(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक : 15.03.2011) अर्जदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे. 1. अर्जदार भानुदास गोमाजी गोहाने, रा.बावने ले-आऊट, वरोरा, जिल्हा – चंद्रपूर येथील रहिवासी आहे. अर्जदार यांनी, गै.अ.क्र.2 चे माध्यमातून गै.अ.क्र.1 कडून ‘एक्वागार्ड पाणी फील्टर’ खरेदी केला आहे व गै.अ.क्र.3 हे दोन्ही गै.अ.चे नियंञण कार्यालय आहे. करीता, तिनही गै.अ.चे अर्जदार हे ग्राहक आहेत. 2. अर्जदार यांनी, गै.अ.क्र.2 चे माध्यमातून गै.अ.क्र.1 यांचेकडून दि.4.8.10 ला रक्कम रुपये 10,000/- देवून पाणी फिल्टर खरेदी केला आहे. गै.अ.क्र.1 यांनी पावती क्र.184/004116 दिली आहे. यावर, गै.अ.क्र.2 ची सही आहे व एजन्ट कोड नंबर सी/022636 हा नमूद आहे. अर्जदार यांनी दि.4.8.10 रोजी पाणी फिल्टर खरेदी केल्यानंतर एक महिना बरोबर चालल्या नंतर दि.9.9.10 ला बंद पडला. फिल्टर बंद पडल्यासंबंधी माहिती गै.अ.क्र.2 यास फोनवर दि.10.9.10 ला सांगीतले. तेंव्हा गै.अ.क्र.2 यांनी फिल्टर पाहून गेलेत, परंतू फिल्टर दुरुस्तीबाबत काहीच केले नाही. अर्जदार यांनी दि.15.9.10 ला गै.अ.क्र.1 कडे मोबाईलवर तक्रार फिल्टर बंद पडल्यासंबंधी सांगीतली. टेक्नीशियन वेळेवर न आल्याने अर्जदार स्वतः दि.30.9.10 ला गै.अ.क्र.1 चे कार्यालयात जावून भेट घेतली व फिल्टर बंद पडल्याची तक्रार ही त्यांचेकडील तक्रार बुकामध्ये नोंद केली. गै.अ.क्र.1 व 2 यांनी काळजी पूर्वक वेळेवर दुरुस्त करुन अथवा नवीन बदलवून दिला नाही. करीता, अर्जदार यांनी दि.5.10.10 व 12.10.10 ला गै.अ. ला लेखी नोटीस दिले. परंतू, तीनही गै.अ.यांनी अर्जदाराचे तक्रारीवर काहीच लक्ष दिले नाही. करीता अर्जदारास, गै.अ.क्र.1 यांनी विक्री केलेला ‘एक्वागार्ड पाणी फिल्टर हा तीनही गै.अ.यांनी परत घेवून फिल्टरची किंमत रुपये 10,000/- दि.4.8.10 पासून 12 % व्याजासह गै.अ.यांनी वैयक्तीकरित्या अथवा वेगवेगळे अर्जदारास देण्याचे आदेश व्हावे. अर्जदारास शारिरीक व मानसीक ञासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रारीचा खर्च रु.3000/- तीनही गै.अ.यांनी संयुक्तपणे अथवा वेगवेगळे अर्जदारास देण्याचे आदेश व्हावे, अशी मागणी केली आहे. 3. अर्जदाराने, नि.5 नुसार 8 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गै.अ.क्र.1 ते 3 यांना नोटीस काढण्यात आले. गै.अ.क्र.1, 2 व 3 ने हजर होऊन नि.11 नुसार लेखी उत्तर व नि.12 नुसार 3 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. 4. गै.अ.क्र.1 ते 3 यांनी लेखी बयानात नमूद केले की, अर्जदार हे तिनही गै.अ.चा ग्राहक आहे, हे अमान्य केले. अर्जदार यांनी दि.4.8.10 रोजी पाणी फिल्टर खरेदी केल्यानंतर दि.9.9.10 ला बंद पडला हे महिती अभावी अमान्य. फिल्टर हा सलगपणे बंद स्थितीमध्ये आहे, फिल्टर बंद पडल्यासंबंधी माहिती गै.अ.क्र.2 यास दि.10.9.10 ला फोनवर दिली, तेंव्हा गै.अ. फिल्टर पाहून गेले, परंतू फिल्टर दुरुस्तीबाबत काहीच केले नाही, परंतू गै.अ.क्र.2 यांनी अर्जदारास मेक्यानीक पाठवितो, फिल्टर दुरुस्त करुन देवून किंवा नवीन बदलवून देवू असे सांगीतले, हे सपशेल खोटे म्हणून अमान्य. अर्जदार यांनी दि.15.10.10 ला गै.अ.क्र.1 कडे मोबाईलवर तक्रार फिल्टर बंद पडल्या विषयी सांगीतली, तेंव्हा गै.अ.क्र.1 यांनी अर्जदाराकडे टेक्नीशन पाठवितो असे सांगीतले हे विधान मान्य केले आहे. गै.अ.क्र.1 ने दि.17.9.10 व 18.9.10 रोजी कंपनीचे टेक्नीशन साजीद शेख यांनी अर्जदार यांचेकडे फिल्टर बघण्याकरीता गेले. परंतू अर्जदाराने, ‘ज्या दिवशी तक्रार दिली त्या दिवशी फिल्टर दुरुस्त करायला का नाही आले.’ म्हणून फिल्टर दाखविण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर, अर्जदाराने दि.30.9.10 रोजी दिलेल्या तक्रारीवरुन टेक्नीशन हे अर्जदाराकडे गेले असता, घराला कुलूप लावलेला होते. अर्जदाराचे दि.5.10.10 चे लेखी तक्रारीवरुन टेक्नीशन दि.6.10.10 रोजी अर्जदाराकडे फिल्टर दुरुस्त करायला गेले व तक्रारीचे निवारण केले, परंतू डेली अक्टीविटी रिपोर्टवर अर्जदारा सही देण्यास स्पष्ट नकार दिला. अर्जदाराची संपूर्ण मागणी अमान्य, त्याच बरोबर अर्जदाराची प्रार्थना अमान्य केली आहे. 5. गै.अ.ने लेखी बयानातील विशेष कथनात नमूद केले की, अर्जदार हे गै.अ.क्र.2 व 3 चे ग्राहक नाही. गै.अ.क्र.1 हे अर्जदाराचे फिल्टर आजही दुरुस्त करुन देण्यास तयार आहे. परंतू, गै.अ.क्र.1 चे टेक्नीशनला फिल्टर पाहण्याची परवानगी द्यावी. पाणी फिल्टर लावल्यापासून 1 वर्षाचे मुदतीपर्यंत कंपनी जर फिल्टरमध्ये काही बिघाड झाल्यास दुरुस्त करुन देण्याची वॉरंटी देते. अर्जदाराची मागणी खोटया सबबीवर आधारीत असल्याने अर्जदाराची मागणी सकृतदर्शनी नाही. त्यामुळे, अर्जदाराचा अर्ज खर्चासह खारीज करण्यात यावा व गै.अ.क्र.1 चे टेक्नीशला फिल्टर पाहण्याचा अर्जदाराला आदेश पारीत करावा, अशी मागणी केली आहे. 6. अर्जदाराने नि.18 नुसार शपथपञ दाखल केले. गै.अ.क्र.1, 2 व 3 यांनी नि.21 नुसार शपथपञ दाखल केले. अर्जदार व गै.अ.यांनी दाखल केलेले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात. @@ कारणे व निष्कर्ष @@ 7. अर्जदाराने, गै.अ.कडून दि.4.8.10 रोजी एक्वागार्ड रीवॉ वॉटर फिल्टर विकत घेतले, याबाबत वाद नाही. अर्जदाराने वॉटर फिल्टर घेतल्यानंतर गै.अ.यांनी विक्रीनंतरची सेवा पुरविली नाही, वॉटर फिल्टर बंद स्थितीत असल्यामुळे गैरअर्जदारांना वारंवार दुरुस्त करुन मागूनही दुरुस्त करुन दिले नाही, त्यामुळे प्रस्तूत तक्रार अर्जदाराने दाखल करुन वॉटर फिल्टरची किंमत रुपये 10,000/- दिनांक 4.8.10 पासून 12 टक्के व्याजाने गैरअर्जदारांनी द्यावे, अशी मागणी तक्रारीत केली आहे. गै.अ. यांनी अर्जदाराकडे वॉटर फिल्टरची पाहणी करु दिल्यास, तो दुरुस्त करुन देण्याची तयारी दर्शविली आहे, आणि दुरुस्ती होणे शक्य नसल्यास तो बदलून देण्याचे लेखी उत्तरात मान्य केले आहे. 8. गै.अ.यांनी लेखी उत्तरातील विशेष कथनात असे मान्य केले आहे की, अर्जदाराकडून दि.5.10.10 ला तक्रार प्राप्त झाल्यानंतर दुसरे दिवशी दि.6.10.10 ला टेक्नीशियन पाठविला व तक्रारीचे निवारण केले. परंतू, डेली अक्टीवीटी रिपोर्ट अर्जदाराने सही देण्यास नकार दिले. गै.अ.यांनी लेखी उत्तरासोबत नि.12 च्या यादीनुसार डेली अक्टीवीटी रिपोर्ट सादर केले त्यात 17.9.10, 18.9.10, 30.9.10, 24.9.10, व 6.10.10 असे दाखल केले. त्याचे अवलोकन केले असता, 6.10.10 च्या डेली अक्टीवीटी रिपोर्टवर भानुदास गोहणे याचे नांव कुठेही नमूद नाही. त्यामुळे, अर्जदाराने डेली अक्टीवीटी रिपोर्टवर सही करण्यास नकार दिला, त्यामुळे तो रकाना कोरा (Blank) राहिला, असे कुठेही दिसून येत नाही. गै.अ. याचा मेक्नीकल दि.6.10.10 ला अर्जदाराकडे दुरुस्तीकरीता गेला व अर्जदाराने सही करण्यास नकार दिला, असे खोटे कथन गै.अ. हे करीत असल्याचे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होतो. अर्जदाराने, 4.8.10 ला एक्वागार्ड रिबा (Reviva) वॉटर फिल्टर घेतल्यानंतर 9 सप्टेंबर 10 ला बंद पडला. त्याची रिपोर्ट फोनव्दारे 10.9.10 ला गै.अ.कडे केली व टेक्नीशियन पाठवितो असे सांगितले. परंतू, टेक्नीशियन दुरुस्ती करीता आला नाही. त्यामुळे लेखी तक्रार 5.10.10 ला दिली. गै.अ.यांनी 5.10.10 ला तक्रार प्राप्त झाल्याचे मान्य केले. तसेच, फोन वर तक्रार दिली हे सुध्दा मान्य केले आहे, तरी गै.अ. यांनी वॉटर दुरुस्त करुन दिले नाही. यावरुन, गै.अ.यांनी विक्रीनंतरची योग्य सेवा अर्जदारास दिली नाही. त्यामुळे, त्याला ञास सहन करावा लागला. अर्जदाराकडील वॉटर फिल्टर हा बंद असल्यामुळे त्याला शुध्द पाणी पिण्यापासून वंचीत राहावे लागले. तसेच वॉटर फिल्टरच्या उपभोग घेता आला नाही. गै.अ.यांनी योग्य प्रकारे सेवा दिली नाही व फिल्टर बंद राहिला त्यामुळे पुन्हा फिल्टरमध्ये दोष निर्माण झाल्यास, परत गै.अ.च्या टेक्नीशियनवर अवलंबून राहून योग्य सेवा मिळणार नाही, त्यामुळे वॉटर फिल्टरची किंमत 12 टक्के व्याजाने परत मिळण्याची मागणी अर्जदाराने केली आहे. अर्जदाराने ही केलेली मागणी संयुक्तीक आहे. गै.अ. यास वॉटर फिल्टर बंद असल्याबाबत तक्रार करुनही दुरुस्त करुन दिले नाही. त्यामुळे, बरेच दिवस वॉटर फिल्टर बंद राहीला, अर्जदाराने ज्या उद्देशाने वॉटर फिल्टर घेतला तो त्याचा उद्देश सफल झाला नाही आणि परत गै.अ. यांनी दुरुस्त करुन न दिल्यास दोष निर्माण झाल्यास पुन्हा त्याचे लाभापासून वंचीत होईल. वॉटर फिल्टरमध्ये टीडीएस चे प्रमाण हे कमी जास्त होत असते. तसेच, एअर पकडल्यास बंद होण्याची शक्यता असते, अशावेळी पुन्हा गै.अ.वरच अवलंबून राहावे लागेल. त्यामुळे, अर्जदाराने पैसे परत करण्याची केलेली मागणी संयुक्तीक आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. अर्जदार यांनी 4.8.10 ला विकत घेतलेल्या वॉटर फिल्टर मध्ये अवघ्या एक ते दिड महिन्याच्या कालावधीत दोष निर्माण झाला व तो वॉटर फिल्टर आजही बंद स्थितीत असल्याचे युक्तीवादाचे वेळी अर्जदाराचे प्रतिनिधीने सांगितले. म्हणजे वॉटर फिल्टर घेतल्यानंतर अत्यल्प कालावधीतच दोष निर्माण झाला असे अर्जदाराच्या पञ व्यवहारावरुन आणि गै.अ. यांच्या कथनावरुन सिध्द होतो. 9. गै.अ.ने लेखी उत्तरात असा मुद्दा घेतला आहे की, अर्जदार यांनी त्याचे कडील वॉटर फिल्टरची तपासणी करुन दिली नाही. जेंव्हा टेक्नीशियन गेला तेंव्हा घराला कुलूप लागलेला होता. गैरअर्जदार यांनी उपस्थित केलेला मुद्दा संयुक्तीक नाही. अर्जदाराने वॉटर फिल्टर तपासणी करुन दिली नाही. तेंव्हा त्याचेशी पञ व्यवहार करुन वॉटर फिल्टर तपासणी करु द्यावे, असा कुठलाही पुरावा सादर केलेला नाही. उलट, गैरअर्जदारांना अर्जदार यांनी 12.10.10 ला रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठविले. तो नोटीस प्राप्त झाल्याची पोच अर्जदारा अ-8 वर दाखल केली आहे, तरी गै.अ. यांनी कोणतीही दखल घेतली नाही, ही गै.अ.च्या सेवेतील न्युनता आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे.
10. गै.अ.क्र.1 व 3 चे एजंन्ट गै.अ.क्र.2 वॉटर फिल्टर विक्रीचे वेळी सेवा देण्याचे सांगतात. परंतू, प्रत्यक्षात तसे सेवा पुरवीत नाही. अर्जदाराने अ-2 वर युरोका फोर्टसचे पञ दाखल केले आहे, त्यात 4 Service Check-ups FREE-1 in warranty under service contract सदर पञाचे पाठीमागे सर्व्हीस मिळविण्याकरीता गै.अ.क्र.1 चा पत्ता दिला असून, टेलीफोन नंबर, तसेच सुमेध साव याचा भ्रमण ध्वनी क्रमांक दिलेला आहे. अर्जदाराने, टेलीफोन व्दारे सेवा मिळविण्याकरीता तक्रार करुनही गै.अ.यांनी दिलेल्या आमीषानुसार व सांगितलेल्या माहितीनुसार अर्जदारास सेवा दिली नाही, आणि अ-2 च्या पञाचे पालन केले नाही. ही गै.अ.ची अनुचीत व्यापार पध्दत आहे, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आले आहे. 11. एकंदरीत, गै.अ.यांनी अर्जदारास सेवा देण्यात न्युनता करुन एक्वागार्ड वाटर फिल्टरच्या लाभापासून वंचीत ठेवले, असे दाखल दस्ताऐवजावरुन व अर्जदार व गै.अ.यांच्या युक्तीवादावरुन सिध्द होतो, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले आहे. 12. वरील कारणे व निष्कर्षावरुन तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. (2) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या अर्जदाराकडील जुने एक्वॉगार्ड वॉटर फिल्टर परत घेऊन, फिल्टरची किंमत रुपये 10,000/- दिनांक 4.8.2010 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजाने आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत परत करावे. (4) गैरअर्जदार क्र.1 ते 3 यांनी, वैयक्तीकरित्या अथवा संयुक्तीकरित्या मानसीक, शारीरीक ञासापोटी रुपये 1000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत द्यावे. (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |