निकालपत्र :- (दि.29.12.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंना पुकारले असता ते गैरहजर आहेत. सामनेवाला यांनी यापूर्वीच लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनीकडे फोर्ड आयकॉन 1.6 इएक्सआय रजि.नं.एम्.एच्.04 एएक्स् 2160 या वाहनाचा विमा उतरविला आहे. सदर विम्याचा कालावधीदि.22.07.2005 ते दि.21.07.2006 असा होता. दि.18.03.2006 रोजी सदर वाहनास अपघात होवून वाहनाचे नुकसान झाले. सदर नुकसानीची भरपाई मिळणेकरिता तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे क्लेमची मागणी केली असता सामनेवाला यांनी ती दिलेली नाही. सबब, सामनेवाला यांचेकडून तक्रारदारांना रुपये 1,72,150/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह, मानसिक त्रासापोटी रुपये 15,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत पॉलीसी पेपर्स, वकिल नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीस मुदतीचा बाध येतो. सबब, तक्रारदारांनी तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांच्या तक्रारीचे अवलोकन केले असता तक्रारीत उल्लेख केलेली घटना ही दि.18.03.2006 रोजी घडलेचे दिसून येते व प्रस्तुतची तक्रार ही दि.19.09.2009 रोजी दाखल केलेची दिसून येते. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 24 (ए) मधील तरतुदीचा विचार करता प्रस्तुतच्या तक्रारीस मुदतीचा बाध येतो या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदर विवेचनास हे मंच खालील पूर्वाधार विचार घेत आहे:- CIVIL APPEAL NO. 4962 OF 2002 - Kandimalla Raghavaiah & Co. Vs. National Insurance Co. & Anr. - Supreme Court. A. Insurance - Conusmer Protection Act, 1986 - S.24-A - Limitation - Fire policy - Limitation for the purpose of s.24-A commences from the date on which fire broke out and complaint ought to be filed within two years thereof. B. Consumer Protection Act, 1986 - S.24-A - Limitation - Fire policy - Reply to legal notice - whether complaint filed by appellant before the Commission was time-barred - On 23.03.1988 fire broke out in godowns of appellant - Goods were hypothecated to 2nd Respondent Bank - 2nd Respondent Bank lodged a complaint against appellant firm and its partners alleging that they had intentionally set fire to the tobacco stocks with a view to lay a false claim for loss of stocks - Appellants was acquitted in the said complaint - Meanwhile on 14.07.1988, 2nd Respondent had preferred as claim with 1st Respondent, but did not pursue the claim - On 06.11.1992, appellant sought ‘claim form’ from 1st Respondent, but fialed to get any response - On 26.10.1995, a legal notice was served on 1st respondent - On 21.03.1996, the 1st respondent replied to the legal notice stating that claim is time-barred - On 21.10.1997, appellant filed the present complaint before the commission - Appellant contended that limitation under S.24-A commenced only when claim was repudated on 21.03.1996 and hence complaint was well within time - Commission observed that cause of action arose on 23.03.1988, i.e. when the fire broke out and first action by appellant was on 06.11.1992 when he sought ‘claim form’ - There was absence of delay condonation application - Commission held complaints were barred by limitation - Appeal against - Appellant contended that commission failed to see that policy was a ‘joint policy’ with the 2nd respondent bank and it had made claim with 1st respondent within limitation - Held, limitation for the purpose of S.24-A commenced from 23.03.1988 when fire broke out and complaint ought to have been filed within two years thereof - Appellant was not depending on claim stated to have been made by the Bank - Reply to legal notice cannot extend period of limitation - Commission was justified in dismissing the complaint as time barred - Consumer Protection Act, 1986 S.23. (6) उपरोक्त संपूर्ण विवेचन व पूर्वाधार विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार काढून टाकणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत. 3. सदरचा आदेश ओपन कोर्टात अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |