जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 20/2016 तक्रार नोंदणी दि. :-10/5/2016
तक्रार निकाली दि. :-25/5/2016
निकाल कालावधी:- 15 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- श्री.गजानन लालाजी भर्रे,
वय -52 वर्ष,व्यवसाय – शिक्षक व विमा अभिकर्ता,
राह.मुरखळा, पो.मुडझा, ता. जिल्हा - गडचिरोली.
- विरुध्द -
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- 1) जिल्हा दुरसंचार अधिकारी,
जिल्हा गडचिरोली, जिल्हा सत्र न्यायालयाच्या
विरुध्द बाजूला, गडचिरोली (कॉम्प्लेक्स),
पिन-442605.
2) उपविभागीय अधिकारी टेलिग्राफ, गडचिरोली
इंदिरा गांधी चौक, गडचिरोली 42605.
अर्जदार तर्फे वकील :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री सादीक मोहसिनभाई झवेरी, सदस्य)
(पारीत दिनांक : 25 मे 2016)
अर्जदार हजर. अर्जदाराने केलेल्या तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी आहे की,
अर्जदार हा गैरअर्जदाराचा मागील 19 ते 20 वर्षापासून ग्राहक असून त्याचा दुरध्वनी क्र.222741 जानेवारी 2015 पासून बंद असल्यामुळे, अर्जदाराचे त्यांचे विमा ग्राहकांशी संपर्क होत नाही व परिणामी विमा ग्राहकांकडून उशिरा विमा हप्ता प्राप्त झाल्यामुळे आर्थिक दंड सोसावा लागतो. तसेच, नातेवाईक व मित्र परिवाराशी संपर्क होत नव्हता व एल.आय.सी.चे नविन ग्राहकांशी संपर्क साधता न आल्यामुळे व्यवसाय कमी होऊन आर्थिक नुकसान झाले. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे वारंवार संपर्क साधूनसुध्दा दुरध्वनी सुरु न झाल्यामुळे, सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली.
सदर दुरध्वनी अर्जदार व्यापाराकरीता वापरत होते, असे अर्जदाराच्या तक्रारीमधून दिसून येते. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून मागितलेली सुविधा व्यापारीक उपयोगाकरीता आहे, असे मंचाचे मत ठरले आहे.
कलम 2(1)(ग्राहक संरक्षण कायदा 1986) प्रमाणे अर्जदार हा ग्राहक संज्ञेत मोडत नाही. सबब, खालील आदेश पारीत करण्यात येते.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करुन खारीज करण्यात येते.
(2) अर्जदाराच्या तक्रारीची मुळ प्रत सोडून उर्वरीत प्रती अर्जदारास परत करावे.
(3) अर्जदार यांनी तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
(4) आदेशाची प्रत अर्जदारास विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 25/5/2016
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.