Maharashtra

Kolhapur

CC/09/26

Jagnnath D. Patil. - Complainant(s)

Versus

Divisional Manager, Bajaj Allianz General Insurance Co. Ltd. - Opp.Party(s)

M.M.Mahajan

29 Apr 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/26
1. Jagnnath D. Patil.A/p Bhadle, Tal. Shahuwadi.Kolhapur.Maharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Divisional Manager, Bajaj Allianz General Insurance Co. Ltd.4 th floor, Vardhaman Shankar Sheth Road, 7 Plus Chowk, Pune-411042Maharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :M.M.Mahajan, Advocate for Complainant
S.K.Dandge, Advocate for Opp.Party

Dated : 29 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.29/04/2011) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(01)       प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. 
 
           सदरची तक्रार तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य विमा दावा सामनेवाला विमा कंपनीने नाकारल्‍यामुळे दाखल करणेत आला आहे. 
 
(02)       तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला विमा व्‍यवसाय करणारी वित्‍तीय संस्‍था असून तक्रारदारांचा मुलगा मयत विजय जगन्‍नाथ पाटील याचा विमा पॉलीसी क्र.08-08-2005-1802-00001551 अन्‍वये उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा कालावधी दि.17/12/2007 ते 16/12/2008 असा असून सदर पॉलीसी अन्‍वये ओन डॅमेज व वैयक्तिक अपघात या दोन्‍हींचा अतंर्भाव आहे व त्‍यासाठीचा एकत्रित विमा हप्‍ता सामनेवालांनी भरुन घेतलेला आहे.
 
           ब) पॉलीसी कालावधीत दि.23/01/2008 रोजी तक्रारदाराचा नमुद विमाधारक मुलगा हा स्‍वत:चे मोटरसायकलवरुन जात असताना समोरुन भरधाव वेगाने येणा-या ट्रकने दिलेल्‍या जोरदार धडकेने जागीच मयत झाला. सदरचा अपघात हा ट्रक चुकीच्‍या दिशेने आलेने झालेला आहे. तदनंतर तक्रारदाराने आवश्‍यक त्‍या कागदपत्रांची पूर्तता करुन ओन डॅमेजची रक्‍कम रु.40,612/-व वैयक्तिक अपघाताची रक्‍कम रु.1,00,000/-क्‍लेमची सामनेवालांकडे मागणी केली असता दि.19/07/2008 रोजी चुकीचे कारण देऊन तक्रारदाराचा न्‍याययोग्‍य व पारदर्शी क्‍लेम नाकारलेने प्रस्‍तुतची तक्रार मे. मंचासमोर दाखल करणे भाग पडले. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन वैयक्तिक अपघाताची रक्‍कम रु.1,00,000/- ओन डॅमेजची रक्‍कम रु.40,612/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.15,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती सदर मंचास केली आहे.
 
(03)       तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ दि.11/01/2008 चा पॉलीसी पेपर, व दि.19/07/08 चे क्‍लेम नाकारलेचे पत्र इत्‍यादी कागदपत्र दाखल केली आहेत.  
 
(04)       सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार- अ) तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय नाकारलेली आहे. प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयानुसार चालणेस पात्र नाही. तसेच तक्रार चालवणेचे अधिकारक्षेत्र मे. मंचास नाही. विजय जगन्‍नथ पाटील हे सामनेवालांचे विमाधारक असलेचे मान्‍य आहे. सामनेवालांनी इन्‍शुरन्‍स पॉलीसी नं.ओजी-08-2005-1802-00001551 दिली होती. सदर पॉलीसीचा कालावधी दि.17/12/2007 ते 16/12/2008 अखेर आहे. सदरची पॉलीसीनुसार हिरोहोडा मोटर सायकल वर नमुद विमाधारकाचा विमा होता. सामनेवालांचे उत्‍तरदायित्‍व हे नमुद विमा पॉलीसीच्‍या अटी, शर्ती, अपवाद व परिशिष्‍ठास अनुसरुन राहील. सामनेवालांनी तक्रारदाराचा क्‍लेम नाकारलेचे मान्‍य केले आहे. तसेच प्रस्‍तुत वाहन चालविणारा नमुद विमाधारक विजय जगन्‍नाथ पाटील याचेकडे वैध चालक परवाना अपघातावेळी नव्‍हता. तसेच सदर अपघाताचे दुसरे वाहन ट्रक यांचा निष्‍काळजीपणा व सामनेवालांचे उत्‍तरदायित्‍व याचा काही संबंध नाही. तसे असेल तर तक्रारदाराने मोटार अपघात विमा ट्रिब्‍युनल यांचेकडे मोटार वाहन कायदयाखाली दाद मागावी.
 
           ब) विमा उतरविलेले वाहनाचे नुकसानीबाबतची जबाबदारी नमुद पॉलीसीच्‍या अटी व शर्तीस अधीन राहूनच असते. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, क्‍लेमबाबत सुचना प्राप्‍त होताच सामनेवाला यांनी आय.आर.डी.ए.मानांकित सर्व्‍हेअर परमार यांची नमुद वाहनाचे नुकसानीचे पाहणी करणेसाठी नेमणूक केली होती. नमुद परमार यांनी नमुद वाहनाचे रु.26,832/- इतकी नुकसानी निश्चित केलेली आहे. मात्र नमुद विमाधारक चालकाकडे वैध चालक परवाना नसलेने प्रस्‍तुतचा क्‍लेम नाकारलेला आहे. पॉलीसीच्‍या कलम 3 मध्‍ये तसे स्‍पष्‍टपणे नमुद केले आहे. तसेच सेंट्रल मोटर व्‍हेईकल रुल 1989 रुल 3 च्‍या तरतुदीचा विचार करता नमुद मयत विमाधारकाकडे पुणे आर.टी.ओ. यांनी दि.11/01/2008 ते 10/07/2008 चे कालावधीसाठी MCWG साठीचे शिकाऊ परवाना दिलेला होता. तसेच नमुद वाहनावर मागे बसलेले मिस सुजाता विलास थोरात हिचेकडेही अपघातावेळी वैध चालक परवाना नव्‍हता. तसेच वाहनावर एल.प्‍लेट लावलेली नव्‍हती. सबब वर नमुद तरतुदीचा विचार करता सामनेवाला यांनी योग्‍य कारणास्‍तव विमा क्‍लेम नाकारुन सेवेत कोणतीही त्रुटी केली नसलेने तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व तक्रारदाराकडून सामनेवालांना कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट व्‍हावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.
 
(05)       सामनेवाला यांनी आपले लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ विजय पाटील यांचे लर्नर्स लायसन्‍स, परमार आणि कंपनी यांचा सर्व्‍हे रिपोर्ट, इन्‍शुरन्‍स पॉलीसीची प्रत इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. दि.07/02/11 रोजी इनशुरन्‍स पॉलीसी प्रत, सामनेवाला यांनी तक्रारदारस दिलेल्‍या पत्राची प्रत, परमार आणि कंपनी यांचा सर्व्‍हे रिपोर्ट इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
 
(06)       तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे व दाखल कागदपत्रे, उभय पक्षाच्‍या वकीलांचा अंतिम युक्‍तीवाद इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.
1) तक्रार चालविणेचा अधिकार सदर मंचास येता का ?   --- होय.
2) सामनेवालांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ?             --- होय.
3) काय आदेश ?                                                      --- शेवटी दिलेप्रमाणे
 
मुद्दा क्र.1 :-सामनेवाला यांनी त्‍यांचे म्‍हणणेत तक्रारदाराची तक्रार ही सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवलेबद्दलची नसलेनेग्राहक सरंक्षण कायदानुसार सदर मंचास तक्रार चालविणेचे अधिकारक्षेत्र नाही असे कथन केले आहे. याचा विचार करता ग्राहक संरक्षण कायदयानुसार सेवेतील त्रुटी ठरविणेचे अधिकार क्षेत्र सदर मंचास आहे. विमा कंपनीने दिलेली सेवा ही '' सेवा '' या सदरात मोडतात. सबब '' सेवा'' ही मंचाचे अधिकार क्षेत्रातील बाब असलेने सदर तक्रार चालविणेचा अधिकार क्षेत्र सदर मंचास येते या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.2 :- तक्रारदारांचा मुलगा मयत विजय जगन्‍नाथ पाटील याचा विमा पॉलीसी क्र.08-08-2005-1802-00001551 अन्‍वये उतरविलेला होता. सदर पॉलीसीचा कालावधी दि.17/12/2007 ते 16/12/2008 असा असून सदर दाखल पॉलीसीच्‍या सत्यप्रतीवरुन ओन डॅमेज प्रिमियम रु.552.66 थर्ड पार्टी साठी रु.300/- प्रिमियम, पी.ए.कव्‍हर फॉर ओनर ड्रायव्‍हर रु.1,00,000/- प्रिमियम रु.50/- सामनेवाला यांनी घेतलेचे दिसून येते. सामनेवाला यांनी पॉलीसी मान्‍य केली असलेने त्‍याबाबत वाद नाही. प्रस्‍तुत पॉलीसी कालावपधीत तक्रारदाराच्‍या नमुद विमाधारक मुलगा दि.23/01/2008 रोजी ट्रकने दिले धडकेने अपघातात मयत झाला. अपघाताबाबत वाद नाही. वादाचा मुद्दा आहे तो त्‍याच्‍याकडे अपघातावेळी वाहन चालवणेचा वैध परवाना होता का ? सामनेवालांनी आपले लेखी म्हणणेत मयत विजय जगन्‍नाथ पाटील याचेकडे पुणे आर.टी.ओ. यांनी दिलेला MCWG साठीचे लर्नींग लायसेन्‍स होते. त्‍याचा कालावधी 11/1/2008 ते 10/07/2008 असा होता. अपघात झाला त्‍यावेळी नमुद मयत विमाधारकाकडे शिकाऊ परवाना होता. त्‍याची प्रत प्रस्‍तुत कामी सामनेवाला यांनी दाखल केली आहे. त्‍याचा परवाना कालावधीत मृत्‍यू झाला आहे ही वस्‍तुस्थिती निर्विवाद आहे. प्रस्‍तुत पॉलीसीचे अवलोकन केले असता Driver-Any person including the insured provided that a person driving holds an effective driving licence at the time of the accident and is not disqualified from holding or obtaining such a licence (Provided also that the person holding an effective Learner’s licence may also drive the vehicle and that such a person satisfies the requirement of Rule 3 of the Central Motor Vehicles Rules 1989)  नुसार तक्रारदाराचा क्‍लेम नसलेने सामनेवाला यांनी दि.19/07/2008 चे पत्राने क्‍लेम नाकारला आहे.
 
           दि.14/09/2009 रोजी तक्रारदाराने बिलचेक रिपोर्ट, सर्व्‍हेअर रिपोर्ट, पोलीस पेपर्स, तसेच क्‍लेम फॉर्मसोबत जोडलेले सर्व अन्‍य पेपर्स सामनेवालांनी हजर करणेबाबत अर्ज केला होता. त्‍यावर सामनेवालांनी म्‍हणणे देणेबाबत मे;मंचाने आदेश केला होता. परंतु सामनेवाला यांनी त्‍यास म्‍हणणे दिलेले नाही तसेच प्रस्‍तुत अर्जाप्रमाणे संपूर्ण कागदपत्र दाखल केलेली नाहीत. त्‍यानंतर सामनेवाला यांनी पॉलीसी, सर्व्‍हे रिपोर्ट, लर्नींग लायसेन्‍स इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. मात्र पोलीस पेपर्स, इन्‍व्‍हेस्‍टीगेशन रिपोर्ट, त्‍यांचे शपथपत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली नाहीत.  कोणत्‍या आधारे पिलर रायडर कडे वैध परवाना नव्‍हता. तसेच गाडीस L  प्‍लेट नव्‍हती हे कसे ठरवले. प्रस्‍तुत कागदपत्रे सामनेवालांचे ताब्‍यात होती व ती दाखल करणेस कोणतीही अडचण नव्‍हती. याबाबत कायदेशीर कागदोपत्री पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेला नाही. सबब केवळ सामनेवालांचे कथनावर व क्‍लेम नाकारलेच्‍या पत्रातील मजकूरावर विश्‍वास ठेवणे उचीत होणार नाही. सबब Section III Personal Accident cover for owner driver Clause c(1) (a) (b) (c) प्रमाणे कागदपत्रांची पूर्तता तक्रारदाराने केलेली होती. तसेच नमुद अपघातावेळी तक्रारदाराचवा मुलग्‍याकडे वैध परवाना होता. पॉलीसीचा मूळ हेतू,  वस्‍तुस्थितीजन्‍य पुराव्‍याचा विचार करता तक्रारदाराचा पारदर्शी व न्‍याययोग्‍य क्‍लेम नाकारुन सेवेत त्रुटी ठेवलेचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार विमा पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु.1,00,000/- दावा नाकारले तारखेपासून व्‍याजासहीत मिळणेस पात्र आहेत तसेच सर्व्‍हे रिपोर्टप्रमाणे ओन डॅमेजपोटी रक्‍कम रु.26,832/-व्‍याजासह मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
मुद्दा क्र.3:-विमाधारकाच्‍या वडीलांना मुलाच्‍या मृत्‍यूनंतर सदर विमा रक्‍कमेचा आधार होता सदर विमा रक्‍कम सामनेवालांनी न दिलेने तक्रारदार मानसिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
                           आदेश
 
1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
 
2) सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदारास पॉलीसीप्रमाणे रक्‍कम रु;1,00,000/-(रु.एक लाख फक्‍त) व सर्व्‍हेअर यांनी त्‍यांचे सर्व्‍हे रिपोर्टमध्‍ये ओन डॅमेजची निश्चित केलेली रक्‍कम रु.26,832/- दयावी. सदर रक्‍कमेवर दि.19/11/2008 पासून ते संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍के दराने व्‍याज मिळणेस पात्र आहेत.
 
3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.2,000/-(रु.दोन हजार फक्‍त) व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्‍त) दयावेत.
 

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT