जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्षा-सौ.वी.वी.दाणी. मा.सदस्या-सौ.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – ४५/२०११
तक्रार दाखल दिनांक – ०४/०३/२०११
तक्रार निकाली दिनांक – १३/०६/२०१३
श्रीमती.सुनिता दुर्वास पाटील. ----- तक्रारदार.
उ.व.३९,धंदा-घरकाम
रा.रेल्वे पोलीस लाईन,अंमळनेर,
ता.जि.जळगांव.
विरुध्द
(१)डीव्हीजन मॅनेजर, ----- सामनेवाले.
भारतीय जीव बिमा निगम,
जीवन प्रकाश गडकरी चौक,
गोल्फ क्लब ग्राऊंन्ड,जुना आग्रा रोड,
पो.बॉक्स नं.११०,नाशिक-४२० ००२.
(२)शाखाधिकारी,
भारतीय जीव बिमा निगम,
सी.बी.ओ-II इशकृपा,जिल्हा परिषद,
धुळे च्या मागे, स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या
बाजूला,धुळे.ता.जि.धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्षाः सौ.वी.वी.दाणी.)
(मा.सदस्याः सौ.एस.एस.जैन.)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.आर.व्ही.निकम.)
(सामनेवाले तर्फे – वकील श्री.व्ही.एस.भट.)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्षा – सौ.वी.वी.दाणी.)
(१) तक्रारदारांनी, सामनेवाले यांच्याकडून विम्याची रक्कम मिळणेकामी
सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांचे पती नामे श्री.दुर्वास उत्तमराव पाटील यांनी सामनेवाले यांचेकडून रक्कम रु.२,५०,०००/- ची विमा पॉलिसी काढलेली होती. तक्रारदार यांचे पती दि.३०-०४-२०१० रोजी मयत झाले आहेत. तक्रारदार या विमा पॉलिसीच्या नॉमिनी होत्या, त्याप्रमाणे त्यांनी पॉलिसीची रक्कम मिळणेकामी सामनेवाले यांचेकडे विनंती केली. परंतु सामनेवाले नं.१ यांनी पञ देऊन विमा प्रस्ताव नामंजूर केला. सदर क्लेम नामंजूर केल्याबाबतची माहिती तक्रारदार यांना मंजूर नाही. तक्रारदारांचे पती दि.२३-०४-२०१० रोजी अचानक पोटात वेदना झाल्यामुळे औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले व तेथे उपचार घेत असतांना त्यांचा दि.३०-०४-२०१० रोजी मृत्यु झाला. पॉलिसी घेतेवेळी तक्रारदारांच्या पतीस कोणत्याही स्वरुपाचा आजार नव्हता. कोणतेही कायदेशीर कारण नसतांना सामनेवाले यांनी विमा प्रस्ताव नामंजूर केलेला आहे. सामनेवालेंनी सेवा देण्यात कसूर केला आहे. त्यामुळे सदर तक्रार अर्ज दाखल करण्यास कारण घडले आहे.
(३) तक्रारदारांची विनंती अशी आहे की, सामनेवाले यांचेकडून पॉलिसीची रक्कम रु.२,५०,०००/- अर्ज दाखल तारखेपासून द.सा.द.शे. १६ टक्के व्याजासह मिळावेत, मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.५०,०००/- तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.३,०००/- सामनेवाले यांचेकडून द्यावेत.
(४) सामनेवाले नं.१ व २ यांनी त्यांचा लेखी खुलासा एकञीत रित्या दाखल केला आहे. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, विमेधारकाने दि.३१-१०-२००९ रोजी पर्सनल फॉर्म भरुन देतांना खोटी माहिती पुरविली आहे. मयत हे दि.२६-०४-२००९ ते ०९-०८-२००९ या कालावधीत सिक लिव्ह घेतली होती व या दरम्यान ते सदभावना परिवार जळगांव या दवाखान्यात आंतररुग्ण म्हणून भरती होते. तसेच पर्सनल फॉर्म मध्ये 11 A, B, C, D, H, I या प्रश्नांची उत्तरे “नाही” असे देऊन त्यांनी अचूक माहिती लपवून ठेवली आहे. तक्रारदारांच्या पतीस कोणताही आजार नव्हता हे मान्य नाही. विमेधारकास विमा काढण्याच्या पुर्वीपासून लिव्हर सीरॉयसीस अॅसीटाईज अॅण्ड एनीईमीया हा हाजार होता व त्याकामी ते उपचार घेत होते ही बाब त्यांनी लपवून ठेवली आहे. तक्रारदार यांनी केवळ रक्कम उकळण्याच्या हेतूने सदरची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे सदर तक्रार दंडासह रद्द करावी अशी मागणी सामनेवाले यांनी केली आहे.
(५) तक्रारदार व त्यांचे वकील तारखांना गैरहजर आहेत. तसेच तक्रारदारांच्या विद्वान वकीलांनी युक्तिवादही केलेला नाही. त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज नि.नं.१, शपथपञ नि.नं.५, कागदपञ नि.नं.४ वर एकूण १ ते ६, तसेच सामनेवाले यांचा एकञीत खुलासा नि.नं. १५, व शपथपञ नि.नं. १६, कागदपञे नि.नं. १७, तक्रारदारांचा लेखी युक्तिवाद नि.नं. १८ पाहता तसेच सामनेवालेंच्या विद्वान वकीलांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ)तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय. |
(ब)सामनेवाले यांच्या सेवेत ञृटी स्पष्ट होते काय ? | : नाही. |
(क)आदेश काय ? | : अंतिम आदेशा प्रमाणे |
विवेचन
(६) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांच्या पतीने सामनेवाले यांच्याकडून दि.३१-१०-२००९ रोजी रक्कम रु.२,५०,०००/- ची विमा पॉलिसी घेतलेली आहे. त्याची छायांकीत प्रत प्रकरणात दाखल केली आहे. या बाबत उभयपक्षात कोणताही वाद नाही. तक्रारदार या मयत विमेधारकाच्या वारस आहेत, याचा विचार होता तक्रारदार या सामनेवाले यांच्या ग्राहक आहेत. म्हणून मुद्दा क्र. “अ” चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(७) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांच्या अर्जातील कलम ३ प्रमाणे, तक्रारदारांच्या पतीचे दि.२३-०४-२०१० रोजी अचानक पोटात वेदना झाल्यामुळे उपचार घेत असतांना दि.३०-०४-२०१० रोजी निधन झाले आहे. त्या बाबतचा मयताचा मृत्युचा दाखला नि.नं.४/५ वर दाखल आहे.
तक्रारदार हे सामनेवाले यांचे वारस असल्याने त्यांनी सामनेवाले यांचेकडे विमा क्लेमची मागणी केली असता सामनेवाले यांनी तो नाकारला आहे. त्या बाबतचे दि.०३-१२-२०१० रोजीचे पञ नि.नं.४/११ वर दखल केले आहे. सदर पञाचा विचार करता सामनेवाले यांनी मयत विमेधारकाने विमा घेते वेळी स्वत:च्या प्रकृती विषयी अचूक माहिती विमा प्रस्तावात नमूद केलेली नाही. विमा प्रस्तावातील व्यक्तिगत निवेदनात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कलम ११ मध्ये सहेतूक चुकीची विधाने केलेली आहेत. त्यामुळे क्लेम नाकारला आहे. असे नमूद केले आहे.
या बाबत विमेधारकाचा पर्सनल फॉर्म नि.नं.४/३ वर दाखल केलेला आहे. यातील कलम ११ A.B,C,D,H, I खालील प्रमाणे आहे.
11 | वैयक्तिक इतिवृत्त | होय किंवा नाही उत्तर द्या. | उत्तर होय असल्यास संपूर्ण तपशील द्या. |
(A) | एक आठवडयाहून अधिक दिवस उपचार आवश्यक असलेल्या एखाद्या दुखण्यासाठी गेल्या पाच वर्षात आपण वैद्यकिय सल्ला घेतला होता का ? | No | --- |
(B) | निरिक्षण,उपचार अगर शस्ञक्रियेसाठी आपण एखाद्या रुग्णालयात किंवा आरोग्यधामात वास्तव केले होते का ? | No | --- |
(C) | प्रकृतिच्या कारणावरुन गेल्या पाच वर्षात आपण कधी कामावरुन गैरहजर राहिला होता का ? | No | --- |
(D) | यकृत,पोट,हृदय,फुफ्फुसे,मुञपिंड,मेंदू किंवा स्थायुसंस्था संबंधित रोगांपासून आपण कधी आजारी होता किंवा सध्या आहात का ? | No | --- |
(H) | आपण उपयोग करत आहात वा आपण कधी उपयोग केला ? | No | --- |
(i) | मद्यपान | No | --- |
(ii) | नशाकारक पदार्थ | No | --- |
(iii) | अन्य कोणती मादक द्रव्ये. | No | --- |
(iv) | कोणत्याही रुपातील तंबाखू. | No | --- |
(I) | आपलेनेहमीचे प्रकृतिमान कसे असते ? | good | --- |
या प्रश्नांचे व त्यांच्या उत्तरांचे अवलोकन केले असता, विमेधारकाने या प्रश्नांची उत्तरे “नाही” अशी दिलेली दिसत आहेत. यावरुन असे लक्षात येते की, विमेधारक हे विमा घेण्यापुर्वी कोणत्याही आजाराने आजारी नव्हते. त्यांनी कधीही उपचार घेतलेले नाही. उपचाराकामी ते कधीही आंतररुग्ण म्हणून दाखल झालेले नाहीत असे दिसत आहे.
परंतु विमेधारकाचा मृत्यु हा आजारी होऊन उपचार घेतांना झाला आहे असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. परंतु या बाबत तक्रारदार यांनी मयतास कोणता आजार होता किंवा कोणत्या आजाराने त्यांचा मृत्यु झाला या बाबत कोणताही खुलासा केलेला नाही. त्या बाबत कोणताही पुरावा दाखल नाही.
सामनेवाले यांनी या बाबत असा बचाव घेतला आहे की, मयत विमेधारकास लिव्हर सीरॉयसीस अॅसीटाईज अॅण्ड एनीईमीया हा आजार होता, व या आजाराची माहिती मयताने दडवून ठेवली आहे. या पुष्ठयर्थ सामनेवाले यांनी पुरावा दाखल केलेला आहे. तसेच नि.नं. १७/३ वर, सदभावना परिवार जळगांव येथे उपचार सुरु असतांना तेथे विमेधारकास भरती केल्याबाबतचे दि.०९-११-२०१० चे पञ दाखल केले आहे. यामध्ये मयत श्री. दुर्वास उत्तम पाटील हे दि.०१-०५-२००९ ते २७-०७-२००९ या कालावधीमध्ये हॉस्पिटलमध्ये आंतररुग्ण म्हणून दाखल होते. या कालावधीत ते लिव्हर सीरॉयसीस अॅसीटाईज अॅण्ड एनीईमीया या आजारावर उपचार घेत होते, असा मजकूर नमूद आहे. नि.नं.१७/४ वर, सदभावना परिवार जळगांव येथे तक्रारदारांचे पती उपचार घेत असतांना त्यांच्या औषधोपचाराची कागदपञे दाखल केली आहेत. यात मयत हे लिव्हर सीरॉयसीस अॅसीटाईज अॅण्ड एनीईमीया या आजाराने आजारी असून त्या कामी डॉक्टरांनी त्यांना औषधोपचार दिलेला आहे. या आजाराबाबतची माहिती, वैद्यकीय माहिती व कागदपञे दाखल केलेली आहे. नि.नं.१७/५ वर डॉ.सौ रजनी एस. नारखेडे यांनी मयत विमेधारक यांना प्रत्यक्ष तपासणी केल्या बाबतचे प्रमाणपञ दाखल केले आहे. यामध्ये मयत यांना स्वत: तपासणी केल्याबाबतचा मजकूर नमूद केला आहे. या तिन्ही कागदपञांचा विचार होता मयत हे लिव्हर सीरॉयसीस अॅसीटाईज अॅण्ड एनीईमीया या आजाराने आजारी होते हे स्पष्ट होत आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्याकडे भरावयाचा फॉर्म नि.नं.१७/६ “विम्याच्या रकमेवर कायद्याचा हक्क असणा-या व्यक्तीने भरावयाचे निवेदन” या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माहितीप्रमाणे मृत्युचे कारण हे छातीत दुखणे असे लिहिलेले दिसत आहे. तसेच तक्रार अर्जातील कलम ३ मध्ये तक्रारदारांचे पती यांचे दि.२३-०४-२०१० रोजी अचानक पोटात वेदना झाल्यामुळे ते औरंगाबाद येथील कमलनयन हॉस्पीटल यांचेकडे अॅडमिट झाले व तेथे उपचार घेत असतांना ते दि.३०-०४-२०१० रोजी मयत झाले असे नमूद आहे. या दोन्ही कारणांचा विचार होता तक्रारदारांच्या पतीच्या मृत्युच्या कारणांमध्ये एकवाक्यता दिसून येत नाही. तसेच तक्रारदार यांनी विमेधारक हे कोणत्या आजाराने आजारी होते व ते कोणत्या कारणाने मयत झाले या बाबतचा कोणताही खुलासा व त्या बाबतचे वैद्यकिय कागदपञ अथवा इतर कोणताही पुरावा या अर्जात दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार या स्वच्छ हाताने या मंचात आलेल्या दिसत नाहीत. तक्रारदार यांनी निश्चितच त्यांच्या पतीच्या मृत्युच्या कारणाबाबत खरी माहिती लपविली आहे असे स्पष्ट होत आहे. मयतास पुर्वीपासून लिव्हर सीरॉयसीस अॅसीटाईज अॅण्ड एनीईमीया हा हाजार होता व त्या आजारामुळे त्यांने निधन झाले आहे ही गोष्ट सामनेवाले यांनी पुराव्यानिशी सिध्द केलेली आहे. यावरुन सामनेवालेंच्या सेवेत कमतरता स्पष्ट होत नाही. याचा विचार होता, तक्रार अर्जामध्ये तथ्य नसून त्यांची मागणी योग्य व रास्त नाही असे आमचे मत आहे.
सदर प्रकरणी तक्रारदार यांनी खालील न्यायनिवाडे दाखल केले आहेत.
· Life Insurance Corporation of India Vs Smt. Shahida Begum.
2011 (3) CPR 474 (NC)
· SBI Life Insurance Co. Ltd. Vs Smt. Kambala Sandhya.
2012 (3) CPR 302 (NC)
· Sahara India Life Insurance Co. Ltd. Vs Smt. Hansaben Deepak Kumar.
2012 (4) CPR 231 (NC)
· Tata AIG Life Insurance Co. Ltd. Vs Sita Devi.
2012 (3) CPR 65 (Rajasthan State Commission, Jaipur )
धुळे.