Maharashtra

Bhandara

CC/19/22

PURANBAI GOPICHAND ATKARI - Complainant(s)

Versus

DIVISIONAL MANAGER. ORIENTAL INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

MR. DEVENDRA HATKAR

22 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/19/22
( Date of Filing : 16 Jan 2019 )
 
1. PURANBAI GOPICHAND ATKARI
R/O. SOMALWADA. TAH. LAKHANI, BHANDARA
BHANDARA
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. DIVISIONAL MANAGER. ORIENTAL INSURANCE CO. LTD.
DIVISIONAL OFFICE NO.2 8. HINDUSTAN COLONY. NEAR AJNI CHOWK. Wardha Road. Nagpur
NAGPUR.
Maharashtra
2. TAHSILDAAR. TAHSIL OFFICE.
TAH. LAKHANI. BHANDARA 441804
BHANDARA
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 22 Jun 2020
Final Order / Judgement

                             (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, सदस्‍या)

                                                                                            (पारीत दिनांक– 22  जून, 2020)

   

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती ही उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचा पती मृतक श्री गोपीचंद दौलत अतकारी हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची शेती ही मौजा- सोमलवाडा, तहसिल लाखनी, जिल्‍हा भंडारा, येथे भुमापन क्रं 129 या वर्णनाची होती.    तिने पुढे असे नमुद केले की, तिचे पती नामे श्री गोपीचंद दौलत अतकारी याचा दिनांक-08.05.2008 रोजी अपघाती मृत्‍यु झाला. यातील विरुध्‍दपक्ष क्रं- 1 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-2) तहसिलदार असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिचे पतीचा रुपये-1,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने ती पत्‍नी या नात्‍याने कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे. पतीच्‍या मृत्‍यू नंतर तिने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-2 तहसिलदार, तहसिल कार्यालय, लाखनी, जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दाखल केला होता. विरुध्‍दपक्षाने ज्‍या दस्‍ताऐवजाची मागणी केली त्‍या दस्‍ताऐवजांची पुर्तता तिने केली होती.

       तिने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीला तिचा विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह प्राप्‍त होवूनही त्‍यांनी विमा दाव्‍या संबधी कोणताही निर्णय न घेता तिचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवून तिची फसवणूक केली आणि ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे तिला दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्‍यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तिने वकीलामार्फत कायदेशीर नोटीस दिनांक 26/12/2018 रोजीची पाठविली होती. परंतु सदर नोटीसला विरुध्‍दपक्षाने उत्‍तर दिलेले नाही, म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचासमक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍याच्‍या दिनांकापासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच तिला झालेल्‍या मानसिक, शारीरीक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 20,000/- आणि तक्रार खर्च रुपये-10,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केली.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएंटल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड कंपनीने आपले लेखी उत्‍तर अभिलेखावर पान क्रं. 91 ते 94 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, तक्रारकर्तीच्‍या पतीने स्‍वतः विहीरीत उडी मारुन आत्‍महत्‍या केली असल्‍यामुळे व पोलीस दस्‍तऐवजा वरुन आत्‍महत्‍या केल्‍याचे दिसून येत असल्‍याने विमा दाव्‍याच्‍या अटी व शर्तीनुसार विमा दावा रक्‍कम देय होत नाही, म्‍हणून तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक 28/01/2009 रोजीचे पत्रान्‍वये फेटाळण्‍यात आला होता व त्‍याबाबतची सुचना विरुध्‍द पक्ष क्रं.2 व मे. कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा. लि. आणि तक्रारकर्तीला सुध्‍दा देण्‍यात आली असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनी कडून सेवेत कोणत्‍याही प्रकारची त्रुटी झालेली नाही. विरुध्‍दपक्ष क्रं.1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला तिच्‍या पतीच्‍या विमा दाव्‍या संबधात विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत पत्र दिले होते, यामुळे तिने तक्रार अर्जात केलेले कथन साफ खोटे व चुकीचे आहे. विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनी आपल्‍या लेखी उत्‍तरासोबत तक्रारकर्तीला देण्‍यात आलेल्‍या दावा नामंजूरीचे पत्राची प्रत दाखल करीत आहे. सदर पत्राची प्रत विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार आणि कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला सुध्‍दा दिलेली आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार यांनी देखील आपल्‍या लेखी उत्‍तरा सोबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्‍या बाबतचे दिनांक-28.01.2009 रोजीची प्रत दाखल केलेली आहे. तक्रारकर्तीने दिनांक 26/12/2018 रोजी दिलेल्‍या नोटीसला त्‍यांनी उत्‍तर दिलेले आहे. तक्रारकर्तीने पाठविलेल्‍या नोटीस मध्‍ये कोणतीही विस्‍तृत माहिती दिलेली नाही व ग्राहक मंचा समोर तक्रार दाखल करण्‍यासाठी झालेला विलंब माफ व्‍हावा यासाठी मुद्दामून विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला कायदेशीर नोटीस पाठविलेली आहे. मात्र त्‍या अगोदर तक्रारकर्तीचा विमा दावा दिनांक 28/01/2009 रोजी फेटाळण्‍यात आला आहे, म्‍हणून सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम- 24 अे प्रमाणे मुदतबाह्य आहे आणि तक्रारकर्तीने तिचा विमा दावा फेटाळल्‍यानंतर दहा वर्षानंतर ग्राहक मंचा समक्ष तक्रार दाखल केलेली आहे, म्‍हणून सदरची तक्रार मुदतबाहय असल्‍याचे कारणावरुन खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कपंनी तर्फे करण्‍यात आली.

04.  विरुध्‍दपक्ष क्रं. 2 तहसिलदार, लाखनी, तहसिल-लाखनी जिल्‍हा भंडारा यांनी आपला लेखी उत्‍तर पान क्रं. 62 वर दाखल केले असुन त्‍यात नमुद केले की, तक्रारकर्तीचे पती श्री. गोपीचंद अतकरी हे दिनांक 08/05/2008 रोजी शेतातील विहीरीतील पाण्‍यात बुडून मरण पावले. तक्रारकर्तीने विमा दावा प्रस्‍ताव दिनांक 05/07/2008 रोजी तहसिल कार्यालय लाखनी येथे दाखल केला होता. सदर विमा दाव्‍याची  तपासणी करुन विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक सर्व कागदपत्रासह कबाल अन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा. लि. नागपूर-440010 यांचेकडे त्‍यांचे कार्यालयाचे दिनांक-10.07.2008 रोजीचे पत्रान्‍वये सादर करण्‍यात आला होता. विरुध्‍दपक्ष क्रं 1  दि ओरिएंटल इंन्‍शुन्‍स विमा कंपनीने त्‍यांचे पत्राव्‍दारे कळविले होते की, मृतक श्री.गोपीचंद दौलत अतकारी यांचा मृत्‍यु विहीरीत आत्‍महत्‍या करण्‍याच्‍या उद्देशाने उडी घेतल्‍यामुळे झाला असे दाखल कागदपत्रावरुन दिसते त्‍यामुळे विमा पॉलीसी अंतर्गत विमा दावा देय होत नसल्‍यामुळे तो “अस्विकृत” करुन फाईल बंद करीत आहोत असे कळविले.

05.  तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 10 नुसार एकूण-09 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये शेतकरी जनता अपघात योजना शासन निर्णय, मृत्‍यूचे प्रमाणपत्र, वारसान प्रमाणपत्र, ओळखपत्र, पोलीस दस्‍तऐवज, शव विच्‍छेदन अहवाल, 7/12 उतारा, शाळा बदलण्‍याचे प्रमाणपत्र, विरुध्‍दपक्षांना रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली कायदेशीर नोटीस व रजि. पोस्‍टाच्‍या पावत्‍या अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 102 ते 105 वर तक्रारकर्तीने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्‍ट क्रं-111 ते 113 नुसार तिने लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तसेच पान क्रं 130 वरील पुर‍सिस नुसार मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

06.   विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 95 ते 99 वर दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीने पृष्‍ट क्रं- 114 वर लेखी पुरसिस दाखल करुन त्‍यांनी लेखी उत्‍तर शपथेवर दाखल केलेले आहे आणि त्‍यामुळे त्‍यांचे लेखी उत्‍तरालाच शपथेवरील पुरावा समजण्‍यात यावा अशी नमुद केले. तसेच पृष्‍ट क्रं- 115 ते 116 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

07.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार, लाखनी यांनी पान क्रं 62 वर लेखी उत्‍तर दाखल केले. तसेच कार्यालयीन आदेशपत्राची प्रत, त्‍यांनी कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी कडे पाठविलेला विमा दावा प्रस्‍ताव व प्रस्‍तावा सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. तसेच पान क्रं 89 वर विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत दिनांक-28.01.2009 रोजीची प्रत दाखल केली.

08.  तक्रारकर्तीची तक्रार, दाखल केलेले दस्‍तऐवज, शपथेवरील पुरावा, लेखी युक्तिवाद तसेच विरुध्‍दपक्ष क्रं-1) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर, लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍दपक्ष क्रं. 2 तहसिलदार यांचे लेखी उत्‍तर व दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजाचे  ग्राहक मंचा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री देवेंद्र हटकर आणि विरुध्‍दपक्ष  क्रं. 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री. एम. ए. चौधरी यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन ग्राहक मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे- 

                                                                               :: निष्‍कर्ष ::

09.   तक्रारकर्तीचा पती शेतकरी होता, त्‍याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये समावेश होता व तिचे पतीचा मृत्‍यु दिनांक-08/05/2008 रोजी झाला होता या बाबी उभय पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नाहीत.

10.   तक्रारकर्तीचे पती मृतक श्री गांपीचंद दौलत अतकारी याचा विरुध्‍दपक्ष क्रं-2 तहसिलदार, लाखनी यांचे मार्फतीने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे विमा काढलेला होता या बाबी प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांवरुन सिध्‍द होतात आणि या बाबी प्रकरणातील उभय पक्षांना सुध्‍दा मान्‍य आहेत, त्‍या बाबत विवाद नाही.

11.   विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीने आपल्‍या लेखी उत्‍तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्तीच्‍या पतीने स्‍वतः विहीरीत उडी मारुन आत्‍महत्‍या केली असल्‍यामुळे  व तसे पोलीस दस्‍तऐवजात नमुद असल्‍याने विमा दाव्‍याच्‍या अटी व शर्तीनुसार विमा दाव्‍याची रक्‍कम देय होत नाही, म्‍हणून तिचा विमा दावा दिनांक 28/01/2009 रोजीचे पत्र तिचे नावाने पाठवून नामंजूर करण्‍यात आला होता व सदर विमा दावा नामंजूरीचे पत्राची प्रत विरुध्‍दपक्ष क्रं.2 तहसिलदार आणि मे. कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा. लि. यांना सुध्‍दा दिली होती. तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार यांनी सुध्‍दा आपल्‍या लेखी उत्‍तरा सोबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे विमा दावा नामंजूरीचे दिनांक-28.01.2009 रोजीचे पत्राची प्रत दाखल केलेली आहे. विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनी कडून सेवेत कोणत्‍याही प्रकारची त्रुटी झालेली नाही.

     या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे नमुद करण्‍यात येते की, विरुध्‍दपक्ष  क्रं 1 विमा कंपनीने  जरी त्‍यांचे लेखी उत्‍तरामध्‍ये त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचा विमा दावा नामंजूर केल्‍याबाबतचे पत्र पाठविल्‍याचे नमुद केलेले असले तरी सदर विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीस मिळाल्‍यासंबंधीची रजिस्‍टर पोस्‍टाची पोच पावती पुराव्‍या दाखल अभिलेखावर दाखल केल्‍याचे दिसून येत नाही, त्‍यामुळे विमा दावा नामंजूरीचे पत्र तक्रारकर्तीस मिळाले अथवा नाही ही बाब स्‍पष्‍ट होत नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीचे प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये मुदतीची बाधा येत नाही असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे तसेच तक्रारकर्तीच्‍या पतीने विहीरीत उडी मारुन आत्‍महत्‍या केली असल्‍याबाबतचा प्रत्‍यक्षदर्शी (Eye Witness) कोणताही पुरावा ग्राहक मंचासमक्ष आलेला नसल्‍याने विरुध्‍द पक्ष क्रं. 1 विमा कंपनीने घेतलेला आक्षेप नाकारण्‍यात येतो.

12.  तक्रारकर्तीचे वकील श्री.देवेद्र हटकर यांनी प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये आत्‍महत्‍ये संदर्भात  खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाच्‍या निवाडयांवर आपली भिस्‍त ठेवलेली आहे-

01)   Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Aurangabad, First Appeal No.FA/427/2011, Decided on-21/11/2011-“United India Insurance Company Ltd.-Versus-Smt.Sumanbai Rangrao Mugal and others”

 सदर अपिलीय प्रकरणातील आदेशामध्‍ये मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ औरंगाबाद यांनी स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, सदर मृत्‍यू प्रकरणात पोलीसांनी फौजदारी प्रक्रिया संहिते अंतर्गत कलम 174 अनुसार गुन्‍हा नोंदविलेला असून पोलीस चौकशी प्रलंबित आहे. विमा कंपनीने मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही, जेणे करुन ही बाब सिध्‍द होईल की, मृतकाने आत्‍महत्‍या केलेली आहे असे मत नोंदवून ग्राहक मंचाचा निर्णय कायम ठेवला. आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा तक्रारकर्तीचे मृतक पतीने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत पोलीसांनी नोंदविलेल्‍या जाब जबाबा शिवाय सक्षम असा पुरावा दाखल केलेला नाही. पोलीसांनी नोंदविलेला जाब जबाब हा सक्षम पुरावा होऊ शकत नाही असे अनेक निर्णय मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांनी वेळोवेळी दिलेले आहेत. त्‍यामुळे सदरचा न्‍यायनिवाडा हातातील प्रकरणास तंतोतंत लागू पडतो असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

                                                                                             *****

  1. Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, kerala- First Appeal No.FA/311/2013, Decided on-30/04/2014-“Moothodi Ayathar, S/o Madhavan -Versus-The Commissioner, The Kerala Fishermen’s  Welfare Fund Board and Reliance General Insurance Co.Ltd.”

सदर अपिलीय प्रकरणातील आदेशा वरुन अपिल मंजूर केले होते आणि ग्राहक मंचाचा तक्रार खारीज करण्‍याचा आदेश रद्दबातल ठरविला. मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍या बाबतचा सक्षम पुरावा रिलायन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनीने दाखल केला नसल्‍याचे नमुद केले.

                                                                                    *****

13.  या व्‍यतिरिक्‍त तक्रारकर्तीचे वकीलांनी शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या प्रकरणात ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्‍यास जो उशिर झालेला आहे त्‍या संदर्भात खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयांवर भिस्‍त ठेवली-

  1. Hon’ble State Consumer Dispute Redressal Commission, Mumbai, Circuit Bench at Nagpur, First Appeal No.FA/13/205, Decided on-24/04/2017-“National  Insurance Company Ltd.-Versus-Smt.Sushilabai Dnyneshwarrao Bobde and others”

सदर अपिलीय प्रकरणातील आदेशा मध्‍ये मा.राज्‍य ग्राहक आयोग यांनी स्‍पष्‍टपणे नमुद केले की, दावा नामंजूरीचे पत्राची प्रत मूळ तक्रारकर्ती (अपिलीय प्रकरणातील उत्‍तरवादी) हिला मिळाल्‍या बाबत रजिस्‍टर पोस्‍टाची पोच पुराव्‍या दाखल केलेली नसल्‍याने तक्रारीमध्‍ये मुदतीची बाधा येत नसून तक्रार दाखल करण्‍यास सतत कारण घडत असल्‍याने नमुद करुन  विमा कंपनीचे अपिल खारीज केले.

                                                                                 *****

14.    शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या प्रकरणात ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्‍यास जो उशिर झालेला आहे त्‍या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे-

Hon’ble N.C.D.R.C. New-Delhi-Revision Petition No.-1179 of 2015 Decided on-01st December, 2015-“Divisional Manager, Oriential Insurance Company-Versus-Damni & 2 others.

उपरोक्‍त नमुद आदरणीय राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, विमा दावा नाकारल्‍याचे दिनांका पासून मुदत सुरु होते. आमचे समोरील प्रकरणात विमा दावा नाकारल्‍याचे पत्र तक्रारकर्त्‍याला दिल्‍या बाबतचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नसल्‍याने सदर न्‍यायनिवाडा आमचे समोरील प्रकरणात अंशतः लागू होतो असे आमचे मत आहे.

                                                                              *****

15.  पोलीस दस्‍तऐवजाचे आधारे तक्रारकर्तीचे पतीने आत्‍महत्‍या केली होती असा जो निष्‍कर्ष विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने काढलेला आहे त्‍या संदर्भात खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयांवर ग्राहक मंच आपली भिस्‍त ठेवीत आहे-

 

  1.                      2011 (4) CPR-23 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Vyakatesh Babu”.

     सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये “FIR as also the statements recorded by police cannot be used by Insurance Company in support of its case”  पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफआयआरचा उपयोग विमा कंपनीला होणार नाही असे मत नोंदविलेले आहे.

                                                                                 *****

2)   2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”

            सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की,  पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

                                                                                  *****    

 

  1. Hon’ble State Commmission, Punjab, Chandigarh-FA No-1406/2006, decided on-10/06/2011-“ National Insurance Company Ltd.-Versus- Gurmail Kaur”

                                                                                                 *****

 

  1. Hon’ble State Commmission, Mumbai-Compalint Case No.-CC/326/2001, decided on-20/10/2011-“Smt. Mangal Ramesh Sontakke-Versus-National Insurance Company Ltd.”.

                                                                                                    *****

  1. Hon’ble State Commmission, Circuit Bench Nagpur-FA No-205/2013, decided on-24/04/2017-“National Insurance Company-Versus-Smt. Sushila Dnyneshwarrao Bobade & others”

       उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडयांचे आम्‍ही काळजीपूर्वक अवलोकन केले, त्‍यामध्‍ये केवळ पोलीसांचे दसतऐवजांचे आधारावरुन आत्‍महत्‍या केली असा निष्‍कर्ष काढता येत नाही त्‍यासाठी सक्षम असा पुरावा (Substantial  Evidence ) समोर येणे आवश्‍यक असल्‍याचे मत नोंदविलेले आहे. उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतात असे ग्राहक मंचाचे मत आहे.

 

16.  शेतकरी अपघात विमा योजने संदर्भात महाराष्‍ट्र शासन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍ध व्‍यवसाय विकास व मत्‍स्‍य व्‍यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक-24 ऑगस्‍ट 2007 रोजीचे परिपत्रकानुसार विमा दावा विमा कंपनीकडे सादर झाल्‍यापासून त्‍यावर 30 दिवसांच्‍या आत कार्यवाही करणे विमा कंपनीवर बंधनकारक राहिल असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. पान क्रं 19 वरील दाखल ग्राम पंचायत सोमलवाडा, पंचायत समिती लाखनी, जिल्‍हा भंडारा यांचेव्‍दारा निर्गमित मृत्‍यू प्रमाणपत्रा वरुन तक्रारकर्तीचा पती  श्री गोपीचंद दौलत अतकारी याचा मृत्‍यू दिनांक-08.05.2008 रोजी झाल्‍याचे दिसून येते. हातातील प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं 2 तहसिलदार तहसिल कार्यालय, लाखनी, तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा यांनी दिनांक 10/07/2008 रोजीचे पत्रा अन्‍वये मे. कबाल इंशुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना तक्रारकर्तीचा विमा दावा प्रस्‍ताव पाठविलेला आहे, सदर तहसिलदार यांचे पत्राची प्रत पान क्रं 51 वर दाखल आहे, सदर पत्रामध्‍ये तक्रारकर्तीने तहसिलदार यांचे कडे विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-05.07.2008 रोजी दाखल केल्‍याचे सुध्‍दा नमुद आहे. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्तीने तिचे पतीचे मृत्‍यू नंतर केवळ दोन महिन्‍यातच विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजासह तहसिलदार यांचे कार्यालयात सादर केला होता व तहसिलदारांनी सुध्‍दा दिनांक-10.07.2008 रोजी विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस प्रायव्‍हेट लिमिटेड नागपूर यांचेकडे पाठविलेला आहे. पान कं 59 वरील गाव नमुना सहा क मध्‍ये मृतक श्री गोपीचंद दौलत अतकारी याचे मृत्‍यू नंतर कायदेशीर वारसदार म्‍हणून त्‍याची पत्‍नी पुरनबाई गोपींचद अतकारी हिचे नाव दर्शविल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला विहीत मुदतीत मिळाल्‍याचे दिसून येते. तक्रारकर्तीचा विमा दावा  विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनीने त्‍यांचे दिनांक 28/01/2009 रोजीचे पत्र तिचे नावाने पाठवून नामंजूर करण्‍यात केला होता व सदर पत्राची प्रत विरुध्‍दपक्ष क्रं.2 तहसिलदार आणि मे. कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्हिसेस प्रा. लि. यांना दिल्‍याचे सदर पत्रावरुन दिसून येते. परंतु सदर विमा दावा नामंजूरीचे पत्राची प्रत तक्रारकर्तीला रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविल्‍या बाबत रजि. पोस्‍टाची पावती व रजि. पोच विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने पुराव्‍या दाखल सादर केलेली नाही. तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दिनांक-16 जानेवारी, 2019 रोजी दाखल केली परंतु वर नमुद केल्‍या प्रमाणे विमा दावा नामंजूरीचे पत्राची प्रत तिला मिळाल्‍या बद्दलचा कोणताही पुरावा अभिलेखावर दाखल केलेला नाही, त्‍यामुळे जो पर्यंत तिला विमा दाव्‍याचे मंजूरी/नामंजूरी बाबत कळविण्‍यात येत नाही तो पर्यंत तक्रारीचे कारण हे सतत घडत (Cause of Action is continuing) असे असे ग्राहक मंचाचे मत आहे. दुसरी बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-28.01.2009 रोजीचे विमा दावा नामंजूरीचे पत्रात मृतक श्री गोपीचंद दौलत अतकारी याने विहिरीत उडी मारुन आत्‍महत्‍या केल्‍या बाबत जो निष्‍कर्ष काढला, त्‍या संबधाने कोणताही सक्षम पुरावा (Substantial Evidence), प्रत्‍यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब (Statement of Eye Witness) दाखल केलेला नाही. तसेच पोलीस दस्‍तऐवजा मध्‍ये सुध्‍दा मृतक श्री गोपीचंद याने आत्‍महत्‍या केल्‍या बाबत कोणताही उल्‍लेख नाही असे असताना विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने मृतकाने आत्‍महत्‍या केल्‍यामुळे विमा दाव्‍याची रक्‍कम देय होत नाही असा जो निष्‍कर्ष काढला तो निष्‍कर्ष योग्‍य अशा सक्षम पुराव्‍याचे अभावी नामंजूर करण्‍यात येतो. तक्रारकर्तीला तिचे पतीचे मृत्‍यू पःश्‍चात देय विमा दाव्‍याची रक्‍कम नामंजूर करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते आणि त्‍यामुळे तिला निश्‍चीतच शारिरीक व मानसिक त्रास झालेला आहे.

17.   उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-1,00,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1) विमा कंपनी कडून विमा दावा प्रस्‍ताव नाकारल्‍याचा दिनांक-28.01.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याजासह मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. या शिवाय विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तिला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5,000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त)  विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीकडून तक्रारकर्तीला मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे, असे ग्राहक मंचाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं-(2) तहसिलदार, लाखनी, तालुका-लाखनी जिल्‍हा भंडारा यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा तक्रारकर्तीला दिल्‍याचे दिसून येत नाही वा तसे तिचे म्‍हणणे सुध्‍दा नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे, त्‍यावरुन ग्राहक मंचाव्‍दारे हातातील तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

                                                                             :: अंतिम आदेश ::

 

(01)  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक, विभागीय कार्यालय, नागपूर यांचे विरुध्‍द  खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष 1 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- (अक्षरी रुपये एक लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर रकमेवर दिनांक-28.01.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्तीला अदा करावे.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 1 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला अदा करावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष -(2) तहसिदार, लाखनी, तहसिल कार्यालय, लाखनी जिल्‍हा भंडारा  यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 विमा कंपनीने प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर अंतिम आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी मुदतीनंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.