::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/11/2014 )
माननिय सदस्य श्री.ए.सी.उकळकर, यांचे अनुसार : -
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये दाखल केलेल्या या तक्रारीचा सारांश खालीलप्रमाणे -
तक्रारदाराची गाडी, स्वीफट डिझायर झेडडीआय ही मारोती कार नोंदणी क्र. एमएच. 37-अे–3379, चेसीस नं. 210862 ही कार अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड, अमरावती येथून खरेदी केली. सदरची कार खरेदी करतांना तक्रारकर्ता यांनी, नॅशनल इंन्शुरन्स कंपनीची पॉलिसी क्र. 70650084 अन्वये रुपये 16,237/- चा भरणा करुन, विरुध्द पक्ष कंपनीतर्फे विमा उतरविण्यात आला होता. सदरहू पॉलिसी दिनांक 25 ऑकटोंबर 2010 पर्यंत वैध होती. तक्रारकर्त्याने सदरहू गाडी ही रुपये 7,31,300/- अतिरीक्त उपकरणासह खरेदी केली होती. सदर गाडी ही वाशिम येथे एका निंबाच्या झाडाला धडकल्यामुळे दूर्घटनाग्रस्त झाली व सदरहू कारचे भरपूर नुकसान झाले. सदरची कार ही सद्यस्थितीत अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड, शाखा वाशिम येथे उभी आहे. तक्रारदाराने सदर अपघाताबाबत विरुध्द पक्षास कळविले होते. त्यानंतर तक्रारदाराने, विरुध्द पक्षाच्या कार्यालयात रितसर मोटार अपघात दावा क्लेम फॉर्म भरुन दिला होता. विरुध्द पक्षाने सदरचा दावा पुढीलप्रमाणे सेटल केला. अ) साल्वेज किंमत रुपये 3,40,000/- ब) विमा रक्कम रुपये 2,10,000/- एकूण रक्कम रुपये 5,50,000/-. तक्रारदारास पहीले डिस्चार्ज व्हाऊचर रक्कम रुपये 2,09,499/- हे दिनांक 23/05/2011 रोजी देण्यात आले. सेटल झालेल्या क्लेमनुसार विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दुसरे डिस्चार्ज व्हाऊचर रक्कम रुपये 4,22,220/- ही व्हाउचरच्या स्वरुपात दिली. परंतु आजतागायत सदरची रक्कम तक्रारकर्ता यांना देण्यात आली नाही. तक्रारकर्त्याने वारंवार विचारणा करुन देखील सदरहू रक्कम देण्यांत आली नाही. म्हणून तक्रारकर्त्याने सदरची गाडी रमेश बतरेजा यांच्यासोबत विकण्याबाबत सौदाचिठठी केली. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास त्यांच्या हक्काची रक्कम न दिल्यामुळे, तक्रारकर्त्यास एस.बी.आय. बँकेचे कर्ज फेडणे कठीण जात आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांच्याविरुध्द ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम-2 (1) (ग) अन्वये सेवेमध्ये अत्यंत न्युनता तसेच हलगर्जीपणा केला आहे, हे स्पष्ट होते. तसेच कलम-2 (1) (आर) अन्वये अनुचीत व्यापार प्रथेचा अवलंब केला. त्यामुळे, तक्रारकर्ता यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सोसावा लागत आहे. तक्रारकर्त्याने तक्रारीत विवरण दिल्याप्रमाणे एकूण रक्कम रुपये 5,68,880/- ची विरुध्द पक्षाकडून मागणी केली. तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष यांना दिनांक 06/01/2012 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस देवून सुध्दा तक्रारकर्त्याला रक्कम रुपये 4,22,220/- दिली नाही तसेच नोटीसचे ऊत्तर सुध्दा दिले नाही. विरुध्द पक्ष क्र. 2 व इतर सर्व विरुध्द पक्ष हे एकमेकातर्फे व्यवसाय करीत असल्यामुळे संयुक्तरित्या व स्वतंत्ररित्या रक्कम देण्यास बाध्य आहेत. सदरहू तक्रार ही मुदतीत आहे व न्यायमंचाच्या अधिकारक्षेत्रात आहे.
त्यामुळे, तक्रारकर्ते यांनी, सदर तक्रार, या न्यायमंचासमोर, दाखल करुन, वाहनाची नुकसान भरपाई रुपये 5,68,880/- व त्यावर 24 % दराने व्याजासह, विरुध्द पक्ष क्र. 1 ते 4 यांच्याकडून संयुक्तरित्या व स्वतंत्ररित्या तक्रारकर्त्यास मिळावे, अशी विनंती, सदर तक्रारीचे शेवटी, केलेली आहे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असुन, त्यासोबत एकंदर 17 दस्त पुरावा म्हणून सादर केले आहेत.
2) विरुध्द पक्षाचा लेखी जवाब -
ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर मंचाने विरुध्द पक्षाला नोटीस काढली. त्यानंतर निशाणी 14 प्रमाणे विरुध्द पक्षाने त्यांचा लेखी जवाब मंचासमोर दाखल करुन, तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे फेटाळले. विरुध्द पक्षाला हे मान्य आहे की, स्वीफट डिझायर झेडडीआय ही मारोती कार नोंदणी क्र. एमएच. 37-अे–3379, चेसीस नं. 210862 ही कार अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड,अमरावती येथून खरेदी केली. सदरची कार खरेदी करतांना तक्रारकर्ता यांनी, नॅशनल इंन्शुरन्स कंपनीची पॉलिसी क्र. 70650084 अन्वये रुपये 16,237/- चा भरणा करुन, विरुध्द पक्ष कंपनीतर्फे विमा उतरविण्यात आला होता. विरुध्द पक्षाने पुढे अधिकचे कथनामध्ये नमुद केले ते थोडक्यात येणेप्रमाणे, तक्रारकर्ता यांची तक्रार या न्यायमंचासमक्ष चालू शकत नाही. तक्रारकर्ता हा विविध कागदपत्रे व सत्य परिस्थिती लपवून, मनघडंत कहानीव्दारे वि. मंचासमक्ष आपली तक्रार घेवून आला आहे. तक्रारकर्ता यांचेकडून गाडीचा अपघात झाल्याबाबत सुचना मिळाली, त्याप्रमाणे विरुध्द पक्षाने स्पॉट सर्वे करिता श्री. महेश गांधी हयांची सर्वेअर म्हणून नियुक्ती केली व त्यांच्या रिपोर्ट नुसार कार्यालयीन चौकशी व शहानिशा केल्यानंतरच दिनांक 27/02/2011 ला सर्व्हे रिपोर्ट तयार करुन, विरुध्द पक्ष क्र. 2 कडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला. त्यांच्या सर्व्हे अहवालानुसार, तक्रारकर्त्याच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर साल्वेज किंमत ही रुपये 4,22,220/- एवढी नियमाप्रमाणे काढली व सदरचा दावा नेट लॉस बेसीसवर सेटल करण्याची शिफारस केली. सदरच्या गाडीची एकूण सम इन्शुअर्ड रक्कम रुपये 6,32,219/- इतकी होती. तक्रारकर्ता यांनी स्वत: नेट लॉस सेटलमेंट करण्यास व अपघातग्रस्त गाडीचा ताबा व मालकी हक्क स्वत:कडे राहावे या उददेशाने सम इन्शुअर्ड रक्कम रुपये 6,32,219/- वरुन कमी करुन रुपये 5,50,000/- इतकी गृहीत धरण्यात यावी, असे लेखी संमतीपत्र दिनांक 13/1/2011 ला स्वखुशीने दिले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा हा पुढीलप्रमाणे निकाली काढला. सम इन्शुअर्ड रक्कम रुपये 6,32,219/- वजाती अ) साल्वेज किंमत रुपये 4,22,219/- वजा ब) विमा रक्कम रुपये 2,10,000/- वजा अतिरीक्त रक्कम रुपये 500/- वजा मुद्रांक तिकीट रुपये 1/- = उर्वरीत एकूण रक्कम रुपये 2,09,499/-. तक्रारदारासडिस्चार्ज व्हाऊचर रक्कम रुपये 2,09,499/- हे दिनांक 23/05/2011 रोजी फुल अँन्ड फायनल सेटलमेंट म्हणून पाठविले व तक्रारकर्त्याला गाडीचा मालकी हक्क व ताबा हा तक्रारकर्त्याकडे अबाधीत ठेवला. सदरहू रक्कम ही तक्रारकर्त्याने स्वखुशीने स्विकारली. तक्रारकर्त्याने सदरहू रक्कम अंडर प्रोटेस्ट किंवा कोणत्याही दबावाखाली स्विकारलेली नाही. विरुध्द पक्ष - विमा कंपनी केंव्हाही पार्ट पेमेंट करीत नसते. विरुध्द पक्षाने रुपये 4,22,219/- चा डिस्चार्ज व्हाऊचर तक्रारकर्त्याला दिलेला नव्हता तो व्हाऊचर संपूर्ण गाडीचा सेम ऑफ साल्व्हेज व्हॅल्यू बाबतचा होता. तक्रारकर्त्याने गाडीचा क्लेम नेट लॉस बेसीस नुसार विरुध्द पक्षाकडून रुपये 2,09,499/- नुकसान भरपाई म्हणून घेतलेला आहे व सोबत सदरहू गाडीचा ताबा व मालकी हक्क सुध्दा घेतलेला आहे. त्यामुळे दुस-या डिस्चार्ज व्हाऊचरचा प्रश्न उद्भवत नाही. तक्रारकर्ता हा कोणालाही गाडी विकू शकतो परंतु तक्रारीमधील दर्शविलेला विक्री व्यवहार हा बनावटी स्वरुपाचा आहे, हे सिध्द होते. तसेच तक्रारकर्त्याच्या नोटीसला विरुध्द पक्ष क्र. 2 ने त्यांच्या वकिलामार्फत रितसर आणि सविस्तर जबाब दिलेला आहे. सदरहू क्लेम बाबत विरुध्द पक्षाकडे तक्रारकर्त्याची कोणतीही कायदेशीर रक्कम घेणे बाकी नसल्यामुळे सदरची तक्रार खर्चासह खारिज करण्यांत यावी, अशी विनंती केली.
सदर जवाब, विरुध्द पक्ष यांनी, शपथेवर, दाखल केला व सोबत दस्तऐवज यादीप्रमाणे 18 कागदपत्रे दाखल केलीत.
3) कारणे व निष्कर्ष ::
तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्द पक्षाचा लेखी जबाब, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे, तक्रारकर्त्याचे प्रतिऊत्तर,तक्रारकर्त्याचा प्रतिज्ञापत्रावरील पुरावा, तक्रारकर्त्याचा लेखी युक्तिवाद, दोन्ही पक्षाने दाखल केलेले न्यायनिवाडे व दोन्ही पक्षांनी केलेला युक्तिवाद एैकला असता खालील निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे.
उभय पक्षांना मान्य असलेल्या बाबी म्हणजे, तक्रारकर्त्याने स्वीफट डिझायर झेडडीआय ही मारोती कार नोंदणी क्र. एमएच. 37-अे–3379, चेसीस नं. 210862 ही कार अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड, अमरावती येथून खरेदी केली. सदरची कार खरेदी करतांना तक्रारकर्ता यांनी, नॅशनल इंन्शुरन्स कंपनीची पॉलिसी क्र. 70650084 अन्वये रुपये 16,237/- चा भरणा करुन,विरुध्द पक्ष कंपनीतर्फे विमा उतरविण्यात आला होता. सदरहू पॉलिसी दिनांक 25 ऑकटोंबर 2010 पर्यंत वैध होती. विरुध्द पक्ष व अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड यांच्यामध्ये ग्राहकांना पॉलिसी काढून देण्याबाबत करार असल्यामुळे पॉलिसीवर अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड तर्फे अधिकृत व्यवस्थापकाची व विरुध्द पक्ष क्र. 1 यांची सही आहे. तसेच विरुध्द पक्षाला तक्रारकर्ते हे त्यांचे ग्राहक आहेत याबाबत कुठलाही आक्षेप नाही.
तक्रारकर्त्याने युक्तिवाद केला की, सदरहू गाडी ही वाशिम येथे निंबाच्या झाडाला धडकल्यामुळे दूर्घटनाग्रस्त झाली व त्याचे पूर्णत: नुकसान झाले. तक्रारकर्त्याने याबाबत विरुध्द पक्षास दिनांक 25/09/2010 रोजी कळविले होते. त्यानंतर विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला सदरहू गाडी अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड, शाखा वाशिम येथे दुरुस्ती करण्यास जमा करण्यास सांगितले. तक्रारकर्त्याने मोटार अपघाता दाव्याचा अर्ज विरुध्द पक्षाकडे सादर केला. त्यावेळेस विरुध्द पक्षाने सदरचा दावा,निवारण करण्याबाबत 1) रुपये 3,40,000/- साल्वेज किंमत 2) विमा रक्कम रुपये 2,10,000/-, एकूण रक्कम रुपये 5,50,000/- रुपयाचा प्रस्ताव तक्रारकर्त्यास दिला. सदरहू प्रस्ताव तक्रारकर्त्याने त्यावेळेस मान्य केला होता. परंतु त्याबाबत पुर्तता न झाल्याने, तो प्रस्ताव तक्रारकर्त्याने अमान्य केला. तद् रोपांत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा, विरुध्द पक्षाच्या सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे सेटल केला. त्याप्रमाणे दिनांक 23/05/2011 रोजी तक्रारकर्त्याला रुपये 2,09,499/- रुपयाचे पहिले डिस्चार्ज व्हाऊचर देण्यात आले व ते परस्पर गाडीवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात आले. त्यानंतर विरुध्द पक्षाने दुसरे डिस्चार्ज व्हाऊचर रुपये 4,22,220/- हे व्हाऊचर स्वरुपात तक्रारकर्त्यास देण्यात आले. परंतु आजपर्यंत तक्रारकर्त्यास सदरहू रक्कम देण्यात आली नाही. याबाबत तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास दिनांक 06/01/2012 रोजी वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून रक्कम रुपये 4,22,220/- ची मागणी केली. परंतु विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्यास सदरहू रक्कम न दिल्यामुळे, तक्रारकर्त्यास ही तक्रार प्रार्थनेतील मागणीप्रमाणे दाखल करावी लागली.
विरुध्द पक्षाने युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने अपघाताची सुचना दिल्यानंतर लगेच विरुध्द पक्षाने मान्यताप्राप्त सर्वेअर श्री. महेश गांधी हयांची नियुक्ती केली व त्यांच्या रिपोर्ट नुसार कार्यालयीन चौकशी व शहानिशा केल्यानंतरच दिनांक 27/02/2011 ला सर्व्हे रिपोर्ट तयार करुन, विरुध्द पक्ष क्र. 2 कडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला. त्यांच्या सर्व्हे अहवालानुसार, तक्रारकर्त्याच्या गाडीचा अपघात झाल्यानंतर साल्वेज किंमत ही रुपये 4,22,220/- एवढी नियमाप्रमाणे काढली व सदरचा दावा नेट लॉस बेसीसवर सेटल करण्याची शिफारस केली. सदरच्या गाडीची एकूण सम इन्शुअर्ड रक्कम रुपये 6,32,219/- इतकी होती. तक्रारकर्ता यांनी स्वत: नेट लॉस सेटलमेंट करण्यास व अपघातग्रस्त गाडीचा ताबा व मालकी हक्क स्वत:कडे राहावे या उददेशाने सम इन्शुअर्ड रक्कम रुपये 6,32,219/- वरुन कमी करुन रुपये 5,50,000/- इतकी गृहीत धरण्यात यावी, असे लेखी संमतीपत्र दिनांक 13/1/2011 ला स्वखुशीने दिले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा हा पुढीलप्रमाणे निकाली काढला. सम इन्शुअर्ड रक्कम रुपये 6,32,219/- वजाती अ) साल्वेज किंमत रुपये 4,22,219/- वजा ब) विमा रक्कम रुपये 2,10,000/- वजा अतिरीक्त रक्कम रुपये 500/- वजा मुद्रांक तिकीट रुपये 1/- = उर्वरीत एकूण रक्कम रुपये 2,09,499/-. तक्रारदारास डिस्चार्ज व्हाऊचर रक्कम रुपये 2,09,499/- हे दिनांक 23/05/2011 रोजी फुल अँन्ड फायनलसेटलमेंट म्हणून पाठविले व तक्रारकर्त्याचे गाडीचा मालकी हक्क व ताबा हा तक्रारकर्त्याकडे अबाधीत ठेवला. सदरहू रक्कम ही तक्रारकर्त्याने स्वखुशीने स्विकारली. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला रुपये 4,22,220/- चा डिस्चार्ज व्हाऊचर दिलेला नव्हता. विरुध्द पक्षाने युक्तिवाद केला की, तक्रारीमधील दर्शविलेला विक्री व्यवहार हा बनावटी स्वरुपाचा आहे आणि म्हणून तक्रारकर्त्याची तक्रार फेटाळण्यांत यावी.
वरील सर्व बाबींवरुन वि. मंचाच्या मते, या प्रकरणाची संपूर्ण भिस्त ही पुढील मुद्दयांवर अवलंबून आहे. 1) विरुध्द पक्षाने,तक्रारकर्त्याला त्याचा दावा सेटल करुन दोन डिसचार्ज व्हाऊचर दिले होते काय ? 2) तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार तक्रारीमधील दर्शविलेला विक्री व्यवहार हा बनावटी स्वरुपाचा आहे काय ? 3) तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्षाच्या म्हणण्यानुसार फुल अँन्ड फायनल सेटलमेंट करुन गाडीचा ताबा व सर्व अधिकार स्वत:जवळ ठेवले होते काय ?
तक्रारकर्त्याने दाखल केलेले व विरुध्द पक्षाने मंजूर केलेले 23/05/2011 चे रुपये 2,09,499/- रुपयाचे डिस्चार्ज व्हाऊचर प्रकरणात दाखल असुन, ते दोन्ही पक्षांना मान्य आहे. तक्रारकर्त्याने दाखल केलेले व विरुध्द पक्षाने त्यांना पाठविलेल्या दिनांक 25/05/2011 च्या पत्रानुसार असे दिसून येते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला मुळ विमा पॉलिसी प्रमाणपत्र व स्टेट बँक ऑफ इंडियाचे ना देय प्रमाणपत्र देण्याबाबत व तक्रारकर्त्याला 4,22,220/- रुपयाचे व्हाऊचर पाठवत असल्याबाबत दिले होते. या सर्व बाबीवरुन सिध्द होते की, तक्रारकर्त्याला विरुध्द पक्षाने दोन डिस्चार्ज व्हाऊचर दिले होते.
तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दिनांक 03/12/2011 रोजीच्या सौदेचिठ्ठीचे मजकूराचे सखोल अवलोकन केले असता, असे दिसून येते की, सदरहू सौदेचिठ्ठीमधील सर्व करार हे पुढील घटनाक्रमांवर आधारीत असुन ( Contigent Contract ) कायदयाच्या तरतुदीच्या कसोटीवर खरे ऊतरत नाहीत. म्हणून विरुध्द पक्षाचे म्हणणे की, तक्रारकर्त्याने केलेली सौदेचिठ्ठी ही बनावटी स्वरुपाची आहे, हे सिध्द होते.
विरुध्द पक्षाने दाखल केलेल्या दिनांक 27/01/2011 चा सर्व्हे अहवालाच्या आधारावर दिलेले गाडीचे दिनांक 20/01/2011 च्या सॅल्वेज कोटेशन प्रमाणपत्रावरुन असे दिसून येते की, विरुध्द पक्षाकडे सर्व्हे अहवाल येण्याअगोदरच गाडीची सॅल्वेज किंमत रुपये 4,22,220/- चे कोटेशन आलेले होते, ही बाब संशयास्पद वाटत आहे. विरुध्द पक्षाचा अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड यांच्यासोबत त्यांच्या ग्राहकांना विमा उतरवून देण्याबाबत करार असल्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्याची गाडी अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड, शाखा वाशिम यांच्याकडे दुरुस्ती करण्याबाबत सांगितले, ही बाब तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दिनांक 22 मार्च 2013 रोजीच्या पत्रानुसार तसेच दिनांक 22/10/2010 रोजी दिलेल्या दुरुस्ती खर्चाबाबतच्या पत्रावरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या पुरसिस व कागदपत्रांवरुन हे निष्पन्न होते की, तक्रारकर्त्याची गाडी अपघात दिनांकापासून तक्रारकर्त्याचा विमा दावा निकाली न निघाल्यामुळे, तक्रारकर्त्याच्या ताब्यात नसून अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड, शाखा वाशिम यांच्या ताब्यात आहे. विरुध्द पक्षाने दाखल केलेले कागदपत्र दिनांक 19/05/2011, 23/05/2011 आणि दिनांक 25/05/2011 वरुन असे दिसून येते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा एकतर्फी निकाली काढून त्याला तब्बल 4 महिन्यानंतर 20/09/2011 रोजी सदर दावा नेट लॉस बेसीसवर निकाली काढल्याचे कळविले. परंतु ही बाब तक्रारकर्त्याला मान्य नसल्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 06/01/2012 रोजी विरुध्द पक्षाला नोटीस पाठवून कळविली. त्याचे ऊत्तर विरुध्द पक्षाने 23/01/2012 रोजी देवून तक्रारकर्त्याचा दावा पुन्हा फेटाळला. विरुध्द पक्षाने, तक्रारकर्त्याला दिलेले 23/05/2011 चे रुपये 2,09,499/- रुपये पहिले डिस्चार्ज व्हाऊचरची रक्कम ही विरुध्द पक्षाने परस्पर तक्रारकर्त्याच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली. या सर्व बाबींवरुन हे सिध्द होते की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा हा एकतर्फी नेट लॉस बेसिसवर निकाली काढला व तो तक्रारकर्त्याला मान्य नाही. यावरुन, तक्रारकर्त्याने फुल अँन्ड फायनल सेटलमेंट विरुध्द पक्षासोबत केले हे सिध्द होत नाही. तक्रारकर्त्याला योग्य तो न्याय मिळण्याकरिता वि. न्यायमंच विरुध्द पक्षाने दाखल केलेला मान्यताप्राप्तसर्वेअर श्री. महेश गांधी हयांचा दिनांक 27/02/2011 चा सर्व्हे रिपोर्ट चा आधार घेत आहे. या सर्व्हे रिपोर्टनुसार, मा. सर्व्हेअर यांनी त्यांचे मत असे प्रदर्शीत केले की, तक्रारकर्त्याच्या गाडीचे संपूर्णत: नुकसान झालेले असून त्याचे मुख्य भाग जसे की,इंजिन, गेअर बॉक्स, स्टेअरींग बॉक्स यांचे नुकसान झालेले आहे व या गाडीचे सुटे भाग खुप महाग असून सदरहू गाडीचे तक्रारकर्त्याच्या इच्छेनुसार नेट लॉस बेसिसवर सेटलमेंट करावे. त्यानुसार त्यांनी गाडीची सॅल्व्हेज व्हॅल्यू 4,22,219/- रुपये काढली व ती IDV रक्कमेमधून वजा जाता नेट कॅश लॉस रुपये 2,09,500/- रुपये देय असल्याबाबत नमुद केले. ही बाब विरुध्द पक्ष फेटाळू शकत नाहीत व स्वत:च केलेल्या विधानापासुन परावृत्त होऊ शकत नाहीत ( Principal of Estoppel ). तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे नियमानुसार पैसे भरुन रक्कम रुपये 6,32,219/- रुपयाचा विमा काढलेला होता. अपघाताच्या वेळेस तक्रारकर्त्याने पॉलिसीच्या अटीचे व नियमांचे कुठलेही ऊल्लंघन केलेले नाही. तरीही, विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याचा दावा फेटाळून अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे. म्हणून विरुध्द पक्षाने वादातीत गाडीचा ताबा स्विकारावा व तक्रारकर्त्याला या गाडीची सॅल्व्हेज व्हॅल्यू रक्कम 4,22,219/- रुपये दयावी, असे या न्यायमंचाचे मत आहे. तसेच विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रुपये 5,000/- व तक्रार खर्च रुपये 2,000/- दिल्यास ते न्यायोचित होईल, या निष्कर्षाप्रत मंच आलेले आहे.
सबब, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
अंतिम आदेश
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजूर करण्यांत येते.
2) विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना स्वीफट डिझायर झेडडीआय मारोती कार नोंदणी क्र. एमएच. 37-अे–3379 या गाडीची सॅल्व्हेज व्हॅल्यू रक्कम 4,22,219/- (रुपये चार लाख बावीस हजार दोनशे एकोणवीस फक्त) दयावी.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ते यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्त) व तक्रार खर्च रुपये 2,000/- (रुपये दोन हजार फक्त) दयावा.
- विरुध्द पक्षाने वादातीत गाडीचा ताबा अॅस्पा बंडसन्स अॅटो प्रा. लिमीटेड, शाखा वाशिम यांचेकडून स्विकारावा व तक्रारकर्त्याचा या गाडीवर कोणताही अधिकार, मालकीहक्क राहणार नाही.
- तक्रारकर्ते यांच्या इतर मागण्या फेटाळण्यांत येतात.
- विरुध्द पक्ष यांनी या आदेशाचे पालन, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत करावे. अन्यथा विरुध्द पक्षासद.सा.द.शे. 6 टक्के व्याजदराने तक्रार दाखल दिनांक 25/10/2013 पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगीपर्यंत देय रक्कमदयावी लागेल.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) (श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.