निकालपत्र :- (दि.11.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांच्या मालकीचा महिन्द्रा ट्रॅक्टर एम्.जी.आय.77 या वाहनाचा सामनेवाला विमाकडे विमा उतरविला होता. त्याचा कालावधी दि.22.11.2000 ते 21.11.2001 असा होता. सदर वाहनास दि. 21.11.2000 रोजी अपघात होवून त्यामध्ये बाबुराव ईश्वरा ढेरे हे जखमी झाले. सदर श्री.ढेरे यांना रुपये 32,000/- देवून तडजोड केली. सामनेवाला विमा कंपनीने चुकीचे कारण देवून तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. सबब, नुकसानीची रक्कम रुपये 32,000/- दि.0411.2008 रोजीपासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 3,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत अॅवॉर्ड कॉपी, एक्स्पेंस रिसीट, प्रिमियम रिसीट, पॉलीसी पेपर, पूर्वीचे पॉलीसी पेपर इत्यादीच्या प्रती तसेच सन 1999-00, 2000-2001, 2005-2006, 2004-2005 च्या मुळ पॉलीसीज व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रार मुदतीत नाहीत. तक्रारीत उल्लेख केलेल्या वाहनाचा विमा उतरविला होता व त्याचा कालावधी दि.22.11.2000 ते दि.21.11.2001 असा होता व तक्रारदारांच्या वाहनास दि.21.11.2000 रोजी अपघात झालेला आहे. त्यामुळे तक्रारदारांचा क्लेम नाकारणेत आलेला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या वाहनाच्या पॉलीसीची प्रत व एम.ए.सी.62/01 मधील आदेशाची नक्कल दाखल केलेली आहे. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकले. तसेच, दाखल कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारील उल्लेख केलेल्या पॉलीसीचा कालावधी दि.21.11.2000 ते दि.22.11.2001 असा आहे. सदरची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. तक्रारदारांच्या वाहनास दि.21.11.2000 रोजी अपघात झालेला आहे. सदर अपघातामध्ये जखमी झालेले श्री.बाबुराव ढेरे यांना तडजोडीने रुपये 32,000/- तक्रारदारांनी दिलेले आहेत. सदर रक्कमेची मागणी तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे केली आहे. सदर वस्तुस्थिती व ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 मधील तरतुदी विचारात घेता प्रस्तुतची तक्रार मुदतीत नाही. तसेच, गुणवत्तेवर विचार करता प्रस्तुत तक्रारीत कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |