(मंचाचे निर्णयान्वये, सौ. मोहिनी जयंत भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 22 ऑगष्ट 2011)
... 2 ... (ग्रा.त.क्र.4/2011)
अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार मय्यत उत्तराज उर्फ उत्तम पञुजी निमसरकार यांची पत्नी असून उत्तमराज यांचा दि.14.2.09 रोजी मलेझरी, अडपल्ली चक, त. मुलचेरा, जिल्हा – गडचिरोली येथील आपल्या शेताची राखण करतांना राञी 9-10 चे सुमारास विद्युत प्रवाहीत तारेस स्पर्श होऊन त्यांना प्राणांतिक विद्युत अपघाती मृत्यु झाला. सदर अपघाती बिमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याकरीता गैरअर्जदार क्र.3 कडे अर्ज केला असता त्याच्या मार्गदर्शनानुसार कृषि अधिकारी, मुलचेरा यांच्या मार्फत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दि.19.6.09 ला अर्ज सादर केला होता. सदरील दावा अर्जासोबत अर्जदाराने आवश्यक दस्ताऐवज सुध्दा सादर केले होते. गैरअर्जदार क्र.1 कडे सदर मामला दस्ताऐवजांच्या ञृटी अन्वये प्रलंबित ठेवून त्यांनी सि.ए. रिपोर्ट व म.रा.वि.वि. कार्यालयाच्या निष्कर्षाची मागणी केली होती. अर्जदाराने सदर दस्ताऐवज पुर्ततेकरीता म.रा.वि.वि.विभागाचे निष्कर्ष पञक प्राप्त करुन दाखल केले. परंतु, सि.ए. रिपोर्ट ही पोलीस स्टेशन घोट, तसेच संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसमध्ये कुठेही उपलब्ध नाही. करीता, सादर करु शकली नाही व त्या संबंधित माहिती व पञ अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 ला कळविले होते. तरी, गैरअर्जदार क्र.1 ने उपलब्ध नसलेल्या दस्ताऐवजाच्या ञृटी अभावी मामला प्रकरण बंद केले. अर्जदार ही निराधार असून तिचेवर मय्यतापासून झालेल्या दोन अपत्यांची (1) चि.प्रयाग वय 07 वर्षे व (2) प्रतिक वय 04 वर्षे, यांची संपूर्ण जबाबदारी आहे. अर्जदाराने आवश्यक दस्ताऐवजाची पुर्तता करुनही सदर नुकसान भरपाई सवलत पासून अर्जदारबाई वंचीत आहे.
2. अर्जदार गैरअर्जदारांचा ग्राहक आहे आणि गैरअर्जदाराने अर्जदाराचा दावा नामंजूर करुन सेवा देण्यास ञुटी केली आहे. त्यामुळे, मुळ दावा रुपये 1,00,000/- व त्यावर द.सा.द.शे. 18 % व्याज दि.19.6.09 आजपर्यंतचे व्याज रुपये 30,000/- गैरअर्जदाराने द्यावे. दावा दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/-, मानसिक ञासापोटी खर्च रुपये 25,000/- व तक्रार संबंधी खर्च रुपये 5000/- असे एकूण रुपये 1,70,000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला देण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली आहे.
3. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 33 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार दाखल करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आला. गैरअर्जदार क्र. 1 ने हजर होऊन नि. 10 नुसार लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने नि. 8 नुसार लेखी उत्तर दाखल केले.
... 3 ... (ग्रा.त.क्र.4/2011)
4. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी उत्तरात नमूद केले की, सदर दस्ताऐवजा अंतर्गत मृतक हा शेतकरी असून तथाकथीत विमा करारा अंतर्गत त्याचा अपघाती मृत्यु हा विमा अंतर्भूत होता हे दाखविण्यासाठी अर्जदाराने कोणतेही दस्ताऐवज तक्रारीसोबत सादर केलेले नाही. या कारणास्तव, सदर तक्रार अदखल पाञ असून खारीज करण्यात यावा. याप्रकरणी दाखल पोलीस दस्ताऐवज व एफ.आय.आर. वरुन असे स्पष्ट होते की, मृतक उत्तराज यांचे अपघाती मृत्युस आरोपी मोरेश्वर जगन्नाथ कुबडे व इतर दोन ह जबाबदार असून ते सर्व अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास कायदेशीररित्या जबाबदार आहेत. एकंदरीत, मृतकाचा मृत्यु हा त्याचे स्वतःचे शेतीचे राखण करीत असतांना घडून आलेला नाही.
5. अर्जदाराकडून सि.ए. रिपोर्ट व म.रा.वि.वि. चे पञाची मागणी वेळोवळी केलेली असता, त्याची पुर्तता माञ अर्जदाराने अदयापि केलेली नाही व त्या कागदपञाचे अभावी गैरअर्जदार क्र.1 सदर विमा करारा अंतर्गत या दाव्याचा निर्णय घेवू शकला नाही. याची पूर्ण जाणीव गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास दिलेली आहे. या अनुषंगाने, गैरअर्जदार क्र.1 ने आपले सेवेत कोणतीही न्युनता ठेवलेली नाही. सदर दस्ताऐवज अर्जदाराचा दावा मंजूर करण्यास अत्यंत आवश्यक असून त्याचे अभावी या प्रकरणी गैरअर्जदार क्र.1 कोणताही निर्णय घेण्यास असमर्थ आहे. म्हणून, गैरअर्जदार क्र.1 यांनी केस फाईल बंद करण्याचा निर्णय योग्य व कायदेशीर आहे. या कारणास्तव, गैरअर्जदार 1 चे विरुध्द दाखल सदर तक्रार खर्चासह खारीज होण्यास पाञ आहे.
6. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी उत्तरात नमूद केले की, अर्जदार मय्यत उत्तराज उर्फ उत्त्म पञुजी निमसरकार यांची पत्नी आहे व उत्तराज यांचा दि.14.2.09 रोजी मलेझरी, अडपल्ली चक, तह. मुलचेरा, जिल्हा - गडचिरोली येथील त्यांचे शेतात मृत्यु झाला. अर्जदाराचा शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत नुकसार भरपाई मिळण्याकरीता प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी, मुलचेरा, जिल्हा - गडचिरोली यांचेकडून पञ क्रमांक/297 दि.30.7.09 अन्वये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, कार्यालयास प्राप्त झाला व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली कार्यालयाव्दारे सदर प्रस्ताव पञ क्रमांक/ ता./सां./शे.अ.वि/2512/2009 दिनांक 5/8/2009 अन्वये कबाल इन्श्युरन्स सर्व्हिसे प्रा.लि. यांना आवश्यक सर्व दस्ताऐवज सादर करण्यात आला.
7. गैरअर्जदार क्र.2 ला दि.2.2.2011 ला दिलेल्या नोटीसची प्रत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली कार्यालयीन आवक क्रमांक/1748/2011 दि.21.2.2011 अन्वये प्राप्त झाली व गैरअर्जदार क्र.2, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी पञ क्रमांक /तां./सा./शेअवि/608/2011 दि.25.2.2011 अन्वये व्यवस्थापक, कबाल इन्श्युरन्स सर्व्हिसेस नागपूर यांना प्रस्ताव मंजुरीचे दृष्टीने नोटीसमधील मुद्याबाबत कळवून नोटीसची पुर्तता केलेली आहे.
... 4 ... (ग्रा.त.क्र.4/2011)
8. अर्जदाराने नि.क्र.14 नुसार शपथपञ दाखल केले. गैरअर्जदार क्र.1 ने नि.क्र. 16 नुसार लेखी युक्तीवाद दाखल केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, लेखी उत्तर, शपथपञ, गैरअर्जदार क्र.1 चा लेखी युक्तीवाद व उभय पक्षाच्या वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
9. अर्जदार हीचा पती उत्तमराज पञुजी निमसरकार याचा दि.14.2.09 रोजी शेतात राखण करतांना विद्युत प्रवाहीत तारेस स्पर्श होवून मृत्यु झाला असल्याचे पोलीस दस्ताऐवजावरुन व विद्युत वितरण कंपनीने दिलेल्या दस्ताऐवजावरुन दिसून येते. अर्जदार ही मृतकाची वारसदार पत्नी असल्यामुळे क्लेम फार्म सोबत सर्व दस्ताऐवज जोडून गैरअर्जदार क्र.2 मार्फत प्रस्ताव सादर केला. परंतू, अजून पावेतो नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे अर्जदाराने तक्रार दाखल केली आहे.
10. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या लेखी बयानात मृतकाचा मृत्यु हा स्वतःचे शेतीचे राखन करीत असतांना घडून आलेला नाही, तसेच अर्जदार यास सि.ए.रिपोर्ट व म.रा.वि.वि.चे पञाची वारंवार मागणी करुनही पुर्तता केलेली नाही. त्यामुळे, केस फाईल बंद करण्यात आलेली आहे. म्हणून अर्जदाराला विमा योजने अंतर्गत लाभ देय होऊ शकत नाही, असे सांगीतले. परंतू, मृतकाचा मृत्यु हा प्रवाहीत विद्युत तारेला स्पर्श होवून झाला म्हणजेच नैसर्गीक मृत्यु नसून अपघाती मृत्यु झाला व मृतकाचे नांव 7/12 वर दाखल केलेल्या दस्ताऐवजात नमूद आहे. म्हणजेच मृतक हा शेतकरी होता व तो शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
11. तसेच, म.रा.वि.वि.कंपनीचे दि.30.3.2010 रोजीचे पञ व सी.ए. रिपोर्ट पोलीस स्टेशन किंवा कोर्टात उपलब्ध नसल्याबाबतचे पञ दि.24.2.11 रोजी इंशुरन्स कंपनीला पाठविल्याचे दस्ताऐवजावरुन दिसून येते. प्रस्तावात सादर करावयाच्या कागदपञांमध्ये सी.ए. रिपोर्टचा कुठेही उल्लेख नाही. शासन परिपञकानुसार राज्यातील कोणत्याही नैसर्गीक आपत्तीने होणा-या अपघातात त्याचे कुंटुंबातील कमावता पुरुष मरण पावल्याने आर्थिक अडचण होवू नये म्हणून शासनाने उदात्त हेतूने ही योजना अंमलात आणली. अर्जदाराने शासन परिपञकानुसार सर्व कागदपञांची पुर्तता केल्याचे दाखल दस्ताऐवजावरुन दिसून येते. त्यामुळे, अर्जदार लाभधारक असल्याने शेतकरी विमा योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पाञ आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
12. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव सर्व दस्ताऐवजासह गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे पाठवून योग्य ती सेवा दिली आहे. त्यामुळे, त्यांच्या सेवेत
... 5 ... (ग्रा.त.क्र.4/2011)
न्युनता आहे, असे म्हणता येत नाही. त्यामुळे, त्यांच्या विरोधात तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
13. गैरअर्जदार क्र.1 यांनी, अर्जदाराचा दावा फाईल बंद करुन नामंजूर केला. परंतू, योग्य ती कागदपञे शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दाव्यासोबत जोडून पाठविलेले गैरअर्जदार क्र. 2 यांचेपञ क्र.ता/सा./शे.अवि.2512/2009 हे दि.5.8.2009 व पञ क्र.ता/सा/शेअवि 608/2011 हे दि.25.2.2011 च्या पञावरुन दिसून येते. यावरुन, गैरअर्जदार क्र.1 यांनी बेकायदेशीरपणे दावा फाईल बंद करुन, अर्जदारास विमा दाव्याच्या लाभापासून वंचीत ठेवून अर्जदारास सेवा देण्यात ञुटी केली असल्याचे सिध्द होते, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
वरील कारणे व निष्कर्षानुसार तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने, मृतक उत्तराज पञुजी निमसरकार याच्या अपघाती मृत्युबाबत शेतकरी विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रार दाखल दिनांक 23/02/2011 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजाने आदेशाचे दिवसापासून 30 दिवसाचे आंत अर्जदारास द्यावे.
(3) गैरअर्जदाराने, अर्जदारास झालेल्या मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये 1000/- व तक्रार खर्च रुपये 500/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आंत अर्जदारास द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.2 व 3 विरुध्द तक्रार खारीज.
(5) अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 22/08/2011.