Maharashtra

Nagpur

CC/229/2015

Vandana Vilas Wankhede - Complainant(s)

Versus

Divisional Manager The Oriental Insurance Company Ltd. - Opp.Party(s)

S. K. Mankar

03 Jan 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/229/2015
 
1. Vandana Vilas Wankhede
Santaji Nagar Kandri Pipari
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager The Oriental Insurance Company Ltd.
Mount Road Sadar Nagpur 440015
Nagpur
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI PRESIDENT
 HON'BLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 03 Jan 2017
Final Order / Judgement

Final Order / Judgement

(आदेश पारित व्दारा -श्री विजय सी प्रेमचंदानी,  मा.अध्यक्ष )

आदेश

पारित दिनांक– 03 जानेवारी,  2017 )

  1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, च्‍या कलम 12 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्तीने तक्रारीत असे  कथन केले आहे की,  कोलमाईन्स वर्कर्स क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. पाटनसावंगी, माईन तहसिल सावनेर,जिल्हा-नागपूर यांनी त्यांचे सभासदांकरिता विरुध्‍द पक्ष यांचेकडुन जनता पर्सनल एक्सीडेंट(ग्रुप) इंश्‍योरेन्स पॉलीसी काढली होती. सदर विमा पॉलीसीचा एकुण वार्षिक हप्ता रुपये 2,63,880/- असा असुन त्या अंतर्गत एकुण 4398 सदस्यांचा ग्रुप विमा उतरविला. सदर विमा पॉलीसीचा कालावधी दि.7.12.2013 ते 6.12.2014 चे मध्‍यरात्री पर्यत होता. सदर को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्य/सभासद श्री विलास पुरुषोत्तम वानखेडे यांचा दि.31.1.2014 रोजी घटनास्थळ रेल्वे स्टेशन कन्हान यार्ड लाईने नं.4 जवळ रेल्वे अपघात झाल्याने  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष यांचेकडे मयत पती विलास पुरुषोत्तम वानखेडे  यांची विमा रक्कम काढण्‍याकरिता वर नमुद सोसायटीला संमतीपत्र दिले होते.सोसायटीने विरुध्‍द पक्ष विमा कंपनीकडे सदर विमा दावा सादर केला. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे रक्कम मिळण्‍याबात अर्ज केला व सत्यप्रत जोडुन दिली. तक्रारकर्तीने त्याचे पतीचा विमा दाव्याची रक्कम मिळावी म्हणुन कोर्ट विदयमान उपविभागीय दंडाधिकारी, रामटेक यांचे कडे पत्राव्दारे सत्यप्रत जोडुन सादर केली. विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक 16.3.2015 रोजी पत्राव्दारे सोसायटीला कळविले की मयत विलास पुरुषोत्तम वानखेडे यांचा  विमा दावा नामंजूर करण्‍यात आलेला आहे. सोसायटीने तक्रारकर्तीला दिनांक 23.3.2015 रोजी सदर मा‍हिती दिली. तक्रारकर्तीने दिनांक 4.4.2015 रोजी विरुध्‍द पक्षाला परत वकीलामार्फत कायदेशीर नोटीस देऊन विमा दाव्याचा पुर्नेविचार करुन विमा रक्कम देण्‍याबाबत सांगीतले. विरुध्‍द पक्षाने दिनांक 14.4.2015 रोजी नोटीसला उत्तर पाठविले. मयत विलास पुरुषोत्तम वानखेडे याचा विमा दावा योग्य कारणास्तव नामंजूर करण्‍यात आलेला आहे असे सांगीतले. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा कोणत्याही योग्य कारणाने नाकारलेला नसल्याने व त‍क्रारकर्तीचे प्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असल्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.  
  3. तक्रारकत्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा पती मयत विलास पुरुषोत्तम वानखेडे यांनी काढलेल्या जनता पर्सनल एक्सीडेंट (ग्रुप) इंश्‍योरेन्स पॉलीसीची रक्कम रुपये 1,00,000/-व  त्यावर दिनांक 6.3.3014 पासुन विमा दावा रक्कम मिळेपर्यत व्याज मिळावे. तसेच तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी  व नुकसानीचा खर्च वि.प.कडुन  मिळावा असे आदेशीत करावे. 
  4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्‍द पक्षाला नोटीस काढण्‍यात आली. विरुध्‍द पक्ष नोटीस मिळुन हजर झाले व नि.क्रं.09 वर आपले लेखी उत्तर  दाखल केले.विरुध्‍द पक्षाने आपले उत्तरात असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्तीने तक्रारीत केलेले आरोप खोटे असुन त्यानी नाकारलेले आहे. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु अपघाताने झाला नव्हता त्यांनी आत्महत्या केली होती ही बाब विरुध्‍द पक्षाने केलेल्या चौकशीवरुन निष्‍पन्न झालेली आहे म्हणुन तक्रारकर्तीने सत्य परिस्थीती लपवीली व तसेच फेरबदल करुन सदर तक्रार खोटी  दाखल केलेली आहे म्हणुन खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केलेली आहे.
  5. तक्रारकर्त्याची तक्रार, प्रती उत्तर, लेखी युक्तीवाद, तोंडी युक्तीवाद व वि.प.चे लेखी उत्तर   यांचे अवलोकन केले असता मंचासमक्ष खाली मुद्दे विचारार्थ आले.

             मुद्दे                                                           निष्‍कर्ष

      1.  तक्रारकर्ता हा वि.प. यांचा ग्राहक आहे काय ?         होय.

      2.  वि.प. ने तकारकर्त्याचे प्रती अनुचित व्यवहार

         पध्‍दतीचा अवलंब केला आहे का ?                          होय.

      3.   आदेश ?                                                               अंतिम आदेशाप्रमाणे.

 

कारणमिमांसा

मुद्दा क्र.1 बाबत – 

कोलमाईन्स वर्कर्स क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. पाटनसावंगी, माईन तहसिल सावनेर,जिल्हा-नागपूर यांनी त्यांचे सभासदांकरिता विरुध्‍द पक्ष यांचेकडुन जनता पर्सनल एक्सीडेंट (ग्रुप) इंश्‍योरेन्स पॉलीसी काढली होती. सदर विमा पॉलीसीचा क्रमांक 185100/47/472014/422 असा आहे व त्या विमा पॉलीसीचा कालावधी दि.7.12.2013 ते दि.6.12.2014 चे मध्‍यरात्री पर्यत होता. दिनांक 31.2.2014 ला श्री विलास पुरुषोत्तम वानखेडे हा कोलमाईन्स वर्कर्स क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी लि. पाटनसावंगी, माईन तहसिल सावनेर,जिल्हा-नागपूर यांचा सदस्य होता. तक्रारकर्ती ही मयताची पत्नी आहे यात कोणताही वाद नसल्याने तक्रारकर्ती ही तक्रारकर्त्याचे सदर वादातील विमा पॉलीसीची लाभार्थी असल्याने तक्रारकर्ती ही विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे ही बाब सिध्‍द होते सबब मुद्दा क्रं.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्र.2 बाबत –

तक्रारकर्तीने दाखल अपघाताची मृत्य समरीची पडताळणी करातंना असे दिसून आले की, मृत्युचे कारण Most probable cause of death is injuries to vital organs due to crushed injuries of spinal card and neck and  teachea due to accidental cause  अपघातीरित्या मरण आले असे दर्शविलेले आहे. परंतु ठाणेदार तसेच उपविभागीय दंडाधिकारी, रामटेक, यांनी आत्महत्या केल्याचा निष्‍कर्ष काढलेला आहे. सदर निष्‍कर्ष सिध्‍द करण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाने कोणताही साक्षी पुरावा सादर केलेला नाही. जरी त्यांनी तक्रार दाखल केलेली असुन केवळ निष्‍कर्षावरुन किंवा अभिलेखावरुन असे सिध्‍द होत नाही की मयत विलास पुरुषोत्तम वानखेडे यांनी आत्महत्या केलेली आहे. अपघाती मृत्यु समरीमधे मधे मत देतांना ते  वेगवेगळे आहे म्हणुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळला. तक्रारकर्तीचा विमा दावा फेटाळून विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याचे प्रती अनुचित व्यापारी पध्‍दतीचा अवलंब केला हे सिध्‍द होते सबब मुद्दा क्रं.2 चे उत्तर होकारार्थी देण्‍यात येते.

मुद्दा क्रं.3 बाबत – 

मुद्दा क्रं.1 व 2 चे विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

-आदेश-

1.    तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीस जनता पर्सनल एक्सीडेंट (ग्रुप) इंश्‍योरेन्स

    पॉलीसी अंतर्गत रुपये 1,00,000/-व त्यावर दिनांक 6.3.2014 पासून

    द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याजासह मिळून येणारी रक्कम अदा करावी.

3.    विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासाबाबत

नुकसान भरपाई दाखल  रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.5,000/- (रुपये पाच हजार फक्त) द्यावेत.

4.    वरील आदेशाची पुर्तता विरुध्‍द पक्षाने वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या   

   आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत  करावी.

5.    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्‍क द्यावी.

6.    तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. VIJAY C. PREMCHANDANI]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.