ग्राहक तक्रार अर्ज क्र.238/2011
तक्रार अर्ज दाखल दि.04/11/2011
अंतीम आदेश दि.
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्री.जाफर फैजाब नाजीर अहमद, अर्जदार
रा.घर नं.5, आयेशा नगर, (अँड.एस.ए.कन्सारा)
सुपर कॉलनी, मालेगाव
ता.मालेगाव, जि.नाशिक.
विरुध्द
मे.डिव्हीजनल मॅनेजर, सामनेवाला
न्यु इडिया इन्शुरन्स कं.लि. (अँड.पी.पी.पवार)
मान भवन,महेश नगर,शिवाजी पुतळा,
मालेगाव.ता.मालेगाव,जि.नाशिक.
(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना वाहनाचे नुकसानीपोटी सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1,60,000/-मिळावेत, मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.30,000/- मिळावेत, अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.22 लगत लेखी म्हणणे, पान क्र.25 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढील प्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय.
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे
काय?- होय.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमपोटी व्याजासह रक्कम
तक्रार क्र.238/2011
वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे
खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द
अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांचे वतीने अँड.एस.ए.कन्सारा यांनी युक्तीवाद केलेला आहे तसेच सामनेवाला यांचे वतीने अँड.पी.पी.पवार यांनी युक्तीवाद केलेला आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये, त्यांनी अर्जदार यांचे ट्रकबाबत विमा पॉलिसी दिली होती ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी या कामी पान क्र.5 लगत पॉलीसी शेडयुल कम सर्टिफिकेट ऑफ इन्शुरन्स हजर केलेले आहे. पान क्र.5 चे कागदपत्र व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचे प्रकरण इन्व्हेस्टीगेटरने इन्व्हेस्टीगेट केले. इन्व्हेस्टीगेटमध्ये सदर गाडीत शरद पाटील, भारत कचवे, विनोद बागुल हे ट्रकमध्ये प्रवास करीत होते. तसेच अपघाताचे दिवशी गाडीचे फिटनेस सर्टिफिकेट संपलेले होते त्यामुळे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. म्हणून सदर क्लेमबाबत नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीचे उत्तरदायित्व नाही. सामनेवाला यांनी सेवेत कमतरता केलेली नाही.” असे म्हटलेले आहे.
अर्जदार यांनी पान क्र.8 लगत फिर्यादीची झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे तीच प्रत सामनेवाला यांनी पान क्र.28 लगत दाखल केलेली आहे. यामध्ये “गाडीत मुंबई आग्रा रोडने चांदवड येथे टोलनाक्यावर सोमा कंपनीचे तीन लोक रात्री 12.45 च्या सुमारास बसविले व मालेगाव बाजुकडे जाण्यास निघालो. तेंव्हा रात्री 1.30 चे सुमारास राहूड घाटात उतारावर स्पिडब्रेकरवर मी गाडी हळु केली असता तेंव्हा माझ्या गाडीचे पाठीमागून ट्रेलर गाडी नं.आर जे 14 जी ओ 1958 हा भरधाव वेगात आला व आमचे गाडीला पाठीमागून ठोस मारुन अपघात केला व आमचे गाडीला रॉंग साईडला डिव्हायडर तोडून दरीत गेला. आमची गाडीपण दरीत गेली. अपघातात क्लिनरच्या डोक्यास मार लागला आहे व गाडीत बसलेले सोमा कंपनीचे लोक यांना पण मार लागलेला आहे.” असा उल्लेख आहे.
तक्रार क्र.238/2011
तसेच सामनेवाला यांनी पान क्र.32 लगत इन्व्हेस्टीगेशनची मुळ अस्सल प्रत दाखल केलेली आहे. यामध्ये “टोल नाक्यावरील 3 नोकर श्री.शरद पवार, श्री.भारत कचवे व विनोद बागूल यांना विचारपूस केली असता वरील तिघांनी रात्रीची वेळ असल्याने बसेस थांबत नाहीत व मालेगाव येथे जावयाचे असल्याने व गावचीच गाडी असल्याने विनंती केल्याने त्यांच्या गाडीत कोणताही मोबदला न घेता बसविले.” असा उल्लेख आहे. तसेच इन्व्हेस्टीगेशन रिपोर्टमधील चौकशीचा निष्कर्ष यामध्ये“वरील तिन्ही जण हे टोलनाक्यावरील तिकीट कलेक्टर असल्याने व नेहमीच्या परीचयामुळे कोठलेही भाडे दिले नसल्याचे सांगतात तसेच ड्रायव्हर हे पण वरील तिन्ही साक्षीदार हे नेहमीच्या परीचयाचे व गावाचे असल्याने भाडे घेतले नसल्याचे सांगतात तसेच त्यांनी गाडीत भाडयाने प्रवास करीत होते असे सांगितलेले नाही. ”असा उल्लेख आहे.
अर्जदार यांनी दाखल केलेले पान क्र.8 व सामनेवाला यांनी दाखल केलेले पान क्र.28 व पान क्र.32 वरील कागदपत्रे याचा विचार होता अपघातग्रस्त वाहनाचा अपघात ड्रायव्हरच्या चुकिमुळे झालेला नसुन अर्जदार यांचे वाहन स्पिड ब्रेकरवर हळु केले असता पाठीमागून भरधाव येणा-या ट्रेलर गाडी अर्जदार यांच्या वाहनाला पाठीमागून ठोस मारुन अपघात झाला असे स्पष्ट दिसुन येत आहे. पान क्र.29 लगतचे सर्वे अहवालामध्ये अपघातग्रस्त वाहनातील इंजिन किंवा इतर पार्टमधील दोषामुळे अपघात झालेला आहे असा कुठेही उल्लेख नाही. याचा विचार होता फिटनेस सर्टीफिकेट व अपघाताचे कारण यांचा कोणताही संबंध नाही, हे सामनेवाले यांचे पान क्र.29 चे सर्वे अहवालानुसार स्पष्ट झालेले आहे.
जे तीन प्रवासी अपघातग्रस्त वाहनामधून प्रवास करीत होते त्या प्रवाशांनी प्रवासी भाडयाची रक्कम दिलेली आहे ही बाब सामनेवाला यांनी शाबीत केलेली नाही तसेच या तीन प्रवाशांच्यामुळे अपघात झालेला आहे ही बाबही सामनेवाला यांनी शाबीत केलेली नाही. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाले यांनी अर्जदार यांचा विमाक्लेम चुकिचे व अयोग्य कारण देऊन नाकारलेला आहे व त्यामुळे सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
1) 1(2012) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 262. न्यु इंडिया इन्शुरन्स कं. विरुध्द कोटलु ब्रम्हान्ना ट्रान्सपोर्ट सोसायटी.
तक्रार क्र.238/2011
2) 2009 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 518. पी.बी.वेंकटारेड्डी विरुध्द न्यु इंडिया इन्शुरन्स कं.
3) 4(2010) सि.पी.जे.राष्ट्रीय आयोग. पान 315. नॅशनल इन्शुरन्स कं. विरुध्द पी.डी.प्रजापती
अर्जदार यांनी याकामी सामनेवाले यांचेकडून विमाक्लेमपोटी रक्कम रुपये 1,60,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे. अर्जदार यांनी याकामी पान क्र.13 ते पान क्र.18 लगत वाहन दुरुस्तीचे खर्चाची इस्टीमेट व कोटेशन सादर केलेले आहे. सामनेवाले यांनी पान क्र.29 लगत सर्वेअर विक्रम पाटील यांचे सर्वे रिपोर्ट दाखल केलेला आहे. पान क्र. 13 ते पान क्र.18 लगतचे इस्टीमेट, कोटेशन्स व त्यामधील नोंदी याची तुलना पान क्र.29 लगतचे सर्वे रिपोर्ट मधील नोंदी याच्याशी केली असता पान क्र.29 चा सर्वेरिपोर्ट योग्य व बरोबर आहे असे दिसुन येत आहे. पान क्र.29 चा सर्वे रिपोर्ट कोणत्या कागदपत्रांचे आधारावर चुकिचा आहे हे स्पष्ट करण्याकरीता अर्जदार यांनी कोणताही योग्य तो पुरावा सादर केलेला नाही. सामनेवाले यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र व पान क्र.29 लगतचा सर्वे रिपोर्ट याबाबत अर्जदार यांनी लेखी प्रतिउत्तर व प्रतिज्ञापत्र दाखल केलेले नाही. पान क्र.29 लगतचे सर्वे रिपोर्टमधील नोंदीचा विचार करता अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून विमाक्लेमपोटी रु.84,555/- इतकी रक्कम वसुल होवुन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
1(2012) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 341. चनन प्रित सिंग विरुध्द युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.
सामनेवाला यांचेकडून अर्जदार यांना रक्कम रु.84,555/- इतकी मोठी रक्कम योग्य त्या वेळेत मिळालेली नाही. यामुळे अर्जदार यांना निश्चीतपणे आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून आर्थीक नुकसान भरपाई म्हणून मंजूर रक्कम रु.84,555/- या रकमेवर पान क्र.29 चे सर्व्हे रिपोर्टची तारीख दि.28/10/2010 पासून दोन महिन्यानंतर म्हणजे दि.29/12/2010 संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.
तक्रार क्र.238/2011
1) 2 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.186. ओरीएन्टल इन्शुरन्स कंपनी विरुध्द राजेंद्रप्रसाद बन्सल.
2) 1 (2008) सी.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान क्र.265. संजीवकुमार विरुध्द न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनी.
सामनेवाला यांचेकडून विमाक्लेमची रक्कम वसूल होवून मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचामध्ये दाद मागावी लागली आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकीलांचा युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेः
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यातः
अ) विमा क्लेमपोटी रक्कम रु.84,555/- व आर्थीक नुकसान भरपाई
म्हणून या मंजूर रकमेवरती दि.29/12/2010 पासून संपुर्ण रक्कम
फिटेपर्यंत द.सा.द.शे.9 टक्के दराने व्याज द्यावे.
ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- द्यावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत
(आर.एस.पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.
दिनांकः-12/03/2012