तक्रार क्रमांक – 323/2007 तक्रार दाखल दिनांक – 24/08/2007 निकालपञ दिनांक – 24/07/2008 कालावधी - 1 वर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री. विष्णु डी. गुप्ता श्री सिध्दी विनायक, आशा हाऊस 163/A, शिवाजी उदयान चुनाभट्टी च्या समोर मुंबई. .. तक्रारदार विरूध्द
डिविजनल मॅनेजर युनायटेड इंडिया इनसुरन्स कंपनी. लि. केनरा बँकेच्या वरती गोखले रोड, ठाणे. .. सामनेवाला
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील - अध्यक्षा श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः - त.क स्वतः वि.प एकतर्फा आदेश (पारित दिः 24/07/2008)
मा. श्री. पी. एन. शिरसाट – सदस्य यांचे आदेशानुसार 1. सदरहू तक्रारदाराने हि तक्रार डिविजनल मॅनेजर यूनायटेड इंडिया इन्सुरन्स कंपनी विरूध्द दाखल केली आहे तक्रारदार दुचाकी मोटर सायकल चालवित असतांना अपघात झाला व त्याचा डावा हात मोडल्यामुळे त्यांना डॉ. खेडेकरचे डायमंड हॉसपीटल पहिला माळा, बाला भवन, डायमंड गार्डन, चेंबूर, मुंबई नं. 400071 येथे दिनांक 04/11/2005 ते 06/11/2005 पर्यंत .. 2 .. भरती करण्यात आले होते. त्यांनादवाखान्यातून घरी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी खर्च केलेले 8,044 विमा कंपनी कडून परत मिळावेत म्हणून दिनांक 03/01/2006 रोजी अर्ज केला. सामनेवालेने तक्रारदाराचे सर्व कागदपत्रे घेऊन तक्रारदाराला त्याचे बिल लवकर मिळेल असे अभिवचन देऊनही ते बिल लवकर पारित केले नाही. उलट त्यांने ते बिल TPA मेडसेव्ह हेल्थ केअर प्रा. लि. इंजिनिअर बिल्डींग, 3रा माळा.,262शामल दास गांधी मार्ग, मुंबई 400 002 येथे पारित करण्याकरीता पाठविले परंतु ते बिल पास केले नाही म्हणुन त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी हि तक्रार या मंचासमोर दाखल केली असुन त्याप्रित्यर्थ त्यांनी रु. 8,444/- मेडीक्लेम मिळावा व त्यावर 12% द.सा.द.शे व्याज मिळावे तसेच मानसिक नुकसानी पोटी रु. 2,500/- मिळावेत व त्या तक्राररीचा खर्च रु. 1,000/- मिळावा म्हणुन हि तक्रार दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने सामनेवालेकडुन MEDICLAIM विमापॉलिसी घेतली जिचे नाव Hospitalization and Domiciliary Hospitalization Benefit Policy असे आहे. व त्याचा नंबर 121000/48/05/00146 असा आहे. Sum assured 50,000/- असुन तक्रारदाराने रु. 745/- चा निव्वळ प्रिमियम विमा कंपनीला दिनांक 08/06/2005 रोजी अदा केला व विमा पॉलिसीचा कालावधी 08/06/2005 ते 07/06/2006 असा आहे.
.. 3 .. 3. तक्रारदाराने त्यांच्या तक्रारीच्या समर्थनार्थ खालील कागदपत्रे निशाणी 3 वर नमुद केले आहेत. जसे कीः अ) इन्सुरन्स पॉलिसी ब) ओंकार पॅथॉलॉजीकल लॅबोरेटरिज चे स्कीनींग टेस्ट (रक्त गटाचे) क) डॉ. खेडेकरचे सल्लयाचे रू. 200/- चार्जेस ड) डॉ. ओमप्रकाश टावरी रु. 170 कॅश मेमो. इ) डॉ. खेडकर कॅश मेमो रु. 200/- फ) बिल रु. 100/- ग) कॅश मेमो रु. 1,385/- भ) हॉस्पीटल बिल रु. 590/- न) हॉस्पीटल बिल रु. 5,989/- इत्यादी. 4. वरील केस कामी सामनेवालेनी आपंला लेखी जबाब निशाणी 7 वर प्रतिज्ञापत्र निशाणि 8 वर व कागदपत्रे, निशाणी 9 वर सादर केली आहेत तसेच तक्रारदराने निशाणी 12 वर प्रतिज्ञापंत्रावर पुरावा दाखल केला व निशाणी 13 वर लेखी युक्तीवाद दाखल केला व सामनेवालेनेही आपले लेखी युक्तीवाद सादर केले.
5. वरील प्रतिज्ञापत्रे, कागदपत्रे व पुरावे यांचे अवलोकन केल्यास एकमेव मुद्दा उपस्थीत होतो तो येणे प्रमाणे दिरंगाई. .. 4 .. तक्रारदार हे सामनेवालेनी सेवेमध्ये दिरंगाई/कमतरता दाखविली हे सिध्द करू शकले काय? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असून त्याप्रित्यर्थ खालील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा 5. तक्रारदाराचा अपघात झाला व त्यामध्ये त्याच्या डाव्या हाताला मार लागून हाड मोडले व त्यामुळे त्यांना डॉ. खेडेकरांचे हॉस्पीटल मध्ये भरती व्हावे लागले. दवाखण्यात भरतीचा कालावधी 04/11/2005 ते 06/11/2005 असा आहे. तक्रारदारानी Mediclaim Policy घेतली होती त्याचा नंबर 121000/48/05/00146 व कालावधी 08/06/2005 ते 06/06/2006 असा आहे. तक्रारकर्त्याने विमा प्रिमियम रू. 745/- विमा कंपनीला अदा केला. तक्रारदाराचा दवाखण्यातील खर्च रु 8,444/- एवढा झाला व तो विरुध्द पक्षाकडुन पैसे परत मिळावेत. सामनेवालेनी त्यांचे व्यक्ती वादामध्ये असे प्रतिपादन केले की अपघात झाला त्यापासून 7 दिवसाचे आत दावा सादर करणे आवश्यक होते व 7 दिवसाचे आत दावा केला नाही म्हणून तक्रारकरत्याचा दावा अव्हेरला तसेच दवाखन्यात औषधोपचार हा अशोक गुप्ता यांना केला व विष्णु गुप्ता यांना केला नाही. दवाखाण्याचे दिलेले विलाचे प्रत्यक्ष अवलोकन केल्यास असे आढळले की, विष्णु गुप्ता यांनाच औषघोपचार केला त्यामुळे विरूध्द पक्षाचे म्हणणे ग्राहय धरता येणार नाही. विरूध्द पक्षाने त्याचे बिल लवकर पारीत न करता TPA .. 5 .. म्हणजे THIRD PARTY AGENCY MED SAVE HEALTH CARE LTD., ENGINEERS BLDG., 3rd FLOOR, 262 S. D. Gandhi Rd., Mumbai 400002. येथे पारित होण्यासाठी पाठविला व ते बिल पास किंवा पारित न केल्यामंळे तक्रारदाराने हि तक्रार दाखल केली असून सामलेवालेने सेवेमध्ये त्रृटी/कमतरता /दिरंगाई दाखविली हे सिध्द होते. त्यास्तव तक्रारकतर्यांचा तक्रारीचा दावा रु. 8,444/- मान्य करण्यास या मंचाला कोणतीही अडचण्ा भासत नाही तसेच त्यांनी मागितलेले 12% व्याज द.सा.द.शे हे जास्त स्वरुपाचे वाटत असल्यामुळे ते मान्य करता येणार नाही परंतु 9% व्याज द.सा.द.शे मान्य करण्यात कोणतीही हरकत नाही तसेच मानसिक नुकसानीपोटी रू.5,000/- मान्य करण्यात येत आहेत तसेच तक्रारीचा खर्च रू. 500/- देण्यास या मंचास कोणतीही अडचण भासत नाही त्यामुळे हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे. अंतीम आदेश 1. तक्रार क्रमांक 323/2007 हि अंशतः मान्य करण्यात येत असुन सामनेवालेने तक्रारकर्त्यास रु. 1,000/- (रु. एक हजार फक्त) हया तक्रारीचा खर्च म्हणून द्यावा व त्यांच्या खर्च त्यांनी सोसावा.
2. सामनेवालेने तक्रारकर्त्यास रु 8,444/-(रु. आठ हजार चारशे चवेचाळीस फक्त) मेडिक्लेम म्हणून द्यावेत व त्यावर रु. 9% द.सा.द.शे फिर्याद दाखल केल्यापासून प्रत्यक्ष रक्कम फिटेपर्यंत व्याज द्यावे. .. 6 .. 3. या हुकूमाची तामिली 30 दिवसाचे आत करावी अन्यथा सामनेवालेनी वरील रक्कमेवर जादा दंडात्मक स्वरुपाचे व्याज द.सा.द.शे 3% दराने द्यावे. 4. सामनेवालेने तक्रारकर्त्यास रु. 5,000/- (रु. पाच हजार फक्त) मानसिक त्रासाचे पोटी द्यावेत. 5. सामनेवालेनी तक्रारकर्त्यांस वरील आदेश झाल्या प्रमाणेची रक्कम परस्पर देय करावी (Direct) 6. उभय पक्षाकारांना या निकालपत्राची साक्षांकित प्रत त्वरीत पाठवावी. दिनांक – 24/07/2008 ठिकान - ठाणे (सौ. शशिकला श. पाटील ) ( श्री. पी. एन. शिरसाट ) अध्यक्षा सदस्य . जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे भासुटD:\judgments from 02-06-2008 on Cdrf2\Shirsat Sir
|