Maharashtra

Nagpur

CC/11/357

Shri Amulya Krishna Sinha Rajendraprasad Sinha - Complainant(s)

Versus

Div. Manager, Oriental Insurance Co.Ltd. - Opp.Party(s)

Adv. Jagjitsingh Bamrah

17 Jan 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/357
 
1. Shri Amulya Krishna Sinha Rajendraprasad Sinha
24, Bhange Vihar, Trimurti Nagar
Nagpur
Maharahstra
...........Complainant(s)
Versus
1. Div. Manager, Oriental Insurance Co.Ltd.
Div. No. 1, A.D.Complex, 15, Mount Road,
Nagpur
Maharashtra
2. the Dedicated Health Care Services T.P.A.India Pvt. Ltd.
286, Dhruva Building, Karande Jewllers, Near Coffi House Chowk, Dharampeth
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HON'ABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:Adv. Jagjitsingh Bamrah, Advocate for the Complainant 1
 Adv.A.M.Quazi, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                          -// आ दे श  //-
                 (पारित दिनांक : 17/01/2012)
1.          प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्‍द मंचात दि.04.07.2011 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 विरुध्‍द दाखल करुन मंचास मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष क्र.1 ने विम्‍याची रक्‍कम रु.1,75,000/- तक्रारकर्त्‍यास द्यावी, शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- द्यावे तसेच संपूर्ण रकमेवर दि.01.04.2010 पासुन 12% व्‍याज द्यावे अश्‍या मागण्‍या केलेल्‍या आहेत.
3.          तक्रारकर्ता सन 2002 पासुन मेडिक्‍लेम पॉलिसी विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून घेत होता व सन 2009 पर्यंत दरवर्षी पॉलिसी घेत होता, मात्र त्‍याने कुठलाही क्‍लेम केला नाही. जून-2009 मधे त्‍याला नवीन पॉलिसी काढावयाची होती तेव्‍हा त्‍याला कळले की, हॅपी फॅमिली फ्लोटर प्‍लॉन आला असुन एका प्रिमीयममधे घरातील सर्व सदस्‍यांचा विमा काढू शकतात. त्‍यामुळे त्‍याने सदर प्‍लॉन विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचेकडून रु.20,681/- चा एकमुस्‍त हप्‍ता भरुन पॉलिसी क्र.181100/48/2010/783 रु.3,00,000/- करीता दि.20.06.2009 ते 19.06.2010 या कालावधीचा घेतला होता, त्‍यामधे औषधीखर्च, दवाखान्‍याचा खर्च तसेच शल्‍यक्रियेचा खर्चाचा समावेश होता.
4.          तक्रारकर्त्‍यास पॉलिसी घेण्‍याचे आधी काहीही शारीरिक व्‍याधी नव्‍हत्‍या व तो स्‍वस्‍थ होता, प्रथमच दि.27.08.2009 रोजी छातीमध्‍ये जडपणा वाटत होता म्‍हणून त्‍याने जी.टी. मेमोरियल हॉस्‍पीटल व आय.सी.यु. खामला रोड, नागपूर यांच्‍या डॉ.निखिल बालनखेड, दवाखान्‍यात तपासणी केली व काही विशेष त्रास नसलयामुळे औषध दिले व तक्रारकर्त्‍यास थोडे बरे वाटत होते. त्‍यानंतर अंदाजे सहा महिन्‍यानंतर दि.22.02.2010 रोजी तक्रारकर्त्‍याचे छातीत दुखणे व अस्‍वस्‍थ वाटू लागले म्‍हणून दि.13.02.2010 रोजी डॉ. निखिल बालनखेड यांचेशी संपर्क साधला व तपासणी केली व अतिरिक्‍त वैद्यकीय रोग निदानतज्ञाकडून चाचणी करुन घ्‍यावी लागल म्‍हणून चाचणी करुन घेतली व वैद्यकीय अहवाल दि.27.03.2010 रोजी डॉ. बालनखेड यांनी निष्‍कर्ष दिला की, त्‍यास एनजिओग्राफीची चाचणी व इतर तपासण्‍या कराव्‍या लागेल म्‍हणून व्‍होक्‍हार्ड हार्ट हॉस्‍पीटल, नागपूर येथे भरती होण्‍यांस सांगितले. त्‍यानुसार तक्रारकर्ता व्‍होक्‍हार्ड हार्ट हॉस्‍पीटलमधे भरती झाला व चाचणी अंति कॉरनोरी एनजिओप्‍लॉस्‍टी तसेच स्‍थाई पेसमेकर इंम्‍प्‍लॉन्‍टेशनची क्रिया दि.01.04.2010 रोजी करण्‍यांत आली व शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍यानंतर व औषधोपचार झाल्‍यानंतर दि.07.04.2010 रोजी तक्रारकर्त्‍यास सुटी देण्‍यांत आली.
5.          तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे की, दि.01.04.2010 ला शस्‍त्रक्रिया करण्‍यापूर्वी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांचेशी बोलला असता त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास कॅशलेस स्किम घेण्‍याचे सुचविले. कारण विरुध्‍द पक्ष क्र.2 हे मेडिकल क्‍लेम पॉलिसीच्‍या स्‍कीम देण्‍याचे काम करतात व त्‍याकरीता त्‍यांना मिळालेल्‍या रकमेवर 10% सर्व्‍हीस फी घेतील असे सांगितले. त्‍यास तक्रारकर्ता तयार झाला व विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना दि.30.03.2010 रोजी आपले अधिकारपत्र दिले, त्‍यानंतर दि.31.03.2010 रोजी अधिकारपत्राची तारीख वाढवुन दिली.
6.          विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना विरुध्‍द पक्ष क्र.1 कडे दाव्‍याचे मंजूरीकरीता पाठविला जेणेकरुन औषधोपचार व शल्‍यक्रिया होईल व रु.3,00,000/- पर्यंत खर्च मिळाण्‍याचे आश्‍वासन दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने आस्‍वस्‍थ होऊन व्‍होक्‍हार्ड हार्ट हॉस्‍पीटल, येथे शस्‍त्रक्रिया करण्‍याची तयारी केली.
7.          तक्रारकर्ता हा 80 वर्षांचे वर असुन त्‍याची पूर्ण देखरेख मुलगा आशिषकुमार सिन्‍हा करतो व कमी वेळात एवढी रक्‍कम जमा करणे शक्‍य नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी जे सुचविले त्‍याप्रमाणे मान्‍यता दिली. शस्‍त्रक्रिया झाल्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाशी संपर्क साधला परंतु त्‍यांनी प्रतिसाद दिला नाही, त्‍यामुळे त्‍याची फार कुचंबणा झाली व उपचारानंतर दि.05.04.2010 ला बरे झाल्‍यानंतर त्‍यास रु.3,95,908/- भरावयास नसल्‍यामुळे तसेच विरुध्‍द पक्षाने फक्‍त रु.1,25,000/- मंजूर केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास बिल भरणे शक्‍य नसल्‍यामुळे तजबीज करावी लागली. तसेच दि.07.04.2010 रोजी सुटी झाली.
8.          तक्रारकर्त्‍याने दि. 28.07.2010 तसेच दि.02.02.2011 रोजी विरुध्‍द पक्षाला पत्र पाठविले मात्र त्‍यास प्रतिसाद मिळाला नाही. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दि.14.03.2011 रोजी उत्‍तर पाठवुन सांगितले की, तक्रारकर्त्‍यास फक्‍त रु.1,25,000/- मंजूर करण्‍यांत आले, त्‍यावर 10% म्‍हणजेच रु.12,500/- विरुध्‍द पक्ष क्र.2 ने घेतले असुन तक्रारकर्त्‍यास रु.2,83,408/- ची सोय करुन भरावे लागले.
9.          तक्रारकर्त्‍याने आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ एकूण 12 दस्‍तावेज अनुक्रमे पृष्‍ठ क्रृ. 7 ते 29 वर दाखल केलेले आहेत.
10.         सदर प्रकरणी मंचामार्फत विरुध्‍द पक्षावर नोटीस बजावण्‍यांत आली असता, त्‍यांना नोटीस मिळाल्‍यानंतर ते मंचात हजर झाले असुन विरुध्‍द पक्ष क्र.1 ने तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र.1 नाकारला. तक्रारकर्त्‍याने सन 2002 पासुन सदर विमा पॉलिसी काढली हे मान्‍य केले असुन दि.20.01.2009 ते 19.06.2010 या कालावधीकरीता पॉलिसीचे नुतणीकरण करते वेळी विमाधारकाला अगोदरच्‍या पॉलिसी मुदत अखेर विमामुल्‍य रु.1,25,000/- होते परंतु एवढी रकमेत वाढ करुन रु.3,00,000/- चा विमा उतरविला व जानेवारी 2009 ला प्रथमच ‘हॅपी फॅमीली फ्लोटर पॉलिसी’, विरुध्‍द पक्ष क्र.1 कडून घेतली. विरुध्‍द पक्ष क्र.1 नुसार तक्रारकर्त्‍याला हायपरटेंशनचा त्रास होता व त्रास भविष्‍यात वाढण्‍याची जाणीव असल्‍यामुळे व लागणा-या खर्चाचा परिपूर्ण जाणीव असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने जून-2009 मधे पॉलिसीचे नुतणीकरण करते वेळी रु.1,25,000/- ऐवजी रु.3,00,000/- रकमेचा विमा हेतुपुरस्‍सर स्‍वतःचे हिताकरीता उतरवुन घेतला. तसेच पॉलिसी नुतणीकरणा आधी तक्रारकर्त्‍यास शारीरिक व्‍याधी नव्‍हत्‍या व तो स्‍वस्‍थ होता, ही बाब नाकारली.
 
11.         विरुध्‍द पक्ष क्र.1 ने विमा दावा विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे पाठवुन व अटी व शर्तींनुसार रु.1,25,000/- चा दावा मंजूर करण्‍यांत आला जो नियमानुसार आहे व तक्रार खारिज होण्‍यास पात्र असल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच रु.3,00,000/- मिळवुन देण्‍याचे आश्‍वासन दिल्‍याचे नाकारले.
12.         विरुध्‍द पक्ष क्र.1 ने विमा दावा विरुध्‍द पक्ष क्र.2 कडे पाठविला व अटी ,शर्तींनुसार रु.1,25,000/- चा दावा मंजूर करण्‍यांत आला जो नियमानुसार असुन सदर तक्रार खारिज होण्‍यास पात्र असल्‍याचे नमुद केले आहे. तसेच रु.3,00,000/- मिळवुन देण्‍याचे आश्‍वासन दिल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे नाकारले. विरुध्‍द पक्ष क्र.1 ने म्‍हटले आहे की, तक्रारकर्त्‍याने प्रथमच जून-2009 मधे हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलिसी रु.3,00,000/- एवढया रकमेची उतरवली व अगोदरच्‍या कालावधीची रक्‍कम रु.1,25,000/- एवढी होती. तक्रारकर्त्‍याला CAD, HTN, Dyslipidemia, करता भरती केले होते व त्‍याला Hypertension   चा त्रास मागील 1 वर्षापासुन असुन त्‍याची जाणी त्‍याला होती, म्‍हणून रु.1,25,000/- चा विमा प्रतिबंधीत करण्‍यांत आला व त्‍यातुन 10% रकमेची भुगतान कमी करुन रु.1,12,500/- चे तक्रारकर्त्‍या भुगतान करण्‍यांत आले. दि.14.03.2011 चे पत्रानुसार व तरतुद (Exclusion No.4.1 and Exclusion No.4.3) नुसार विमा दाव्‍याची रक्‍कम दिल्‍यामुळे कोणत्‍याही रक्‍कम मिळण्‍यांस तक्रारकर्ता पात्र नाही. त्‍यामुळे सदर तक्रार खारिज करण्‍याची मागणी केलेली आहे.
 
13.         विरुध्‍द पक्ष क्र.1 ने एकूण 4 दस्‍तावेज दाखल केलेली असुन त्‍यामध्‍ये पॉलिसीच्‍या अटी व शर्ती, प्रोसेस शिट, प्री ऑथरायझेशन फॉर्म आणि डिस्‍चार्ज समरी पृष्‍ठ क्र.50 ते 72 वर दाखल आहे.
 
14.         तक्रारकर्त्‍याने आपल्‍या शपथपत्रात विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे नाकारुन तक्रारी प्रमाणेच वस्‍तुस्थिती प्रस्‍तुत केली व त्‍याला Hypertension   चा त्रास मागील 1 वर्षापासुन होता हे नाकारले.
15.         मंचाने विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊनही ते उपस्थित झाले नाही तसेच त्‍यांनी आपले उत्‍तर सुध्‍दा दाखल केले नाही. त्‍यामुळे मंचाने त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश पारित केलेला आहे.
           
16.         प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.20.12.2011 रोजी आली असता मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्तिवाद ऐकला. तसेच मंचासमक्ष दस्‍तावेजांचे व दोन्‍ही पक्षांचे कथन यांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
-// नि ष्‍क र्ष //-
 
17.         तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या वकीलांनी युक्तिवादात हे मान्‍य केले आहे की, तक्रारकर्ता हा सन-2002 पासुन मेडिक्‍लेम पॉलिसी विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचेकडून घेत होता. तसेच 20.06.2009 रोजी हॅपी फॅमिली फ्लोटर पॉलिसी क्र.181100/48/2010/783 रु.3,00,000/- एवढया रकमेकरीता काढली होती.
18.         विरुध्‍द पक्षाने आपल्‍या उत्‍तरात मंचाची दिशाभूल करण्‍यासाठी ठिकठिकाणी दि.20.01.2009 ते 19.06.2010 चा उल्‍लेख केलेला आहे, जो की पूर्णतः चुकीचा आहे. तक्रारकर्त्‍याची दि.01.04.2010 रोजी एनजिओप्‍लॅस्‍टी तसेच स्‍थायी पेसमेकन इम्‍पलान्‍टेशनची शस्‍त्रक्रिया झाल्‍यानंतर दि.07.04.2010 रोजी दवाखान्‍यातून सुटी झाली. तक्रारकर्त्‍यानुसार त्‍याला विरुध्‍द पक्ष क्र.1 ने विमा दावा रु.1,25,000/- प्रतिबंधीत करुन त्‍यातुन 10% रक्‍कम कपात करुन रु.1,12,500/- दिले, परंतु प्रत्‍यक्षात खर्च झालेली रक्‍कम रु.3,95,908/- न देता निव्‍वळ रु. 1,25,000/- मंजूर केले. तसेच विरुध्‍द पक्ष क्र.2 च्‍या दि.31.08.2010 रोजीचे विमा नाकारल्‍याचे पत्रात खालिल प्रमाणे नमुद केलेले आहे...
      On scrutiny of the documents and information received by us, our panel of doctor’s is of the opinion that the claim is inadmissible due to the following reasons:
·         Amulya Sinhs was admitted at WOCKHARDT HEART HOSPITAL – NAGPUR for CORONARY HEART DISEASE on 21.03.2010 and was discharged on 07.04.2010. previous year policy sum insured is Rs. 125000/- as per pre-authorization form patient is a known case of hypertension since 1 year. Current year policy shows enhancement of sum insured to Rs.300000/- but as hypertension is prior to enhanced limit amount payable will still be Rs.125000/- with 10% co pay as sanctioned in AL. Hence the remaining amount Rs.187500/- is not payable, so this claim is rejected.
 
           Therefore as per clause of the policy terms and conditions which mentions (clause details) the claim is repudiated. We regret to inform you that the claim is not payable.
                        यामधे स्‍पष्‍टपणे नमुद आहे की, आताची पॉलिसी ही रु.1,25,000/- ची होती व 1 वर्षापासुन तक्रारकर्ता हायपरटेंन्‍शनचा रुग्‍ण होता ही बाब तक्रारकर्त्‍याने पूर्णतः नाकारलेली आहे. तसेच सध्‍या असलेली पॉलिसी ही रु.3,00,000/- पर्यंत वाढविण्‍यांत आली, परंतु तक्रारकर्त्‍यास पॉलिसी रक्‍कम वाढविण्‍याच्‍या आधी पासुन हायपरटेन्‍शनचा त्रास असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास देय असलेली रक्‍कम रु.1,25,000/- व सहभुगतानाची रक्‍कम रु.12,500/- कमी करुन मंजूरी देण्‍यांत आली व उर्वरित रक्‍कम रु.1,87,500/- देय नसल्‍यामुळे विमा दावा नाकारला. परंतु त्‍याबाबत विरुध्‍द पक्ष क्र.2 ने आपले लेखी उत्‍तर दाखल केले नाही, तसेच वस्‍तुनिष्‍ठ पुरावा सुध्‍दा सादर केला नाही. त्‍यामुळे वरील कारणास्‍तव नाकारलेला विमा दावा हा पुराव्‍या अभावी संयुक्तिक वाटत नसल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष क्र.2 ची कृति चुकीची व खोडसाळ स्‍वरुपाची आहे, असे मंचाचे मत आहे.
 
19.         विरुध्‍द पक्ष क्र.1 ने आपल्‍या लेखी उत्‍तरात Exclusion No.4.1 and Exclusion No.4.3 ला आधारभुत मानले असुन त्‍यानुसार विमा दाव्‍याची रक्‍कम दिल्‍यामुळे कोणत्‍याही रक्‍कम मिळण्‍यांस तक्रारकर्ता पात्र नसल्‍याचे नमुद केले आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या अनुक्रमे पृष्‍ठ क्र.8 व 9 वरील पॉलिसी दस्‍तावेजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता त्‍यातील अटी व शर्ती व विरुध्‍द पक्ष क्र.2 ने दाखल केलेले पृष्‍ठ क्र.50 व 51 वर दाखल पॉलिसी दस्‍तावेजांसोबतच्‍या अटी व शर्ती या वेगळ्या जोडून मंचास हे दाखविण्‍याचा प्रयत्‍न केला आहे की, त्‍यांनी विमापत्रासोबत अटी व शर्ती तक्रारकर्त्‍यास पाठविलेल्‍या होत्‍या व समजावुन सांगितल्‍या होत्‍या, या विरुध्‍द पक्ष क्र.1 च्‍या म्‍हणण्‍याशी मंच सहमत नाही. तसेच विरुध्‍द पक्ष अटी व शर्तींतील Exclusion No.4.1 and Exclusion No.4.3 चा फायदा घेऊन तक्रारकर्त्‍याचा न्‍यायोचित विमा दावा नाकारु शकत नाही, असे मंचाचे स्‍पष्‍ट आहे. म्‍हणून विरुध्‍द पक्ष क्र.1 ने (Exclusion No.4.1 and Exclusion No.4.3) अंर्तगत विमा दावा नाकारला ही त्‍यांचे सेवेतील गंभीर स्‍वरुपाची त्रुटी आहे.
20.         मंचाने मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाचा 2000 Vol-1, CPJ-1, (SC), Modern Insulators –v/s- Oriental Insurance Co. Ltd. नुसार Exclusion Clause – Neither part of contract of Insurance Nor Disclosed to insured no benefit available to Insurance Co. Exclusion Clause did not part of contract of insurance.
 
21.                  तक्रारकर्त्‍याने मा. राज्‍य आयोगाचा Vol-I(2011) CPJ – 25 (NC), Mahesh Chand Ghiya –v/s- New India Assurance Co. Ltd., या निकालपत्रास आधारभुत मानले असुन त्‍यात खालिल प्रमाणे नमुद केलेले आहे...
      Consumer Protection Act, 1986- Sections 2(1)(g), 21(b) – Mediclaim Reimbursement – Exclusion clause – Claim restricted in case of heart problem OP admitted in hospital and underwent treatment – Claim repudiated – OP restricted claim and paid some amount – District Forum allowed complaint – State Commission allowed appeal and set aside order of For a below- Hence revision – Imposition of restriction in exclusion clause in policy was a unilateral action- No document placed to justify Corporation’s action – Complainant not told about such clause – Order of State Commission set aside and order of District Forum upheld.
 
22.                  वरील विमापत्रानुसार विरुध्‍द पक्ष क्र.1 ने दावा प्रतिबंधीत केल्‍याने सदर विमा दाव्‍यास लागू पडत नाही व तक्रारकर्ता विमा दाव्‍याची उर्वरित रक्‍कम रु.1,87,500/- मिळण्‍यांस पात्र ठरतो.
23.         मंचाने M.S.C.D.R.C., MUMBAI -2011, Vol-II,CCC-110 (SS),- “The New India Assurance Co. Ltd. –v/s- Balkrushna Banesh Joshi”, या निकालपत्रात खालिल प्रमाणे प्रमाणीत करण्‍यांत आले आहे...
 
      Insurance- Mediclaim Policy- Repudiation of claim – Suppression of fact about health- the life assured experienced while taking treatment in the Hospital when the policy was existence and force- claim ledged- rejected – complaint filed – allowed – Hence the appeal.
 
1.                  Insurance Company has not produce any proposal form in respect of insurance policy so as to infer that the deceased had suppress of diabetics from the Insurance Co. The State Commission held that meare statement in discharge card showing history of patient can not lead to inference that the insured had suppressed said fact from Insurance Co. order of District Forum upheld- Appeal Dismissed.
2.                  R.S.C.D.R.C. Jaipur-2011, Vol-IV, CPR – 211, “H.D.F.C. Standared Life Insurance Co. Ltd. –f/s- Kailash Chandra Agarwal”, Non reimbursement of expenses Incurred in treatment of heart ailment – appellant Insurance Co. directed to pay to complainant sum of Rs.5,00,000/- to say that insured is known case of diabetes for last 8 years, is not sufficient proof justifying remediation of claim insurance Co. should have held inquired also to find out wheather complainant was really suffering from diabetes for last 8 years- where no treatment record prior to proposal is produced, repudiation on the basis Hospital Record in not justified- appeal dismissal- in the same judgment. Observation of the National Commission is that if the Doctor who treated the decease had recorded the case history, that was not sufficient to say that information was given by insured or relative. The case history given in the record may be just base on hear say and remained unsubstantial without any medical evidence or the statement of insured person himself or the complainant. 
 
24.                  विरुध्‍द पक्ष क्र.1 ने मंचासमोर प्रपोजल फॉर्म तसेच कुठलाही चौकशी अहवाल अथवा मंचास विश्‍वसनीय वाटणारे वस्‍तुनिष्‍ठ दस्‍तावेज सादर केले नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विमा पॉलिसी घेतेवेळी त्‍याला 1 वर्षापासुन हायपरटेन्‍शनचा त्रास होता व निव्‍वळ त्‍या कारणास्‍तव विमा दावा नाकारला ही विरुध्‍द पक्ष क्र.1 चे ग्राहक सेवेतील त्रुटी आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. म्‍हणून तक्रारकर्ता विमा दाव्‍याची उर्वरित रक्‍कम रु.1,87,500/- दि.07.04.2010 पासुन द.सा.द.शे.9% व्‍याजासह मिळण्‍यांस पात्र आहे. तसेच विरुध्‍द पक्षांचे ग्राहक सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी तक्रारकर्ता रु.5,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- मिळण्‍यांस पात्र ठरतो असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
            वरील सर्व बाबींचा विचार करता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
 
      -// अं ति म आ दे श //-
 
 
1.    तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास विम्‍याच्‍या    दाव्‍याची उर्वरित रक्‍कम रु.1,87,500/- दि.07.04.2010 पासुन द.सा.द.शे.9%     व्‍याजासह अदा करावी.
3.    विरुध्‍द पक्ष क्र.1 ला आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांचे ग्राहक सेवेतील त्रुटीमुळे     तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व     तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4.    वरील आदेशाचे पालन गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन    30 दिवसांचे आत करावे.
 
 
[HON'ABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.