जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच,धुळे.
मा.अध्यक्षा- सौ.व्ही.व्ही.दाणी
मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन
मा.सदस्य - श्री.एस.एस.जोशी
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ११७/२०११
तक्रार दाखल दिनांक – १४/०६/२०११
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१३
वंदना नितीन चव्हाण ----- तक्रारदार.
उ.व.सज्ञान, धंदा – घरकाम
रा.ग.नं.९, घर नं.६०२,
जुने धुळे,ता.जि.धुळे.
विरुध्द
(१)म.वरीष्ठ विभागीय प्रबंधक साो ----- सामनेवाले.
भारतीय जीवन बिमा निगम,
नासिक,ता.जि.नासिक
(२)म.शाखाधिकारी सो.(९६ क)
भारती जीवन बिमा निगम,
रा.सिव्हिल हॉस्पीटलसमोर,साक्रीरोड,
धुळे.ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.व्ही.व्ही.दाणी )
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य: श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकिल श्री.डी.वाय.कुलकर्णी)
(सामनेवाले तर्फे – वकिल श्री.एस.एम.शिंपी)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही.दाणी)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून त्यांच्या मयत पतीची जीवन विमा पॉलिसीची रक्कम मिळावी या मागणीसाठी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे पती श्री.नितिन पद्माकर चव्हाण यांनी सामनेवाले यांच्याकडून दि.३१-०३-२००१ रोजी विमा पॉलिसी रक्कम रु.६२,५००/- ची घेतली होती. तक्रारदार यांच्या पतीचे दि.१२-०१-२००९ रोजी आकस्मीक निधन झाले. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे सदर विमा पॉलिसीची रक्कम मिळण्याकामी अर्ज केला. परंतु सामनेवाले यांनी, विमेधारकाने पॉलिसी घेतेवेळी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विमेधारकाने चुकीची नमूद केली म्हणून दि.१०-०८-२०१० रोजी पत्र देऊन पॉलिसीची विनंती नामंजूर केली आहे. तसेच सामनेवाले यांनी सदर विमा पॉलिसीकामी आवश्यक असलेला फॉर्म नं.५१५२ हा डॉ.नितीन अग्नीहोत्री यांनी भरुन द्यावा अशी मागणी केली होती. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, डॉ. अग्निहोत्री यांचे निधन झाले असल्यामुळे, तक्रारदार हे फॉर्म भरुन देऊ शकले नाहीत. डॉ.अग्निहोत्री यांच्याकडून मयत तक्रारदारांच्या पतीने कोणतीही ट्रीटमेंट घेतलेली नव्हती. तसेच पॉलिसी घेतांना कोणतीही माहिती लपवून ठेवलेली नाही. तक्रारदारांच्या पतीने कार्यालयीन रजेसाठी डॉ.अग्निहोत्री यांच्याकडून सर्टीफीकेट घेतले होते. त्यांच्या पतीस हाय ब्लड प्रेशरचा आजार नव्हता व त्या कारणाने त्यांचा मृत्यु झालेला नाही. सबब सामनेवाले यांनी क्लेमचे पैसे देण्याचे टाळले असून सेवा देण्यात कसूर केला आहे. त्यामुळे सदरची तक्रार या मंचात दाखल करावी लागली आहे.
तक्रारदारांची अशी विनंती आहे की, सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे व तक्रारदार यांनी या कायद्याप्रमाणे सेवा देण्यात कसूर केली आहे. तसेच मानसिक व शारीरिक छळ केला आहे. हे सामनेवालेंचे कृत्य अनुचित व्यापारी प्रथेत मोडणारे आहे हे जाहीर होऊन मिळावे. तसेच तक्रारदारांच्या पतीच्या विमा पॉलिसीची रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.२०,०००/- व अर्जाचा खर्च रु.५,०००/- सामनेवालेंकडून मिळावा.
(३) सामनेवाले क्र.१ व २ यांनी त्यांची लेखी कैफीयत देऊन सदर तक्रार अर्ज नाकारला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, तक्रारदारांचे पती यांनी जीवन विमा पॉलिसी घेतलेली आहे हे मान्य आहे. तसेच तक्रारदारांचे पती यांनी पॉलिसी काढतांना त्यांनी विमा प्रस्तावात देण्याची पुर्व माहिती ही लपवून ठेवली आहे. त्यामुळे पॉलिसी कराराचा भंग झालेला आहे. मयत विमाधारक हे दि.१२-११-२००९ रोजी डायबेटीय या आजाराने आजारी असून, त्यामुळे मयत झाले आहेत. ही बाब डॉ.संघवी यांच्या सर्टीफीकेटने स्पष्ट होत आहे. सदरची माहिती विमेधारकाने लपवून ठेवलेली आहे या कारणाने विमा प्रस्ताव हा नाकारलेला आहे. सबब सामनेवालेंनी कोणत्याही प्रकारची सदोष सेवा दिलेली नाही. त्यामुळे सदरचा तक्रार अर्ज खर्चासह रद्द होण्यास पात्र आहे असे नमूद केले आहे.
(४) तक्रारदारांचा अर्ज, शपथपत्र, छायांकीत कागदपत्र, पुराव्याचे शपथपत्र आणि सामनेवालेंचा खुलासा व शपथपत्र पाहता तसेच उभयपक्षांच्या विद्वान वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवालेंचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब) सामनेवाले यांच्या सेवेत त्रुटी स्पष्ट होते काय ? | : होय. |
(क)तक्रारदार हे विमा क्लेमची रक्कम व्याजासह मिळण्यास मानसिक, शारीरिक त्रासाची रक्कम व अर्जाच्या खर्चाची रक्कम मिळण्यास पात्र आहेत काय ? | : होय. |
(ड) आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे. |
विवेचन
(५) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांचे मयत पती यांनी सामनेवाले यांच्याकडून जीवन विमा पॉलिसी घेतली ही बाब सामनेवालेंनी मान्य केली आहे. त्या बाबत वाद नाही. दोन्ही पक्षांनी विमा प्रस्तावाची प्रत दाखल केलेली नाही. परंतु सदर पॉलिसी संदर्भातला विमा प्रस्ताव व विमा मंजूरी करणे बाबतचा पत्र व्यवहार दाखल केलेला आहे. याचा विचार करता तक्रारदार हे या सामनेवालेंचे ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(६) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांच्या पतीचे आकस्मीक निधन दि.१२-०१-२००९ रोजी झालेले आहे. त्याकामी सामनेवाले यांनी मयताचा विमा क्लेम हा दि.११-०५-२०१० रोजी नाकारलेला आहे. त्या बाबतचे पत्र नि.नं.२२ वर दाखल केलेले आहे. या पत्राचा विचार करता सामनेवाले यांनी मयत विमेधारक यांनी विमा प्रस्तावातील व्यक्तिगत निवेदनात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कलम ११ मध्ये अ, ब, क आणि ट ही असत्य दिलेली आहेत. विमेधारकाने स्वत:च्या प्रकृती विषयी अचुक माहिती विमा प्रस्तावात प्रस्ताव करतेवेळी दडवून ठेवलेली आहे. या कारणाने सदरचा विमा क्लेम हा नाकारलेला दिसत आहे.
या कामी सामनेवाले यांनी पॉलिसी प्रस्तावाची प्रत दाखल केली आहे. याचा विचार करता प्रश्न क्र.११ अ, ब, क आणि ट खालील प्रमाणे असल्याचे दिसून येते.
प्रश्न क्र.११ अ : एक आठवडयाहून अधिक दिवस उपचार आवश्यक असलेल्या एखाद्या दुखण्यासाठी गेल्या ५ वर्षात आपण वैद्यकीय सल्ला घेतला होता काय ? - नाही.
ब : निरिक्षण उपचार अगर शस्त्रक्रीयेसाठी आपण एखाद्या रुग्णालयात किंवा आरोग्यधामात वास्तव्य केले होते काय ? - नाही.
क : प्रकृतीच्या कारणावरुन गेल्या ५ वर्षात आपण कधी कामावरुन गैरहजर राहिला होता काय ? - नाही.
ट : आपले नेहमीचे प्रकृतीमान कसे असते ? - चांगली.
या प्रश्नांची उत्तरे विमेधारकाने प्रकृतीमान हे चांगले आहे, अशा अर्थाची उत्तरे दिलेली आहेत. या प्रश्न-उत्तरांचा विचार होता, विमेधारकाची प्रकृती ही उत्तम आहे असे दिसते.
(७) परंतु सामनेवाले यांनी डॉ.संजय संघवी यांचे दि.१२-०४-२००९ रोजीचे मेडीकलचे पत्र व दि.१८-०६-२००४ रोजीचे डॉ.नितिन अग्निहोत्री यांनी दिलेले सर्टीफीकेट दाखल केलेले आहे. या कागदपत्राप्रमाणे मयत विमेधारक हे वांती, हाय ब्लडप्रेश, चक्कर येणे या आजाराने आजारी होते असे दिसत आहे व या आजाराच्या कारणाने विमेधारकाने कार्यालयीन रजाही दि.१६-०४-२००४ ते दि.२५-०६-२००४ व दि.११-१२-२००६ ते दि.१६-१२-२००६ पावेतो घेतलेली दिसत आहे. या कागदपत्रांप्रमाणे विमेधारक हे आजारी असून त्यांनी कार्यालयीन रजा घेतलेली आहे ही बाब स्पष्ट होत आहे.
सामनेवाले यांनी डॉ.पाटील यांचे दि.११-११-२०१० रोजीचे पत्र दाखल केलेले आहे. या पत्राप्रमाणे मयत विमेधारक हे त्यांच्याकडे पायरेक्सिया ब्राॅनकॉचिस्ट यां आजाराकामी उपचार घेत होते. त्यामुळे मयतास त्यांनी सहा दिवस आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे, असे या पत्राप्रमाणे स्पष्ट होत आहे.
तसेच मयत हे दि.१२-११-२००९ रोजी अचानक तब्बेत बिघडल्याने डॉ.संजय संघवी यांचेकडे दाखल झाले होते व त्यांना त्यानंतर आस्था हॉस्पिटल धुळे येथे दाखल केले गेले. त्या बाबतचे डॉ.संघवी यांचे सर्टीफीकेट दाखल आहे. परंतु सदर सर्टीफीकेटवरुन मयत हे कोणत्या आजाराने आजारी होते व कोणत्या आजाराने मयत झाले हे स्पष्ट होत नाही.
परंतु या सर्व पत्रांप्रमाणे मयत हे कोणत्या आजाराने आजारी होते व त्या बाबतचे कोणते उपचार घेत होते याबाबतची स्पष्टता होत नाही. मयत विमेधारकाचा मृत्यु झाला परंतु विमा घेणेपुर्वी त्यांना कोणता आजार होता व त्या नंतर त्याच आजाराने त्यांचा मृत्यु झाला आहे हे पुराव्या अभावी स्पष्ट होत नाही. त्यामुळे सामनेवाले यांनी विमा क्लेम नाकारण्याकामी जो बचाव घेतला आहे तो योग्य व रास्त वाटत नाहीत. याचा विचार होता सामनेवालेंच्या सेवेत त्रृटी स्पष्ट होत आहे.
(८) सामनेवाले यांनी मयताच्या विमा क्लेमची पुर्तता करण्याकामी तक्रारदार यांच्याकडे दि.११-०५-२०१० रोजी पत्र पाठवून फॉर्म क्र.५१५२ हा डॉ.नितिन अग्निहोत्री यांचेकडून भरुन मिळणेकामी पत्र पाठविले आहे. तसेच मयताने डॉ.अग्निहोत्री यांच्याकडे हाय बिपीसाठी उपचार घेतल्याबाबतचे पेपर्स पाठवावे या कामी सदरचा पत्र व्यवहार केलेला आहे. या पत्राप्रमाणे सामनेवाले यांना क्लेमची पुर्तता करणेकामी फॉर्म क्र.५१५२ व उपचाराकामी कागदपत्रांची आवश्यकता आहे असे दिसते. परंतु डॉ.अग्निहोत्री हे मयत झाले असल्या कारणाने सदरचा फॉर्म तक्रारदार हे भरुन देऊ शकत नाहीत असे दिसते. याचा विचार होता, क्लेमची पुर्तता होणेकामी आवश्यक असलेला फॉर्म व उपचाराचे कागदपत्र याची पुर्तता झालेली दिसत नाही व त्यामुळे कोणताही पुरावा उपलब्ध होऊ शकला नाही.
त्याकामी सामनेवाले यांनी घेतलेला बचाव की, विमेधारकाने पुर्व माहिती नमूद केली नाही, व मयतास डायबेटीस असून त्या आजाराने ते मयत झाले आहेत ही बाब पुरावा नसल्याने सिध्द होत नाही. त्यामुळे सामनेवाले यांच्या या बचावात तथ्य नाही असे दिसते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – सदरच्या विमा क्लेमची रक्कम तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वेळेत मंजूर केलेली नाही. त्यामुळे तक्रारदारांना सदरचा तक्रार अर्ज या मंचात दाखल करावा लागलेला आहे आणि त्याकामी मानसिक त्रास व अर्जाचा खर्च सहन करावा लागला आहे. याचा विचार होता सदर विमा क्लेमची रक्कम व मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चाची रक्कम देण्यास सामनेवाले हे जबाबदार आहेत असे आमेच मत आहे.
याकामी सदर विमा पॉलिसीची प्रत दोन्ही पक्षांनी दाखल केलेली नाही. परंतु विमा पॉलिसी घेतांना भरावयाचा प्रपोजल फॉर्म प्रकरणात दाखल आहे. यामध्ये विमा रक्कम ही रु.६२,५००/- अशी नमूद आहे. या प्रपोजल फॉर्म प्रमाणे सदरची रक्कम देण्यास सामनेवाले हे जबाबदार आहेत, असे आमचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘क’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(१०) मुद्दा क्र. ‘‘ड’’ – वरील सर्व बाबीचा विचार होता व उभयपक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता तसेच युक्तिवाद ऐकला असता, खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करण्यात येत आहे.
(ब) सामनेवाले यांनी, या आदेशाच्या दिनांकापासून पुढील तीस दिवसांचे आत.
(१) तक्रारदारास त्यांच्या मयत पतीच्या विमा पॉलिसीची रक्कम