(मंचाचे निर्णयान्वये, श्री रत्नाकर ल.बोमीडवार, सदस्य)
(पारीत दिनांक : 24 ऑक्टोंबर 2011)
... 2 ... (ग्रा.त.क्र.14/2011)
अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार मय्यत भक्तदास सखाराम निकोडे यांची विधवा असून, त्यांचे दि.27.6.2010 रोजी शेतात काम करीत असतांना विज पडून आकस्कीक मृत्यु झाला. या अपघाती मृत्यु संबंधाने अर्जदाराने शेतकरी अपघाती विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.3 यांचे मार्फतीने दि.6.12.2010 ला अर्ज सादर केला होता. अर्जा सोबत आवश्यक सर्व दस्ताऐवज सुध्दा गैरअर्जदाराकडे पाठविले होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदाराचा दावा क्र.230200/47/10/99/00000067, दि.8.4.2011 रोजी नामंजूर केला. अर्जदाराचा दावा चुकीचे कारणाने नामंजुर केलेला आहे. अर्जदाराने पॉलिसी पिरेडमध्ये कृषि अधिकारी कडे सुचना न दिल्याचे चुकीचे कारण दर्शवून गैरअर्जदार क्र.1 यांनी दावा नामंजुर केला.
2. वास्तविक, असे कारण संयुक्तीक नाही, कारण मृत्युच्या तारखेला गैरअर्जदार क्र.1 कडे इंशुरन्स योजना असून, एका वर्षाच्या कालावधीत कृषि अधिकारी यांचेकडे अर्जदाराने सुचना दिली होती. गैरअर्जदार क्र.2 ही महाराष्ट्र कृषि मंञालया अंतर्गत नेमणूक केलेली सेवा पुरविणारी खाजगी संस्था आहे. शेतकरी अपघात विमा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 ची आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी सर्व कागदपञे पूर्ण तपासणी न करता अर्जदाराचा दावा नामंजुर केला. अर्जदाराला गैरअर्जदाराचे सेवेमध्ये ञुटी असल्यामुळे, शारिरीक, मानसिक ञास सहन करावा लागला. त्यामुळे, गैरअर्जदाराने मुळ दावा रुपये 1,00,000/- व त्यावरील व्याज रुपये 30,000/- दि.6.12.10 ते 5.5.2011 पर्यंतचे व्याज, गैरअर्जदाराकडे दावा दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/-, मानसिक ञासापोटी रुपये 25,000/- व तक्रार दाखल करण्याकरीता लागलेला खर्च रुपये 5000/- असे एकूण रुपये 1,70,000/- अर्जदाराला देण्याचा आदेश व्हावा अशी मागणी केली आहे.
3. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 18 दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस काढण्यांत आले. गैरअर्जदार हजर होऊन लेखी बयान दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र.13 नुसार लेखी बयान दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.12 नुसार लेखी बयान व सोबत दस्ताऐवज दाखल केले. गैरअर्जदार क्र.3 ने नि.क्र.10 नुसार लेखी बयान व नि.क्र.11 नुसार 1 दस्ताऐवज दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र.1 ने माहिती अभावी अमान्य व नाकबूल केले की, भक्तदासचा दि.27.6.2010 रोजी शेतात काम करीत असतांना विज पडल्यामुळे मृत्यु
... 3 ... (ग्रा.त.क्र.14/2011)
झाला. मय्यत मारोती हा शेतमजुरीचे काम करीत नव्हता. कास्तकारी हा त्याचा व्यवसाय नव्हता. अर्जदाराला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मागण्याचा हक्क अधिकार नाही. तसेच, अर्जदाराची तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे. मृतकाचे वारसानी गैरअर्जदाराकडे दावा मुदतीच्या आंत सादर केला नाही. अर्जदाराने मुदतीच्या आत क्लेम सादर केला नाही म्हणून नुकसान भरपाई देण्याची गैरअर्जदार क्र.1 ची जबाबदारी नाही. तसेच, मृत्युची वेळीच सुचना दिलेली नाही. शेतीकरी अपघात विमा योजना पॉलिसीच्या अटी व शेर्तीनुसार कार्यवाही करणे उभय पक्षांवर बंधनकारक आहे. अर्जदाराने त्याचा भंग केल्यामुळे विमा क्लेम देण्याची गैरअर्जदाराची जबाबदारी नाही.
5. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदाराकडून क्लेम फार्म मुदतीत सादर करण्यांत आले नाही. पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे अर्जदाराचा क्लेम नियमबाह्य असल्यामुळे नामंजुर करण्यांत आला. त्यामुळे, खारीज होण्यास पाञ आहे.
6. गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी बयाणात नमुद केले की, महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतो. तालुका कृषीधिकारी, तहसिलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपञे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजुर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढाच आहे. तक्रारीतून गैरअर्जदार क्र.2 ची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली.
7. गैरअर्जदार क्र.3 ने लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदार मय्यत भक्तदास सखाराम निकोडे यांची विधवा पत्नी असून, त्यांचा दि.26.6.2010 रोजी शेतात काम करीत असतांना विज पडून आकस्मिक मृत्यु झाला. अर्जदाराचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता प्रस्ताव जिल्हा अधिक्षक, कृषि अधिकारी, गडचिरोली कार्यालयाकडून पञ क्र. सां./शे.अ.वि./196/2011, दि.21.1.2011 अन्वये कबाल इंन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. यांना आवश्यक सर्व दस्ताऐवजासह सादर करण्यांत आला.
8. अर्जदाराने रिजाईन्डर देणार नाही अशी पुरसीस नि.क्र.14 नुसार दाखल केली. गैरअर्जदार यांना संधी देवूनही शपथपञ दाखल केले नाही. त्यामुळे नि.1 वर प्रकरण गैरअर्जदाराचे शपथपञाशिवाय पुढे चालविण्यात यावे असा आदेश दि.29.7.2011 ला पारीत करण्यांत आला. गैरअर्जदार यांनी युक्तीवाद केला नाही. त्यामुळे उपलब्ध रेकॉर्डवरुन तक्रार निकाली काढण्याकरीता ठेवण्यात यावे असा आदेश नि.1 वर दि.26.9.2011 ला पारीत करण्यांत आले. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी
... 4 ... (ग्रा.त.क्र.14/2011)
बयान, दस्ताऐवज व अर्जदारांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
9. अर्जदार हीचे पती भक्तदास सखाराम निकोडे यांचा दि.27.6.2010 रोजी शेतात काम करीत असतांना विज पडून मृत्यु झाल्याचे अर्जदाराने दाखल केलेल्या कागदपञ व पोलीस दस्ताऐवजावरुन दिसून येते. अर्जदार ही मृतकाची वारसदार व पत्नी असल्यामुळे, क्लेम फॉर्म, सर्व दस्ताऐवजासह गैरअर्जदार क्र.3 च्या मार्फत दि.6.12.2010 ला सादर केला.
10. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी बयाणात सांगीतले की, सदर प्रस्ताव आमच्या कार्यालयात जिल्हा कृषि अधिकारी कार्यालया मार्फत दि.14.1.2011 ला प्राप्त झाला व सदर दावा पुढील कार्यवाहीसाठी युनायटेड इंशुरंन्स इंडिया कंपनी नागपूर यांचेकडे दि. 25.1.2011 ला पाठविण्यात आला. परंतु, विमा कंपनीने दि.8.4.2011 च्या पञाव्दारे सदर दावा अर्ज मुदतीत न दिल्यामुळे फेटाळला.
11. गैरअर्जदा क्र.2 यांचे म्हणणे असे आहे की, महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबविण्यासाठी बिना मोबदला सहाय्य करतो. तालुका कृषि अधिकारी/तहसिलदार यांच्या मार्फत आलेला विमा दावा अर्ज योग्य आहे की, नाही हे पाहून त्याची पुर्तता करुन दावा मंजुर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसास देणे, ऐवढेच काम आहे. हे गैरअर्जदार क्र.2 चे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे, असे या मंचाचे मत आहे.
12. गैरअर्जदार क्र.1 च्या लेखी कथनानुसार अर्जदाराने मुदतीत सादर केलेला नाही, तसेच पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार नियमबाह्य आहे. त्यामुळे, नामंजुर करण्यात येत आहे. परंतु, शासन परिपञकानुसार राज्यातील कोणत्याही आपत्तीने होणा-या अपघातात कमावता पुरुष मरण पावल्यास त्याच्या वारसास आर्थिक सहाय्य व्हावे म्हणून शासनाने ही योजना अंमलात आणली. अर्जदार लाभधारक असल्याने, शेतकरी अपघात विमा येाजना अंतर्गत लाभ मिळण्यास पाञ आहे. अर्जदाराने सर्व दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.3 कडे सादर केले व गैरअर्जदार क्र.3 यांनी पूर्ण दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.2 कडे सादर केले. गैरअर्जदार क्र.2 यांनी तो प्रस्ताव लगेच दि.25.1.2011 ला गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दाखल केला.
13. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी प्रस्ताव सर्व कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 कडे
... 5 ... (ग्रा.त.क्र.14/2011)
पाठवून योग्य ती सेवा दिली आहे. त्यामुळे, त्यांच्या सेवेत न्युनता आहे, असे म्हणता येत नाही. करीता, त्यांचे विरोधात तक्रार खारीज करण्यांस पाञ आहे.
14. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचा दावा मुदतीत नसल्याचे कारण सांगून नामंजुर केला आहे. परंतु, अर्जदाराने योग्य ती कागदपञे दाव्या सोबत जोडून नियमानुसार पाठविले आहे, असे उपलब्ध दस्ताऐवज व कागदपञ व रेकॉर्डवरुन दिसून येते. यावरुन, गैरअर्जदार क्र.1 यांनी चुकीचे कारण दाखवून विमा क्लेम नामंजूर करुन, अर्जदारास सेवा देण्यात ञुटी केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. गैरअर्जदार क्र.1 ची सेवा न्युनतापूर्ण असल्याचा निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
वरील कारणे व निष्कर्षानुसार तक्रार मंजुर करण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे, तक्रार मंजुर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने मृतक भक्तदास सखाराम निकोडे याच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रार दाखल दि.23/5/2011 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजाने आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत अर्जदाराला द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास झालेल्या मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 1500/- व ग्राहक तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत अर्जदारास द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द तक्रार खारीज. त्यांनी आपआपला खर्च सहन करावा.
(5) आदेशाची प्रत उभय पक्षकारांना देण्यांत यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 24/10/2011.