(घोषित दि. 18.12.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांचे पती श्री.रामभाऊ जयसिंग राठोड यांनी “जनता पर्सनल अक्सीडंट पॉलीसी” दिनांक 08.03.2006 ते 07.03.2011 या कालावधीची रक्कम रुपये 1,00,000/- घेतली होती. तक्रारदारांचे पती दिनांक 26.06.2010 रोजी मोटार सायकलवरुन प्रवास करीत असता झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाले. शासकीय रुग्णालय, औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान दिनांक 28.06.2010 रोजी मृत्यू पावले. संबंधित पोलीस स्टेशन मौजपूरी यांनी अपे रिक्षा चालका विरध्द गुन्हा नोंदवला
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर नूकसान भरपाई मिळण्याकरीता गैरअर्जदार यांचेकडे लेखी प्रस्ताव दाखल केला, तोंडी विनंती केली. दिनांक 03.02.2011 रोजी पोष्टाद्वारे पत्र पाठवून विमा रकमेची मागणी केली. परंतू अद्याप पर्यंत गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना सदर रक्कम दिली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार 1 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रादारांचा प्रस्ताव त्यांचे कार्यालयास प्राप्त झालेला नाही.
गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव दिनांक 07.02.2011 रोजी ओरीयंटल इन्शूरन्स कंपनी लि. सावेडी ब्रँच अहमदनगर ऑफीसला सादर केला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.
गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांचे पती श्री रामभाऊ जयसिंग राठोड हे मोटार सायकल व अपे रिक्षा यांचेमध्ये दिनांक 26.06.2010 रोजी झालेल्या अपघातात गंभीर जखमी होवून दिनांक 28.06.2010 रोजी उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालय औरंगाबाद येथे मृत्यू पावले.
तक्रारदारांनी दिनांक 03.02.2011 रोजी गैरअर्जदार 2 यांचेकडे आवश्यक कागदपत्रासह विमा प्रस्ताव दाखल केला असून, गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार दिनांक 07.02.2011 रोजी गैरअर्जदार 1 यांचेकडे पाठवला. परंतू सदर प्रस्ताव गैरअर्जदार 1 यांचेकडे प्राप्त न झाल्यामूळे प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे स्पष्ट होते.
तक्रारदारांनी सदर प्रकरणात विमा प्रस्तावा सोबत दाखल केलेली कागदपत्रे, घटनास्थळ पंचनामा, पोस्ट मार्टम अहवाल, एफ.आय.आर, मृत्यू प्रमाणपत्र, पॉलीसीचे सर्टिफिकेट वगैरे कागदपत्रे दाखल केली आहेत. सदर कागदपत्रानूसार तक्रारदार जनता व्यक्तीगत अपघात पॉलीसीनूसार नूकसान भरपाईची रक्कम मिळण्यास पात्र असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत गैरअर्जदार 1 विमा कंपनीने तक्रादारांना विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- देणे उचित होईल. असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
- गैरअर्जदार 1 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना विमा लाभ रक्कम रुपये 1,00,000/- आदेश मिळाल्या पासून 30 दिवसात द्यावी.
- वरील रक्कम विहीत मूदतीत अदा न केल्यास 9 टक्के व्याज दरा सहीत द्यावी.