Maharashtra

Bhandara

CC/18/4

Shahnaj Nazim Sheikh - Complainant(s)

Versus

Divisional Manager, Life Insurance Corporation Of India - Opp.Party(s)

MR. V.C.Pardhi

08 Jun 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
 
Complaint Case No. CC/18/4
( Date of Filing : 30 Jan 2018 )
 
1. Shahnaj Nazim Sheikh
R/o Vinoba Nagar, Tumsar, Tah-Tumsar, Bhandara
BHANDARA
MAHARASHTRA
2. Ku. Ashimira Nazim Sheikh
R/o Vinoba Nagar, Tumsar, Tah-Tumsar, Bhandara
BHANDARA
MAHARASHTRA
3. Ku. Aayara Nazim Sheikh
R/o Vinoba Nagar, Tumsar, Tah-Tumsar, Bhandara
BHANDARA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager, Life Insurance Corporation Of India
Divisional Office, LIC Sqaure, Nagpur, Tah.Dist - Nagpur
NAGPUR
MAHARASHTRA
2. Branch Manager, Life Insurance Corporation Of India
Branch Office.Tumsar , Lahari Complex, Tumsar, Tah-Tumsar, Bhandara
BHANDARA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 08 Jun 2020
Final Order / Judgement

       (पारीत व्‍दारा श्रीमती वृषाली गौ.जागीरदार, मा.सदस्‍या)

                                                                           (पारीत दिनांक–08 जून, 2020)

01.    उपरोक्‍त नमुद तक्रारदारांनी  ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं-2 विमा कंपनी विरुध्‍द विमा दावा नामंजूरी बाबत प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे.

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

   उपरोक्‍त नमुद तक्रारी मध्‍ये तक्रारकर्ती क्रं 1 ही मृतक नझीम सलीम शेख विमाधारक याची पत्‍नी आहे तर तक्रारकर्ती क्रं-2 व क्रं-3 हया मृतक विमाधारकाच्‍या मुली आहेत. विरुध्‍दपक्ष क्रं 1 हे विमा कंपनीचे विभागीय कार्यालय असून विरुध्‍दपक्ष क्रं 2 हे विमा कंपनीचे शाखा कार्यालय आहे. मृतक विमाधारक हा तुमसर, जिल्‍हा भंडारा येथे राज्‍य परिवहन महामंडळात बसचालक म्‍हणून कार्यरत होता. तो हयातीत असताना त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून एकूण तीन विमा पॉलिसीज काढल्‍या होत्‍या, त्‍या विमा पॉलिसीचे क्रं.-973809463 विमा राशी रुपये-1,25,000/- तसेच पॉलिसी क्रं-977936721 अन्‍वये विमाराशी रुपये-10,00,000/- तसेच विमा पॉलिसी क्रं-978663170 अन्‍वये विमाराशी रुपये-2,25,000/- असे आहेत. त्‍यापैकी विमा पॉलिसी क्रमांक-973809463 विमाराशी रुपये-1,25,000/- अन्‍वये तक्रारदारांना विमा पॉलिसीची रक्‍कम मिळालेली आहे. तक्रारदारांचा वाद हा उर्वरीत पॉलिसी क्रं-977936721 अन्‍वये विमाराशी रुपये-10,00,000/- तसेच विमा पॉलिसी क्रं-978663170 अन्‍वये विमाराशी रुपये-2,25,000/- चे संबधीचा आहे.

    तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, उपरोक्‍त नमुद विमा पॉलिसी काढते वेळी मृतक विमाधारकाच्‍या सर्व शारीरिक व मानसिक वैद्दकीय चाचण्‍या विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे अधिकृत डॉक्‍टरां कडून करण्‍यात आल्‍या होत्‍या व तो वैद्दकीय दृष्‍टया समक्ष असल्‍याचे डॉक्‍टरांनी प्रमाणित केले होते. सदर विमा पॉलिसीज हया विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे एजंट श्री दिपक वसंत देशमुख यांचे मार्फतीने काढल्‍या होत्‍या. विमा पॉलिसीज काढल्‍या नंतर विमाधारकाने विम्‍याचे हप्‍ते नियमितपणे भरले होते. परंतु अचानक विमाधारक नझीम सलीम शेख याचा दिनांक-10.01.2016 रोजी मृत्‍यू झाला. विमाधारक हा त्‍याचे नौकरीचे कर्तव्‍याचे काळात कधीही आजारी पडलेला नव्‍हता व त्‍याने शेवट पर्यंत नौकरी केली होती. विमाधारकाचे मृत्‍यू नंतर मूळ विमा पॉलिसीजसह विमा क्‍लेम विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे सादर करण्‍यात आला होता. त्‍यानंतर त्‍यांनी वेळोवेळी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयात भेटी दिल्‍या असता विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने केवळ एक विमा पॉलिसी क्रमांक-973809463 अन्‍वये विमाराशी रुपये-1,25,000/- ची रक्‍कम त्‍यांना दिली. उर्वरीत दोन विमा पॉलिसी संबधीचे विमा दावे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-17 मार्च, 2017 रोजीचे पत्रान्‍वये नामंजूर केलेत. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारदारांच्‍या उर्वरीत दोन विमा पॉलिसी संबधी विमा दाव्‍याची रक्‍कम नामंजूर करुन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सदरचे कृतीमुळे तक्रारदारांना आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला, म्‍हणून त्‍यांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-18.05.2017 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली, सदर नोटीस मिळूनही वि.प.विमा कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्‍हणून शेवटी तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी विरुध्‍द खालील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

      विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने मृतक विमाधारकाच्‍या उर्वरीत दोन विमा पॉलिसीची विमा राशी रुपये-10,00,000/- आणि रुपये-2,25,000/- व्‍याजासह तक्रारदारांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने उर्वरीत दोन विमा पॉलिसीची रक्‍कम नामंजूर केल्‍याने त्‍यांना झालेल्‍या नुकसानी बाबत भरपाई म्‍हणून दिनांक-19.11.2016 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो प्रतीदिन रुपये-1000/- प्रमाणे येणारी रक्‍कम देण्‍याचे विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनीला आदेशित व्‍हावे. याशिवाय तक्रारदारांना झालेल्‍या मानसिक त्रासा बद्दल  रुपये-50,000 आणि तक्रारीचा खर्च वि.प.क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी कडून त्‍यांना देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

03.   विरुध्‍दपक्ष क्रं-1)  व क्रं 2) विमा कंपनी तर्फे एकत्रीत लेखी उत्‍तर पान क्रं -39 ते 47 वर ग्राहक मंचात दाखल केले. त्‍यांनी उत्‍तरामध्‍ये मृतक विमाधारक नझीम शेख हा विमा पॉलिसी घेते वेळी शारिरीक व मानसिकदृष्‍टया सक्षम असल्‍याची बाब नामंजूर केली. मृतक विमाधारकाने विमा पॉलिसी काढते वेळी विमा प्रस्‍ताव फॉर्म मध्‍ये त्‍याचे आरोग्‍य विषयी विचारलेल्‍या प्रश्‍नांची चुकीची उत्‍तरे दिलीत आणि सत्‍य वस्‍तुस्थिती लपवून ठेवली. विमा प्रस्‍तावाचे आधारे विमा पॉलिसी निर्गमित करण्‍यात येते. विमा प्रस्‍तावातील आरोग्‍य प्रश्‍नांना दिलेल्‍या उत्‍तराचे आधारे अधिकृत वैद्दकीय अधिकारी यांचे कडून वैद्दकीय चाचण्‍या घेण्‍यात येतात. मृतक विमाधारकास त्‍याचे मृत्‍यू पर्यंत कोणताही आजार नव्‍हता ही बाब नामंजूर केली. मृतक विमाधारकाची एक विमा पॉलिसी क्रमांक-973809463 विमाराशी रुपये-1,25,000/- ची रक्‍कम तक्रारदारांना दिनांक-28.03.2016 रोजी दिली. उर्वरीत दोन पॉलिसी क्रं-977936721  विमाराशी रुपये-10,00,000/- तसेच विमा पॉलिसी क्रं-978663170  विमाराशी रुपये-2,25,000/- चे विमा दावे नामंजूर केलेत.  विमा पॉलिसी क्रं-977936721 चा विमा दावा हा विमाधारकाने त्‍याचे आरोग्‍य विषयी केलेल्‍या वैयक्तिक स्‍टेटमेंटच्‍या आधारे नाकारला तर विमा पॉलिसी क्रं-978663170 संबधीचा विमा दावा हा विमाधारकाने विमा प्रस्‍तावात दिलेल्‍या चुकीच्‍या माहितीमुळे नाकारण्‍यात आला. विमा दावा नामंजूरीचे पत्र दिनांक-24 मार्च, 2017 रोजी देण्‍यात आले. विमा पॉलिसी क्रं-977936721 ही फेब्रुवारी-2014 चा वार्षिक हप्‍ता न भरल्‍याने  लॅप्‍स स्थितीत होती आणि विमा पॉलिसी पुर्नजिवित करते वेळी विमाधारकाने त्‍याचे आरोग्‍य विषयक वैयक्तिक स्‍टेटमेंट मध्‍ये मुद्दामून माहिती लपवून ठेवली होती की तो टी.बी.आणि कॅन्‍सर आजाराने ग्रस्‍त आहे आणि त्‍याचेवर दिनांक-30.11.2013 पासून वैद्दकीय उपचार चालू आहेत आणि त्‍याने दिनांक-30.11.2013 पासून वैद्दकीय रजा घेतली होती. विमा पॉलिसी क्रं-978663170 संबधी विमाधारकाने विमा प्रस्‍तावात त्‍याचे आरोग्‍य विषयी विचारलेल्‍या प्रश्‍नांना नकारार्थी व चुकीची उत्‍तरे दिलीत. अशाप्रकारे चुकीची माहिती दिल्‍यामुळे दोन्‍ही विमा पॉलिसीचे विमा दाव्‍याची रक्‍कम नामंजूर करण्‍याची विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची कृती योग्‍य आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही वा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. विमा कंपनीचा करार हा विश्‍वासावर आधारीत असतो. विमा प्रस्‍ताव दाखल करते वेळी दिलेल्‍या माहितीच्‍या आधारावर विमा पॉलिसी स्विकारावी किंवा कसे ही बाब विमा कंपनी ठरविते. विमाधारक हा टी.बी. आणि कॅन्‍सर ग्रस्‍त होता व तो वैद्दकीय रजेवर होता परंतु त्‍याने या बाबी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी पासून लपवून ठेवल्‍याने विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा भंग झालेला आहे. विमा पॉलिसी क्रं-978663170 दिनांक-28.11.2014 पासुन सुरु झाली होती आणि विमा पॉलिसी सुरु झाल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाचे आत विमाधारकाचा मृत्‍यू झाला होता. तर विमा पॉलिसी क्रं-977936721 ही दिनांक-21.11.2014 रोजी पुर्नजिवित करण्‍यात आली होती आणि पुर्नजिवित केल्‍याचे दिनांका नंतर तीन वर्षाचे आत म्‍हणजे दिनांक-10.01.2016 रोजी विमाधारकाचा मृत्‍यू झाला होता. विमा पॉलिसी क्रं-977936721 चा विमा दावा हा विमाधारकाने विमा पॉलिसी पुर्नजिवित करते वेळी म्‍हणजे दिनांक-19.11.2014 रोजी त्‍याचे आरोग्‍य विषयी केलेल्‍या वैयक्तिक स्‍टेटमेंटच्‍या आधारे नाकारला तर विमा पॉलिसी क्रं-978663170 संबधीचा विमा दावा हा विमाधारकाने विमा प्रस्‍तावात  दिनांक-25.11.2014 रोजी त्‍याचे आरोग्‍य विषयक विचारलेल्‍या प्रश्‍नांना दिलेल्‍या चुकीच्‍या माहितीमुळे नाकारण्‍यात आला. डॉ.सचिन बाळबुधे यांचे सहीच्‍या स्‍पेशल क्‍युरी फॉर्मवरुन असे दिसून येते की, मृतक विमाधारकास त्‍याला झालेल्‍या टी.बी.आजारा संबधी (Pulmonary tuberculosis) दिनांक-28.11.2013 पासून माहिती होती. शासकीय वैद्दकीय दवाखाना तुमसर, जिल्‍हा भंडारा येथील टी.बी. कक्षाचे वैद्दकीय अधिकारी यांनी दिलेल्‍या वैद्दकीय प्रमाणपत्रावरुन सुध्‍दा सिध्‍द होते की, मृतक विमाधारक हा दिनांक-30.11.2013 पासून टी.बी.आजाराने ग्रस्‍त होता आणि त्‍याचेवर नियमितपणे (T.B.No.-3033/2013) वैद्दकीय उपचार चालू होते आणि तो दिनांक-30.11.2013 ते दिनांक-26.05.2014 या कालावधीत वैद्दकीय रजेवर होता. त्‍याचेवरील वैद्दकीय उपचाराचे दस्‍तऐवज, दिनांक-30.11.2013 रोजीचे ओळखपत्र यावरुन तो टी.बी.आजाराचे वैद्दकीय उपचार घेत होता. मृतक विमाधारकाचा विमा प्रस्‍ताव, त्‍याचे वैयक्तिक स्‍टेटमेंट आणि आजाराच्‍या उपचाराचे दस्‍तऐवज ते पुराव्‍यार्थ दाखल करीत आहेत. विमा पॉलिसी क्रं-977936721 चा विमा दावा हा विमाधारकाने विमा पॉलिसी पुर्नजिवित करते वेळी म्‍हणजे दिनांक-19.11.2014 रोजी तीन आरोग्‍य विषयक प्रश्‍नांची उत्‍तरे नकारार्थी दिलेली आहेत जेंव्‍हा की तो टी.बी.आजारा पासून दिनांक-29.11.2013 पासून ग्रस्‍त असल्‍याची बाब त्‍याला चांगली माहिती होती. सबब विमाधारकाने त्‍याचे आरोग्‍य विषयक सत्‍य वस्‍तुस्थिती लपवून ठेऊन एक विमा पॉलिसी काढली तसेच दुसरी विमा पॉलिसी पुर्नजिवित केली असल्‍याने त्‍यांनी योग्‍य त्‍या कारणास्‍तव दोन्‍ही वादातील विमा पॉलिसीजचे विमा दावे नामंजूर केलेत असे नमुद केले.

04.   तक्रारदारांनी पान क्रं 12 वरील दस्‍तऐवज यादी नुसार दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने विमाधारकाचे मृत्‍यू प्रमाणपत्र, विमा हप्‍ते भरल्‍या बाबत पावत्‍या, पॉलिसी पुर्नजिवित करते वेळी भरलेला विमा हप्‍ता, विम्‍याची राशी मिळण्‍यासाठी केलेला अर्ज, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे विमा दावा नामंजूरीचे पत्र, तक्रारदारांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला रजि. पोस्‍टाने पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत, रजि.पोस्‍टाच्‍या पावत्‍या इत्‍यादीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्ती क्रं 1 हिने  पान क्रं 137 ते 139 वर स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच पान क्रं 143 ते 146 वर लेखी युक्‍तीवाद दाखल केला.

05.   विरुध्‍दपक्ष क्रं-1)  व क्रं 2 विमा कंपनीने पान क्रं 48 वरील दस्‍तऐवज यादी नुसार दोन्‍ही विमा पॉलिसी संबधात विमा दावा नमंजूरीचे दिनांक-24.03.2017 रोजीची पत्रे,  विमा पॉलिसी क्रं-978663170 विमाराशी रुपये-2,25,000/- संबधात दिनांक-25.11.2014 रोजीचा विमाप्रस्‍ताव फॉर्म, विमा पॉलिसी क्रं-978663170 पुर्नजिवित करते वेळी  विमाधारकाने विमा प्रस्‍तावात  दिनांक-25.11.2014 रोजी त्‍याचे आरोग्‍य विषयक विचारलेल्‍या प्रश्‍नांना दिलेली उत्‍तरे (स्‍वास्‍थ संबधी वैयक्तिक प्रकथन) तसेच विमाधारक नौकरी करीत असलेल्‍या राज्‍य परिवहन महामंडळाचे व्‍यवस्‍थापक, तुमसर आगार यांना दिनांक-10.12.2013 रोजी दिनांक-29.11.2013 पासून  वैद्दकीय रजा मिळण्‍यासाठी  केलेला अर्ज,  दिनांक-29.11.2013 रोजीचे वैद्दकीय अधिकारी शासकीय रुग्‍णालय तुमसर जिल्‍हा भंडारा यांनी विमाधारकाचे आजारा संबधी दिलेले प्रमाणपत्र व रुग्‍णाचे ओळखपत्र, शासकीय रुग्‍णालयाचा चाचणी अहवाल, शासकीय रुग्‍णालयातील विमाधारका संबधीची रुग्‍णपत्रीका, आरोग्‍य सेवा जिल्‍हा क्षयरोग केंद्र भंडारा यांनी दिलेले वैद्दकीय प्रमाणपत्र, दिनांक-30.11.2013 पासून ते दिनांक-26.02.2004 पर्यंत विशेष क्षयरोग रजा मंजूर करण्‍यासाठी विमाधारकाने त्‍याचे अधिकारी यांचेकडे केलेला रजेचा अर्ज व वैद्दकीय प्रमाणपत्र, वैद्दकीय अधिक्षक, क्षय आरोग्‍य धाम बुलढाणा यांनी विभाग नियंत्रक राज्‍य परिवहन भंडारा यांचेकडे पाठविलेला वैद्दकीय अहवाल, विमाधारकाने विशेष क्षयरोग रजा मिळण्‍या बाबत केलेले रजेचे अर्ज,  टी.बी. बोर्ड मेंबर, सचिव, जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालय भंडारा यांनी विमाधारक हा  दिनांक-27.02.2014 पासून ते दिनांक-26 मे, 2014 पर्यंत टी.बी. आजाराने ग्रस्‍त असल्‍याने कामावर नव्‍हता परंतु तो दिनांक-27 मे, 2014 पासून त्‍याचे कामावर रुजू होण्‍यासाठी दिलेले फीटनेस प्रमाणपत्र,  विमाधारक हा दिनांक-27 मे, 2014 पासून ते दिनांक-13 जुलै, 2014 पर्यंत शासकीय उपजिल्‍हा रुग्‍णालय तुमसर येथे भरती राहिल्‍या बाबत तेथील वैद्दकीय अधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र, मानधनीया कॅन्‍सर हॉस्‍पीटलचे प्रमाणपत्र व ईतर वैद्दकीय आजाराचे दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात. वि.प.विमा कंपनी तर्फे पान क्रं 140 ते 142 वर शपथपत्र दाखल करण्‍यात आले तर पान क्रं 146 ते 149 वर लेखी युक्‍तीवाद दाखल करण्‍यात आला.

06.    तक्रारदारांची तक्रार, शपथेवरील पुरावा, लेखी युक्‍तीवाद व दाखल दस्‍तऐवज तसेच  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तर, शपथपत्र, लेखी युक्‍तीवाद व दाखल दसतऐवज इत्‍यादीचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले त्‍याच बरोबर उभय पक्षाचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद एैकला, त्‍यावरुन ग्राहक मंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची कारणमिमांसा पुढील प्रमाणे आहे-

अक्रं

मुद्दा

उत्‍तर

01

वि.प.विमा कंपनीने मृतक विमाधारकाचे दोन पॉलिसीचे दावे नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-होय-

02

काय आदेश

-अंतीम आदेशा नुसार-

                                                                                                     :: कारणे व मिमांसा::

मुद्दा क्रं 1 व 2 बाबत-

विमा पॉलिसी क्रं-977936721 बाबत-

07.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे उत्‍तरा प्रमाणे विमा पॉलिसी क्रं-977936721 ही दिनांक-21.11.2014 रोजी पुर्नजिवित करण्‍यात आली होती आणि पुर्नजिवित केल्‍याचे दिनांका नंतर तीन वर्षाचे आत म्‍हणजे दिनांक-10.01.2016 रोजी विमाधारकाचा मृत्‍यू झाला होता. विमा पॉलिसी क्रं-977936721 चा विमा दावा हा विमाधारकाने विमा पॉलिसी पुर्नजिवित करते वेळी म्‍हणजे दिनांक-19.11.2014 रोजी त्‍याचे आरोग्‍य विषयी केलेल्‍या वैयक्तिक स्‍टेटमेंटच्‍या आधारे नाकारला.

    या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे विमाधारकाचे स्‍वास्‍थ संबधी वैयक्तिक प्रकथन जे पान क्रं 60 वर दाखल आहे त्‍याचे अवलोकन करण्‍यता आले, ज्‍यावर प्राप्‍त दिनांक-19.11.2014 नमुद असून अभिकर्ता का नाम या समोर इंग्रजी मध्‍ये B.R.Dipte असे नमुद केलेले असून सदर फॉर्म मध्‍ये मुददा क्रं-2 मधील अ) ते इ) मध्‍ये विमाधारकाचे आरोग्‍य विषयक प्रश्‍नांना इंग्रजी मध्‍ये “No” अशी उत्‍तरे नमुद केलेली आहे. सदर फार्मचे घोषणापत्रात दिनांक-19.11.2014 नमुद असून त्‍यामध्‍ये साक्षदार म्‍हणून B.R.Dipte LIC Agent Tumsar यांनी सही केलेली आहे. सदर फॉमचे ग्राहक मंचाचे वतीने सुक्ष्‍मरित्‍या अवलोकन केले असता असे दिसून येते की, विमाधारकाचा स्‍वास्‍थ संबधी वैयक्तिक प्रकथनाचा संपूर्ण फॉर्म हा श्री बी.आर.दिप्‍ते, एलआयसी एजन्‍ट याने भरुन दिल्‍याचे दिसून येते व सदर फॉर्मवर विमाधारकाची स्‍वाक्षरी घेतल्‍याचे दिसून येते. विमाधारक हा राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या नौकरीत चालक म्‍हणून कार्यरत होता व तो खूप काही शिकलेला होता असे म्‍हणता येणार नाही. सदर घोषणापत्राच्‍या खाली मुद्दा क्रं 1 मध्‍ये मै एतव्‍दारा घोषीत करता हू की मैने प्रस्‍तावक बीमार्थी को उपरोक्‍त प्रश्‍न भलीभांती समझा दिये है और उनके व्‍दारा दिये गये उत्‍तरों को सही सही लिखा है हस्‍ताक्षर.............. या समोर सही केल्‍याचे दिसून येत नाही. यावरुन असे दिसून येते की, सदर वैयक्तिक प्रकथन भरते वेळी त्‍यातील अटी व शर्ती विमाधारकास योग्‍यरित्‍या समजावून सांगितल्‍या बद्दल कोणताही पुरावा अभिलेखावर आलेला नाही. सदर विमा पॉलिसी अनमोल जीवन टेबल क्रं 164 हीचा क्रं-977936721 असा असून ती दिनांक-28.02.2012 रोजी काढल्‍याचे दिसून येते आणि तिचा वार्षिक हप्‍ता रुपये-5623 होता आणि तिची मुदत 21 वर्षा करीता होती असे दाखल अभिलेखावरुन दिसून येते. सदर पॉलिसी ही दिनांक-21.11.2014 रोजी पुर्नजिवित करण्‍यात आली होती. अभिलेखावरील दाखल वैद्दकीय अधिकारी, सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्‍णालय तुमसर जिल्‍हा भंडारा डॉ. श्री एस.व्‍ही.बाळबुधे यांनी सर्वप्रथम विमाधारक श्री नझीम शेख कॅटेगिरी क्रं 1332 Pulmonary Tuberculosis असल्‍याचे दिनांक-29.11.2013 रोजीचे वैद्दकीय प्रमाणपत्र दिलेले असून ते पान क्रं 63 वर दाखल आहे आणि सदर विमा पॉलिसी क्रं-977936721 हि दिनांक-28.02.2012 रोजी काढल्‍याचे अभिलेखावरुन दिसून येते. याचाच अर्थ असा निघतो की, सदर विमा पॉलिसी फेब्रुवारी, 2012 मध्‍ये काढली होती आणि विमाधारकास क्षयरोग झाल्‍याचे प्रथम निदान हे  नोव्‍हेंबर, 2013 मध्‍ये झालेले आहे म्‍हणजेच सदर विमा पॉलिसी काढते वेळी विमाधारकाची प्रकृती चांगली होती. तसेच वर नमुद केल्‍यामुळे सदर विमा पॉलिसी क्रं-977936721 दिनांक-21.11.2014 रोजी पुर्नजिवित करताना विमाधारकाची संपूर्ण सखोल वैद्दकीय तपासणी (Require all medical tests of Insured) करणे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीवर बंधनकारक (Mandatory) होते कारण सदर विमा पॉलिसी  रुपये-10,000,00/- एवढया मोठया रकमेची होती परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तसे काहीही केलेले नाही व तशी वैद्दकीय तपासणी केल्‍याचे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणणे सुध्‍दा नाही. उपरोक्‍त नमुद केल्‍या प्रमाणे विमा पॉलिसी क्रं-977936721 दिनांक-21.11.2014 रोजी पुर्नजिवित करताना विमाधारकाचे स्‍वास्‍थ संबधी वैयक्तिक प्रकथन जे पान क्रं 60 वर दाखल आहे ते विमा कंपनीचे विमा अभिकर्त्‍याने भरलेले असून त्‍यावर विमाधारकाची केवळ स्‍वाक्षरी घेतलेली आहे परंतु सदर फॉर्म मध्‍ये भरलेला मजकूर विमाधारकास समजावून सांगितल्‍या बद्दलचे घोषाणापत्र घेतल्‍याचे दिसून येत नाही. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा पॉलिसी पुर्नजिवित करते वेळी विमाधारकाचे केवळ स्‍वास्‍थ संबधी घेतलेल्‍या वैयक्तिक प्रकथनाचे आधारावर विमाधारकाचे मृत्‍यू पःश्‍चात विमा क्‍लेम दावा नामंजूर करण्‍याची केलेली कृती ही अयोग्‍य असून ती कायदेशीर तरतुदी नुसार नाही असे ग्राहक मंचाचे मत आहे. त्‍यामुळे चुकीचे कारण दर्शवून नामंजूर केलेल्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम  मृत विमाधारकाचे वारसदार म्‍हणून तक्रारदार व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे मत आहे.

                                                                                                                   *****

विमा पॉलिसी क्रं-978663170 बाबत-

08.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे उत्‍तरा प्रमाणे विमा पॉलिसी क्रं-978663170 संबधीचा विमा दावा हा विमाधारकाने विमा प्रस्‍तावात त्‍याचे आरोग्‍य विषयक प्रश्‍नांना दिलेल्‍या चुकीच्‍या उत्‍तरामुळे नाकारण्‍यात आला. सदर विमा पॉलिसी ही रुपये-2,25,000/- एवढया रकमेची होती

     या संदर्भात ग्राहक मंचा तर्फे अभिलेखावर दाखल सदर विमा पॉलिसी क्रं-978663170 संबधी अभिलेखावर दाखल विमा प्रस्‍तावाचे अवलोकन करण्‍यात आहे. सदर विमा प्रस्‍तावा मध्‍ये विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे एजंटचे नाव इंग्रजी मध्‍ये D.V.Deshmukh असे नमुद केलेले असून सदर फॉर्म मध्‍ये मुददा क्रं-11 Personal History व्‍यक्‍तीगत इतिवृत्‍त (a) To (h) मधील विमाधारकाचे आरोग्‍य विषयक प्रश्‍नांना इंग्रजी मध्‍ये “No” अशी उत्‍तरे नमुद केलेली आहे. सदर फार्मचे घोषणापत्रात दिनांक-25.11.2014 नमुद असून त्‍यामध्‍ये साक्षदार म्‍हणून D.V.Deshmukh Tumsar यांनी सही केलेली आहे. सदर फॉमचे ग्राहक मंचाचे वतीने सुक्ष्‍मरित्‍या अवलोकन केले असता असे दिसून येते की, विमाधारकाचा संपूर्ण विमा प्रस्‍ताव फार्म  हा  श्री डी.व्‍ही.देशमुख, एलआयसी एजन्‍ट याने भरुन दिल्‍याचे दिसून येते व सदर फॉर्मवर विमाधारकाची स्‍वाक्षरी घेतल्‍याचे दिसून येते. विमाधारक हा राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या नौकरीत चालक म्‍हणून कार्यरत होता व तो खूप काही शिकलेला होता असे म्‍हणता येणार नाही.  सदर विमा प्रस्‍तावा मध्‍ये केवळ फुल्‍या (X) मारुन विमाधारकाच्‍या सहया घेतलेल्‍या आहेत परंतु सदर विमा प्रस्‍तावातील  अटी व शर्ती विमाधारकास योग्‍यरित्‍या समजावून सांगितल्‍या बद्दल कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने अभिलेखावर आलेला नाही. क्षणभरासाठी असेही गृहीत धरले की, सदर विमा पॉलिसी क्रं-978663170  काढण्‍यापूर्वी विमाधारकास त्‍यास क्षयरोग झाल्‍याची माहिती असल्‍याची बाब अवगत होती परंतु सदर विमाप्रस्‍ताव फॉर्म भरते वेळी सदर विमा प्रस्‍तावातील संपूर्ण मजकूर, विमा पॉलिसीच्‍या संपूर्ण अटी व शर्ती या विमाधारकास नीट समजावून सांगितल्‍या बद्दलचा कोणताही पुरावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दाखल केलेला नाही. त्‍यामुळे चुकीचे कारण दर्शवून नामंजूर केलेल्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम  मृत विमाधारकाचे वारसदार म्‍हणून तक्रारदार व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे मत आहे.

                                  *****

09.   सर्वसाधारण व्‍यवहारात असे दिसून येते की, विमा कंपनीने विमा व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी विमा एजंटची नियुक्‍ती केलेली आहे व त्‍यांचे मार्फतीने विम्‍याचा व्‍यवसाय केल्‍या जातो. सदर विमा एजंट हे त्‍यांचा व्‍यवसाय वाढवून जास्‍तीत जास्‍त कमीशन कसे प्राप्‍त करता येईल याचाच विचार करतात आणि केवळ चिन्‍हांकीत ठिकाणी सदर विमाधारकाच्‍या स्‍वाक्ष-या घेतात. हातातील प्रकरणात सुध्‍दा केवळ विमा प्रस्‍तावावर चिन्‍हांकीत ठिकाणी विमाधारकाच्‍या सहया घेतल्‍याचे दिसून येते तसेच विमाप्रस्‍ताव फॉर्म सुध्‍दा संबधित एजंटने भरुन विमाप्रस्‍तावावर साक्षदार म्‍हणून सही केल्‍याचे दिसून येते. अशा परिस्थितीत विमाधारकाचे मृत्‍यू पःश्‍चात विमा क्‍लेम दावा नामंजूर करण्‍याची केलेली विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची कृती ही अयोग्‍य असून ती कायदेशीर तरतुदी नुसार नाही असे ग्राहक मंचाचे मत आहे. त्‍यामुळे चुकीचे कारण दर्शवून नामंजूर केलेल्‍या विमा दाव्‍याची रक्‍कम  मृत विमाधारकाचे वारसदार म्‍हणून तक्रारदार व्‍याजासह मिळण्‍यास पात्र आहेत असे ग्राहक मंचाचे मत आहे. हातातील प्रकरणात विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे एजंट हे अधिकृत एजंट म्‍हणून आहेत आणि ते अधिकृत नसल्‍या बाबतची बाब विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने लेखी उत्‍तरात नाकारलेली नाही. विमा कंपनीचे एजंटने केलेल्‍या कृती बाबतची जबाबदारी ही “Vicarious Libility” चे तत्‍वा नुसार विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची येते असे ग्राहक मंचाचे मत आहे.

10.    या संदर्भात हे ग्राहक मंच मा. राज्‍य आयोग, पंजाब, हरियाणा यांनी दिनांक 19/09/2017 रोजी पारित केलेल्‍या Ruldha Singh V/S United India Insurance Co. ltd. & other   या न्‍यायनिवाड्यावर आपली भिस्‍त ठेवीत आहे. सदर न्‍यायनिवाडयात मा. राज्‍य ग्राहक आयोगाने खालील न्‍यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.

           New India Ins. Co. Ltd. V/S Smt. Usha Yadav & others 2008 (3) R.C.R. (Civil) 111 या न्‍यायनिवाडयात मा. उच्‍च न्‍यायालय पंजाब आणि हरियाणा यांनी खालीलप्रमाणे मत नोंदविले आहे.

“It seems that the insurance companies are only interested in earning the premiums, which are rather too stiff now a days, but are not keen and are found to be evasive to discharge their liability.  In large number of cases, the insurance companies make the effected people to fight for getting their genuine claims.  The insurance companies in such cases rely upon clauses of the agreements, which a person is generally made to sign on dotted lines at the time of obtaining policy.  This is, thus, pressed into service to either repudiate the claim or to reject the same.  The insurance companies normally build their case on such clauses of the policy, but would adopt methods which would not be governed by the strict conditions contained in the policy.”

मा. राज्‍य आयोगाने पुढे असे मत नोंदविले आहे की, कलम 19 General insurance Business (Nationalization) ACT-1972 नुसार विमा कंपन्‍यांची जबाबदारी आहे की, त्‍यांनी विम्‍याचा व्‍यवसाय हा जनतेच्‍या जास्‍तीत-जास्‍त फायद्या करीता विकसित केला पाहीजे. जर विमा पॉलीसीत दावा रद्द करण्‍यास किंवा विम्‍याची मर्यादा सिमित करणा-या Exclusions / Conditions अटी असतील तर त्‍या कटाक्षतेने विमित व्‍यक्‍तीस समजावून लक्षात आणून देणे व त्‍या समजावून सांगितल्‍याबाबत स्‍वाक्षरी घेणे आवश्‍यक आहे. तसेच विम्‍याचा करारनामा हा विमा कंपनीने तयार केलेला असतो, त्‍यामुळे त्‍यावर विमा कंपनीचे विमित व्‍यक्‍तीपेक्षा जास्‍त वर्चस्‍व असते आणि त्‍यामुळे विमा पॉलिसीतील अटी व शर्तीचा फायदा हा विमा कंपनीला तेव्‍हाच होवू शकतो जेव्‍हा विमा कंपनीने विमा पॉलिसीतील अटी व शर्ती हया स्‍पष्‍टपणे विमाधारकास समजावून सांगितलेल्‍या असतात. अशा परिस्थितीत  विमा कंपनीने त्‍यांच्‍या पॉलीसीतील अटी व शर्ती हया विमाधारकास व्‍यवस्थितपणे समजावून सांगितलेल्‍या आहेत किंवा नाही हे बघणे आवश्‍यक आहे.

11.    हातातील प्रकरणांत विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पॉलीसी काढते वेळी तसेच पॉलिसी पुर्नजिवित करते वेळी विमा पॉलीसीच्‍या अटी व शर्ती विमाधारकास योग्‍य प्रकारे समजावनू सांगितल्‍या होत्‍या ही बाब योग्‍य कागदोपत्री पुराव्‍याअभावी सिध्‍द होत नाही, त्‍यामुळे वरील न्‍यायनिवाडयाचे आधारे विरुध्‍दपक्ष 1 व 2 विमा कंपनीने विमा दावे नामंजूर करुन तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिलेली आहे या निष्‍कर्षाप्रत ग्राहक मंच येते.

12.   उपरोक्‍त नमुद पुरावे पाहता विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याची बाब सिध्‍द होते म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 01 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 01 चे उत्‍तर होकारार्थी आल्‍याने, मुद्दा क्रं 02 अनुसार तक्रारदारांची  विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनी विरुध्‍दची तक्रार अंशतः मंजूर होण्‍यास पात्र आहे असे ग्राहक मंचाचे मत आहे, त्‍यावरुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

                                                                          :: अंतिम आदेश ::

01) उपरोक्‍त नमुद तक्रारदारांची, विरुध्‍दपक्ष क्रं-1) भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे विभागीय व्‍यवस्‍थापक, विभागीय कार्यालय, नागपूर आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय तुमसर, जिल्‍हा भंडारा  यांचे विरुध्‍दची  तक्रार वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

02) विरुध्‍दपक्ष क्रं 1) आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मृतक विमाधारक नझीम सलीम शेख याची विमा पॉलिसी क्रं- क्रं-977936721 अन्‍वये विमा रक्‍कम रुपये-10,00,000/-(अक्षरी रुपये दहा लक्ष फक्‍त)        तक्रारदारांना सदर आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 45 दिवसाचे आत अदा करावी.

03) विरुध्‍दपक्ष क्रं 1) आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी मृतक विमाधारक नझीम सलीम शेख याची विमा पॉलिसी क्रं-978663170 अन्‍वये विमा रक्‍कम रुपये-2,25,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष पंचवीस हजार फक्‍त) तक्रारदारांना सदर आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 45 दिवसाचे आत अदा करावी.

04) विरुध्‍दपक्ष क्रं 1) आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारदारांना झालेल्‍या शारिरीक, मानसिक त्रासा बद्दल तसेच तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) सदर आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांका पासून 45 दिवसाचे अदा करावे.

05) विहित मुदतीत विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीने अंतिम आदेशातील अक्रं-02) व 03) मध्‍ये नमुद केलेली विमा रक्‍कम तक्रारदारांना न दिल्‍यास मुदती नंतर पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो सदर नमुद देय विमा रकमा हया द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याजासह तक्रारदारांना देण्‍याची जबाबदारी वि.प.क्रं 1 व क्रं 2 विमा कंपनीची राहिल.

06)    उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी.

         07)    तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्ती क्रं 1 ला परत करावी.                     

 

 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.