::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :-15.07.2016)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
1.अर्जदाराने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, अर्जदार क्रं 1 चे पती श्री. मनोज डोंगरे यांनी गैअर्जदार क्रं 1 व 2 यांच्याकडे विमा काढला होता व त्या विमाचे नियमीत पणे हप्तेची भरणा गैरअर्जदाराकडे करण्यात आली होती. त्यामुळे अर्जदार चे पती हे नात्याने गैरअर्जदाराचे ग्राहक होते. दिनांक 12/02/2013 रोजी अकस्मात मनोज डोंगरे यांचे निधन झाले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे त्या संदर्भात सुचना दिली होती व त्यानुसार अर्जदार क्रं 1 नी गैरअर्जदार क्रं 2 कडे प्रस्ताव विमा रक्कम घेण्याकरिता कागज पत्र व मुळ पॉलिसी सोबत अर्ज केले. दिनांक 22/02/2014 रोजी गैरअर्जदार कंपनी याने चुकीचे व खोटे पत्र पाठवुन अर्जदाराचे विमा क्लेम नाकारण्यात आला अशी सुचना दिली. अर्जदारांने दिनांक 08/11/2014 रोजी वकीला मार्फैत गैरअर्जदारांना कायदेशीर नोटीस पाठविले. पॉलिसीची रक्कम देण्यास विनंती केली. त्याची गैरअर्जदारांनी कोणतीही दखल घेतली नाही. व अर्जदारास उत्तर सुध्दा पाठविले नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराला सेवेत न्युनता दिली असुन अर्जदाराने सदर तक्रार मंचा समक्ष दाखल केली.
2.अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदाराला नोटीस प्राप्त होवून गैरअर्जदार मंचासमक्ष हजर झाले व आपले लेखीउत्तर नि. क्रं.10 प्रमाणे दाखल केले. गैरअर्जदाराने त्यांचे लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप खोटे असुन नाकबुल आहे. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केलेले आहे की, अर्जदाराचे पतीने पॉलिसीतील जोखीम सुरू होण्याच्या तारखेपासुन 1 वर्षाच्या आतच पॉलिसी धारकाने आत्महत्या केली असल्यामुळे पॉलिसीतील अट क्रं 6 नुसार मृत्यु दावा देय नाही. त्याप्रमाणे तो नाकरण्यात आला आहे. त्यात गैरअर्जदाराची सेवेत कुठलीही न्युनता नाही. त्यामुळे प्रस्तुत तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली.
3.अर्जदाराचा अर्ज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
१.अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
२.गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे नाही.
काय ?
३.अंतीम आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
4.अर्जदार क्रं 1 चे पतीने गैरअर्जदार क्रं 1 व 2 कडुन पॉलिसी क्रं 978361529 काढली होती व त्याचा सहा महिन्याचा (1 हप्ता) गैरअर्जदार कडे भरला होता. अर्जदार क्रं 1 ही पॉलिसी धारकाची मृत्यु नंतर वारसदार म्हणुन अर्जदार क्रं 2 मार्फेत अर्जदार क्रं 1 ने गैरअर्जदारांकडे विमा दावाचा प्रस्ताव सादर केला होता. ही बाब अर्जदार व गैरअर्जदारांना मान्य असुन अर्जदार हे गैरअर्जदारांचे ग्राहक आहे असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
5.पॉलिसी धारक श्री. मनोज शामराव डोंगरे यांनी दिनांक 18/08/2013 रोजी सरकारी सामान्य रूग्णालय, चंद्रपुर येथे उपचारासाठी भरती व उपचाराचे कागद पत्र दस्तावेज क्रं 3 वर दाखल असुन त्यात ‘ Self inflected injury on abdomen, K/C/O SCD with Anemia’ असे निदान केलेले आहे. गैरअर्जदाराने दाखल गुन्हाचा तपशील नमुना/घटना स्थल पंचनामा वरून असे निदान होत आहे की, मृतकाने स्वतःचे पोटावर कैचीने मारून दुखापत केली व उपचार दरम्यान मरण पावले.
पॉलिसीचे अट क्रं 6 मध्ये “ This policy shall be void if life assured commits suicide ( While sane or insane at the time) at any time on or after the date on which the risk under the policy has commenced but before the expiry of one year from the date of commencement of risk under this policy and the Corporation will not entertain any claim by virtue of this Policy…”
वरील नमुद असलेली पॉलिसी मधील अट नुसार पॉलिसी धारकाने 1 वर्षाच्या आतच आत्महत्या केली असल्याने पॉलिसीतील मृत्यु दावा देय नाही असे सिध्द झाले आहे. सबब गैरअर्जदाराने पॉलिसीतील मृत्यु दावा नाकारून कोणतीही अर्जदारास प्रती सेवेत न्युनता दर्शवली नाही असे सिध्द झाले आहे. सबब मुद्दा क्रं 2 चे उत्तर नाकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 बाबत ः-
मुद्दा क्रं. 1 व 2 च्या विवेचनावरुन खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
1)अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2)उभय पक्षाने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावे.
3)आदेशाची प्रत उभयपक्षास विनामुल्य पाठविण्यात यावी..
चंद्रपूर
दिनांक - 15/07/2016