Maharashtra

Kolhapur

CC/08/777

Sou. Kasturi J.Patil. - Complainant(s)

Versus

Divisional Manager, United India Insurance Co. - Opp.Party(s)

Adv. R.N.Powar.

27 Jul 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/08/777
1. Sou. Kasturi J.Patil.A/p Kumbhoj, Tal. Hatkanangale.Kolhapur.Maharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Divisional Manager, United India Insurance Co.Shriram Mandir Bldg. 1st floor, 9 th lane, Subhash Road, Jaysingpur, Tal. Shirol.Kolhapur.Maharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv. R.N.Powar., Advocate for Complainant
S.K.Dandage, Advocate for Opp.Party

Dated : 27 Jul 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.27/07/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. 

 

           सदरची तक्रार तक्रारदाराचा न्‍याय्य व योग्‍य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारुन सेवा त्रुटी केल्‍यामुळे दाखल करणेत आली आहे.

          

(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) प्रस्‍तुत तक्रारदार यांनी MH-09-AQ-0339  या नंबरची तवेरा बी आय ही गाडी री सुरेंद्र आप्‍पासो चौगुले यांचेकडून खरेदी घेतलेली असून दि.07/08/2007रोजी सदर गाडी तक्रारदार यांनी रितसर आर.टी.ओ. कडे स्‍वत:चे नांवे ट्रान्‍सफर केलेली आहे. नमुद गाडीचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविलेला असून त्‍याचा पॉलीसी क्र.160305/31/06/01/00001678असा असून पॉलीसीचा कालावधी दि.16/01/2007 ते 05/01/2008असा आहे. नमुद  कालावधीचे दरम्‍यान तक्रारदाराचा मुलगा नातेवाईकांसह बेळगांवमधून कोल्‍हापूरकडे येत असताना दि.24/12/2007 रोजी नमुद वाहनाचा अपघात होऊन वाहनाचे संपूर्ण नुकसान झाले. तदनंतर आवश्‍यक त्‍या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन तक्रारदाराने गाडीची आयडीव्‍ही प्रमाणे रक्‍कम रु.4,18,000/- इतक्‍या न्‍याय्य योग्‍य क्‍लेमची मागणी सामनेवालांकडे केली असता दि.01/09/2008 रोजी सामनेवाला यांनी लेखी पत्राव्‍दारे '' इन्‍शुरन्‍स पॉलीसीमधील नावात व गाडी रजिस्‍ट्रेशनच्‍या नावात फरक असलेने सदरचा क्‍लेम देता येत नाही.'' असे खोटे व चुकीचे कारण देऊन क्‍लेम नाकारला आहे.

 

                        वास्‍तविक गाडीचे अपघाती नुकसान झाले त्‍याचवेळी गाडी कायदेशीरपणे तक्रारदाराचे नांवे होती व सदर गाडीची पॉलीसीही चालू स्थितीत होती. सदर पॉलीसी तक्रारदाराचे नांवे ट्रान्‍सफरच्‍या कालावधीत अपघात झालेने नमुद गाडीचा क्‍लेम न देऊन सामनेवालांनी सेवात्रुटी केलेमुळे सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले.

 

           सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करणेत यावी. सामनेवालांनी तक्रारदारास क्‍लेमची रक्‍कम रु.4,18,000/- दि.24/12/2007 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह वसुल होऊन मिळावी तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/-, तक्रार अर्जाच्‍या खर्चापोटी रु.2,000/- वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.

 

(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीसोबत पॉलीसीपेपर, सामनेवाला यांनी क्‍लेम नाकारलेचे पत्र, तक्रारदार यांनी गाडी खरेदी केलेचा स्‍टॅम्‍प इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत.तसेच दि.17/02/2010 रोजी सदर वाहनाचे आर.सी.बुक व इन्‍शुरन्‍स पॉलीसी दाखल केली आहे.

(4)        सामनेवालांनी दाखल केलेल्‍यास लेखी म्‍हणणेनुसार तक्रारदाराची तक्रार अर्जातील कथने नाकारली आहेत. तक्रार अर्जातील कलम 1ते 3 मधील मजकूर अमान्‍य केला आहे.कलम 4 मधील दि.01/09/2008 रोजी नाकारलेला क्‍लेम हा योग्‍य कारणास्‍तव नाकारलेला आहे. कलम 5 ते 8 मधील मजकूर नाकारलेला आहे.

 

           सामनेवाला आपल्‍या लेखी म्‍हणणेत पुढे असे प्रतिपादन करतात की, नमुद वाहनाच्‍या अपघाताची सूचना मिळालेबरोबर सामनेवाला विमा कंपनीने कबाडे सर्व्‍हेअर यांची नेमणूक केली. नमुद वाहन नं. MH-09-AQ-0339   चे अपघात झालेल्‍या नुकसानीची पाहणी मुल्‍यनिर्धारण करुन निव्‍वळ तोटा प्रमाणे रक्‍कम रु.3,37,000/- इतकी नुकसानी झाल्‍याचे नमुद केले आहे. मात्र क्‍लेम पेपर्सची छाननी व सर्व्‍हे रिपोर्टचे अवलोकन केले असता नमुद पॉलीसी नं.160305/31/06/01/00001678 असून कालावधी दि.06/01/2007 ते 05/01/2008 असा आहे व सदर पॉलीसी सुरेंद्र आप्‍पासो चौगुले यांचे वाहन क्र. MH-09-AQ-0339   याची असून नमुद वाहन त्‍यांनी सौ.कस्‍तुरी जयकुमार पाटील यांना विकले आहे. नमुद वाहनाची विक्री ही सामनेवाला विमा कंपनीस कोणतीही पूर्वसुचना न देता मान्‍यता न घेता विकलेली आहे. नमुद वाहन हे सदर अपघातानंतरच ट्रान्‍सफर केलेचे सामनेवाला कंपनीस माहिती झाले. सदर पॉलीसी लॅप्‍स झालेली आहे. प्रस्‍तुत प्रकरणी सुरेंद्र आप्‍पासो चौगुले यांचे नांवे नमुद वाहनाची पॉलीसी आहे. मात्र प्रत्‍यक्ष अपघातावेळी ते त्‍या वाहनाचे मालक नव्‍हते तर तक्रारदार हे नमुद वाहनाचे मालक असलेची नोंद आहे.मात्र तक्रारदार हे विमाधारक नाहीत. सबब तक्रारदार हे क्‍लेमसाठी पात्र नाहीत. सबब विमाधारक व गाडीचा मालक यामध्‍ये फरक आढळल्‍याने सामनेवाला सदर क्‍लेम देण्‍यास जबाबदार नाहीत. सामनेवालांनी योग्‍य कारणास्‍तव तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेला आहे. तक्रारदार हा विमाधारक नसल्‍याने तो सामनेवालांचा ग्राहक नाही; सबब ग्राहक संरक्षण कायदयाप्रमाणे तक्रार चालणेस पात्र नाही.तक्रारदार नुकसानभरपाई मिळणेस पात्र नाही. सामनेवाला ते देण्‍यास जबाबदार नाहीत.  सबब सामनेवालांनी सेवेत कोणतीही त्रुटी ठेवलेली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत नामंजूर करावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.

 

(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.15/02/2008 रोजी दिलेले पत्र, कबाडे सर्व्‍हेअर यांचा सर्व्‍हे रिपोर्ट, इन्‍शुरन्‍स पॉलीसी दाखल केली आहे.

(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, रिजॉइन्‍डर, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे,दाखल कागदपत्रे व उभय पक्षाच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.

1) प्रस्‍तुतची तक्रार चालवणेचे अधिकार क्षेत्र मंचास येते का ?       --- होय.

2) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे का ?                 --- होय.

3) तक्रारदार विमा रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?  --- होय.

4) काय आदेश ?                                                                --- शेवटी दिलेप्रमाणे  

 

मुद्दा क्र.1 :- सामनेवाला ही विमा कंपनी आहे. ती विमा सेवा देते. 'विमा सेवा' ही मंचाचे अधिकार क्षेत्रातील बाब असलेने सदरची तक्रार चालविणेचे अधिकार क्षेत्र या मंचास येते.

मुद्दा क्र.2 :- तक्रारदाराने तक्रारी नमुद वाहन क्र. MH-09-AQ-0339   श्री सुरेंद्र आप्‍पासो चौगुले यांचेकडून खरेदी केले होते त्‍याबाबतची नमुद वाहनापोटी रु.4,50,001/- इतकी रक्‍कम विक्रीपोटी स्विकारलेची दि.07/08/2007 रोजीची पावती लिहून दिली आहे. सबब ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.

 

           सुरेंद्र आप्‍पासो चौगुले यांनी नमुद वाहनाचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविला होता हे पॉलीसीच्‍या दाखल सत्‍यप्रतीवरुन निर्विवाद आहे. नमुद पॉलीसी क्र.160305/31/06/01/00001678 असा असून पॉलीसीचा कालावधी   दि.16/01/2007 ते 05/01/2008 असा आहे. नमुद वाहनाची मालकी वाहन ट्रान्‍सफर रिपोर्टवरुन दि.14/8/2007 रोजी तक्रारदाराचे नांवे रजिस्‍टर झाले आहे हे आर.सी. टी.सी.बुकवरुन निदर्शनास येते. त्‍यामुळे नमुद वाहनाची पॉलीसी ही सुरेंद्र चौगुलेचे नांवे व वाहनाची मालकी तक्रारदाराचे नांवे आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. विमा पॉलीसी कालावधी तक्रारदाराचा मुलगा व नातेवाईक बेळगांवहून कोल्‍हापूरकडे येत असताना नमुद वाहनाचा अपघात हा दि.24/12/2007 रोजी होऊन वाहनाचे नुकसान झाले आहे. तक्रारदाराने योग्‍य त्‍या कागदपत्रांची पूर्तता करुन क्‍लेमची मागणी केली आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे.

 

           अपघाताची सुचना मिळताच सामनेवालांनी नेमणूक केलेले सर्व्‍हेअर कबाडे यांनी अपघातग्रस्‍त नमुद वाहनाची पाहणी करुन रक्‍कम रु.3,37,000/- इतकी नुकसानीची रक्‍कम निव्‍वळ तोटा (नेट लॉस बेसीसवर) निश्चित केलेली आहे हे सामनेवाला यांनी आपले म्‍हणणेत मान्‍य केलेले आहे.

 

           सामनेवालांनी तक्रारदाराचा क्‍लेम हा अपघातावेळी नमुद वाहनाची पॉलीसी ही सुरेंद्र चौगुले यांचे नांवे तर वाहनाची मालकी तक्रारदाराचे नांवे या फरकामुळे नाकारला आहे. तसेच यासाठी इंडियन मोटार टेरिफ जी.आर.क्र.17 प्रमाणे 14 दिवसात वाहन ट्रान्‍सफरबाबत तक्रारदाराने लेखी काहीही कळवलेले नाही. सबब सामनेवाला हे सदर क्‍लेम देण्‍यास जबाबदार नाहीत. सदर इंडियन मोटर टेरिफ हे दि.01/07/2002 चे असून तदनंतर अशा पध्‍दतीच्‍या तक्रारी निर्णीत करणेत आलेल्‍या आहेत. सदर पूर्वाधार खालीलप्रमाणे आहेत.

1. II (2009) CPJ 213 - PUNJAB STATE CONSUMER DISPUTES RESDRESSAL COMMISSION CHANDIGARH- Appeal No.1627 of 2002- decided on 15/05/2008- Kulwant Singh Vs. United India Insurance Co.Ltd. and Others.- (i) Consumer Protection Act,1986-Section 15-Insurance-Motor Accident Claim-Repudiated- Contention, Complainant transferee from original owner-No notice give to insurer regarding purchase of car prior to accident -Complainant not entitled to compensation-Contention not acceptable - As per India Motor Tariff  Regulation GR 10 and circular, Insurance policy automatically change in favour of transferee of vehicle-Complainant entitled to claim insurance amount as per policy-Insurer directed to pay loss assessed by Surveyor-Compensation and cost awarded.

 

2. II (2008) CPJ 324 (NC) - NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI - Revision Petition 518 of 2008 decided on 29/02/2008 -National Insurance Co.Ltd. Vs. Subhash Chand Kataria and Another- (ii) Insurance- Insurable Interest-Vehicle sold-No request made for transfer of policy in name of buyer-Accident claim repudiated -Contention, buyer has no insurable interest, not acceptable -As per circular issued by General Insurance Company, on transfer of vehicle, benefits under policy in force, automatically accrue to new owner-Complaint allowed by Forum-Appeal against order dismissed -No interference required in revision.

 

3. IV (2007) CPJ 289 (NC) - NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NEW DELHI -  Revision Petition 556 of 2002 decided on 22/05/2007-Shri Narayan Singh  Vs. New India Assurance Co. Ltd. - (ii) Consumer Protection Act,1986-Section 2(1)(g), 14(1)(d) and 21 (b) -Insurance -Claim not settled -Vehicle purchased from original owner-Met with accident-Insurance policy taken by original owner-Benefits under policy automatically accrue to new owner on transer of vehicle-Insurance Company liable to pay insurance amount along with interest-Compensation and cost awarded -Punitive cost imposed for taking unjustified stand in not disclosing India Motor Tariff Regulation.

 

                        वरील पूर्वाधारचा विचार करता विमा उतरविलेल्‍या वाहनाचाच अपघात झालेला आहे व त्‍यात वाहनाचे नुकसान झालेले आहे. सदर नुकसानी क्‍लेमची मागणी करुनही सामनेवालांनी दि.01/09/2008 रोजी क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

 

मुद्दा क्र.3 :- अपघाताची सुचना मिळताच सामनेवालांनी नेमणूक केले कबाडे सर्व्‍हेअर यांनी नमुद वाहनाचे अपघातामध्‍ये झालेल्‍या नुकसानीपोटी नेट लॉस बेसीसवर रक्‍कम रु.3,37,000/- निश्चित केलेली आहे. सबब सदर रक्‍कम व्‍याजासहीत मिळणेस तक्रारदार पात्र आहेत.

 

मुद्दा क्र.4 :- सामनेवालांच्‍या सेवात्रुटीमुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. सबब तक्रारदार त्‍यापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                           आदेश

 

(1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

 

(2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्‍कम रु.3,37,000/-(रु.तीन लाख सदतीस हजार  फक्‍त) अदा करावेत. सदर रक्‍कमेवर दि.01/09/2008 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज अदा करावे.

 

(3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) अदा करावेत.

 

 


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER