जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 41/2016 तक्रार नोंदणी दि. :- 5/10/2016
तक्रार निकाली दि. :- 1/03/2017
निकाल कालावधी :- 4 म.26 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- निर्मला योगराज कोरडे,
वय 33 वर्षे, धंदा-घरकाम,
रा.वार्ड क्र.5, एटापल्ली रोड, आलापल्ली
तह.अहेरी, जि.गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- (1) विभागीय व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंश्योरन्स कं.लिमिटेड,
विभागीय कार्यालय नं.6 ए/501, गणेश प्लाझा,
नवरंगपुरा, बस स्टॅन्डच्या समोर,नवरंगपुरा,
अहमदाबाद-380009
(2) व्यवस्थापक,
तुलीप ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड,
305, तिसरा माळा, जयपूर टॉवर,
(ऑल इंडिया रेडिओ समोर) एम.आय.रोड,
जयपुर-302001, राजस्थान.
(3) व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंश्योरन्स कं.लिमिटेड,
चामोर्शी रोड, गडचिरोली, तह.जि.गडचिरोली.
अर्जदार तर्फे वकील :- अधि.श्री.आर.एस.खोबरे
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील :- अधि.श्री.मंगेश देशपांडे
गैरअर्जदार क्र.3 तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, अध्यक्ष (प्र.)
(2) श्री सादिक मोहसिनभाई झवेरी, सदस्य
- आ दे श -
(मंचाचे निर्णयान्वये, सादिक मो.झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 1 मार्च 2017)
तक्रारकर्तीने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. तक्रारकर्तीचे पती मिस्त्रीकाम करुन कुटूंबाचे पालनपोषण करीत होते. तक्रारकर्तीचे पती श्री.योगराज शंकर कोरडे हे दि.7.11.2012 रोजी मिस्त्रीकाम करीत असतांना विजेचा धक्का लागून अपघाती मृत्यु पावले. गैरअर्जदार क्र.1 व 3 हे विमा कंपनी असून ते संपुर्ण भारत देशात विमापत्र विक्रीचा व्यवसाय करते. गैरअर्जदार क्र.2 हे बहुस्तरीय विपनन चा व्यवसाय करते. गैरअर्जदार क्र.2 चे डिस्ट्रीब्युटर होण्याकरीता कंपनीकडे रुपये 3500/- भरणा केल्यावर कंपनी डिस्ट्रीब्युटरला आय.डी.नंबर देते. सदर कंपनीचे डिस्ट्रीब्युअर झाल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 डिस्ट्रीब्युटरला ट्रेलर मेड पर्सनल एक्सीडेंट पॉलीसी जारी करते. सदर पॉलीसीची वैधता 4 वर्षाची असून त्यामध्ये अपघाती मृत्यु, कायमचे पुर्ण अपंगत्व, कायमचे अंशिक अपंगत्व याकरीता रुपये 1,00,000/- व अपघाताने दवाखान्यात उपचार करावे लागल्यास रुपये 25,000/- विमा रक्कम प्रत्येक वर्षाला डिस्ट्रीब्युटरला देय असल्याचे अंतर्भूत असते. अर्जदाराचे पती हे गैरअर्जदार क्र.2 कडे दिनांक 30.8.2011 रोजी रुपये 3500/- भरुन डिस्ट्रीब्युटर झाले व त्यानंतर गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराच्या पतीला आय.डी.नंबर 2464845 दिला व गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीचे पतीला ट्रेलर मेड पर्सनल एक्सीडेंट पॉलीसी जिचा पॉलीसी नं. 060600/42/11/05/00002831 जारी केली. सदर पॉलीसीचा कालावधी दिनांक 30.8.2011 ते 29.8.2015 पर्यंत असून त्यामध्ये अपघाती मृत्युकरीता रुपये 1,00,000/- देय आहे. अर्जदाराच्या पतीचा दिनांक 07.11.2012 रोजी मिस्त्रीकाम करीत असतांना विजेचा धक्का लागून मृत्यु झाला. अर्जदार ही नॉमिनी असल्यामुळे, विमा पॉलीसीप्रमाणे विमा रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्यास पात्र आहे. त्यामुळे, सदर रक्कम मिळण्याकरीता अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 व 2 ला आवश्यक दस्तऐवजासह कळविले. परंतु, गैरअर्जदार यांनी अर्जदारास रक्कम दिली नाही. त्यामुळे, अर्जदाराने दिनांक 4-5 फेब्रुवारी 2015 चे दरम्यान विम्याची रक्कम मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.1 ला पत्र दिले. त्यावर गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीचा विमा दावा क्लेम नं.060600/4 प्रमाणे पंजीबध्द केला. परंतु, तक्रारकर्तीला विमा रक्कम रुपये 1,00,000/- अदा केली नाही किंवाकाहीही कळविले नाही. गैरअज्रदार क्र.1 ने मार्च 2016 मध्ये आपले चौकशी अधिकारी श्री.भविन जानी यांना चौकशीकरीता पाठविले. त्यांनी चौकशीअंती तक्रारकर्तीची प्रत्यक्ष भेट घेवून विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळण्यास प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. परंतु, गैरअर्जदार क्र.1 ने विम्याची रक्कम अदा न करता आधिच पुरविलेल्या दस्तऐवजांची दिनांक 4.5.2016 चे पत्रान्वये मागणी केली. यावरुन, गैरअर्जदार क्र.1 रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे, अर्जदाराने गेरअर्जदारास दिनांक 5.7.2016 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु, गैरअर्जदार यांनी कोणतेही उत्तर दिले नाही वा विमा रक्कम दिली नाही. गैरअर्जदाराची सदर कृती अनुचित व्यापार प्रथेत मोडते व त्यांनी अनुचित व्यापार पध्दती अवलंबिली आहे असे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्तीस मानसिक, शारिरीक ञास व आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तक्रारकर्तीने गैरअर्जदारांनी विमा दाव्याची रक्कम रुपये 1,00,000/- दि.7.11.2012 पासून द.सा.द.शे. 12 % व्याजाने मिळण्याचे, तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक ञासापोटी रुपये 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी व इतर खर्चापोटी रुपये 15,000/- अर्जदारास गैरअर्जदारांकडून मिळण्याचे आदेश व्हावे, अशी प्रार्थना केली.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 13 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणीकरुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली. गैरअर्जदार क्र.1 व 3 ने नि.क्र.8 नुसार लेखी उत्तर दाखल केले व गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.11 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 व 3 ने नि.क्र.8 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरामध्ये असे नमूद केले की, मयत हा मिस्त्रीकाम करीत होता व त्याचेवर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी होती व त्याचा मृत्यु इलेक्ट्रीक शॉक लागून दिनांक 7.1.2012 रोजी झाला, हे माहितीअभावी अमान्य आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खरे आहे की, गैरअर्जदार क्र.1 व 3 विमा कंपनी हे पॉलीसी विक्रीचा व्यवसाय करतात. अर्जदाराचे हे म्हणणे अमान्य आहे की,अर्जदाराचे पतीचा मृत्यु हा मिस्त्रीकाम करीत असतांना श्री.धर्माजी गोविंदराव चांदेकर यांचे घरी दिनांक 7.11.2012 रोजी इलेक्ट्रीक शॉक लागून झाला. हे खरे आहे की, अर्जदार ही पॉलीसीधारकाची नॉमिनी आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे व अयोग्य आहे की, अर्जदाराने अपघाताची सूचना व विमा दावा अपघात घडल्यानंतर गैरअर्जदारास ताबडतोब दिलेली होती. ही बाब मान्य आहे की, पॉलीसी कालबाहय झाल्यानंतर 28 महिन्यानी अर्जदाराकडून पहिल्यांदा दिनांक 9.2.2015 रोजी विमा कंपनीला एक पत्र प्राप्त झाले. सदर पत्राव्दारे योग्य तो खुलासा केलेला नव्हता व विलंबाचे कारणदेखील नमुद केलेले नव्हते. अर्जदाराकडून सदरचा विलंब हा जाणीवपुर्वक केलेला आहे. अर्जदार ही शिक्षित महिला असून, तिने विना-तारखेचे पाठविलेले पत्र गैरअर्जदार विमा कंपनीस दिनांक 9.2.2015 रोजी प्राप्त झाले आहे. अर्जदार यांनी मुदतबाहय तक्रार विद्यमान मंचासमोर दाखल केलेली असल्यामुळे खर्चासह खारीज होण्यास पात्र आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने विशेष कथनामध्ये असे नमुद केले की, विमा पॉलीसीधारकाच्या नॉमिनीने विमा दावा हा विहित मुदतीत योग्य कागदपत्रासहीत दाखल करणे आवश्यक आहे. अर्जदार ही शिक्षित महिला असून तिने जाणीवपुर्वक पतीचे मृत्युचे कारण व इतर बाबी लपवून ठेवून कालबाहय विमा दावा वकीलामार्फत दाखल केला आहे. यानंतर देखील दिनांक 4.5.2016 चे पत्र प्राप्त झाल्यानंतर अर्जदाराने विमा दाव्याचे पुष्टयर्थ आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही. अर्जदार कधीही गडचिरोली येथील गैरअर्जदाराचे कार्यालयात आली नाही किंवा विमा दाव्याचे पुष्टयर्थ आवश्यक दस्तऐवज सादर केले नाही. अर्जदाराने पोलीस स्टेशन, अहेरी यांचेकडून आवश्यक कागदपत्रे दिनांक 20.8.2014 रोजी वा त्यानंतर प्राप्त केले आहे. सदर तक्रारीचे कारण दिनांक 7.11.2012 रोजी घडले आहे आणि सदरतक्रार दिनांक 5.7.2016 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार विहित मुदतीच्या नंतर सदर तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यामुळे, सदर तक्रार मुदतबाहय असल्यामुळे खर्चासह खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली
4. गैरअर्जदार क्र.2 ने नि.क्र.11 नुसार दाखल केलेल्या लेखी उत्तरातील प्राथमिक आक्षेपामध्ये नमूद केले की, गैरअर्जदार क्र.2 ही मार्केटींग कंपनी असून, आपल्या उत्पादनाची डिस्ट्रीब्युटरमार्फत विक्री करणे हे कार्य आहे. अर्जदाराचे पती श्री.योगराज शंकर कोरडे यांनी कंपनीचे उत्पादन खरेदी केले होते. त्यामुळे, ग्राहक संरक्षण कायद्याचे कार्यक्षेत्रात सदर वाद व्यापारीक संबंध असल्यामुळे येत नाही. अर्जदाराने काही महत्वपुर्ण बाबी विद्यमान मंचासमोर लपवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे, सदरची तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. तसेच, सदरचा वाद हा विद्यमान मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे देखील सदर तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
गैरअर्जदार क्र.2 यांनी पुढे असे नमुद केले की, गैरअर्जदार क्र.2 ही मार्केटींग कंपनी असून, आपल्या उत्पादनाची डिस्ट्रीब्युटरमार्फत विक्री करणे हे कार्य आहे. अशा डिस्ट्रीब्युटर्सना आयआरडीए अंतर्गत नोंदणी असलेल्या विमा कंपनीमधून व्यक्तीगत दुर्घटना विमा दिल्या जातो, त्याचे प्रिमियम गैरअर्जदार क्र.2 मार्फत केल्या जाते. विमा पॉलीसीच्या कालावधीमध्ये अपघात झाल्यास विम्याची रक्कम अदा करणे हे विमा कंपनीचे दायित्व असते. गैरअर्जदार क्र.2 यांनी, अर्जदाराचे पतीने डिस्ट्रीब्युटरशिप घेतल्यानंतर बिझनेस किटसोबत एक वर्ष कालावधीची विमा पॉलीसी क्रमांक 060600/42/11/05/00002831 प्रदान केलेली होती. सदर पॉलीसीमध्ये अर्जदारास नॉमिनी म्हणून जोडण्यात आले होते. अशास्थितीमध्ये अर्जदाराच्या पतीचा मश्त्यु झाल्यानंतर विम्याची रक्कम देणे हे गैरअर्जदार विमा कंपनीचे कर्तव्य आहे. त्यामुळे, गैरअर्जदार क्र.3 विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी, अशी विनंती केली.
5. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी दाखल केलेले लेखी बयान, तसेच अर्जदार व गैरअर्जदार क्र.1 व 2 ने दाखल केलेले तोंडी व लेखी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 चा ग्राहक आहे काय ? : होय
2) गैरअर्जदार क्र.1 व 2 ने लाभार्थ्याप्रती सेवेत न्युनतापूर्ण : नाही
व्यवहार केला आहे काय ?
4) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. तक्रारकर्तीचे पती श्री.योगराज शंकर कोरडे योनी गैरअर्जदार क्र.1 तर्फे गैरअर्जदार क्र.2 ची विमा पॉलीसी प्रिमियम रुपये 3500/- भरुन घेतली असल्यामुळे व अर्जदाराचे पतीचा मृत्यु जेव्हा झाला म्हणजे दिनांक 7.11.2012 च्या वेळी वैध असल्याने व अर्जदार बाई ही मृतकाची नॉमिनी असल्याने सदर विमा दाव्याची लाभार्थी आहे, असे या मंचाचे मत असल्याने मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. गैरअर्जदाराने आपल्या लेखी युक्तीवादासोबत दाखल केलेले दस्तऐवज पॉलीसीची नियम व शर्ती वरुन दिसून येते की, सदर नियमानुसार अर्जदाराने मृतकाचा विमा दावा मृत्युच्या नंतर म्हणजे मृत्युचा दिनांक 7.11.2012 ला झाली व अर्जदाराने दाखल केलेले पत्र नि.क्र.4 वरील दस्तऐवज क्र.4 नुसार विमा कंपनीला दिनांक नसलेले पत्र पाठवून गैरअर्जदार क्र.1 ला मिळालेली दिनांक 9.2.2015 नुसार असे विचारले आहे की, परिच्छेद 2 मध्ये (So you are requested to please provide us the guidelines to comply to formalities for getting an insurance claim.) म्हणजे या पत्रावरुन असे दिसते की, अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्युनंतर तब्बल 2 वर्षानंतर विमा दावा कसा दाखल कसा करावा, याबाबत विचारणा केलेली आहे.
गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास पाठविलेले पत्र अर्जदाराने दाखल केलेले नि.क्र.4 नुसार दस्तऐवज क्र.2 दिनांक 4.5.2016 गैरअर्जदाराने स्पष्टपणे विचारणा केली आहे की, दिनांक 7.11.2012 मृत्यु झाल्यानंतर गैरअर्जदार क्र.1 ला दिनांक 9.2.2015 ला प्राप्त पत्रानुसार उशिरा विमा दावा दाखल करण्यास कारण काय ? तसेच इतर दस्तऐवजांची मागणी सुध्दा केलेली असून अर्जदाराने त्याबाबत कुठलाही गैरअर्जदार क्र.1 व 2 सोबत पत्रव्यवहार केल्याचे पुरावे दाखल केलेले नाही. सरळ दिनांक 5.7.2016 ला वकीलामार्फत नोटीस पाठवून व या मंचासमोर दिनांक 5.10.2016 ला तक्रार दाखल करुन विमा दाव्याची मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीत मोघम आरोप करुन गैरअर्जदारक्र. व 2 तर्फे विमा दावा मागितलेला आहे. एकंदरीत अर्जदाराने विमा दावा मिळविण्यासाठी कुठलेही पत्रव्यवहार न करता व विमा दाव्यासाठी लागणा-या दस्तऐवजांची पुर्तता न करता सरळ मुदतबाहय तक्रार या मंचासमोर दाखल केलेली असल्यामुळे, व गैरअर्जदार क्र.1 व्दारे पत्रव्यवहार करुनसुध्दा विमा दाव्यासाठी लागणा-या दस्तऐवजांची पुर्तता न केल्याने गैरअर्जदारांना विमा दावा देता आला नाही, म्हणून गैरअर्जदाराने अर्जदारास कुठलीही न्युनतापुर्ण सेवा दिलेली नाही व अनुचित व्यापार पध्दती अवलंबिलेली नाही असे या न्यायमंचाचे मत आहे व त्यामुळे, मुद्दा क्र.2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. वरील विवेचनावरुन हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश –
(1)
(2)
(3)
गडचिरोली.
दिनांक – 01/03/2017.