Maharashtra

Nashik

CC/194/2011

Shri Surendra BalKrishna Davkher - Complainant(s)

Versus

Divisional Manager Star Health & Alied Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

Shri Anis Shekh

31 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/194/2011
 
1. Shri Surendra BalKrishna Davkher
R/o N-42 /JC-1/23/3 Jijamata chowk Cidco Nashik
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager Star Health & Alied Insurance Co. Ltd.
18 kapadia Commercial complex Opp. Janlaxmi Bank Head Office Old Agra Rd. Nashik
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Shri Anis Shekh, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.अध्‍यक्ष, श्री.आर.एस.पैलवान  यांनी निकालपत्र पारीत केले)

 

                      नि  का      त्र                             

अर्जदार यांना सामनेवालाकडून क्‍लेमची रक्‍कम रु.40,000/- मिळावेत, या रकमेवर दि.16/02/2011 पासून  द.सा.द.शे.20% दराने व्‍याज मिळावे, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.              

सामनेवाला यांनी पान क्र.35 लगत लेखी म्‍हणणे व पान क्र.36 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे.

 

 अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दें विचारात घेतले आहेत.

मुद्देः

1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय? - होय

2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे

   काय?-होय.

3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मेडीक्‍लेम विमापॉलिसीपोटी रक्‍कम

   वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत काय?- होय.

4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी

   रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत काय?- होय.

5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्‍द

   अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 विवेचन

या कामी अर्जदार व सामनेवाला या दोघांतर्फे युक्‍तीवाद करण्‍यात आलेला नाही.

अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून मेडीक्‍लेम विमापॉलिसी घेतलेली आहे.  ही बाब सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे कलम 1 मध्‍ये मान्‍य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.5 लगत पॉलिसी शेडयुलची झेरॉक्‍स प्रत हजर केलेली आहे. सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व पान क्र.5 लगतचे विमापॉलिसी शेडयुल यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये अर्जदार यांनी योग्‍य रित्‍या कागदपत्रे जमा केलेली नाहीत. रक्‍कम रु.36,659/- चा क्‍लेम अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडे जमा केलेला आहे.  यामधील रुम चार्जेस, ऑपरेशन चार्जेस व पॉलिसीनुसार मिळणा-या रकमा याचा विचार होवून सदरचा क्‍लेम रक्‍कम रु.29,959/- रुपयांपर्यंतच मान्‍य करता येण्‍यासारखाच आहे, परंतु अर्जदार हे विनाकारण बिलाची रक्‍कम वाढवून मागत आहेत. अर्जदार यांनी जे फायनल बिल दिले आहे त्‍यात देखील तपासणी चार्जेस व ड्रग चार्जेस समाविष्‍ट करण्‍यात आलेले आहेत. अर्जदार यांनी उपचाराचे जे बिल डॉ.इंदोरवाला यांचेकडून घेतलेले आहे ते देखील जास्‍त आहे. अर्ज रद्द करण्‍यात यावा. असे म्‍हटलेले आहे.

अर्जदार यांनी तक्रार अर्ज विनंती कलम 6 अ मध्‍ये क्‍लेमची रक्‍कम रु.40,000/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे, परंतु याबाबतचा योग्‍य तो पुरावा अर्जदार यांनी दाखल केलेला नाही. पान क्र.14 लगत हॉस्‍पीटलचे जे फायनल बिल अर्जदार यांनी दाखल केलेले आहे, त्‍याबाबत अर्जदार यांनी योग्‍य ते प्रतिज्ञापत्र दिलेले नाही. पान क्र.14 चे बिलामध्‍ये डॉक्‍टर राऊंड चार्जेस, ड्रग्‍ज व गॅस चार्जेस अशा रकमांचा उल्‍लेख करण्‍यात आलेला आहे.  याचा विचार होता पान क्र.14 चे फायनल बिल हे अयोग्‍य व चुकीचे आहे असे दिसून येत आहे.  सामनेवाला यांनी पान क्र.38 लगत अर्जदार यांचे क्‍लेमबाबत टोटल अँप्रुव्‍हड् अमाऊंट म्‍हणून रक्‍कम रु.29,959/- अशी रक्‍कम दिलेली आहे.  परंतु सामनेवाला यांनी अर्जदार यांना ही टोटल अँप्रुव्‍हड् अमाऊंट  रक्‍कम रु.29,959/- इतकी रक्‍कम विमाक्‍लेम पोटी मंजूर करणे गरजेचे होते.  परंतु अशा प्रकारे कोणतीही रक्‍कम सामनेवाला यांनी विमाक्‍लेमपोटी मंजूर केलेली नाही.  वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

पान क्र.38 लगत सामनेवाला यांनी अर्जदार यांचे विमाक्‍लेमबाबत बिलाची जी समरी दाखल केली आहे ही समरी कशा प्रकारे अयोग्‍य व चुकीची आहे हे दर्शवण्‍याकरीता अर्जदार यांनी कोणताही योग्‍य तो पुरावा दाखल केलेला नाही. पान क्र.38 चे समरीचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मेडीक्‍लेम विमापॉलिसीपोटी पान क्र.38 चे सामनेवाला यांचे समरीनुसार रक्‍कम रु.29,959/- इतकी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

सामनेवाला यांचेकडून मेडीक्‍लेम विमापॉलिसीपोटी रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्जदार यांना सामनेवाला विरुध्‍द या मंचामध्‍ये दाद मागावी लागलेली आहे.  यामुळे निश्‍चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.2500/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांचा तक्रार अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, प्रतिज्ञापत्रे, त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहेत.

                           आ दे श

 

1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत

   आहे.

2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे

   रकमा द्याव्‍यात.

2अ) मेडीक्‍लेम विमा पॉलिसीपोटी रक्‍कम रु.29,959/- द्यावेत.

2ब) मानसिक त्रासापोटी रु.2500/- द्यावेत.

2क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.