::: अं ति म आ दे श :::
( पारित दिनांक : 27/01/2015 )
माननिय सदस्य श्री. ए.सी. ऊकळकर, यांचे अनुसार : -
तक्रारकर्ता यांनी सदर प्रकरण ग्राहक संरक्षण कायदा कलम-12 नुसार दाखल केलेले आहे.
या तक्रार प्रकरणात तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी, दिनांक 23/01/2015 रोजी, आपसातील तडजोडीचा अर्ज, रेकॉर्डवर सादर केलेला आहे. सदरहू अर्जामधील मजकूराचा, थोडक्यात आशय येणेप्रमाणे ः
सदरहू तक्रार प्रकरणात तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांनी आपसात समज केला आहे. तक्रारकर्ता हे कास्तकार असुन त्यांचे विरुध्द पक्षा बरोबर चांगले संबंध आहेत व पुढे देखील चांगले संबंध राहावेत या हेतूने प्रकरण दोघांनी आपसात मिटविले आहे. विरुध्द पक्ष हे आज रोजी तक्रारकर्ता श्रीराम दगडुजी वाट यांना रुपये 11,925/- (अकरा हजार नऊशे पंचविसचा) बॅंक ऑफ महाराष्ट्रचा चेक क्र.016474 तारीख 22.01.2015 चा देत आहे. तक्रारकर्ता हयांनी प्रकरणात मागणी केलेप्रमाणे रक्कम सोडून दिली आहे तसेच हया प्रकरणाचा खर्च देखील तक्रारकर्ता हे मागणार नाहीत. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाबद्दल समझोता झाल्याप्रमाणे रक्कम रुपये 11,925/- (अकरा हजार नऊशे पंचविसचा चेक) मिळाली आहे व तक्रारकर्ता सदरहू प्रकरण परत घेत आहे. दोघांनी आपआपला खर्च सोसावा असे ठरले आहे.
वरीलप्रमाणे विनंती अर्जामध्ये करण्यात आलेली आहे.
अशास्थितीत, सदर तक्रार प्रकरणातील कार्यवाही, कायमची, येथेच, थांबविण्यात येत असून, सदर तक्रार प्रकरण, नस्तीबध्द करण्याचे निर्देश, देण्यात येत आहेत व अशाप्रकारे, सदर तक्रार प्रकरण, कायमचे, निकाली काढण्यात येत आहे.
(श्रीमती जे.जी. खांडेभराड) ( श्री. ए.सी.उकळकर) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्या. सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, वाशिम, (महाराष्ट्र).