जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली
ग्राहक तक्रार क्रमांक :- 16/2016 तक्रार नोंदणी दि. :-01/03/2016
तक्रार निकाली दि. :-24/5/2016
निकाल कालावधी:- 2 म.24 दिवस
अर्जदार/तक्रारकर्ता :- राजेंद्रसिंह श्याम सुंदर सिंह ठाकूर,
वय -72 वर्ष, धंदा – शेती (ज्येष्ठ नागरीक)
मु.पो.पुराडा, ता. कुरखेडा,
जिल्हा - गडचिरोली.
- विरुध्द –
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- 1) मा.दूरसंचार जिल्हा प्रबंधक,
भारत संचार निगम लिमिटेड जि.कार्यालय,
वासी क्षेत्र, ता.जिल्हा – गडचिरोली
2) मा.वाटमवार साहेब. डि.ई.
ग्राहक सेवा केंद्र कार्यालय,
इंदिरा चौक, ता.जि.गडचिरोली.
3) मा.पोष्टमास्तर साहेब, पोस्ट कार्यालय
ता.कुरखेडा, जि.गडचिरोली-441209
अर्जदार :- स्वतः
गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील :- अधि.श्री संजय ठाकरे व अन्य
गैरअर्जदार क्र.3 तर्फे :- स्वतः
गणपूर्ती :- (1) श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष
(2) श्री सादीक मोहसीनभाई झवेरी, सदस्य
(3) श्रीमती रोझा फुलचंद्र खोब्रागडे, सदस्या
- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 24 मे 2016)
1. अर्जदाराने सदर तक्रार, गैरअर्जदार यांचेकडून दुरध्वनी देयके वेळेवर प्राप्त होत नसल्याबाबत अर्ज दाखल केला.
2. सदर तक्रार न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदार व गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांचेमध्ये समझोता झाल्याने प्रकरण मागे घेत असल्याबाबतची पुरशिस नि.क्र.10 नुसार अर्जदार व गैरअर्जदार यांनी संयुक्तरित्या दाखल केली. सदर पुरशिस मंजुर करुन, त्याअनुषंगाने अंतिम आदेश पारीत करण्यात येते.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदार तक्रार पुढे चालविण्यास इच्छुक नसल्याने व तक्रार मागे घेण्याचे कारणाने नस्तीबध्द करण्यात येत आहे.
(2) तक्रारीची मुळ प्रत सोडून इतर प्रती व मुळ दस्ताऐवज अर्जदाराला परत देण्यात यावे.
(3) अर्जदार व गैरअर्जदार यांनी आप-आपला खर्च स्वतः सहन करावा.
(4) अर्जदाराला आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 24/5/2016
(रोझा फु. खोब्रागडे) (सादीक मो. झवेरी) (विजय चं. प्रेमचंदानी)
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, गडचिरोली.