(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराने स्वतःच्या शेतजमिनीत फळबाग पिकाची रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड केली होती. पीक न आल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे तक्रार केली. गैरअर्जदार यांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांची शिवार, नेवपूर ता.कन्नड जि.औरंगाबाद येथे शेतजमिन आहे. सन 2001-2002 मध्ये त्यांनी शेतात आवळा या फळबाग पिकाची रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवड केली. पीक न आल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार यांच्याकडे याबाबत तक्रार केली. गैरअर्जदार यांनी कोणतीही कारवाई न (2) त.क्र.320/09 केल्यामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे. गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाई देण्याची अर्जदाराने मागणी केली आहे. गैरअर्जदार यांना नोटीस प्राप्त होऊनही मंचात जवाब दाखल केला नाही, म्हणून त्यांच्याविरुध्द नो से चा आदेश पारित करण्यात आला. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन असे दिसून येते की, त्यांची शिवार नेवपूर, ता.कन्नड जि.औरंगाबाद येथे शेतजमिन आहे. या शेतजमिनीत त्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत आवळा या पिकाची लागवड केली आहे. ही लागवड त्यांनी सन 2001-2002 साली केली आहे. आवळयाच्या हायब्रीड पिकास साधारण 4 वर्षानंतर फळ येतात व नेहमीच्या पिकास साधारण 7 ते 8 वर्षानंतर फळ येतात. दि.06.09.2007 रोजीच्या पत्राद्वारे त्यांनी गैरअर्जदार यांना, पीक न आल्यामुळे पाहणी करण्याबाबत पत्र लिहीले. गैरअर्जदार यांनी, त्याची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने दि.23.10.2007, 07.12.2007, 02.01.2008 रोजी स्मरणपत्रे लिहीलेली दिसून येते. दि.02.02.2009 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनात देखील त्यांनी या प्रकरणी तक्रार केल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांनी, अर्जदाराने केलेला तक्रार अर्ज दि.02.01.2008 रोजी तालुका कृषी अधिकारी कन्नड यांना पाठवून अभिप्राय देण्याबाबत कळविले. तालुका कृषी अधिकारी कन्नड यांनी ही बाब, प्रभारी अधिकारी, फळबाग संशोधन केंद्र, औरंगाबाद यांना कळवून, पाहणी करुन अहवाल देण्याची विनंती केलेली दिसून येते. अर्जदाराने शेतात लागवड केलेली आवळा रोपे फलोत्पादन अधिकारी, तालुका फळ रोपवाटीका, पैठण जि.औरंगाबाद यांच्याकडून खरेदी केलेली असल्याचे दिसून येते. अर्जदाराने मंचात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्यांना गैरअर्जदार करणे जरुरी होते. गैरअर्जदार यांनी, अर्जदाराने वेळोवेळी केलेल्या तक्रारीची दखल न घेता, जागेची पाहणी न करता, फक्त कागदी पत्रव्यवहार केला असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार यांना संधी देऊनही त्यांनी मंचात म्हणणे दाखल केलेले नाही. अर्जदार हे जरी, गैरअर्जदार यांचे प्रत्यक्ष ग्राहक नसले तरी, गैरअर्जदार यांची ही कृती शासनाच्या रोजगार हमी योजनेला पूरक नसणारी आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविणे, त्यांना मार्गदर्शन करणे, तसेच (3) त.क्र.320/09 शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबविणे हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे प्रत्यक्ष ग्राहक नसल्यामुळे सदरील तक्रार खारीज करण्यात येत आहे. आदेश 1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डि.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |