Maharashtra

Bhandara

CC/18/35

USHA MAROTI WADATKAR - Complainant(s)

Versus

DIVISIONAL MANAGER, The Oriental Insurance Co. L.T.D. - Opp.Party(s)

Adv. UDAY P. KSHIRSAGAR

21 Jun 2019

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/35
( Date of Filing : 06 Jul 2018 )
 
1. USHA MAROTI WADATKAR
R/O LAKHORI TA.LAKHNI DISTT.BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIVISIONAL MANAGER, The Oriental Insurance Co. L.T.D.
DIVISION OFFICE NO.3 PLOT NO.321. A.2. OSWAL BANDHU SAMAJ BUILDING. J.N.ROAD. PUNE 411042
PUNE
MAHARASHTRA
2. REGIONAL MANAGER, The Oriental Insurance Co. L.T.D.
REGIONAL OFFICE. MENTAL HOSPITAL SQUARE. CHHINDWADA ROAD. NAGPUR
Nagpur
MAHARASHTRA
3. TALUKA KRUSHI ADHIKARI, SAKOLI
TALUKA. SAKOLI DISTT. BHANDARA
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:Adv. UDAY P. KSHIRSAGAR , Advocate
For the Opp. Party:
Dated : 21 Jun 2019
Final Order / Judgement

             (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, मा.सदस्‍या. )

                                                                                   (पारीत दिनांक– 21 जून, 2019)

01.  तक्रारकर्तीने प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 ते 3 यांचे विरुध्‍द शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तिचे पतीचे मृत्‍यू संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम न मिळाल्‍या संबधात दाखल केलेली आहे.

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

      तक्रारकर्ती उपरोक्‍त नमुद पत्‍त्‍यावर राहत असून, तिचे मृतक पती श्री मारोती बाबुराव वडतकर यांचे मालकीची मौजा लाखोरी, तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा येथे भूमापन क्रं-39/1/1 ही शेत जमीन आहे. तिचा पती हा शेतकरी होता आणि शेतीवरच त्‍यांचे कुटूंबाचा उदरनिर्वाह चालू होता. विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 ही विमा कंपनी आहे तर विरुध्‍दपक्ष क्रं-3) तालुका कृषी अधिकारी असून ते महाराष्‍ट्र शासनाचे वतीने शेतक-याचा विमा काढतात व विमा दावा  स्विकारुन व आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेऊन पुढे तो विमा दावा विमा कंपनीकडे दाखल करतात. सदर विमा योजने अंतर्गत तक्रारकर्तीचे मृतक पतीचा रुपये-2,00,000/-एवढया रकमेचा शेतकरी अपघात विमा सरकाद्वारे काढण्‍यात आला असल्‍याने ती पत्‍नी या नात्‍याने कायदेशीर वारसदार म्‍हणून “लाभार्थी” आहे.

      तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पतीचा अपघाती मृत्‍यू दिनांक-05/08/2017 रोजी घरा समोरील सिमेंट नाली वरुन जात असताना तोल जाऊन सदर नालीच्‍या काठावर डोक आपटल्‍याने जख्‍मी होऊन झाला. तिने तिच्‍या पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा असल्‍याने  आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विरुध्‍दपक्ष क्रं-3 तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात विमा दावा प्रस्‍ताव दिनांक-25/10/2017 रोजी दाखल केला व वेळोवेळी विरुध्‍दपक्षा तर्फे मागणी केलेले दस्‍तऐवजांची पुर्तता केली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे दिनांक-20/01/2018 रोजीचे पत्र पाठवून तिचा विमा दावा पोस्‍ट  मार्टम रिपोर्ट आणि पोलीस अहवाला नुसार तिचा मृतक पती हा घटनेच्‍या वेळी दारुच्‍या अमलाखाली होता त्‍यामुळे Policy Exclusion Clause-11  नुसार विमा दावा मंजूर होण्‍यास अपात्र आहे असे कारण दर्शवून नामंजूर केला.

     या संदर्भात तक्रारकर्तीचे असे म्‍हणणे आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तिची फसवणूक केली असून विमा दाव्‍याची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करीत आहे. ज्‍या उद्देश्‍याने शासनाने मृतक शेतक-यांच्‍या पत्‍नी व मुलांसाठी ही योजना सुरु केली त्‍या उद्देश्‍यालाच विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तडा देत आहेत आणि दोषपूर्ण सेवा दिलेली आहे,    म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे पुढील मागण्‍या विरुध्‍दपक्षा विरुध्‍द केल्‍यात-

(01)  विरुध्‍दपक्षांना आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे मृतक पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा राशी रुपये-2,00,000/- द्दावी आणि सदर रकमेवर विमा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-26/10/2017 पासून ते रकमेचया प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-18% दराने व्‍याज द्दावे.

(02)  तिला झालेल्‍या  मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-50,000/- तसेच तक्रारखर्च म्‍हणून रुपये-20,000/- विरुध्‍दपक्षांनी देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

(03)   या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 दि ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी, पुणे यांना मंचाचे मार्फतीने रजिस्‍टर पोस्‍टाने नोटीस पाठविण्‍यात आली. सदर नोटीस वि.प.क्रं 1 यांना मिळाल्‍या बाबत रजि. पोस्‍टाची पोच पान क्रं 58 वर दाखल आहे परंतु अशी नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित न झाल्‍याने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने प्रकरणात पारीत केला.

04.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 ओरिएन्‍टल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, नागपूर तर्फे लेखी उत्‍तर मंचा समक्ष पान क्रं 62 ते 64 वर  दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी आपल्‍या लेखी उत्‍तरात तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू दिनांक-05/08/2017 रोजी झाल्‍याची बाब मान्‍य केली परंतु तिचे पतीचा मृत्‍यू हा दिनांक-05/08/2017 रोजी घरासमोरील सिमेंट नालीच्‍या वरुन जात असताना तोल जाऊन सिमेंट नालीच्‍या काठावर डोक आपटल्‍याने जखमी होऊन  झाल्‍याची बाब नामंजूर केली. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-20/01/2018 रोजीचे पत्र पाठवून त्‍याव्‍दारे पोलीस अहवाल आणि पोस्‍ट मार्टम अहवाला नुसार तिचा विमा दावा रद्द केल्‍याचे कळविलेले आहे. आपले विशेष कथनात त्‍यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्तीचे पती संबधात अपघाती घटना ही दिनांक-05/08/2017 चे 16.40 वाजता घडलेली असून तपासामध्‍ये पोलीस विभागा कडून निषकर्ष काढण्‍यात आला की, मृतकाला दारु पिण्‍याची सवय होती आणि घटनेच्‍या दिवशी तो दारु पिऊन जात असताना नशेमध्‍ये त्‍याचे घरा समोरील सिमेंट नालीवर तोल जाऊन सिमेंट नालीच्‍या काठावर डोक्‍याचे भागावर पडल्‍यामुळे जख्‍मी झाला आणि मरण पावला. तक्रारकर्तीचे मृतक पतीचे संबधात विमा दाव्‍या सोबत दाखल कलेले दस्‍तऐवज मृत्‍यू सुचना, पोस्‍टमार्टम रिपोर्ट आणि घटनास्‍थळ पंचनामा यावरुन असे दिसून येते की, घटनेच्‍या वेळी तक्रारकर्तीचा मृतक पती हा दारुचे नशेमध्‍ये होता आणि त्‍यामुळे त्‍याचा तोल जाऊन जख्‍मी होऊन मृत्‍यू झाल्‍याची बाब सिध्‍द होते म्‍हणून विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला, त्‍यामुळे त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने तक्रार खर्चासह खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 2 तर्फे  करण्‍यात आली.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी, तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा यांनी आपले लेखी उत्‍तर पान क्रं 54 ते 56 वर दाखल केले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात तक्रारकर्ती श्रीमती उषा मारोती वडतकर हिचे मृतक पतीचे नावे मौजा लाखोरी, तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा येथे शेती होती व तो शेतीचा व्‍यवसाय करीत होता ही बाब मान्‍य केली. ते शासनाचे वतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा दावे स्विकारुन व दस्‍तऐवजांची पुर्तता करुन सदर विमा प्रस्‍ताव विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे पाठवितात. तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू दिनांक-05/08/2017 रोजी झाला होता, त्‍या अनुषंगाने तक्रारकर्तीने त्‍यांचे कार्यालयात आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा प्रस्‍ताव दिनाक-25/10/2017 रोजी दाखल केला होता व त्‍यांनी सदर विमा प्रस्‍ताव पुढे दिनांक-26/10/2017 रोजी त्‍वरीत पुढील कार्यवाहीसाठी जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांचे कार्यालयात पाठविला होता. विमा दावा मंजूर अथवा नामंजूर करणे सर्वस्‍वी विमा कंपनीचे अधिकाराखालील बाब येते. सबब त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांनी केली.

06.    तक्रारकर्तीने तक्रारीचे पृष्‍टयर्थ दस्‍तऐवज यादी पृष्‍ठ क्रं- 10 नुसार एकूण-09 दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍या असून ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना-2016-17 शासन निर्णय, तिचा विमा दावा फेटाळल्‍या बाबत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिलेले पत्र, तिने तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात दाखल केलेला विमा दावा प्रस्‍ताव तसेच शेतीचे दस्‍तऐवज, तिचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍या बाबत मृत्‍यू सुचना व इतर पोलीस दस्‍तऐवज, शवविच्‍छेदन अहवाल, तिचे पतीचे मृत्‍यूचे प्रमाणपत्र, तिचे पतीचे वयाचा पुरावा, ग्राम पंचायत लाखोरी यांचे  वारसान प्रमाणपत्र अशा दसतऐवजाचे प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्तीने स्‍वतःचे शपथपत्र पान क्रं 67 व 68 वर दाखल केले तसेच लेखी युक्‍तीवाद पान क्रं 72 व 73 वर दाखल केला. तसेच   मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडे दाखल केलेत.

07.    विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे पान क्रं 76 वरील दस्‍तऐवज यादी प्रमाणे पॉलिसीची प्रत, करारनामा, विमा कंपनीचे विमा दावा रद्द केल्‍या बाबतचे पत्र, स्‍क्रुटीनी फॉर्म, अकस्‍मात मृत्‍यू सुचना, घटनास्‍थळ पंचनामा, मरणान्‍वेषन प्रतिवृत्‍त, पोस्‍टमार्टम रिपोर्ट इत्‍यादी दस्‍तऐवज दाखल केलेत व लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

08.   तक्रारकर्तीची तक्रार, लेखी युक्तिवाद, विरुध्‍दपक्ष क्रं- 2 विमा कंपनीतर्फे लेखी उत्‍तर, विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांचे लेखी उत्‍तर तसेच तक्रारकर्ती आणि विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे  प्रकरणांत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे मंचा तर्फे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष पुढील प्रमाणे.   

                               :: निष्‍कर्ष ::

09.   तक्रारकर्तीनेमहाराष्‍ट्र शासना तर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन-2016-17 संबधी दिनांक-25 नोव्‍हेंबर, 2016 रोजीचे परिपत्रकाची प्रत अभिलेखावर दाखल केली, त्‍यानुसार सदर योजने मध्‍ये संबधित शेतक-याचा अपघाती मृत्‍यू झाल्‍यास रुपये-2,00,000/- कायदेशीर वारसदारांना विमा रक्‍कम देण्‍याची तरतुद असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.

10.   विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-20/01/2018 रोजीचे पत्र पाठवून त्‍याव्‍दारे पोलीस अहवाल आणि पोस्‍ट मार्टम अहवाला नुसार सदर घटना ही दारुच्‍या नशेत झाली असल्‍याने Policy Exclusion No. 11 अनुसार तिचा विमा दावा रद्द केल्‍याचे कळविलेले आहे त्‍या कारणास्‍तव विमा दावा रद्द करीत असल्‍याचे दाखल पत्राचे प्रतीवरुन दिसून येते.

11.    तक्रारकर्तीने तिचे मृतक पती श्री मारोती बाबुराव वडतकर यांचे मृत्‍यू नंतर विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी यांचे कार्यालयात दिनाक-25/10/2017 रोजी विमा दावा प्रस्‍ताव व तयासोबत आवश्‍यक दस्‍तऐवजांच्‍या प्रती दाखल केल्‍यात ही बाब विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी यांनी सुध्‍दा उत्‍तरात मान्‍य केलेली आहे. महाराष्‍ट्र शासन आरोग्‍य विभाग यांचे मृत्‍यू प्रमाणपत्रावरुन मृतकाचा मृत्‍यू दिनांक-05/08/2017 रोजी झाल्‍याची बाब नमुद आहे.

12.   प्रस्‍तुत प्रकरणात विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे एकच वादातीत मुद्दा असा आहे की, पोलीस अहवाल आणि पोस्‍ट मार्टम अहवाला नुसार तक्रारकर्तीचा पती हा  अपघाती घटनेच्‍या वेळी दारुचे नशेत असल्‍याने Policy Exclusion No. 11 अनुसार तिचा विमा दावा रद्द केलेला आहे. थोडक्‍यात विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचा बचाव असा आहे की, मृतकाचा तोल हा दारुचे अमलाखाली असल्‍याने गेला आणि तो घरा शेजारील सिमेंटच्‍या नालीवर आपटल्‍याने त्‍याचे डोक्‍याला गंभीर दुखापत होऊन त्‍याचा मृत्‍यू झाला त्‍यामुळे तक्रारकर्ती ही विमा दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाही.

13.   गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने प्रमाणे अपघाताचे घटनेच्‍या वेळी संबधित मृतक हा शेतकरी असला पाहिजे तरच त्‍याचे कायदेशीर वारसदार हे विमा राशी मिळण्‍यास पात्र ठरतात. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनी तर्फे पॉलिसी शेडयुलची प्रत दाखल केली त्‍यामध्‍ये सदर सामूहिक विमा योजनेचा कालावधी हा दिनांक-01/12/2016 ते दिनांक-30/11/2017 चे मध्‍यरात्री पर्यंत असून विमा राशी ही रुपये-2,00,000/- असून कलेक्‍शन डेट ही 30/11/2016 अशी नमुद केलेली आहे. विमा करारात अपघाती मृत्‍यू आल्‍यास संपूर्ण विमा राशी देय असल्‍याचे नमुद आहे. विमा करारात असेही नमुद आहे की,  उंचा वरुन खाली पडल्‍याने अपघाती मृत्‍यू झालेला असल्‍यास एफआयआर/पोलीस पाटील रिपोर्ट, पोस्‍ट मार्टम रिपोर्ट, स्‍पॉट पंचनामा, इन्‍क्‍वेस्‍ट पंचनामा अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल कराव्‍यात असे नमुद आहे. तक्रारकर्तीने विमा दाव्‍या सोबत अकस्‍मात मृत्‍यू सुचना, घटनास्‍थळ पंचनामा,  मरणान्‍वेषन प्रतिवृत्‍त, पोस्‍टमार्टम रिपोर्ट, मृत्‍यू प्रमाणपत्र अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत, यावरुन सिध्‍द होते की, तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाला.

14.   मंचा तर्फे मृतकाचे मृत्‍यू संदर्भात पोलीस स्‍टेशन, लाखनी, उपविभाग साकोली, जिल्‍हा भंडारा यांचे तर्फे तयार करण्‍यात आलेल्‍या अकस्‍मात मृत्‍यू सुचना या दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता त्‍यामध्‍ये मृतक श्री मारोती वडतकर हा दारु पिण्‍याचे सवयीचा होता, तो दारु पित असल्‍याने कमजोर झाला होता आणि दारुचे नशेत असताना नालीत पडून मृत्‍यू झाला असावा असा मजकूर असून त्‍यामध्‍ये तक्रार नोंदविणा-याचे नाव श्री रामभाऊ नामदेव कमाने, पोलीस पाटील लाखोरी असे आहे. वैद्दकीय अधिकारी, ग्रामीण रुग्‍णालय, लाखनी, जिल्‍हा भंडारा यांनी दिलेल्‍या मृतकाचे  शवविच्‍छेदन अहवालाचे अवलोकन केले असता सदर अहवाला मध्‍ये मृतकाची शारिरीक प्रकृती सामान्‍य असल्‍याचे दर्शविले असून कोणतीही अनियमितता नोंदविलेली नाही तसेच मृत्‍यूचे कारण हे “Head Injury” असे नोंदविलेले आहे. सदर शवविच्‍छेदन अहवाला मध्‍ये मृतकाचे शरिरात दारुचा अंश असल्‍याची बाब नोंदविण्‍यात आलेली नाही. त्‍यामुळे पोलीसांनी नोंदविलेला अकस्‍मात मृत्‍यू सुचना या दस्‍तऐवजा मधील नोंदीशी शवविच्‍छेदन अहवालातील नोंदी या ताळमेळ खात नाहीत, दोन्‍ही अहवाल एकमेकांशी विसंगत आहेत.

15.  तक्रारकर्तीचे वकीलांनी आपले तक्रारीचे समर्थनार्थ खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे न्‍यायनिवाडयांवर आपली भिस्‍त ठेवली-

1)     2011 (4) CPR-23 (NC) “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Vyakatesh Babu”.

       सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये “FIR as also the statements recorded by police cannot be used y Insurance Company in support of its case”  पोलीसांनी नोंदविलेल्‍या एफआयआरचा उपयोग विमा कंपनीला होणार नाही असे मत नोंदविलेले आहे.

*****

2)   2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka”

      सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की,  पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

*****

3)     I (2018) CPJ 541 (NC) “Anil Kumar-Versus-National Insurance Co. Ltd.”

      सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये “Merely because case history reveals factum of alcohol influence without any supportive or cogent evidence it cannot be concluded as person was under alcohol influence” केवळ दारुचे अमलाखाली होता असे नमुद करुन चालू शकत नाही कारण ते सिध्‍द करण्‍यासाठी सक्षम असा पुरावा असला पाहिजे असे मत नोंदविलेले आहे.

*****

4)     II (2015) CPJ 146 (NC) “Bajaj Allianze General Insurance Co.Ltd.-Versus-Achla Rudranwas Marde”.

      सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये “Post mortem findings are not supported by any histopathological evidence of acute Alcohol injury to liver” मत नोंदविलेले आहे.

*****

5)      III (2015) CPJ 104 (NC) “M,Sujatha-Versus-Bajaj Allianze General Insurance Co.Ltd”.

      सदर मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयामध्‍ये “ Mere smell of alcohol or presence of ethyl alcohol in tissue samples cannot lead to inference that a person  is incapable of taking care of himself-Both post-mortem report and investigators report merely state that deceased had consumed alcohol without giving any details about actual amount of alcohol if consumed”  मृतकाचे शरिरात किती प्रमाणात अल्‍कोहल होते हे शवविच्‍छेदन अहवालात नमुद नसल्‍याने विमा दावा नाकारता येत नसल्‍याचे मत नोंदविलेले आहे.

*****

6)    2015 (2) CPR 316  (NC) Executive Engineer-Versus-Shisma Devi”.

*****

7)     2015 (2) CPR 345  (NC) “New India Assurance Co.Ltd-Versus-Ashminder”.

*****

8)   III (2015) CPJ 232 (NC) “Life Insurance Co.Ltd.-Versus-Ranjit Kaur”.

*****

थोडयाफार प्रमाणात अशाच आशयाची मते मा.वरिष्‍ठ न्‍यायालयानी नोंदविलेली असून  तक्रारकर्तीचे वकीलांनी दाखल केलेले न्‍यायनिवाडे हातातील प्रकरणात अंशतः लागू पडतात असे मंचाचे मत आहे.

16.  या संदर्भात  या मंचा तर्फे  खालील मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येत आहे, त्‍या निवाडयांचे मंचा तर्फे काळजीपूर्वक वाचन करण्‍यात आले त्‍यातील संक्षीप्‍त निरिक्षणे नोंदविण्‍यात आलीत, ती निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत-

  1. IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की,  पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा  पुराव्‍याचे कायद्दा नुसार भक्‍कम पुरावा आहे असे म्‍हणता येणार नसल्‍याने पोलीसांचे दस्‍तऐवजाचा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                *****

  1. 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka

      सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की,  पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

*****

3)       III (2016) CPJ-574 (NC) “S.B.I.Life Insurance Co.-Versus-Sudesh Khanduja & Anr.”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने डॉक्‍टरांचा अहवाला वरुन मृतकाने विष घेतले किंवा नाही हे स्‍पष्‍ट होऊ शकले नाही. पोलीसांनी घेतलेल्‍या जबाबाचा आधार हा विमा दावा नामंजूर करताना विमा कंपनीला घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

*****

4)       IV (2015) CPJ 307 (NC)-“United  India Assurance Co.Ltd.-Versus-Saraswatabai Balabhau Bharti”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, मृतकाने विष प्राशन केले होते या संबधाने पुरावा आलेला नसल्‍याने त्‍याने आत्‍महत्‍या केली होती असा निष्‍कर्ष काढता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

*****

17.   अभिलेखावर दाखल दस्‍तऐवजांचे पुराव्‍या वरुन हे सिध्‍द होते की, तक्रारकर्तीचे पतीचा अपघाती मृत्‍यू झाल्‍याची  बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते आणि तक्रारकर्तीचा मृतक पती हा घटनेच्‍या वेळी दारुच्‍या अमलाखाली होता या बाबत सक्षम असा वैद्दकीय अहवाल पुराव्‍या दाखल मंचा समक्ष सादर करण्‍यात आलेला नाही. केवळ पोलीसांनी नोंदविलेल्‍या बयानाचे आधारावर अपघाती घटनेच्‍या वेळी मृतक हा दारुचे नशेमध्‍ये होता असा निष्‍कर्ष न्‍यायमंचाला काढता येणार नाही. तसेच उपरोक्‍त नमुद मा.वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयां वरुन देखील तक्रारकर्तीचा विमा दावा योग्‍य असल्‍याचे दिसून येत असल्‍याने  गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा पॉलिसी नुसार तक्रारकर्तीचा विमा दावा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा दावा कंपनीने कोणत्‍याही सबळ पुराव्‍या शिवाय नामंजूर करुन तिला शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास देऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते.

18.    तक्रारकर्ती ही मृतक शेतकरी श्री मारोती बाबुराव वडतकर याची पत्‍नी व कायदेशीर वारसदार असल्‍याने तिला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात  विमा योजने प्रमाणे तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात विमा दावा रक्‍कम रुपये-2,00,000/- आणि सदर रकमेवर महाराष्‍ट्र शासनाचे शेतकरी अपघात विमा योजनेच्‍या परिपत्रका प्रमाणे सर्वप्रथम विमा प्रस्‍ताव दाखल केल्‍याचा दिनांक-25.10.2017 पासून विमा दावा निश्‍चीतीसाठी 60 दिवसांचा कालावधी सोडून म्‍हणजे दिनांक-25.12.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे असे मंचाचे मत आहे. तसेच तिचा अस्‍सल विमा दावा असतानाही कोणत्‍याही सबळ पुराव्‍याशिवाय तिचा विमा दावा फेटाळल्‍याने तिला झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-10,000/-आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व वाजवी आहे. त्‍याच प्रमाणे विरुध्‍दपक्ष क्रं 3 तालुका कृषी अधिकारी, लाखनी, तालुका लाखनी, जिल्‍हा भंडारा यांनी त्‍यांचे कर्तव्‍य योग्‍यरितीने पार पाडल्‍याने व त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नसल्‍याने त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

19.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-

                                :: आदेश ::

(01)  तकारकर्तीची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 अनुक्रमे ओरिएन्‍टल इनशुरन्‍स कंपनी कार्यालय, पुणे आणि नागपूर यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02) विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीला आदेशित करण्‍यात येते  की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने गोपीनाथ मुंडे  शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) द्दावेत आणि सदर रकमेवर दिनांक-25.12.2017 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष्‍य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्‍याज तक्रारकर्तीला द्दावे.

(03) विरुध्‍दपक्ष क्रं. 1 व 2 विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्‍हणून रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष क्रं- 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्तीला द्यावेत.

(04)  विरुध्‍दपक्ष -(3) तालुका कृषी अधिकारी, लाखनी यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

(05)   सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीने वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.विहित मुदतीत सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने न केल्‍यास अंतिम आदेशातील मुद्दा क्रं-(02) मध्‍ये नमुद केलेली विमा राशी मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने दंडनीय व्‍याजासह तक्रारकर्तीला देण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी जबाबदार राहिल.

(06) निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

(07)  तक्रारकर्तीला “ब” व “क” फाईल्‍स परत करण्‍यात याव्‍यात.

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.