निकालपत्र :- (दि.28/07/2010) ( सौ. प्रतिभा जे. करमरकर,सदस्या) (1) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- तक्रारदार क्र.1 या मयत बाजीराव पाटील यांच्या विधवा असून तक्रारदार क्र.2 व 3 ही त्यांची मुले आहेत. मयत बाजीराव बळवंत पाटील दि.23/09/2001 रोजी विलास दत्तात्रय बिरंजे यांच्या मालकीच्या जीप नं.MH-09-C-881 मधून प्रवास करताना कसबा बावडा ते कसबा ठाणे रोडवर अपघातामध्ये मयत झाले आहेत. श्री बिरंजे यांनी सदर जीपचा विमा सामनेवाला विमा कंपनीकडे उतरविला होता. सदर विमा पॉलीसी पर्सनल अॅक्सिडेंट स्वरुपाची होती व त्यामध्ये पॅसेंजर अॅक्सिडेंट बेनिफीट क्लॉज असल्याचे व त्यासाठीचा जास्त प्रिमियम श्री बिरंजे यांनी भरल्याचे तक्रारदार यांना समजल्यावर त्यांनी सामनेवालांकडे क्लेमसंबंधरी नोटीसीने मागणी केली. सदर नोटीसीला सामनेवालाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने तक्रारदार यांनी प्रस्तुत मंचाकडे 35/2006 ही ग्राहक तक्रार केली.सदर तक्रारीच्या बाबतीत प्रस्तुत मंचाने दि.10/10/2007 रोजी आदेश पारीत केला होता. त्या आदेशानंतर तक्रारदार यांनी त्वरीत सामनेवाला यांचेकडे क्लेमची मागणी केली असता सामनेवाला यांनी दि.03/06/2009 रोजी क्लेम दाखल करण्यास उशीर केला तसेच अपघाताच्या वेळी मयत बाजीराव पाटील हे दारुच्या नशेत असल्याचे चुकीचे कारण देऊन तक्रारदारचा न्याय्य क्लेम नाकारला आहे. ही सामनेवालाच्या सेवेतील त्रुटी आहे असे तक्रारदाराचे कथन आहे. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत मंचाचा दरवाजा ठोठावला आहे व आपल्या पुढील मागण्या मान्य व्हाव्यात अशी मागणी केली आहे. तक्रारदारने विमा क्लेमची रक्कम रु.1,00,000/- दि.23/12/01 पासून द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावेत तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.50,000/-व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावा अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (2) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी विमा क्लेम नाकारलेचे पत्र दाखल केले आहे. (3) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेत असे निदर्शनास आणून दिले आहे की, मयत बाजीराव पाटील दि.23/09/2001 रोजी अपघातात मृत्यू पावले. परंतु तक्रारदाराने क्लेम सन 2006साली दाखल केला होता. त्यामुळे सदर क्लेम हा लिमिटेशनाचा मुद्दा विचारात घेऊन सामनेवालाने नामंजूर केला आहे. हयामध्ये सामनेवालाने पूर्ण जबाबदारीने व विचारपूर्वक सदर क्लेमचा विचार करुनच क्लेम नामंजूर केला आहे व त्यामध्ये सामनेवालाच्या सेवेत कुठलीही त्रुटी नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह निकाली काढावी अशी विनंत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (4) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत सदर अपघातातील गु.र.नं.105/01 मधील स.पो. निरीक्षक, करवीर यांचा वर्दीजबाब दाखल केला आहे. (5) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. तसेच दाखल कागदपत्र तपासले. मयत बाजीराव बळवंत पाटील यांचा अपघाती मृत्यू दि.23/09/2001 रोजी झाला व तक्रारदाराने विमा क्लेम सन-2006 मध्ये दाखल केला. त्यामुळे विमा पॉलीसीच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदाराचा क्लेम लिमिटेशनच्या नंतर केला होता. पॉलीसीतील लिमिटेशनच्या महत्वाच्या अटींचा तक्रारदाराने भंग केला असल्याने सामनेवालाने सदर क्लेम नामंजूर केला. तक्रारदाराने क्लेम दाखल करण्यास मर्यादेबाहेर विलंब करण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण दाखल केले नाही हे सामनेवालाचे कथन हे मंच ग्राहय धरत आहे. सामनेवालाचया सेवेमध्ये कुठलीही त्रुटी झाली नाही असा निष्कर्ष हे मंच काढत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |