Maharashtra

Gondia

CC/13/26

MR. SUDHIR HIMMATLALJI RATHOD - Complainant(s)

Versus

DIVISIONAL COMMERCIAL MANAGER SHRI K. JAISANKAR - Opp.Party(s)

MR. S. B. RAJANKAR

30 Aug 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, GONDIA
ROOM NO. 214, SECOND FLOOR, COLLECTORATE BUILDING,
AMGOAN ROAD, GONDIA
MAHARASHTRA
 
Complaint Case No. CC/13/26
 
1. MR. SUDHIR HIMMATLALJI RATHOD
R.O.POWER HOUSE ROAD, RAMNAGAR, GONDIA
GONDIA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIVISIONAL COMMERCIAL MANAGER SHRI K. JAISANKAR
CENTRAL RAILWAY KINGSWAY, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. SOUTH EAST CENTRAL RAILWAY, THROUGH STATION MASTER NAMELY SHRI.B.V.T.RAO,
GONDIA
GONDIA
MANARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MS. VARSHA O. PATIL MEMBER
 HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

(आदेश पारित द्वारा मा. अध्‍यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)

(पारित दि. 30 ऑगस्‍ट, 2014)

तक्रारकर्ता हा छत्‍तीसगढ एक्‍सप्रेसने हबीबगंज रेल्‍वे स्‍टेशन ते गोंदीया रेल्‍वे स्‍टेशन असा प्रवास करीत असतांना विरूध्‍द पक्ष यांनी रेल्‍वे कोचमध्‍ये पाणी व वीजेची व्‍यवस्‍था न दिल्‍यामुळे नुकसानभरपाई मिळण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने सदरहू तक्रार दाखल केलेली आहे.   तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालीलप्रमाणेः-

2.    तक्रारकर्ता हा व्‍यवसायाने Income Tax Legal Practitioner असून तो गोंदीया येथील रहिवासी आहे.  विरूध्‍द पक्ष हे सेंट्रल रेल्‍वेतर्फे पदाधिकारी आहेत.  तक्रारकर्त्‍याने दिनांक 03/11/2011 रोजीचे हबीबगंज ते गोंदीया प्रवासाकरिता रेल्‍वे गाडी क्रमांक 18238 छत्‍तीसगढ एक्‍सप्रेसचे रिझर्वेशन तिकीट काढले होते. विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला सदरहू रेल्‍वे गाडीमधील SL-11 या कोचमध्‍ये बर्थ क्रमांक 11 दिला होता.    

3.    प्रवासादरम्‍यान टॉयलेटचा वापर करीत असतांना त्‍यामध्‍ये पाणी व वीज उपलब्‍ध नसल्‍याचे तक्रारकर्त्‍याला आढळून आले.  त्‍याबाबत T.T.E. कडे तक्रार करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने कोचमध्‍ये T.T.E. चा शोध घेतला असता तक्रारकर्त्‍याला सदरहू कोचमध्‍ये तसेच आजूबाजूच्‍या कोचमध्‍ये T.T.E. आढळून आले नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गोंदीया रेल्‍वे स्‍टेशन येथे विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे लेखी तक्रार दिली.  

4.    विरूध्‍द पक्ष यांनी दिनांक 14/06/2012 च्‍या पत्राद्वारे कबूल केले होते की, कोच नंबर SL- 1, 2,, 3, 7, 11 व 12 या बोगीमध्‍ये स्‍टाफ कमी असल्‍यामुळे T.T.E. नव्‍हते.  तक्रारकर्त्‍याने दिनांक 04/11/2011 रोजी विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे लेखी तक्रार दाखल केली व ती सदरहू प्रकरणात दाखल केलेली आहे.  तक्रारकर्त्‍याने माहितीच्‍या अधिकाराअंतर्गत विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडून माहिती मागितली असता विरूध्‍द पक्ष यांनी दिनांक 29/05/2012 च्‍या पत्रानुसार तक्रारकर्त्‍याच्‍या कोच नंबर SL- 11 मध्‍ये इटारसी ते नागपूर दरम्‍यान पाण्‍याचे Shortage असल्‍यामुळे सदरहू बोगीमध्‍ये पाणी नसल्‍याचे कबूल केले.  विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला ग्राहक या नात्‍याने पाणी व वीजेची सुविधा न पुरविल्‍यामुळे व ही विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास नुकसानभरपाई म्‍हणून रू. 20,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रू. 10,000/- द्यावे याकरिता सदरहू तक्रार दाखल केली आहे.  

5.    तक्रारकर्त्‍याची तक्रार विद्यमान न्‍याय मंचाने दिनांक 26/03/2013 रोजी दाखल करून घेतल्‍यानंतर विरूध्‍द पक्ष यांना मंचामार्फत नोटीसेस बजावण्‍यात आल्‍या. 

      विरूध्‍द पक्ष 1 यांना नोटीस मिळाल्‍यानंतर त्यांनी दिनांक 29/05/2013 रोजी आपला जबाब मंचात दाखल केला. 

      विरूध्‍द पक्ष 2 यांना नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात हजर न झाल्‍यामुळे अथवा लेखी जबाब सुध्‍दा दाखल न केल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याविरूध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 26/02/2014 रोजी पारित करण्‍यात आला.

      विरूध्‍द पक्ष 1 यांनी आपल्‍या जबाबात असे म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याने हबीबगंज ते गोंदीया प्रवास कुठलाही त्रास न होता पूर्ण केलेला आहे.  तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमधील इतर प्रवाश्‍यांची पाण्‍याबद्दल व वीजेबद्दल कुठलीही तक्रार विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे आलेली नाही तसेच तक्रारकर्ता हा विरूध्‍द पक्ष यांचा ग्राहक नाही.  तक्रारकर्ता हा हबीबगंज रेल्‍वे स्‍टेशन ते गोंदीया रेल्‍वे स्‍टेशन असा प्रवास करीत असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला Cause of action नसल्‍यामुळे विद्यमान न्‍याय मंचास सदरहू तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही.

6.    तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दिनांक 03/11/2011 रोजीचे रिझर्वेशन तिकीट  पृष्‍ठ क्र. 14 वर दाखल केले असून तक्रारकर्त्‍याने विरूध्‍द पक्ष 2 यांना दिलेली तक्रार पृष्‍ठ क्र. 15 वर दाखल केली आहे.  डिव्‍हीजनल ऑफीस, नागपूर यांनी माहितीच्‍या अधिकाराअंतर्गत दिलेले पत्र पृष्‍ठ क्र. 16 वर तसेच D.R.M’S Office, Mechanical Branch, Nagpur यांनी दिनांक 29/05/2012 रोजी माहितीच्‍या अधिकारात दिलेली माहिती पृष्‍ठ क्र. 18 वर दाखल केली आहे.  Divisional Manager यांनी दिनांक 14/06/2012 रोजी तक्रारकर्त्‍यास पाठविलेले पत्र पृष्‍ठ क्र. 21 वर दाखल केले आहे.   

7.    तक्रारकर्ता सुधीर राठोड यांनी स्‍वतः असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्‍याने दिनांक 03/11/2011 रोजी हबीबगंज ते गोंदीया असा प्रवास केला.  प्रवासादरम्‍यान तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमध्‍ये रात्रीच्‍या वेळेस पाणी व वीज नव्‍हती.  तक्रारकर्ता यासंबंधीची तक्रार T.T.E. कडे देण्‍याकरिता गेला असता त्‍याला तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमध्‍ये तसेच इतर कोचमध्‍ये T.T.E. आढळून आले नाही.  तक्रारकर्ता सकाळी 6.00 चे सुमारास गोंदीया येथे पोहोचला असता त्‍याने स्‍टेशन मास्‍टर म्‍हणजेच विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे लेखी तक्रार केली.  तक्रारकर्त्‍याला विरूध्‍द पक्ष यांनी माहितीच्‍या अधिकाराअंतर्गत Divisional Railway Manager, Nagpur यांनी दिलेल्‍या माहितीनुसार प्रवासाच्‍या दिवशी तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमध्‍ये T.T.E. व Water & Light दिले नाही असे विरूध्‍द पक्ष यांनी कबूल केले आहे.  त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरूध्‍द पक्ष यांचा ग्राहक असल्‍यामुळे व त्‍याला विरूध्‍द पक्ष यांनी सेवा न पुरविल्‍यामुळे नुकसानभरपाई देण्‍यात यावी.   

8.    विरूध्‍द पक्ष 1 चे वकील ऍड. डी. जी. वडेकर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्‍याने तक्रारीमध्‍ये प्रवासादरम्‍यान श्री. ए. के. जैन व मीना जैन हे तक्रारीतील साक्षीदार सदरहू गाडीने प्रवास करीत होते याबद्दलचा कुठलाही पुरावा सदरहू प्रकरणात दाखल केलेला नाही.  तक्रारकर्त्‍याने संपूर्ण प्रवाशांची यादी तक्रारीमध्‍ये दाखल केलेली नाही.  विरूध्‍द पक्ष 2 यांची सदरहू तक्रारीमध्‍ये कुठलीही जबाबदारी नाही व सदरहू घटना ही विरूध्‍द पक्ष 1 यांच्‍या Jurisdiction मध्‍ये घडली असल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याविरूध्‍द प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी.  विरूध्‍द पक्ष 1 यांनी म्‍युनिसिपल कार्पोरेशन कडून पाण्‍याचा पुरवठा न झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमध्‍ये विरूध्‍द पक्ष पाण्‍याची सुविधा देऊ शकले नाहीत.  त्‍याकरिता विरूध्‍द पक्ष हे जबाबदार नसल्‍यामुळे त्‍यांच्‍याविरूध्‍द सदरहू तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.      

9.    तक्रारकर्त्‍याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्‍द पक्ष 1 यांचा लेखी जबाब तसेच दोन्‍ही बाजूच्‍या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

निर्णय

1.

तक्रारकर्त्‍याची तक्रार मान्‍य होण्‍यास पात्र आहे काय?

होय

2.

या तक्रारीचा अंतिम आदेश काय?

कारणमिमांसेप्रमाणे

- कारणमिमांसा

10.   तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या दिनांक 03/11/2011 रोजीच्‍या रिझर्व्‍हेशन तिकीटावरून हे सिध्‍द होते की, तक्रारकर्त्‍याने दिनांक 03/11/2011 रोजी छत्‍तीसगढ एक्‍सप्रेसने हबीबगंज ते गोंदीया असा प्रवास केला.  तक्रारकर्त्‍याने दिनांक 04/11/2011 रोजी विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे तक्रारकर्त्‍याच्‍या कोच क्रमांक S-11 मध्‍ये पाणी व वीजेची सुविधा तसेच T.T.E. नसल्‍याबद्दल केलेली तक्रार ही विरूध्‍द पक्ष यांच्‍याकडे दिनांक 04/11/2011 रोजी सकाळी 8.50 मिनीटांनी दिल्‍याचे विरूध्‍द पक्ष 1 यांनी तक्रारीमध्‍ये केलेल्‍या हस्‍ताक्षरानुसार सिध्‍द होते.  तक्रारकर्त्‍याने दिनांक 21/05/2012 रोजी Right to Information Act, 2005 नुसार मागितलेल्‍या माहितीच्‍या अधिकारात विरूध्‍द पक्ष 1 यांनी दिनांक 14/06/2012 रोजीच्‍या पृष्‍ठ क्र. 19 वर दाखल केलेल्‍या रिपोर्टनुसार परिच्‍छेद क्र. 1 मध्‍ये कबूल केले आहे की, नागपूर महानगरपालिका यांचेकडून विरूध्‍द पक्ष 1 यांना Water Supply  कमी झाल्‍यामुळे ट्रेन नंबर 18238 या रेल्‍वेगाडीला पुरेसा पाणीपुरवठा करण्‍यास ते असमर्थ ठरले.  इटारसी ते नागपूर या दरम्‍यान नागपूर डिव्‍हीजन सेंट्रल रेल्‍वे तिकीट चेकिंग स्‍टाफ कमी असल्‍यामुळे कोच नंबर एस-1, 2, 3, 7, 11 व 12 यांना पुरेसा स्‍टाफ देता आला नाही.  परिच्‍छेद क्र. 4 मध्‍ये असेही म्‍हटले आहे की, “No staff is held responsible for watering as there was a shortage of water.  Due to acute staff position no TTE manned coaches S/11 between ER-NGP beat of C.Rly.  As regard to no light in coach no complaint was received otherwise such complaints are instantly attended by the concerned ETL staff”.  त्‍यामुळे विरूध्‍द पक्ष यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दिलेली माहिती ही Divisional Railway Manager (Commercial ), Nagpur यांच्‍या सहीनिशी असून सदरहू माहिती दिल्‍याचे विरूध्‍द पक्ष यांनी आपल्‍या जबाबात कबूल केले आहे.  विरूध्‍द पक्ष यांनी Reserved कोचमध्‍ये तक्रारकर्त्‍यास Water facility तसेच Light facility न देणे म्‍हणजेच सेवेतील त्रुटी होय.   विरूध्‍द पक्ष यांनी माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्‍या माहितीनुसार तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमध्‍ये T.T.E. उपलब्‍ध नसल्‍यामुळे तक्रारकर्ता पाणी व लाईटच्‍या त्रासाबद्दल त्‍वरित T.T.E. कडे तक्रार करू शकला नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने गोंदीया येथे विरूध्‍द पक्ष 2 यांच्‍याकडे केलेली तक्रार ही योग्‍य व अविलंब तसेच ग्राह्य धरण्‍यायोग्‍य तक्रार आहे.  सदरहू तक्रार विद्यमान मंचात दाखल करण्‍याचे तक्रारकर्त्‍याने दिलेले कारण हे संयुक्तिक कारण असल्‍याचे सिध्‍द होते.  तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला तक्रारकर्त्‍याचा प्रतिज्ञालेख हा तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीस व तक्रारकर्त्‍याने दाखल केलेले रिझर्व्‍हेशन तिकीट तसेच विरूध्‍द पक्ष 2 यांना केलेली तक्रार ग्राह्य धरण्‍यास पुरावा आहे हे सिध्‍द होते.

11.   तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमधील बंद असलेल्‍या विद्युत पुरवठ्याची तपासणी तक्रारकर्त्‍याची तक्रार आल्‍यानंतर केली व त्‍याबद्दलचा रिपोर्ट तसेच संबंधित अधिका-यांचे प्रतिज्ञापत्र सदरहू तक्रारीमध्‍ये विरूध्‍द पक्ष 1 यांनी दाखल केलेले नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमध्‍ये विद्युत पुरवठा नव्‍हता हे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे सिध्‍द होते.          

12.   प्रवाशांना पाणी, लाईट व T.T.E. ची सेवा उपलब्‍ध करून देणे ही विरूध्‍द पक्ष यांची जबाबदारी आहे.  रेल्‍वे ऍक्‍टनुसार संबंधित कोचमध्‍ये हजर राहून प्रवाशांच्‍या तक्रारीचे निवारण करणे ही विरूध्‍द पक्ष यांच्‍या T.T.E. ची जबाबदारी आहे.  परंतु विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या कोचमध्‍ये T.T.E. ची सेवा उपलब्‍ध न करून दिल्‍यामुळे ती विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी दर्शविते.  विरूध्‍द पक्ष यांच्‍या T.T.E. चे काम हे कोचमधील प्रवाशांच्‍या तक्रारीचे अर्ज स्विकारणे व ते त्‍वरित निकाली काढणे तसेच संबंधित अधिका-यांपर्यंत कार्यवाहीकरिता पोहोचविणे असे कार्य Indian Railway Act नुसार आहे.  परंतु विरूध्‍द पक्ष यांचे T.T.E.  फक्‍त प्रवाशांवर बेकायदेशीररित्‍या दंड लावून त्‍यांच्‍याकडून पैसे वसूल करीत असतांना दिसतात व प्रवाशांच्‍या तक्रारीकडे लक्ष देऊन निराकरण करतांना दिसत नाही या तक्रारकर्त्‍याच्‍या युक्तिवादाला मंच सहमत आहे.

13.   Citizens’ Charter on Passenger Services of Indian Railways यामध्‍ये असे म्‍हटले आहे कीः-

      Indian Railway Administration is commitment to:-

  • Provide safe and dependable train services
  • Set notified standards for various services, wherever possible
  • Ensure adequate passenger amenities in trains and at railway stations
  • Set up a responsive and effective Grievance Redressal Machinery, at various levels and time-bound resolution of complaints and grievances as far as possible
  • Every effort shall be made to keep railway premises clean and hygienic and regular inspections are to be conducted to monitor cleanliness in order to identify weak areas and take remedial measures. Toilets under ‘Pay and Use’ scheme are made available at more and more stations.

Passenger Amenities

  • Basic facilities liking booking arrangements, waiting hall, benches, lighting, drinking water, platform, urinals, shady trees shall be available at all the regular stations.  On board a train, lighting and fans, cushioned berths, toilets, reservation charts and destination board will be available.  TTEs/Conductors, etc. shall also be available to attend to complaints/grievances. या सेवा पुरविणे जरूरी आहे.  परंतु विरूध्‍द पक्ष 1 हे तक्रारकर्त्‍यास सेंट्रल रेल्‍वेच्‍या सिटीझन चार्टर नुसार Basic amenities – Water & Light देण्‍यास असमर्थ ठरल्‍यामुळे विरूध्‍द पक्ष 1 यांची सेवेतील त्रुटी आहे.

13.   तक्रारकर्त्‍याने दाखल केलेला माननीय राज्‍य आयोग, नवी दिल्‍ली यांच्‍या III (2006) CPJ 335 – NORTHERN RAILWAYS versus PRAKASH CHANDRA  यामध्‍ये असे म्‍हटले आहे की, “Railways are duty-bound to provide access to compartment and reserved berths – Bad management in coach proved – Compensation awarded by Forum upheld. – Any fault, imperfection, shortcoming or inadequacy in the manner of performance of its obligation amounts to deficiency in service entitling the consumer for compensation as to the loss or injury suffered by him”.   

      सदरहू न्‍यायनिवाडा हा तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीशी सुसंगत असल्‍यामुळे ग्राह्य धरण्‍यात येतो.   विरूध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला Water & Light या Basic amenities न देणे म्‍हणजे विरूध्‍द पक्ष यांच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. 

      करिता खालील आदेश.             

-// अंतिम आदेश //-

1.     तक्रारकर्त्‍याची तक्रार मंजूर करण्‍यात येते.

2.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, हबीबगंज ते गोंदीया या रेल्‍वे प्रवासादरम्‍यान तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या असुविधा व त्रासाबद्दल नुकसानभरपाई म्‍हणून त्‍यांनी रू. 20,000/- द. सा. द. शे. 12% व्‍याज दरासह तक्रार दाखल केल्‍यापासून म्‍हणजेच दिनांक 26/03/2013 पासून संपूर्ण रक्‍कम मिळेपर्यंत तक्रारकर्त्‍यास द्यावे.    

3.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास रू.10,000/- द्यावे.

4.    विरूध्‍द पक्ष 1 यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत करावे.

5.    विरूध्‍द पक्ष 2 विरूध्‍द कोणताही आदेश नाही.  

 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
[HON'BLE MS. VARSHA O. PATIL]
MEMBER
 
[HON'BLE MR. WAMAN V. CHOUDHARI]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.