जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/239 प्रकरण दाखल तारीख - 03/11/2009 प्रकरण निकाल तारीख – 25/01/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य मा.श्रीमती एस.आर.देशमुख - सदस्या श्री.सुधाकर पि.गुडप्पा पालदेवार, वय वर्षे 50, व्यवसाय नौकरी, अर्जदार. रा. 8,सरपंचनगर,तरोडा खु, ता.नांदेड जि.नांदेड. विरुध्द. डिव्हीजनल मॅनेजर दि.युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं.लि, गैरअर्जदार. डिव्हीजनल ऑफीस, गुरुद्वारा रोड,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.व्ही.राजुरकर. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.एस.जी.मद्ये. निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी यांचे सेवेच्या त्रुटीबद्यल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात त्यांचे टाटा इंडिका क्र. एम.एच.-26-एल-2149 या खाजगी वाहनासाठी गैरअर्जदाराकडुन दि.12/11/2007 ते 11/11/2008 या कालावधीसाठी विमा संरक्षण घेतले होते दि.12/10/2008 रोजी अर्जदार स्वतः देगलुर- बिचकुंदा असे जात असतांना रस्त्याला मोठे मोठे खडडे असल्यामुळे वाहनाची पेट्रोलची टाकी चपटी झाली त्यामुळे अर्जदारांना नविन टाकी खरेदी करावी लागली. अपघाताची सुचना दि.14/10/2008 रोजी गैरअर्जदारांना दिली . त्याप्रमाणे त्यांनी सर्व्हेअर श्री.सेलमोनकर यांना पाठवुन वाहनाची तपासणी केली व बाफना मोटर्स यांचेकडे दुरुस्ती करण्या विषयी सांगीतले याप्रमाणे बाफना मोटर्स यांनी टाकी बदलुन दुरुस्तीचे बिल दि.27/10/2008 रोजी रु.3,014/- चे गैरअर्जदारांना दिले असता, त्यांनी क्लेमची रक्कम देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना दि. दि.12/01/2009, दि.12/02/2009 रोजी लेखी स्वरुपात विनंती केली. याचा काही उपयोग झाला नाही म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, वाहन दुरुस्ती खर्च रु.3,014/- त्यावर 18 टक्के व्याज व मानसिक त्रास व शारीरिक त्रास रु.5,000/- नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडुन मिळावेत. गैरअर्जदार हे वकीला मार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराच्या स्वतःच्या चुकीमुळे तसेच वस्तुस्थिती गैरअर्जदारा पुढे आलेले नसल्यामुळे, क्लेम संदर्भात गैरअर्जदारांना सहकार्य केले नाही. गैरअर्जदाराने टाटा इंडिका कार एम.एच.26- एल- 2149 या वाहनाचा विमा स्विकारला. दि.12/10/2008 रोजी अर्जदार हे स्वतः त्या वाहनात प्रवास केला नाही. किंवा त्यांनी म्हटलेल्या रस्त्यामध्ये मोठ मोठे खडडेही नाहीत. त्यामुळे वाहनाची डिझेलची टाकी चपटी व खराब झाली व टाकी नविन घ्यावी लागली हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. याच वाहनासाठी पुर्वी दि.12/02/2008 रोजी कारची डिझेलची टॉकी व Fuel Pump खराब झाल्यामुळे पॉलिसी अंतर्गत अर्जदाराने क्लेम मागीतला व गैरअर्जदाराने ते मंजुर सुध्दा केला. पुन्हा आता टाकीसाठी दुस-यांदा गैरअर्जदाराकडे क्लेम का करतात जे की, खोटे आहे व गैरअर्जदारास मान्य नाही. पैसे उकळण्याच्या उद्येशाने केलेली तक्रार फेटाळण्यास योग्य आहे. सर्व्हेअर सेलमोनकर यांनी सर्व्हे करुन गाडीचे नुकसान रु.1,600/- चे असल्याचे सांगतीले व घटनेचे नेमके कारण क्लेम फॉर्ममध्ये लिहीलेले नाही किंवा सर्व्हेअरला सांगीतले नाही. त्यामुळे सर्व्हेअरने क्लेम रदद् करण्या विषयी रिपोर्टमध्ये लिहीलेले आहे. अर्जदाराची तक्रार खोटी असल्या कारणांने त्यांनी मागीतलेली दुरुस्तीची रक्कम मानिसिक त्रास, व्याज दावा खर्च हे मागण्याचा त्यांना अधिकार नाही म्हणुन खर्चासह तक्रारअर्ज फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले तसेच गैरअर्जदार यांनी पुरावा म्हणुन आपले शपथपत्र दाखल केले. दोन्ही पक्षकार यांनी दाखल केलेले दस्तऐवज बारकाईने तपासुन व वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर. 1. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 अर्जदाराने पॉलिसी कव्हर नोट दाखल केलेले आहे याप्रमाणे पॉलिसी क्र.203600/31/07/01/00003844 वाहन क्र.एम.एच. 26 एल 2149 या टाटा इंडिका कारसाठी अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दि.14/10/2008 रोजी घटनेची सुचना दिली व फॉर्म दाखल केलेला असुन त्यावर पॉलिसी क्रमांक दुर्घटनेचा दि.12/10/2008 असे लिहीलेले असून रस्ते मे बडे खडडे से इतकेच लिहीलेले आहे बाकी काय नुकसान झाले या कुठल्याही गोष्टीचा उल्लेख केला नाही किंवा पोलिस स्टेशन यांना सुचना दिलेली नाही. यासोबत वाहनाची आर.सी.बुक ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसन्स इ. कागदपत्र दिलेले आहे. गैरअर्जदाराने क्लेम फॉर्म त्यांचे वाहनाची नुकसासंबंधी बोलावून दिलेले आहे तो दि.14/10/2008 या तारखेचा आहे यानंतर गैरअर्जदाराने सर्व्हेअर श्री.सेलमोनकर यांना वाहन तपासणीसाठी पाठविले. सर्व्हेअर दि.14/10/2008 रोजी गेला असून यात पेट्रोल टाकीची किंमत ते बसविण्यासाठी लागणारी मजुरी इ. भरल्यानंतर रु.2,983.62 पैसे होतात. यात 25 टक्के डिप्रेसेशन व पॉलिसी एक्सेसचे रु.500/- कमी करुन नुकसान रु.1,858/- चे ठरविले आहे त्यातुन रु.200/- सॉलवेज कमी केले असता, रुद्य1,658/- नक्की नुकसान धरलेले आहे पण यात सर्व्हेअरच्या मताप्रमाणे अर्जदाराना अपघाताचे कारण विचारले असता, त्यांनी टाकी कशासाठी बेंड झाली ते सांगीतले नाही या शिवाय क्लेम फॉर्म मध्ये देखील अपघाताचे कारण विचारलेल्या प्रश्नास उत्तर दिले नाही व ती जागा रिकामी सोडली आहे. या आधी देखील अर्जदार यांनी वाहनासाठी पेट्रोलची टाकी अपघातात चपटी झाल्यामुळे क्लेम केले व गैरअर्जदारांनी क्लेम दिलेला आहे. एका वर्षाच्या आंत पुन्हा टाकी खराब होते व अर्जदार परत तीच टाकी बदलुन मागतात हे सत्य वाटत नाही. त्यामुळे स्वर्हेअरच्या मते हा अपघात नसुन काही तरी मुद्याम अर्थपुर्ण मागणी आहे असा अभिप्राय दिलेला आहे. या सर्व्हे रिपोर्टच्या आधारेच गैरअर्जदाराने अर्जदाराचा क्लेम नाकारलेला आहे. अर्जदाराने अपघाताचे कारणा विषयी गैरअर्जदाराने दोन पत्र पाठवुन विचारणा केली तो पत्र व्यवहार या प्रकरणांत जोडलेला आहे. परंतु त्याला उत्तर देत असतांना अर्जदार यांनी दुसरे वेगवेगळे कारण सांगितले परंतु अपघाताचे कारण सांगीतले नाही. अर्जदाराच्या तक्रारीनुसार हा रस्ता खराब आहे व रस्त्यामध्ये मोठ मोठे खडडे असल्यामुळे पेट्रोलची टाकी खराब झाली . डिझेलची टाकी वरच्या बाजुस असते व खाली सस्पेशन व एकसेल, शॉक अबसॉर्बर स्टर्ट इ. पार्ट खाली असतात तेंव्हा कुठलाही पार्ट खराब न होता डायरेक्ट पेट्रोलची टाकी चपटी झाली हे अर्जदाराचे म्हणणे न पटण्या सारखे आहे व क्लेम फॉर्ममध्ये देखील ही बाब अर्जदाराने सोडुन दिलेले आहे. अर्जदाराने एक वर्षाच्या आतच डिझेलची टाकीसाठी दुस-यांदा क्लेम मागीतला याचा अर्थ अर्जदार हे सत्य लपवत आहेत हे स्पष्ट होते म्हणुन गैरअर्जदाराने घेतलेला निर्णय हे बरोबर आहे असे आम्ही ठरवितो. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदाराचा तक्रारअर्ज फेटाळण्यात येतो. 2. दावा खर्च ज्यांनी त्यांनी आपापला सोसावा. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री. बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.एस.आर.देशमुख) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्या सदस्य गो.प.निलमवार,लघुलेखक |