Maharashtra

Pune

CC/10/138

Sunil R Pawar - Complainant(s)

Versus

Divan Housing.Finance ltd - Opp.Party(s)

Kiran Ghone

20 Apr 2012

ORDER

 
Complaint Case No. CC/10/138
 
1. Sunil R Pawar
Kesvnagar Near Oskar School,Pune 36
Pune
Maha
...........Complainant(s)
Versus
1. Divan Housing.Finance ltd
Sancheti Hospital Pune 05
Pune
Maha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  Smt. Anjali Deshmukh PRESIDENT
  Shri. S. K. Kapase MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

द्वारा-  श्री. एस. के. कापसे , मा. सदस्‍य यांचेनुसार 
                                     निकालपत्र
                      दिनांक 20 एप्रिल 2012
 
 1.                    तक्रारदारांनी दिनांक 6/2/2010 रोजी जाबदेणार यांचे प्रतिनिधी श्री. सतीश चव्‍हाण यांच्‍याकडे गृहकर्जासाठी प्रोसेसिंग फी म्‍हणून रुपये 5515/- चा स्‍टेट बँक ऑफ इंडिया यांचा चेक क्र.462637 दिलेला होता. गृहकर्ज मंजुर झाले तरच सदर रक्‍कम चेकद्वारे घ्‍यावयाची होती. परंतु गृहकर्ज मंजुर न करताच तक्रारदारांच्‍या अकाऊंट मधून पैसे काढून घेण्‍यात आले. मागणी करुनही तक्रारदारांना सदरहू रक्‍कम परत मिळाली नाही. म्‍हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्‍याकडून रक्‍कम रुपये 5515/-, मानसिक त्रासापोटी रुपये 10,000/-, खर्चापोटी रुपये 500/- एकूण रुपये 16015/- मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2.                जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्‍या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी पुर्वी घेतलेल्‍या कर्जाची परतफेड व्‍यवस्थित केली नाही अशी माहिती जाबदेणार यांच्‍या समोर आली त्‍यामुळे तक्रारदारांना कर्ज मंजुर करण्‍यात आले नव्‍हते. तक्रारदारांनी कर्ज मंजुरीसाठी जो अर्ज केला होता त्‍यावर प्रोसेसिंग फी परत मिळणार नाही याची माहिती स्‍पष्‍ट शब्‍दात दिलेली होती. तक्रारदारांना याबाबत माहिती होती. तरीही तक्रारदारांनी सदरहू तक्रार दाखल केली आहे ती खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी कागदपत्रे दाखल केली.
3.                दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांनी तक्रारदारांनी केलेल्‍या लोन अप्‍लीकेशन फॉर्म दिनांक 8/2/2010 ची मंचाने पाहणी केली. त्‍यामध्‍ये “I/we also understand that the processing fees are non-refundable” असे स्‍पष्‍ट लिहीण्‍यात आलेले आहे. त्‍याखाली तक्रारदारांची सही आहे. याचाच अर्थ प्रोसेसिंग फी परत मिळणार नव्‍हती याची माहिती तक्रारदारांना होती. तसेच जाबदेणार यांनी दाखल केलेल्‍या स्‍टेटमेंटवरुन तक्रारदारांनी पुर्वी घेतलेल्‍या कर्जासंदर्भात दिलेले चेक बाऊन्‍स झालेले होते, त्‍यामुळेच जाबदेणार यांनी तक्रारदारांना नवीन कर्ज मंजुर केले नाही ही बाब स्‍पष्‍ट होते. यामध्‍ये जाबदेणार यांच्‍या सेवेतील त्रुटी मंचास दिसून येत नाही. म्‍हणून तक्रारदारांची तक्रार मंच नामंजुर करीत आहे.
                  वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्‍यात येत आहे.
                                :- आदेश :-
1.     तक्रार नामंजुर करण्‍यात येत आहे.
2.    खर्चाबद्यल आदेश नाही.
      आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क पाठविण्‍यात यावी.
 
 
 
[ Smt. Anjali Deshmukh]
PRESIDENT
 
[ Shri. S. K. Kapase]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.