Maharashtra

Nashik

CC/204/2011

Shri Mohan Bapurao Adhangle - Complainant(s)

Versus

Divisional Manager Iffco Tokio Genral Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Shri Ajay gaikwad

31 Jan 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/204/2011
 
1. Shri Mohan Bapurao Adhangle
R/o takshshila Rangrej mala Near Rajsarthi Hsg.Society Indira nager Nashik
Nashik
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Divisional Manager Iffco Tokio Genral Insurance Co.Ltd.
2nd floor Sethis city plaza Near kalika mandir Gadkari chowk Old Mumbai Agra Rd. Nashik
Nashik
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. R.S.Pailwan PRESIDENT
 HON'ABLE MRS. V.V.Dani MEMBER
 
PRESENT:Shri Ajay gaikwad, Advocate for the Complainant 1
 
ORDER

(मा.सदस्‍या सौ.व्‍ही.व्‍ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)

 

              नि  का      त्र                                  

 

अर्जदार यांना सामनेवालेकडून वाहनाची विमित रक्‍कम रु.8,07,217/-मिळावेत व त्‍यावर वाहन चोरीची माहिती दिल्‍यापासून द.सा.द.शे.15% प्रमाणे व्‍याज मिळावे, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- व अर्जाचा खर्च रु.5000/- मिळावा या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.

सामनेवाले यांनी पान क्र.30 लगत लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.

अर्जदार व सामनेवाले यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतलेले आहेत

 

मुद्देः

1.           अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय? -- होय.

2.  अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत आहे काय?-- होय.

                                                         तक्रार क्र.204/2011

3.         सामनेवाले यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यात कमतरता केली आहे

    काय?- होय.

4.          अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून विमा क्‍लेमपोटी  व्‍याजासह रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय? ---होय

5.         अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत काय?-- होय

6.         अंतीम आदेश?  -- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवालेविरुध्‍द अंशतः मंजूर करणेत येत आहे.

 

 विवेचनः

याकामी अर्जदार यांनी पान क्र.32 लगत लेखी युक्‍तीवाद सादर केलेला आहे.  सामनेवाला व त्‍यांचे वकिल युक्‍तीवादाचे वेळी गैरहजर राहीलेले आहेत.   

अपघातग्रस्‍त वाहनास सामनेवाले यांनी विमा पॉलिसी दिलेली आहे ही बाब सामनेवाले यांनी त्‍यांचें लेखी म्‍हणणे कलम 4 मध्‍ये मान्‍य केलेली आहे.   अर्जदार यांनी पान क्र.9 लगत विमा पॉलिसी दाखल केलेली आहे.  सामनेवाले यांचे लेखी म्‍हणणे व पान क्र.9 लगतची विमा पॉलिसी याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.

अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचासमोर दि.08/09/2011 रोजी दाखल केलेला आहे.  वाहन चोरीची घटना दि.07/03/2009 रोजी घडलेली आहे.  अर्जदार यांनी दि.07/03/2009 पासून दोन वर्षाचे आत म्‍हणजे दि.06/03/2011 रोजी किंवा त्‍यापुर्वी तक्रार अर्ज दाखल करणे गरजेंचे होते, परंतु या कामी अर्जदार यांनी पान क्र.1 लगत विलंब माफी अर्ज, पान क्र.2 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे व पान क्र.3 लगत वैद्यकिय प्रमाणपत्र दाखल केलेले आहे.  अर्जदार यांचा विलंब माफीचा अर्ज दि.08/09/2011 रोजी मंजूर करण्‍यात आलेला आहे.  यामुळे अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल आहे असे या मंचाचे मत आहे.

     याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.

मा.राज्‍य आयोग मुंबई यांचेसमोरील प्रथम अपील क्र.274/2010. निकाल ता.10/06/2010. संजय खेमजी वसंत, नाशिक   विरुध्‍द नॅशनल इन्‍शुरन्‍स कं.शाखा नाशिक.

                                                    तक्रार क्र.204/2011

सामनेवाले यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व प्रतिज्ञापत्रामध्‍ये अपघातग्रस्‍त वाहनास दि.07/03/2009 रोजी अपघात झालेला आहे व अपघातग्रस्‍त वाहनाची माहिती अर्जदार यांनी सामनेवाला यांना दि.07/05/2009 रोजी कळविलेली आहे. अर्जदार यांनी 61 दिवस उशिराने क्‍लेम दाखल केलेला आहे, त्‍यामुळे विमा पॉलिसीचा अटी व शर्तींचा भंग झालेला आहे.  सेवा देण्‍यात कमतरता केलेली नाही.  अर्ज नामंजूर करण्‍यात यावा. असे म्‍हटलेले आहे.

या कामी अर्जदार यांचे वाहन दि.7/3/2009 रोजी चोरीस गेलेले आहे.  परंतु अर्जदार यांनी सामनेवाला यांना विमापॉलिसीचे अटी व शर्तीनुसार किती दिवसाचे आत अपघाताची माहिती कळविली पाहीजे याबाबतचे कोणते बंधन आहे? हे दर्शवण्‍याकरीता सामनेवाला यांनी विमापॉलिसीच्‍या अटी व शर्ती दाखल केलेल्‍या नाहीत.  अर्जदार यांनी या कामी पान क्र.20 लगत सामनेवाला यांचे दि.17/08/2010 रोजीचे नो क्‍लेमबाबतचे पत्र दाखल केलेले आहे.  या पत्रामध्‍ये अर्जदार यांनी घटना घडल्‍यानंतर त्‍याची माहिती लगेचच सामनेवाला यांनी दिलेली नाही, त्‍यामुळे क्‍लेम बंद करण्‍यात येत आहे. असा उल्‍लेख आहे.  परंतु या पत्रामध्‍येही घटना घडल्‍यानंतर किती दिवसात माहिती देणे बंधनकारक आहे व पॉलिसीची कंडीशन नंबर 1 काय आहे याचा कोणताही उल्‍लेख करण्‍यात आलेला नाही.  केवळ वाहनाबाबत घडलेली घटना कळविण्‍यास 61 दिवसांचा उशिर झालेला आहे, या कारणावरुन सामनेवाला हे अर्जदार यांचा विमाक्‍लेम नाकारु शकत नाहीत.  वरील सर्व कारणांचा विचार होता, सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.

     याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्‍ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे.

2011 एन.सी.जे. राष्‍ट्रीय आयोग. पान 860. न्‍यु इंडिया इन्‍शुरन्‍स कं.  विरुध्‍द मे. स्‍टर्डी पॉलिमर्स

     या कामी अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून विमाक्‍लेपोटी रु.8,07,217/- मिळावेत अशी मागणी केलेली आहे.  पान क्र.9 चे विमापॉलिसीनुसार सामनेवाला यांनी अर्जदार यांचे वाहनाचे बाबतीत रु.8,07,217/- इतक्‍या रुपयांची जोखीम स्विकालेली आहे असे दिसून येत आहे. अर्जदार यांनी अपघातग्रस्‍त वाहन ऑगष्‍ट 2008 मध्‍ये खरेदी घेतलेले आहे व वाहन चोरीला जाण्‍याची घटना मार्च 2009 मध्‍ये घडलेली आहे, म्‍हणजेच विमा पॉलिसी घेतल्‍यापासून 1 वर्षाचे आतच चोरीची घटना घडलेली आहे, याचा विचार

 

                                                          तक्रार क्र.204/2011

होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून विमाक्‍लेमपोटी रु.8,07,217/-इतकी रक्‍कम वसूल होवून मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

     सामनेवाले यांचेकडून अर्जदार यांना विमा क्‍लेमपोटी रक्‍कम रु.8,07,217/- इतकी मोठी रक्‍कम योग्‍य त्‍या वेळेत मिळालेली नाही. वाहन चोरीला गेल्‍याची घटना दि.07/03/2009 रोजी घडलेली आहे. तेथून पुढे तिन महिन्‍याचे आत सामनेवाला यांनी अर्जदार यांचा योग्‍य तो विमाक्‍लेम मंजूर करणे गरजेचे होते. विमाक्‍लेमची योग्‍य ती रक्‍कम अर्जदार यांना योग्‍य  त्‍या वेळेत मिळालेली नाही, त्‍यामुळे निश्‍चीतपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागलेले आहे.  वाहन खरेदीसाठी अर्जदार यांनी महिंद्रा अँण्‍ड महिंद्रा फायनान्‍स सर्व्‍हीसेस या कंपनीकडून कर्जाऊ रक्‍कम घेतलेली आहे ही बाब पान क्र.9 चे विमापॉलिसीवरुन स्‍पष्‍ट झालेली आहे.  पान क्र.22 चे सामनेवाला यांचे दि.06/12/2010 रोजीचे पत्रानुसार सामनेवाला यांनी अर्जदार यांचा विमाक्‍लेम नामंजूर केलेला आहे.  याचा विचार होता पान क्र.22 चे पत्राची तारीख दि.06/12/2010 पासून अर्जदार हे आर्थीक नुकसान भरपाई म्‍हणून मंजूर रक्‍कम रु.8,07,217/- या रकमेवर संपुर्ण रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

याबाबत मंचाचेवतीने पुढीलप्रमाणे वरिष्‍ठ कोर्टांचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहेः

  1.       2(2008) सी.पी.जे. राष्‍ट्रीय आयोग पान क्र.186. ओरीएंन्‍टल

      इन्‍शुरन्‍स कंपनी विरुध्‍द राजेंद्रप्रसाद बंन्‍सल.

  2. 1(2008) सी.पी.जे. राष्‍ट्रीय आयोग पान क्र.265. संजीवकुमार

      विरुध्‍द न्‍यु इंडिया  इंन्‍शुरन्‍स कंपनी.  

सामनेवाले यांचेकडून विमा क्‍लेमची रक्‍कम  मिळावी या मागणीसाठी अर्जदार यांना सामनेवालेविरुध्‍द या मंचासमोर दाद मागावी लागलेली आहे.  सामनेवाले यांचे कृतीमुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्‍यासाठी खर्चही करावा लागला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्‍कम वसूल होऊन मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

      अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्‍तीवाद तसेच सामनेवाले यांचे लेखी म्‍हणणे,  प्रतिज्ञापत्र,  त्‍यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे वर उल्‍लेख केलेली व आधार घेतलेली वरिष्‍ठ कोर्टाची

                                                          तक्रार क्र.204/2011

निकालपत्रे आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होऊन पुढीलप्रमाणे आदेश करण्‍यात येत आहे.

                                                आ दे श

 

1.  अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाले यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येत  

  आहे.

2.   आजपासून 30 दिवसांचे आंत सामनेवाले यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे

   रकमा दयाव्‍यातः

   2.अ. विमाक्‍लेमपोटी रक्‍कम रु.8,07,217/- दयावेत व आर्थिक नुकसान

       भरपाई म्‍हणून या मंजूर रकमेवर दि.06/12/2010 पासून संपूर्ण

       रक्‍कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.12% दराने व्‍याज दयावे.

  2ब.  मानसिक त्रासापोटी रु.15,000/- दयावेत.

  2क. अर्जाचे खर्चापोटी रु.1,000/- दयावेत.

 

 

 
 
[HON'ABLE MR. R.S.Pailwan]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. V.V.Dani]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.