निकालपत्र :- (दि.11.08.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. तक्रारदार तसेच त्यांचे वकिल गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.कोल्हापूर येथे असिस्टंट जनरल मॅनेजर असून त्यांनी व इतर अधिकारी वर्गांनी स्वत:करिता व स्वत:चे कुटुंबातील इतर सदस्यांकरिता सामनेवाला यांचेकडून ‘ग्रुप जनता पर्सनल अॅक्सिडेंट पॉलीसी’ क्र.47/152303/18072 ही पॉलीसी उतरविलेली होती. तिचा कालावधी दि.27.11.1998 ते दि.26.11.2009 असा आहे. सदर पॉलीसी अंतर्गत तक्रारदारांची पत्नी समाविष्ट आहे व तक्रारदार हे नॉमिनी आहेत. तक्रारदारांच्या पत्नी दि.07.10.2006 रोजी अपघातात मयत झालेल्या आहेत. सर्व कागदपत्रांसह सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेमची मागणी केली असता मयत माधवी बंडोपंत किल्लेदार या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.कोल्हापूर येथे नोकरीस नसल्याने तक्रारदारांचा क्लेम फेटाळलेला आहे व तक्रारदारांचा न्याय्य क्लेम नाकारलेला आहे. सबब, विमा रक्कम रुपये 4 लाख द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 25,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांनी क्लेम नाकारलेबाबतचे पत्र, तक्रारदारांच्या पत्नीचा मृत्यूचा दाखला, पॉलीसी, श्येडयुल, सामनेवाला यांनी परत केलेला प्रिमियम इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.कोल्हापूर यांचेकडे असलेल्या अधिका-यांसाठी तक्रारीत उल्लेख केलेली पॉलीसी दिलेली होती. त्यानुसार तक्रारदारांना पॉलीसी दिलेली होती. परंतु, तक्रारदारांच्या मयत पत्नी यांना सदरची पॉलीसी दिलेली नव्हती. त्यामुळे तक्रारदारांचा क्लेम नाकारलेला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी व सामनेवाला यांना रुपये 10,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यासोबत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.कोल्हापूर यांचे दि.21.02.2007 रोजीचे पत्राची प्रत दाखल केली आहे. (6) या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्हणणे, उपलब्ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. त्या अनुषंगाने तक्रारीत उल्लेख केलेल्या पॉलीसीचेही अवलोकन केले आहे. सदर पॉलीसीचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेली पॉलीसी ही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.कोल्हापूर यांच्याकडील अधिका-यांसाठी दिलेली आहे. त्यामध्ये दर अधिका-यांच्या कुटुंबियांना समाविष्ट केलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांना त्यांच्या अपघातात मरण पावलेल्या पत्नीबाबतचा क्लेम हा सदर अटी व शर्तीनुसार सामनेवाला विमा कंपनीने दिलेला नाही. त्यामुळे सामनेवाला विमा कंपनीची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |