Maharashtra

Wardha

CC/121/2011

SAU.KAWADABAI PANDURANG POGALE+1 - Complainant(s)

Versus

DIVI.MGR. ORIANTAL INSURANCE COM.+1 - Opp.Party(s)

V.N.DESHMUKH

09 Apr 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/121/2011
 
1. SAU.KAWADABAI PANDURANG POGALE+1
R/O TAS TQ. SAMUDRAPUR
WARDHA
MAHARASHTRA
2. PANDURANG MAHADEORAO POGALE
TAS SAMUDRAPUR
WARDHA
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIVI.MGR. ORIANTAL INSURANCE COM.+1
NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
2. TALUKA KRUSHI OFFICER SAMUDRAPUR
SAMUDRAPUR
WARDHA
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. ANIL N. KAMBLE PRESIDENT
 HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi Member
 HONABLE MR. Shri Milind R. Kedar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

:: नि का ल  प ञ   ::

(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन. कांबळे ,मा.अध्‍यक्ष, प्रभारी)

(पारीत दिनांक : 09 एप्रिल, 2012)

       

1.     अर्जदारानी प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत प्रतिज्ञालेखावर दाखल केलेली आहे. अर्जदार/तक्रारदार हे मृतक शेतकरी धनेश पांडुरंग पोगले याचे नात्‍याने अनुक्रमे आई व वडील असून, त्‍यांनी कायदेशीर वारसदार या नात्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही मृतकाचे अपघाती निधना संबधाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्‍कम मिळावी यासाठी गैरअर्जदार विरुध्‍द दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍यांचे तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे-

2.    अर्जदार यांचे तक्रारी नुसार ते मृतक शेतकरी धनेश पांडुरंग पोगले याचे आई वडील असून, मृतकाचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत महाराष्‍ट्र शासनाचे मार्फतीने विमा काढण्‍यात आला होता. मृतक धनेश पांडुरंग पोगले यांचा दिनांक 12.08.2008 रोजी मौजा तास शिवार ते पारडा रोड या वाटेवर मोटरसायकल घसरुन अपघात झाला. सदर अपघातामध्‍ये किरण देवचंद सुरपाम याच्‍या मोटरसायकल मागे बसलेल्‍या धनेशचे डोक्‍याला जबर जखम झाल्‍याने, उपचारा दरम्‍यान मृतकाचा दिनांक-13.08.2008 रोजी मृत्‍यू झाला. त्‍यामुळे मृतकाचे मृत्‍यूनंतर त्‍याचे कायदेशीर वारसदार या नात्‍याने अर्जदार लाभार्थी या नात्‍याने विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत.

 

3.    अपघाता नंतर पोलीस स्‍टेशन समुद्रपूर, जिल्‍हा वर्धा येथे नोंद घेण्‍यात येऊन, घटनास्‍थळ पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल इत्‍यादी कार्यवाही करण्‍यात आली. अर्जदार क्रमांक-2 ने सदर घटनेची माहिती गैरअर्जदार क्रमांक-2 ला दिली असता, गैरअर्जदार क्रमांक 2 ने आवश्‍यक दस्‍तऐवजाची पुर्तता करुन घेतली व शासनातर्फे विमा सल्‍लागार म्‍हणून कार्यरत असलेल्‍या कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस मार्फत गैरअर्जदार क्रमांक-1 कडे विमाक्‍लेम दाखल केला.

 

4.    गैरअर्जदार क्रमांक-1 ने, अर्जदार क्रमांक-2 ला दिनांक-06.05.2009 रोजी पत्राद्वारे 6-क साक्षांकित प्रतीची मागणी केली असता, अर्जदार क्रमांक 2 ने त्‍वरीत पुर्तता केली. परंतु गैरअर्जदार क्रमांक-1 ने दिनांक-16.12.2009 रोजीचे पत्राद्वारे विहित दिनांका नंतर म्‍हणजेच दिनांक 15/11/2008 नंतर कागदपत्र प्राप्‍त झाल्‍यामुळे, अर्जदाराचा विमा दावा नामंजूर केल्‍याचे कळविले. अशाप्रकारे गैरअर्जदार क्रमांक 1 ने केवळ तांत्रिक शुल्‍लक कारणासाठी अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन सेवेत त्रृटी केली आहे.

5.    सर्वसाधारण शेतकरी अज्ञानी असल्‍यामुळे त्‍यांचे कडून विहित साक्षांकित दस्‍तऐवजाची  पुर्तता  विहित  कालावधीत  करण्‍याची जबाबदारी ही शासनाने गैरअर्जदार क्रमांक-2 वर टाकलेली असताना, गैरअर्जदार क्रमांक-2 ने सदर जबाबदारी योग्‍यरित्‍या पार पाडलेली नसल्‍याने गैरअर्जदार क्रमांक 2 सुध्‍दा जबाबदार आहे, जेंव्‍हा की,  अर्जदार क्रमांक-2 ने दिनांक 27.01.2009 रोजी 6 क ची साक्षांकित प्रत, गैरअर्जदार क्रमांक-2 चे कार्यालयास पुरवून पुर्तता केलेली होती. अशाप्रकारे गैरअर्जदार क्रमांक 2 ने सुध्‍दा आपल्‍या सेवेत त्रृटी केल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते.

 

6.    म्‍हणून अर्जदारांनी प्रस्‍तुत तक्रारीद्वारे गैरअर्जदारां विरुध्‍द पुढील प्रमाणे मागणी केली- गैरअर्जदारांनी, अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मिळणारी विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- आणि या रकमेवर विमा दावा नामंजूर केल्‍याचा                   दिनांक-16.12.2009 पासून वार्षिक 15 टक्‍के व्‍याज यासह रक्‍कम देण्‍याचे आदेशित व्‍हावे. तसेच अर्जदारांना झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्यल रुपये-5000/- व नोटीस खर्च रुपये-1000/- व तक्रारखर्च रुपये-5000/- गैरअर्जदारांकडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

                                                             

                                                             

7.    गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनी तर्फे प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर न्‍यायमंचा समक्ष दाखल करण्‍यात आले. गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने, अर्जदारांनी त्‍यांचे विरुध्‍द केलेली संपूर्ण विपरीत विधाने माहिती अभावी नाकबुल केलीत. अर्जदार हे मृतकाचे कायदेशीर वारसदार असल्‍याची बाब तसेच मृतकाचे नावे मौजा तास येथे असलेली शेती या बाबी माहिती अभावी नाकबुल केल्‍यात. अर्जदारांनी कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेस यांना सदर प्रकरणात प्रतिपक्ष केलेले नसल्‍यामुळे तक्रार खारीज व्‍हावी. गैरअर्जदार क्रमांक-2 ने, गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता केली असल्‍याची बाब खोटी असल्‍याचे नमुद केले. मृतक शेतकरी धनेश याचा दिनांक-12.08.2008 रोजी झालेला मृत्‍यू व अपघाता संबधाने तक्रारी नमुद केलेली संपूर्ण विधाने  तसेच पोलीस कारवाई व शवविच्‍छेदन अहवाल इत्‍यादी संपूर्ण विधाने माहिती अभावी नाकबुल केलीत.

 

8.    गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, त्‍यांनी दिनांक 06.05.2009 रोजीचे पत्रान्‍वये, गैरअर्जदार क्रमांक-2 कडे व कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे 6-क चे साक्षांकित प्रतीची मागणी केली होती व सदर कागदपत्रांची 15 दिवसाचे आत पुर्तता करण्‍या विषयी तसेच 15 दिवसाचे आत पुर्तता न झाल्‍यास विमा फाईल बंद करण्‍यात येईल असे सुचित केले होते परंतु विहित मुदतीत पुर्तता न झाल्‍यामुळे                दिनांक 16.12.2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक-2 ला पाठविलेल्‍या पत्रान्‍वये विमा क्‍लेम नामंजूर केल्‍याचे सुचित केले व त्‍यात शासनाचे परिपत्रका नुसार कट ऑफ डेट ही                 दिनांक-15.11.2008 ही होती. गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने सदर शासनाचे परिपत्रकाचा आधार घेऊन अर्जदारांचा क्‍लेम नामंजूर केला, यामध्‍ये त्‍यांनी कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. त्‍यामुळे अर्जदाराचे नोटीसला उत्‍तर देण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही.

  

9. गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की,   दिनांक-27.09.2009 रोजी अर्जदाराने साक्षांकित प्रती, गैरअर्जदार क्रमांक-1 कडे पाठविल्‍या. अर्जदारांची तक्रार अर्जातील मागणी त्‍यांना मान्‍य नाही. कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे विमा क्‍लेम संबधाने संपूर्ण पत्रव्‍यवहार होत राहतो व शासनाचे परिपत्रका नुसार कबाल इन्‍शुरन्‍स सर्व्‍हीसेसद्वारे शेतक-यांचा विमा काढण्‍यात येतो परंतु कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीस प्रस्‍तुत प्रकरणात प्रतिपक्ष केलेले नाही. अर्जदाराचा क्‍लेम मुदतबाहय आहे. सबब अर्जदाराची तक्रार खारीज व्‍हावी, असा उजर गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनी तर्फे घेण्‍यात आला.

 

10.    गैरअर्जदार क्रमांक-2 ने आपला लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर न्‍यायमंचा समक्ष दाखल केला. गैरअर्जदार क्रमांक-2 चे लेखी जबाबाद्वारे कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीचे मार्फतीने विमा दावे, आवश्‍यक त्‍या त्रृटींची पुर्तता संबधितांकडून करवून घेऊन, नंतर विमा दावा संबधित विमा कंपनीकडे पाठविल्‍या जातो.  कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीचे     दिनांक-06.05.2009 रोजीचे पत्रा नुसार  अर्जदारा कडून 6 क ची साक्षांकित प्रत मागविण्‍यात आली होती, त्‍यानुसार  जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी, वर्धा यांनी त्‍यांचे पत्र क्रमांक- अ.वि.यो./3220/09, दिनांक-02.06.2009 नुसार, गैरअर्जदार क्रमांक-2 ला अर्जदार यांचे कडून विमा प्रस्‍तावातील त्रृटीची पुर्तता करण्‍या विषयी कळविले होते. सदर पत्रा नुसार अर्जदार कडून त्रृटीची पुर्तता करवून घेण्‍यात आली व  गैरअर्जदार क्रमांक-2 कार्यालयाचे पत्र क्रमांक-तां-1/1996/09 दिनांक-06.08.2009 अनुसार अधिक्षक जिल्‍हा कृषी अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयात कागदपत्र सादर करण्‍यात आले होते व त्‍यानंतर वर्धा कार्यालयाने विमा कंपनीला आवश्‍यक असलेले कागदपत्र पाठविले त्‍यामुळे त्‍यांचे कार्यालयाने कागदपत्र पाठविताना कोणताही विलंब केलेला नाही. या सर्व झालेल्‍या विलंबास गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीच जबाबदार आहे. सबब गैरअर्जदार क्रमांक-2 विरुध्‍दची तक्रार खारीज व्‍हावी असा उजर गैरअर्जदार क्रमांक-2 तर्फे घेण्‍यात आला.

 

11.    अर्जदारांनी एकत्रितरित्‍या तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत पान क्रमांक 9 व 10 वर सादर केलेल्‍या यादी नुसार मृतकाचे मृत्‍यू प्रमाणपत्र, 7/12 उतारा, गाव नमुना 8-अ प्रमाणपत्र, गाव नमुना 6 क सांक्षाकीत प्रत, अर्जदाराने कबाल इन्‍शुरन्‍स कडे पाठविलेल्‍या पत्राची पोच पावती, पोलीस स्‍टेशन समुद्रपूर एफआयआर, विमाधारकाचा शवविच्‍छेदन अहवाल, घटनास्‍थळ पंचनामा, कबाल इन्‍शुरन्‍स यांनी अर्जदार यांना पाठविलेले पत्र, कबाल इन्‍शुरन्‍सने गैरअर्जदार क्रमांक 1 ला दिलेल्‍या अर्जाची प्रत, गैरअर्जदार क्रमांक 1 चे विमा दावा नामंजूरीचे पत्र, विमा योजने संबधीचे                  परिपत्रक, अर्जदाराने  पाठविलेल्‍या  नोटीसची प्रत व पोस्‍टाच्‍या पावत्‍या, पोच पावती अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रतीचा समावेश आहे. अर्जदार क्रमांक 1 व 2 ने आपले शपथपत्र स्‍वतत्ररित्‍या दाखल केले.

 

12.    गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर न्‍यायमंचा समक्ष दाखल केला. अन्‍य दस्‍तऐवज दाखल केले नाहीत.

13.    गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाब प्रतिज्ञालेखावर न्‍यायमंचा समक्ष दाखल केला व लेखी युक्‍तीवाद दाखल केला..

 

14.    अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले दस्‍तऐवज, शपथपत्रावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.

 

  :: कारणे व निष्‍कर्ष ::

 

15.  अर्जदारांनी प्रकरणात दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजा वरुन, उभय अर्जदार हे मृतक शेतकरी धनेश पांडूरंग पोगले याचे नात्‍याने अनुक्रमे आई व वडील असून ते मृतकाचे कायदेशीर वारसदार असून लाभार्थी ग्राहक  आहेत ही बाब स्‍पष्‍ट होते. तसेच ग्राम पंचायत तास, तहसिल समुद्रपूर, जिल्‍हा वर्धा यांचे मृत्‍यू प्रमाणपत्रा वरुन मृतकाचा मृत्‍यू               दिनांक 13.08.2008 रोजी झाल्‍याचे स्‍पष्‍ट होते. 7/12 उता-याचे प्रतीवरुन तसेच गाव नमुना आठ-अ आणि गाव नमुना 6-क मधील नोंदींवरुन मृतक धनेश पांडुरंग पोगले अ.पा.क. तर्फे आई कवडाबाई हिचे नावे मौजा तास, तहसिल समुद्रपूर, जिल्‍हा वर्धा येथे गट क्रमांक-158/2, आराजी 6.20 हेक्‍टर आर शेती असल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते. एफआयआर प्रती वरुन मौजा तास शिवार तास ते पारडा रोडवर दिनांक 12.08.2008 रोजी चालक किरण देवचंद सुरपाम याचे मोटरसायकल मागे मृतक धनेश उर्फ धनराज पोगले बसला होता व अपघातात धनेशचा मृत्‍यू झाल्‍याचे नमुद आहे. शवविच्‍छेदन अहवाला वरुन मृतकाचा मृत्‍यू डोक्‍याला मार लागल्‍यामुळे झालेला आहे.

 

16.  गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीचा मुख्‍य आक्षेप असा आहे की, त्‍यांनी             दिनांक 06.05.2009 रोजीचे पत्रान्‍वये, गैरअर्जदार क्रमांक-2 कडे व कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे  6-क चे साक्षांकित प्रतीची मागणी केली होती व सदर कागदपत्रांची 15 दिवसाचे आत पुर्तता करण्‍या विषयी तसेच 15 दिवसाचे आत पुर्तता न झाल्‍यास विमा फाईल बंद करण्‍यात येईल असे सुचित केले होते परंतु विहित मुदतीत पुर्तता न झाल्‍यामुळे               दिनांक 16.12.2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक-2 ला पाठविलेल्‍या पत्रान्‍वये विमा              क्‍लेम नामंजूर केल्‍याचे सुचित केले व त्‍यात शासनाचे परिपत्रका नुसार कट ऑफ डेट ही  दिनांक-15.11.2008 ही होती. गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने सदर शासनाचे परिपत्रकाचा आधार घेऊन अर्जदारांचा क्‍लेम नामंजूर केला.

 

17.    परंतु या संदर्भात गैरअर्जदार क्रमांक-2 ने नमुद केले की, कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीचे दिनांक-06.05.2009 रोजीचे पत्रा नुसार  अर्जदारा कडून 6 क ची साक्षांकित प्रत मागविण्‍यात आली होती. सदर पत्रा नुसार अर्जदार कडून त्रृटीची पुर्तता करवून घेण्‍यात आली व गैरअर्जदार क्रमांक-2 कार्यालयाचे पत्र क्रमांक-तां-1/1996/09      दिनांक-06.08.2009 अनुसार अधिक्षक जिल्‍हा कृषी अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयात कागदपत्र सादर करण्‍यात आले होते व त्‍यानंतर वर्धा कार्यालयाने विमा कंपनीला आवश्‍यक असलेले कागदपत्र पाठविले त्‍यामुळे त्‍यांचे कार्यालयाने कागदपत्र पाठविताना कोणताही विलंब केलेला नसल्‍याचे नमुद केले. यावरुन अर्जदाराकडून त्रृटीची पुर्तता करुन सुध्‍दा विमा क्‍लेमची रक्‍कम रुपये-1,00,000/- देण्‍यात आलेली नाही, असे दाखल दस्‍तऐवजा वरुन सिध्‍द होते.

   

18.  अर्जदार क्रमांक-2 ने आपले शपथपत्रात नमुद केले की,  कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून दिनांक 12.05.2009 चे पत्राची प्रत त्‍यांना प्राप्‍त झाली व सदर पत्रामध्‍ये सुचीत केल्‍या नुसार 6-क ची साक्षांकित प्रत सादर करण्‍यास सुचित करण्‍यात आले होते.  अर्जदार यांनी याआधीच 6-क ची साक्षांकित प्रत दिनांक-27.01.2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक-2 यांचेकडे सादर केली होती परंतु सदर दिनांक-12.05.2009 रोजीचे पत्रा नुसार पुन्‍हा 6-क ची साक्षांकित प्रत कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे सादर केली होती व कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीने सदर 6 क ची साक्षांकित प्रत दिनांक-03.06.2009 रोजी एफ.पी.ए.क्रमांक-1595 नुसार गैरअर्जदार क्रमांक-1 कडे पाठविण्‍यात आल्‍याचे कागदपत्र क्रमांक-11 वरुन दिसून येते. सदर दस्‍तऐवज क्रमांक 11 ची  प्रत अभिलेखावर दाखल आहे. यावरुन अर्जदारा कडून कागदपत्राची पुर्तता करण्‍यात आली या अर्जदाराचे म्‍हणण्‍यास पुष्‍टी मिळते.

 

19.  उपरोक्‍त विवेचना वरुन सिध्‍द होते की, अर्जदाराने,  गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीचे दिनांक 06.05.2009 रोजीचे पत्रानुसार पुर्तता केली होती व सदर 6-क ची साक्षांकित प्रत दिनांक-03.06.2009 रोजी कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीचे मार्फतीने गैरअर्जदार क्रमांक-1 कडे पाठविल्‍याची बाब सिध्‍द होते. असे असताना गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने  दिनांक 16.12.2009 रोजीचे पत्रान्‍वये बेकायदेशीरपणे अवाजवी कारणाने विमा क्‍लेम नामंजूर केल्‍याचा निष्‍कर्ष निघतो.

 

20.      यावरुन एक बाब आणखी स्‍वयंस्‍पष्‍ट आहे की, संबधित शेतक-याचे वारसदार आणि विमा कंपनी यांचा प्रत्‍यक्ष्‍य कोणताही संबध येत नाही कारण मृतक शेतक-याचे अपघाती मृत्‍यू नंतर संबधित मृतक शेतक-याचे कायदेशीर वारसदार हे शासनाचे प्रतिनिधी म्‍हणजे गैरअर्जदार क्रमांक-2 चे मार्फतीने, शासनाची सल्‍लागार कंपनी कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे विमा क्‍लेम प्रस्‍ताव आवश्‍यक दस्‍तऐवजांसह सादर करतात आणि त्‍यानंतर सदर सल्‍लागार कंपनी ही विमा प्रस्‍तावाची छाननी करुन सदर विमा प्रस्‍ताव संबधित विमा कंपनीकडे पाठविते आणि त्‍यानंतरही विमा प्रस्‍तावात त्रृटी असल्‍यास विमा कंपनीने दिलेल्‍या सुचने नुसार विमा प्रस्‍तावातील त्रृटीची पुर्तता शासनाचे प्रतिनिधी म्‍हणजे गैरअर्जदार क्रमांक-2 चे मार्फतीने संबधित शेतक-याचे वारसदार कडून करवून घेते. यामध्‍ये विमा प्रस्‍ताव हा दोन तीन यंत्रणे कडून हाताळला जातो. साहजिकच त्‍यात थोडा फार विलंब होण्‍याची शक्‍यता असतो.

 

21.   आमचे समोरील प्रस्‍तुत प्रकरणात सुध्‍दा अर्जदार कडून 6-क ची साक्षांकित प्रत सादर करण्‍या करीता अगदी क्षुल्‍लक म्‍हणजे 15 दिवसांचा विलंब लागल्‍याचे दिसून येते आणि तोही सुध्‍दा शासनाची सल्‍लागार कंपनी कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी मार्फतीने पाठविल्‍याचे सिध्‍द होते. यामध्‍ये गैरअर्जदार क्रमांक 2 ने सुध्‍दा आपली जबाबदारी योग्‍य पार पाडलेली आहे. परंतु केवळ तांत्रिक कारणास्‍तव अर्जदाराचा विमा क्‍लेम नामंजूर करुन गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब स्‍पष्‍ट होते.

 

22.   मृतकाचा मृत्‍यु झाल्‍यानंतर त्‍याच्‍या वारसदारांनी तात्‍काळ विमा क्‍लेम सादर करावेत हे अपेक्षीत नाही.  कारण की, कुंटुंबातील कर्ता पुरुषाचे अपघाती मृत्‍यु झाल्‍यानंतर त्‍यातून सावरण्‍यातच बराचसा वेळ निघून जातो.  अशास्थितीत, महाराष्‍ट्र शासनाची शेतकरी अपघात विमा योजना ही सर्व सामान्‍याना माहित असेलच असे म्‍हणता येत नाही, अशावेळी प्रशासनाने माहिती देवून त्‍याचा लाभ मिळवून देणे अपेक्षीत आहे.  प्रस्‍तुत प्रकरणात दस्‍ताऐवज सादर करण्‍यात विलंब झाला, हे म्‍हणणे गै.अ.क्र.1 चे म्‍हणणे संयुक्‍तीक नाही. या कारणावरुन विमा दावा नाकारणे न्‍यायोचित नाही याच आशयाचे मत  मा.महाराष्‍ट्र राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग, यांनी याच स्‍वरुपाच्‍या प्रकरणात दिलेले मत या प्रकरणातील बाबीला तंतोतंत लागु पडतो, त्‍यातील महत्‍वाचा भाग खालील प्रमाणे.     

 

Consumer Protection Act 1986,-- Section 2(1)(g) – Insurance – Accidental death—claim repudiated due to delayed filing of claim – complaint allowed by Forum – Hence Appeal – No reasonable opportunity given to widow undergoing mourning period cannot be expected to  rush to insurer to lodge claim – claim submitted on 25.8.2003 repudiated on 18.3.2005 --- Delay in rejection of claim

 

  highly objectionable – No Post mortem curried out, insistence for Post mortem report unjustified – Voluminous documentary evidence produced to show that insured met with accidental death – order of Forum upheld.

           

                                    National Insurance Co.Ltd.-Vs.- Asha Jamdar Prasad

                                                I(2009) CPJ. 147. mah.

 

23.   गैरअर्जदार क्रमांक-1 यांनी आपले लेखी उत्‍तरात असा आक्षेप घेतला आहे की, अर्जदाराने तक्रारीत योग्‍य त्‍या व्‍यक्‍तीनां प्रतिपक्ष केलेले नाही. शेतकरी अपघात विमा योजना ही कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी मार्फत कागदपत्राची पडताळणी करुन, विमा कंपनी कडे पाठविण्‍यात यावे, अशा स्‍वरुपाची आहे. त्‍यामुळे कबाल इन्‍शुरन्‍स ही आवश्‍यक पक्ष असूनही प्रतीपक्ष केलेले नाही, त्‍यामुळे तक्रार खारीज करण्‍यात यावी. गैरअर्जदार क्रमांक-1 यांनी "Non Joinder of Necessary Parties" चा उपस्थित केलेला मुद्या उपलब्‍ध रेकॉर्ड वरुन ग्राहय धरण्‍यास पात्र नाही.  उपलब्‍ध रेकॉर्ड वरुन, अर्जदाराने दाखल केलेले कागदपत्र, कबाल इन्‍शुरन्‍सला पाठविण्‍यात आले. कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून कागदपत्राची पुर्तता करण्‍या बाबत दिनांक-12.05.2009 ला पत्र देण्‍यात आले, त्‍यानुसार अर्जदाराने कागदपत्राची पुर्तता करुन, कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला कागदपत्र सादर करण्‍यात आले. कबाल इन्‍शुरन्‍सने दिनांक-03.06.2009 रोजी, गैरअर्जदार क्रमांक-1 ला एकूण-08 लोकांचा विमा क्‍लेम देण्‍या बाबत लेखी पत्र देण्‍यात आले, त्‍यात अ.क्रं 6 वर मृतक धनेश पांडुरंग पोगले एफ.पी.ए.क्रमांक-1595 नमुद करण्‍यात आले. सदर प्रत गैरअर्जदार   क्रमांक-1 ला दिनांक-03.06.2009 ला प्राप्‍त केल्‍याचा शिक्‍का, अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवज क्रमांक 11 वर स्‍पष्‍टपणे नमुद आहे. अशास्थितीत कबाल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून गैरअर्जदार क्रमांक 1 विमा कंपनीला कागदपत्राची पुर्तता करुन विमा क्‍लेम देण्‍या बाबत कळविण्‍यात आले असल्‍याचे, अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजा वरुन सिध्‍द होत असल्‍याने, कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीला प्रतिपक्ष न केल्‍याचे कारणा वरुन तक्रार खारीज होण्‍यास पात्र नाही या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे.  

 

24.   अर्जदाराने विमा प्रस्‍तावातील त्रृटीची पुर्तता करुनही गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीने, शासनाची सल्‍लागार आणि मध्‍यस्‍थ कंपनी कबाल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे कोणतीही शहानिशा न करता मोघमपणे दिनांक 16.12.2009 रोजीचे पत्रान्‍वये नाकारलेला आहे. त्‍यामुळे अर्जदार हे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- विमा क्‍लेम नाकारल्‍याचा दिनांक-16.12.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.9% व्‍याजासह रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत.

 

 

 25.   या सर्व प्रकरणात अर्जदार यांना निश्‍चीतच मानसिक, शारीरीक ञास सहन करावा लागला, त्‍यामुळे शारिरीक मानसिक त्रासा बद्यल नुकसान भरपाई गैरअर्जदार क्रमांक-1 विमा कंपनीकडून मिळण्‍यास अर्जदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.

 

26.   एकंदरीत, उपलब्‍ध रेकॉर्डचे अवलोकन केला असता आणि दोन्‍ही पक्षाचे युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर गै.अ.क्र.1 चे विरुध्‍द तक्रार मंजूर करण्‍यास पाञ आहे आणि गै.अ.क्र. 2 चे विरुध्‍द तक्रार खारीज होण्‍यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्‍यायमंच आले असल्‍याने, तक्रार अंशतः मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

                 

::  अंतिम आदेश ::

(1)   अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर. 

(2)   गैरअर्जदार क्र.1 ने मृतक धनेश पांडुरंग पोगले याचा अपघाती मृत्‍यु झाल्‍यामुळे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रुपये 1,00,000/- दि.16.12.2009 पासून द.सा.द.शे.9% व्‍याज दराने आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत मंचात जमा करावे.

(3)   गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास मानसिक, शारीरीक ञासापोटी रुपये 2000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रुपये 1000/- आदेशाच्‍या दिनांकापासून 30 दिवसाचे आंत मंचात जमा करावे.  

(4)   गैरअर्जदार क्र. 1 ने, विमा दाव्‍याची रक्‍कम आदेशानुसार जमा केल्‍यानंतर व्‍याजासह येणारी रक्‍कम मृतकाची आई सौ.कवडाबाई व वडील श्री पांडुरंग यांना समप्रमाणात विभागणी करुन देण्‍यात यावी.

(5)   गैरअर्जदार 2 चे विरुध्‍द तक्रार खारीज.

(6)   गैरअर्जदार क्र.1 ने सदर आदेशाचे पालन विहीत मुदतीत न केल्‍यास विमा रक्‍कम रुपये-1,00,000/- दिनांक-16.12.2009 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे. 12 % दराने व्‍याज देय राहिल.

(7)   गैरअर्जदार यांनी आप आपला खर्च स्‍वतः सहन करावे.

(8)   अर्जदार व गैरअर्जदारांना आदेशाची प्रत देण्‍यात यावी. 

वर्धा.

दि.09 एप्रिल, 2012

 

 
 
[HONABLE MR. ANIL N. KAMBLE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Sau.Sushama W/O Pradeep Joshi]
Member
 
[HONABLE MR. Shri Milind R. Kedar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.