निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 08/04/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 20/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 01/03/2012 कालावधी 10 महिने.10 दिवस. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. कारभारी पिता साहेबराव जाधव. अर्जदार वय 36 वर्ष.धंदा.- व्यापार. अड.आर.बी.चव्हाण. रा.आंबेगाव ता.मानवत.जि.परभणी. विरुध्द 1 विभागीय नियंत्रक. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य परिवहन महा.मंडळ. अड.एस.एस.पवार. विभाग गंगाखेड रोड.परभणी. 2 महाराष्ट्र राज्य परिवहन महा.मंडळ शाखा मानवत,ता.मानवत जि.परभणी. 3 सिध्दी विनायक फ्राअट पा.ली.ऑफीस पहिला मजला. अड.एस.एन.वेलणकर. शिवराम कॉम्पलेक्स लोकमत ऑफिस समोर.साकरी रोड. धुळे ता.जि.धुळे. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – सौ.सुजाता जोशी. सदस्या.) गैरअर्जदाराने गहाळ झालेल्या पेटीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मानवत येथील व्यापारी असून तो गैरअर्जदारांच्या मार्फत सतत पार्सलव्दारे औषधाची ने आण करत असतो. दिनांक 18/02/2011 रोजी अर्जदाराने मानवत येथून अकोला येथे हिंदुस्थान फुलवरायसिंग मिल्स न्यु रवि स्पिनींग कंपनीच्या नावे औषधीच्या 11 पेट्या पाठवल्या व त्यासाठी सेवा कर रु.243/- भरला होता.दिनांक 23/02/2011 रोजी कंपनीला दहाच पेट्या पोहचल्याची पोचपावती अर्जदाराला मिळाली कंपनीकडून त्या पेटीची एकुण किंमत रु.27,300/- असे अर्जदारास सांगण्यात आले.पेटी गहाळ झाल्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे व पेटीची मुळ किंमत रु.27,300/- 12 टक्के व्याजासह दिनांक 18/02/2011 पासून मिळावेत, इतर नुकसान भरपाई रु. 25,000/- मानसिक त्रासापोटी रु.10,000/- दाव्याचा खर्च रु.2500/- मिळावेत. अशी मागणी केलेली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, पार्सल केल्याची पावती, पार्सल घेतल्याची पावती गैरअर्जदाराशी केलेल्या पत्रव्यवहार इ.कागदपत्र दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने त्यांच्या लेखी जबाबात अर्जदार हा त्यांचा ग्राहकच नाही त्यांच्यात व जोशी फ्रेटकॅरीअर्स धुळे यांच्यात झालेल्या करारान्वये पार्सल जर प्रवासादरम्यान गहाळ अथवा डॅमेज झाले तर महामंडळ जबाबदार रहाणार नाही तसेच पावती वरील नियमात सुध्दा जर पार्सल अथवा कुंरीअर गहाळ झाल्यास महामंडळ अथवा त्यांच्या कोणत्याही अधिका-यास प्रतिवादी म्हणून पार्टी करता येणार नाही. म्हणून सदरील तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने केलेली आहे. लेखी जबाबासोबत गैरअर्जदाराने शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्यांच्या लेखी जबाबात अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहकच होत नाही कारण गैरअर्जदारांची सेवा त्याने व्यापारासाठी घेतलेली आहे तसेच मालाचे बुकींग करताना मालाची किंमत जाहीर करुन दर हजारी रु.3/- नुसार मुल्य आधारीत अधिभार अदा करणे आवश्यक होते मात्र अर्जदाराने तसे केले नाही.तसेच बुकींग नियमावली मधील कलम 2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे प्रवासादरम्यान अपघाताने माल गहाळ झाल्यास गैरअर्जदार प्रती डागास रु.50/- नुकसान भरपाई देण्यास पात्र आहे असे अर्जदारास कळविण्यात आले आहे.अर्जदाराने पाठवलेल्या 10 पेट्यामधून 1 पेटी गहाळ होण्याचे कारण प्रवासा दरम्यान अचानक वादळी वा-यामुळे 1 पार्सल गहाळ झाले. गैरअर्जदार क्रमांक 3 ने तशी तक्रार महामंडळाकडे केलेली आहे म्हणजेच 1 पेटी कोणत्याही निष्काळजीपणामुळे वा त्रुटीच्या सेवेमुळे गहाळ झालेली नसून ती अपघाताने गहाळ झालेली आहे व नियमाप्रमाणे त्याची रु.50/- भरपाई देण्याची गैरअर्जदाराची तयारी आहे म्हणून अर्जदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 3 ने केलेली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्याच्या लेखी जबाबासोबत त्याचे शपथपत्र, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना पाठवलेले स्मरणपत्र, अर्जदाराने गैरअर्जदारास पाठवलेले पत्र इ.कागदपत्र दाखल केलेले आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व वकिलांच्या युक्तीवादावरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 ने त्रुटीची सेवा दिलेली आहे काय ? होय. 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे.? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे. अर्जदाराने गैरअर्जदारामार्फत दिनांक 18/02/2011 रोजी हिन्दुस्थान फुलवरायसींग मिल्स अकोला यांच्या नावे 11 पेट्या पाठवल्या व त्याबद्दल गैरअर्जदार क्रमांक 3 यांना रु.243/- दिले.हे नि.5/1 वरील पावती वरुन सिध्द होते. दिनांक 23/02/2011 रोजी अकोल्याला 11 पैकी 10 पेट्या मिळाल्या असे नि.5/3 व नि.5/2 वरील पावत्यांवरुन सिध्द होते. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 शी पत्रव्यवहार ( नि.5/4, 5/5 ) वरुन गहाळ झालेल्या पेटीची नुकसान भरपाई एकुण रु.27,300/- मागितली अर्जदाराने किमती बाबत पुरावा म्हणून 5/4 वर कंपनीचे पत्र दाखल केले आहे, परंतु पार्सलच्या नि.5/1 वरील पार्सलवर पेट्यांच्या किमती बाबत काहीही उल्लेख नाही वा विमाही उतरवलेला नाही.नि.5/1 वरील पावतीवर ह्याबाबत स्पष्ट उल्लेख आहे व ज्या पावतीवर अधिभार भरलेला नसेल अशावेळी एका पार्सलसाठी रु. 50/- नुकसान भरपाई देण्यात येईल असा नियम क्रमांक 2 आहे. अर्जदाराने एस.टी.महामंडळा कडूनही नुकसान भरपाई मागितलेली आहे,परंतु त्यांनी दाखल केलेल्या लायसेंस डीड मधील कलम 34 अन्वये वाहतुकीच्या दरम्यान पार्सल गहाळ झाल्यास महामंडळ त्याला जबाबदार रहाणार नाही.त्यामुळे अर्जदार महामंडळाकडून नुसान भरपाई मिळण्यास पात्र नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचे पार्सल गहाळ करुन त्रुटीची सेवा दिलेली आहे असे आम्हांस वाटते मात्र अर्जदाराने मागणी केलेली किंमत मिळण्यास अर्जदार पात्र नाही. कारण त्याबाबत पावतीवर किंमतीचा उल्लेख नाही. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदारास निकाल समजल्यापासून 30 दिवसांचे आत रु.50/- द्यावेत. 3 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदारास आदेश मुदतीत मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- द्यावेत. 4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |