Maharashtra

Bhandara

CC/18/69

MAROTI RAMDAS MESHRAM - Complainant(s)

Versus

DIVISIONAL MANAGER. NATIONAL INSURANCE CO. LTD. - Opp.Party(s)

MR. UDAY P. KSHIRSAGAR

23 Dec 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/69
( Date of Filing : 25 Oct 2018 )
 
1. MAROTI RAMDAS MESHRAM
R/O BOTHLI TA. LAKHANDUR. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIVISIONAL MANAGER. NATIONAL INSURANCE CO. LTD.
DIVISIONAL OFFICE Bhausaheb shiroli bhavan. 4TH FLOOR. PMT BUILDING. DECKAN GYMKHANA. SHIVAJINAGAR. PUNE 411004
PUNE
MAHARASHTRA
2. BRANCH MANAGER. NATIONAL INSURANCE CO. LTD. NAGPUR
BRANCH DHARAMPETH. SAKET. LAXMI BHAVAN CHOWK. NAGPUR.
NAGPUR
MAHARASHTRA
3. TALUKAKRUSHI ADHIKARI. LAKAHANDUR
TA.LAKHANDUR. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:MR. UDAY P. KSHIRSAGAR , Advocate
For the Opp. Party:
Dated : 23 Dec 2019
Final Order / Judgement

                  (पारीत व्‍दारा  श्री नितीन माणिकराव घरडे, सदस्‍य.)

                                                                                (पारीत दिनांक– 23 डिसेंबर, 2019)

   

01.  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी आणि इतर विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्‍याचा मुलगा श्री राहूल मारोती मेश्राम याचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ता हा उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, त्‍याचा मुलगा मृतक श्री राहुल मारोती मेश्राम हा व्‍यवसायाने शेतकरी होता व त्‍याचे मालकीची शेत जमिन ही मौजा- गुंजेपार, तहसिल लाखांदुर, जिल्‍हा भंडारा, येथे भुमापन क्रं -189 या वर्णनाची होती.

    तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याचा मुलगा नामे श्री राहुल मारोती मेश्राम याचा दिनांक-17.05.2016 रोजी मित्राच्‍या मोटरसायकलवर मागे बसून जात असताना सदर मोटरसायकल घसरुन पडल्‍याने जख्‍मी होऊन मोक्‍क्‍यावरच त्‍याचा मृत्‍यु झाला. यातील विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तक्रारकर्त्‍याचे मुलाचा रुपये-2,00,000/- एवढया रकमेचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीकडे काढण्‍यात आला असल्‍याने तो वडील या नात्‍याने “लाभार्थी” आहे. मुलाचे अपघाती मृत्‍यू नंतर त्‍याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी लाखांदुर, जिल्‍हा भंडारा  यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-05.08.2016 रोजी दाखल केला होता. तसेच विरुध्‍दपक्षाने ज्‍या दस्‍ताऐवजाची मागणी केली त्‍या दस्‍ताऐवजांची पुर्तता तक्रारकर्त्‍याने केली होती.

    तक्रारकर्त्‍याने पुढे नमुद केले आहे की, विरुध्‍द पक्ष क्रं. 2 विमा कंपनीने दिनांक-16.07.2017 रोजीचे पत्राव्‍दारे 7/12 उता-यावर मृतक शेतक-याचे नाव दिनांक-01.12.2015 नंतर असल्‍याने विमा दावा नामंजूर करण्‍यात येतो असे कारण दर्शवून त्‍याचा विमा दावा नामंजूर केला. ही विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे तक्रारकर्त्‍याला दिलेली दोषपूर्ण सेवा असून, त्‍यामुळे त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्‍हणून शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा कडून विमा दाव्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- विमा दावा प्रस्‍ताव सादर केल्‍याचा दिनांक-06.08.2016 पासून द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह मिळावी तसेच त्‍याला झालेल्‍या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये 30,000/- आणि तक्रार खर्च रुपये-20,000/- अशा रकमांची मागणी विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केलेली आहे.

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे विभागीय कार्यालय, पुणे यांना ग्राहक मंचाव्‍दारे रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस मिळाल्‍या बद्यलची रजि.पोच अभिलेखावर दाखल आहे परंतु ते अशी रजि.नोटीस मिळूनही ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाहीत म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश ग्राहक मंचाने प्रकरणात दिनांक-27.03.2019 रोजी पारीत केला.

04.  विरुध्‍दपक्ष क्रं 2 नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे शाखा अधिकारी, शाखा कार्यालय, नागपूर यांनी आपले लेखी उत्‍तर अभिलेखावर पान क्रं 57 व 58 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात असे नमुद केले की, मृतक श्री राहूल मेश्राम हा दिनांक-17 मे, 2016 रोजी मरण पावला परंतु 7/12 चे उता-यावर सदर शेतक-याचे नाव दिनांक-01.12.2015 नंतरचे असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने मृतक श्री राहूल मेश्राम याचे अपघाती मृत्‍यू संबधातील विमा दावा नामंजूर केला आणि विमा कंपनीने केलेली ही कार्यवाही पॉलिसीचे अटी, शर्ती व नियमा नुसार केलेली आहे. विमा कंपनीने नियमा नुसार कार्यवाही केलेली असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही, सबब तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज करण्‍यात यावी.

05.  विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, जिल्‍हा भंडारा यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर पान क्रं- 61 ते 63 वर दाखल केले. त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचा मुलगा नामे  श्री राहुल मारोती मेश्राम याचे नावे मौजा गुंजेपार, तालुका लाखांदुर, जिल्‍हा भंडारा येथे  भूमापन क्रं 189 शेती होती व तो शेतीचा व्‍यवसाय करीत होता या बाबी मान्‍य केल्‍यात. तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचा दिनांक-17 मे, 2016  रोजी तो आपल्‍या मित्राच्‍या मोटरसायकलवर मागे बसून जात असताना सदर दुचाकी वाहन घसरुन पडल्‍याने जख्‍मी होऊन मोक्‍यावरच मृत्‍यू झाला ही बाब मान्‍य केली. तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-05.08.2016 रोजी दाखल केला असता त्‍यांनी लगेच म्‍हणजे दिनांक-11.08.2016 रोजी जिल्‍हा अधिक्षक, कृषी अधिकारी भंडारा यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह दाखल केला. विमा दावा मंजूर करणे अथवा नामंजूर करणे ही बाब त्‍यांचे अधिकारक्षेत्रात येत नाही. करीता त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती केली.

06.  तक्रारकर्त्‍याने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ट क्रं- 10 नुसार एकूण-12 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये शेतकरी अपघात योजना शासन निर्णय-2015-2016,  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात विमा दावा व आवश्‍यक दस्‍तऐवजाच्‍या प्रती, तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केल्‍या बाबत वि.प.क्रं 2 विमा कंपनीने पाठविलेल्‍या पत्राच्‍या प्रती, तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचे नावाचा 7/12 उतारा व ईतर शेतीचे दस्‍तऐवज,तक्रारकर्त्‍याच्‍या मुलाचा अपघाती मृत्‍यू संबधात एफ.आय.आर.आणि ईतर पोलीस दस्‍तऐवजाच्‍या प्रती, मृतकाचा शव विच्‍छेदन अहवाल, मृत्‍यू प्रमाणपत्र, तलाठी यांचे प्रमाणपत्र, सरपंच ग्रामपंचायत बोथले यांचे प्रमाणपत्र, तक्रारकर्त्‍याचे मुलाचे वयाचे प्रमाणपत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. पृष्‍ट क्रं- 68 ते 69  वर तक्रारकर्त्‍याने शपथेवरील पुरावा दाखल केला असून, पृष्‍ट क्रं-70 व 71 नुसार तक्रारकर्त्‍याने लेखी युक्‍तीवाद दाखल केला आहे. तसेच मा. वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

07.   विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर अभिलेखावरील पान क्रं 57 व 58 वर दाखल केले. तसेच पुराव्‍याचे शपथपत्र पृष्‍ठ क्रं- 73  वर दाखल केले. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने लेखी युक्‍तीवाद पान क्रं 72 वर दाखल केला.

08.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, जिल्‍हा भंडारा यांनी त्‍यांचे लेखी उत्‍तर पान क्रं- 61 ते 63 वर दाखल केले.

09.  तक्रारकर्त्‍याची तक्रार, शपथपत्र,  विरुध्‍दपक्ष क्रं-2) विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर व शपथपत्र  तसेच वि.प.क्रं 3 यांचे लेखी उत्‍तर तसेच उभय पक्षाने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री उदय क्षिरसागर आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे वकील श्री विनय भोयर यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन ग्राहक मंचा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

1

तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2  विमा कंपनीचा ग्राहक होतो काय?

-होय-

2

वि.प.क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

-होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

   

                                                                                             :: निष्‍कर्ष ::

मुद्दा क्रं 1 बाबत

10.  तक्रारकर्त्‍याचा मृतक मुलगा नामे श्री राहुल मारोती मेश्राम हा शेतकरी होता व त्‍याचे मालकीची मौजा गुंजेपार, तालुका लाखांदुर, जिल्‍हा भंडारा येथे भूमापन क्रं 189 शेती होती या बाबी उभय पक्षांमध्‍ये विवादास्‍पद नसून विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा मृतकाचे नावाची उशिराने फेरफारपत्रकात आणि 7/12 चे उता-यात नोंद झाल्‍या संबधी आक्षेप आहे. शेतकरी अपघात विमा योजने नुसार संबधित मृतक शेतकरी याचे कायदेशीर वारसदार हे विमा योजने प्रमाणे देय विमा रकमेचे लाभार्थी ठरत असल्‍याने वडील या नात्‍याने लाभार्थी म्‍हणून तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचा ग्राहक ठरत असल्‍याने आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर  होकारार्थी नोंदवित आहोत.

मुद्दा क्रं 2 व 3 बाबत

11.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार मृतक श्री राहूल मारोती मेश्राम हा दिनांक-17 मे, 2016 रोजी मरण पावला परंतु 7/12 चे            उता-यावर सदर शेतक-याचे नाव दिनांक-01.12.2015 नंतरचे असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने मृतक श्री राहूल मेश्राम याचे अपघाती मृत्‍यू संबधातील विमा दावा नामंजूर केला आणि त्‍यांनी केलेली सदरची कार्यवाही ही पॉलिसीचे अटी, शर्ती व नियमा नुसार केलेली आहे.

12.    आम्‍ही पान क्रं 15 वर दाखल तक्रारकर्त्‍याचे मुलाचे अपघाती मृत्‍यू संबधाने विमा दावा नामंजूरी संबधात विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने मा.कृषी आयुक्‍त, पुणे यांना तसेच श्री सतिश मारोती मेश्राम यांना दिनांक-16 जुलै, 2017 रोजी पाठविलेल्‍या पत्राचे प्रतीचे अवलोकन केले असून त्‍यामध्‍ये                  7/12 चे उता-यावर शेतक-याचे नाव दिनांक-01.12.2015 नंतर असल्‍यामुळे विमा दावा नामंजूर असे नमुद केलेले आहे.  आम्‍ही पान क्रं 22 वरील दाखल गाव नमुना 7/12 चे अवलोकन केले त्‍यामध्‍ये सर्वश्री रामा लक्ष्‍मण रामटेके, अभिमण लक्ष्‍मण रामटेके, मारोती लक्ष्‍मण रामटेके, देवांगणा दाजी रामटेके, सतिश मारोती मेश्राम, राहूल मारोती मेश्राम, अनुता सुनिल खोब्रागडे,पोर्णीमा  सिताराम रंगारी अशी नावे नमुद असून सदरची संपूर्ण नावे ही फेरफार  क्रं 457, दिनांक-27.06.2016 रोजी 7/12 उता-यावर चढविलेली असून भूमापन क्रं 189, गाव गुंजेपार, तालुका लाखांदुर, जिल्‍हा भंडारा असे नमुद आहे.

13.   तक्रारकर्त्‍याचा मुलगा मृतक नामे श्री राहूल मारोती मेश्राम याचा दिनांक-17 मे, 2016 रोजी मृत्‍यू झालेला असून त्‍याचे नावाचा फेरफार हा त्‍याचे मृत्‍यू नंतर दिनांक-27 जून, 2016 रोजी घेतलेला आहे. सदर 7/12 उता-यामध्‍ये मृतक श्री राहूल मारोती मेश्राम सोबत त्‍याचा भाऊ सतिश मारोती मेश्राम याचे नावाची सुध्‍दा नोंद आहे. पान क्रं 24 वर दाखल फेरफारपत्रका मध्‍ये गाव गुंजेपार, तालुका लाखांदुर, जिल्‍हा भंडारा येथील भूपान क्रं 457 संदर्भात असे नमुद आहे की, मृतक राहूल मारोती मेश्राम आणि त्‍याचा भाऊ सतिश मारोती मेश्राम यांची आई नामे सुगंधा मारोती मश्राम ही दिनांक-28.12.2004 रोजी मरण पावली असून त्‍यांचे वारसदार श्री सतिश मारोती मेश्राम, मुलगा, श्री राहुल मारोती मेश्राम (मृतक), मुलगा, सौ.अमृता सुनिल खोब्रागडे (विवाहित मुलगी), सौ.पोर्णीमाबाई सिताराम रंगारी(विवाहित मुलगी) वरील प्रमाणे वारसान असल्‍याचे नमुद केलेले असून त्‍यानुसार वारसान फेरफार नोंद क्रं 174 प्रमाणे दिनांक-27.06.2016 रोजी घेतल्‍याचे दिसून येते. यावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, मृतक श्री राहूल मारोती मेश्राम आणि त्‍याचा भाऊ श्री सतिश मारोती मेश्राम आणि उपरोक्‍त नमुद दोन्‍ही विवाहित बहीणी यांची आई नामे सुगंधा मारोती मेश्राम हिचे नावाने शेती होती आणि तिचे मृत्‍यू नंतर कायदेशीर वारसदार म्‍हणून तिची मुले आणि मुली यांचे नावाची फेरफार नोंद जरी उशिराने झालेली असली तरी तिचे मृत्‍यू नंतर तिची मुले व मुली हे त्‍याचवेळी म्‍हणजे तिचे मृत्‍यू नंतर लगेच वारसाहक्‍काने जमीनीचे मालक झालेले आहेत. या प्रकरणामध्‍ये  मृतक श्री राहूल मारोती मेश्राम याचे नावाची फेरफार नोंद त्‍याचे मृत्‍यू नंतर केलेली आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की, मृतक श्री राहूल मारोती मेश्राम हा अपघाती मृत्‍यू दिनांक-17 मे, 2016 रोजी शेतकरी नव्‍हता व त्‍याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये समावेश नव्‍हता. वस्‍तुतः मृतक श्री राहूल मारोती मेश्राम याची आई नामे सुगंधा मारोती मेश्राम हिचे सन-2004 मध्‍ये निधन झालेले असल्‍याने तिचे मृत्‍यू नंतर तिचे मुल व मुली हे वारसाहक्‍काने त्‍या शेताचे मालक झालेले आहेत फरक एवढाच झालेला आहे की, तिचे मुल आणि मुली यांचे नावाची मालकी हक्‍काची फेरफार नोंद ही सरकारी अभिलेखावर उशिराने झालेली आहे, परंतु मालकी हक्‍काची फेरफार नोंद उशिराने करण्‍यात आली म्‍हणून त्‍यांचे शेतीचे स्‍वामीत्‍व मालकी हक्‍क हिरावल्‍या जात नाही हे येथे लक्षात घेणे गरजेचे व आवश्‍यक आहे, असे या प्रकरणात ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, त्‍यामुळे मृतक   श्री राहूल मारोती मेश्राम हा अपघाती मृत्‍यूचे दिनांकास शेतकरी होता व त्‍याचा शेतकरी अपघात विमा योजने मध्‍ये समावेश होता असा निष्‍कर्ष निघतो परंतु चुकीचे कारण पुढे करुन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने त्‍याचे वडील तक्रारकर्ता श्री मारोती रामदास मेश्राम यांचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते, म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत.

14.   या संदर्भात तक्रारकर्त्‍याचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी खालील नमुद मा.राष्‍ट्री ग्राहक आयोगाचे न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला-

     IV (2012) CPJ 51 (N.C.) . NATIONAL CONSUMER DISUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI – Reliance General Insu. co. ltd.. – Vs Sakorba Hetubha Jadeja  & ors.

     या प्रकरणात शेतकरी अपघात विमा योजना लागू होण्यापूर्वी शेतक-याच्या वडिलांच्या मृत्‍युमुळे त्याला शेतजमिनीत वारसा हक्काने मालकी झाली असेल परंतु सरकारी जमीन अभिलेखामध्‍ये वेळीच फेरफार नोंद घेण्यांत न आल्याने विमा योजना सुरू झाली त्या दिवशी अशा शेतक-याचे नांव 7/12 मध्ये नोंदविलेले नसेल आणि ते नंतर नोंदण्यात आले असेल तर असा शेतकरी अपघाताने मरण पावल्यास त्याचे वारसदार शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतात काय? असा मुद्दा माननीय राष्ट्रीय आयोगासमोर उपस्थित झाला होता,  त्‍यावर माननीय राष्ट्रीय आयोगाने खालीलप्रमाणे अभिप्राय नोंदविला आहे.

      “ Nothing among the records produced by Mr. Nandwani (from among those produced before and considered by the District Forum) is contrary to the cogent analysis of the documentary evidence by the District Forum. Moreover, if as per the entries in  Village Form 6 extract, the date of death of Bharmalji Bapeeji Jadeja was nearly five months before the date of the said entry’    i.e., 12.04.2002, Bharmalji died sometime in December 2001.   Hence, all his legal heirs became registered farmers immediately after the death of their father and it was only the statutory process   of registration of the legal heirs in the village record of rights after the death of a farmer that took time, leading to the final entry    showing the names of Hetubha Jadeja and others as the legal right   pertaining to the agricultural land owned by their father being       made in Village Form 6 on 12.04.2002. Therefore, it has to be held that sometime in December 2001, i.e., well before  26.01.2002, the date of inception of the insurance policy in question, Hetubha Jadeja become a registered farmer as one of the legal heir of his deceased father who was a registered farmer.    Hence, on his death in May 2002, his heirs, i.e. the    respondents/complainants were entitled to receive the sum assured within 30 days of the proposal for claim being submitted.”

            माननीय राष्ट्रीय आयोगाच्या वरील निर्णयाच्या आधारे हे स्पष्ट होते की, शेतकरी अपघात विमा योजना लागू होण्यापूर्वी शेतक-याच्या वडिलांच्या मृत्‍युमुळे त्याला शेतजमिनीत वारसा हक्काने मालकी मिळाली होती परंतु वेळीच शासकीय जमीन अभिलेखामध्‍ये फेरफार नोंद घेण्यांत न आल्याने विमा योजना सुरू झाली त्या दिवशी अशा शेतक-याचे नांव 7/12 मध्ये नोंदविले गेल्‍या नसेल आणि ते नाव नंतर नोंदण्यात आले असेल तरी असा शेतकरी अपघाताने मरण पावल्यास त्याचे वारसदार शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतात असे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. आमचे समोरील हातातील प्रकरणात मृतक श्री राहूल मारोती मेश्राम याचे पूर्वी जमीनीच्‍या अभिलेखामध्‍ये त्‍याची आई नामे श्रीमती सुगंधा मारोती मेश्राम हिचे नावाची नोंद होती, याचाच अर्थ असा होतो की, तिची कायदेशीर वारसदार  मुले व मुली म्‍हणजे श्री सतिश मारोती मेश्राम, मुलगा, श्री राहुल मारोती मेश्राम (मृतक), मुलगा, सौ.अमृता सुनिल खोब्रागडे (विवाहित मुलगी), सौ.पोर्णीमाबाई सिताराम रंगारी(विवाहित मुलगी) हे त्‍यावेळी सुध्‍दा शेतीचे मालक होते व आहेत. आई श्रीमती सुगंधा मारोती मेश्राम हिचे मृत्‍यू नंतर जरी मृतक श्री राहूल मारोती मेश्राम याचे नाव उशिराने जमीन अभिलेखामध्‍ये नोंदविल्‍या गेले असेल तरी शेतकरी अपघात योजनेच्‍या कालावधीत मृतक श्री राहूल मारोती मेश्राम हा शेतकरी होता ही बाब उपरोक्‍त मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे न्‍यायनिवाडयाचा अभ्‍यास केल्‍यास स्‍पष्‍ट होते त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीची मृतक श्री राहूल मारोती मेश्राम याचे नावाची 7/12               उता-यावरील नोंद दिनांक-01.12.2015 नंतरची असल्‍यामुळे त्‍याचे वडील तक्रारकर्ता श्री मारोती रामदास मेश्राम यांचा विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती चुकीची असल्‍याचे दिसून येते,त्‍यामुळे हातातील प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचा उपरोक्‍त नमुद न्‍यायनिवाडा तंतोतंत लागू पडतो असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

15.   तक्रारकर्त्‍याचे वकील श्री उदय क्षिरसागर यांनी खालील नमुद अनुक्रमे मा.राज्‍य ग्राहक आयोग, खंडपिठ नागपूर आणि खंडपिठ औरंगाबाद यांनी दिलेल्‍या न्‍यायनिवाडयांचा आधार घेतला-

         (I) Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra Nagpur Circuit Bench, Nagpur-First Appeal No.-A/16/49, Order date-20th March, 2019-“Tata AIG General Insurance Company Ltd.-Versus-Smt Asha Gunwant Koche & Smt. Pramila C. Patle”

         (II) Hon’ble State Consumer Disputes Redressal Commission Maharashtra Circuit Bench, Aurangabad-First Appeal No.-307 of 2018, Order date-08th August 2019-“National  Insurance Company Ltd.-Versus-Smt Rukhminibai Sakharan Kharat”

     उपरोक्‍त नमुद अनुक्रमे मा.राज्‍य ग्राहक आयोग खंडपिठ नागपूर आणि  खंडपिठ औरंगाबाद यांनी दिलेल्‍या न्‍यायनिवाडयाचे आम्‍ही काळजीपूर्वक वाचन केले असता त्‍यामध्‍ये सुध्‍दा उपरोक्‍त नमुद मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, दिल्‍ली यांनी “Reliance General Insu. co. ltd. – Vs- Sakorba Hetubha Jadeja  & ors” या प्रकरणाचा आधार घेऊन विमा कंपनीचे अपिल खारीज केलेले आहे. तसेच असे मत नोंदविले की, मृतकाचे नावाची फेरफार नोंद जरी उशिराने सरकारी जमीन अभिलेखात झालेली असली तरी मृतक शेतकरी हा अपघाती घटनेच्‍या वेळी वारसाहक्‍कामुळे शेतकरी असल्‍याने विमा दावा विमा कंपनीला नामंजूर करता येणार नाही.

16.  उपरोक्‍त नमुद तिन्‍ही न्‍यायनिवाडे हे आमचे वरीष्‍ठ न्‍यायालय अनुक्रमे मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, दिल्‍ली, मा.राज्‍य ग्राहक आयोग खंडपिठ नागपूर आणि औरंगाबाद यांनी दिलेले असून सदर न्‍यायनिवाडे हे हातातील प्रकरणात तंतोतंत लागू पडतात व मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाने दिलेले न्‍यायनिवाडे हे प्रस्‍तुत ग्राहक मंचावर बंधनकारक आहेत असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

17.  उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थिती आणि मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे लक्षात घेता ग्राहक मंचाचे असे स्‍पष्‍ट मत आहे की, विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा मृतक मुलगा नामे श्री राहूल मारोती मेश्राम याचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा नामंजूर करुन सेवेत त्रृटी दिल्‍याची बाब स्‍पष्‍ट दिसून येते. करीता तक्रारकर्त्‍याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे त्‍याचा मृतक मुलगा नामे श्री राहूल मारोती मेश्राम याचे अपघाती मृत्‍यू संबधात विम्‍याची रक्‍कम रुपये-2,00,000/- आणि सदर विमा रकमेवर महाराष्‍ट्र शासनाचे परिपत्रका नुसार सर्वप्रथम विमा दावा दाखल केल्‍याचे दिनांका पासून 60 दिवसांचे आत विमा कंपनीला निर्णय देणे बंधनकारक असल्‍याने तक्रारकर्त्‍याने सर्वप्रथम विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर, जिल्‍हा भंडारा यांचे कार्यालयात दिनांक-05.08.2016 रोजी दाखल केलेला असल्‍याने दाखल दिनांका पासून दोन महिने म्‍हणजे दिनांक-05.10.2016 पासून   द.सा.द.शे.-12% दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई आणि तक्रारीचा खर्च मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित आहे असे ग्राहक मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, त्‍यावरुन ग्राहक मंचाव्‍दारे प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येतो-

                                                                                    :: अंतिम आदेश ::

(01)  तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2  नॅशनल  इन्‍शुरन्‍स कंपनी, अनुक्रमे विभागीय कार्यालय, पूणे व शाखा कार्यालय, नागपूर यांचे विरुध्‍द  वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष 1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याचा मुलगा नामे श्री राहूल मारोती मेश्राम याचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अदा करावी आणि सदर विमा रकमेवर दिनांक-05.10.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने येणा-या व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याला दयावी.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 1  व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या  मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला अदा करावेत.

(04) विरुध्‍दपक्ष -(3) तालुका कृषी अधिकारी, लाखांदुर,जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे. विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली देय विमा राशी दिनांक-05.10.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-15% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्त्‍याला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध  करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्त्‍याला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.