जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 64/2011 तक्रार दाखल तारीख – 02/05/2011
तक्रार निकाल तारीख– 10/05/2013
संगिता भ्र.जनार्धन क्षीरसागर
वय 35 वर्षे, धंदा घरकाम,
रा.रायमोहा, ता.शिरुर (का.) जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन, मार्फत जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय,
नगर रोड, बीड.ता.जि.बीड
2. अधिक्षक, तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
शिरुर(का.) ता.शिरुर (का.) जि.बीड.
3. तहसिलदार,
तहसिल कार्यालय, शिरुर (का.)
ता.शिरुर (का.) जि.बीड.
4. व्यवस्थापक, ...गैरअर्जदार कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
भास्करायण,एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स
टाऊन सेंटर जवळ, राजमाता जिजाऊ मिशनच्या खाली,
सिडको, औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद.
5. विभागीय व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
भास्करायण एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स
टाऊन सेंटर जवळ, राजमाता जिजाऊ मिशनच्या खाली,
सिडको, औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद.
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.बी.ई.येळे
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – स्वतः
गैरअर्जदार क्र.2 तर्फे - स्वतः
गैरअर्जदार क्र.3 तर्फे - स्वतः
गैरअर्जदार क्र.4 तर्फे - स्वतः
गैरअर्जदार क्र.5 तर्फे - अँड.ए.पी.कुलकर्णी
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराच हिचे पती जनार्दन क्षीरसागर हे दि.09.06.2009 रोजी मारुती अल्टो कारच्या अपघातात मरण पावले आहेत. तक्रारदार ही त्यांची वारस आहे. तक्रारदाराचे पती हे व्यवसायाने शेतकरी होते. त्यांचे नांवे रायमोहा ता.शिरुर (का.) जि.बीड येथे शेतजमीन आहे. त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर पोलिस स्टेशन बीड (ग्रामीण) येथे गु.रं.नं.58/2009 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर मयत जनार्दन यांचे जिल्हा रुग्णालय बीड येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात मेंदूला मार लागल्यामुळे मृत्यू झाला असे मृत्यूचे कारण दर्शवलेले आहे.
तक्रारदारांनी योग्य त्या कागदपत्रांसह शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दि.08.09.2009 ला दाखल केला. त्यानंतर तक्रारदाराने दि.01.03.2011 रोजी गैरअर्जदारांकडे विमा प्रस्तावा बाबत चौकशी केली असता तिला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार या न्यायमंचासमोर दाखल केली आहे व विमा रक्कम रु.1,00,000/-,मानसिक त्रासापोटी रु.15,000/-, प्रवास खर्च रु.15,000/- व तक्रारीचा खर्च यांची मागणी केली आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत प्रथम खबर, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, क्लेम फॉर्म, वारस प्रमाणपत्र, 7/12,8-अ, व 6-क चे उतारे, वाहन चालवण्याचा परवाना, शासन निर्णय इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र.1 ते 5 मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपापले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या लेखी म्हणण्यानुसार अर्जदाराने विमा प्रस्ताव दि.08.09.2009 ला सादर केला व त्यांनी तो विहीत मुदतीत जिल्हा कृषी अधिक्षक, बीड यांचेकडे पाठवला. तक्रारदार ही गैरअर्जदार क्र.2 यांची ग्राहक नाही. सबब, त्यांच्या हद्यीपुरती तक्रार निकाली काढण्यात यावी.
गैरअर्जदार क्र.4 कबाल इन्शुरन्स सर्विसेस यांच्या लेखी म्हणण्यानुसार घटना दि.09.06.2009 ची आहे. त्यांना विमा प्रस्ताव दि.22.06.2010 रोजी मिळाला. तो दि.15.08.2008 ते दि.14.08.2009 या कालावधीसाठी होता. म्हणून तो प्रस्ताव त्यांना दि.14.10.2009 पर्यत प्राप्त व्हावयास हवा होता.म्हणून त्यांनी तो “ 90 दिवसानंतर प्राप्त झाला “ या शे-यासह दि.07.10.2010 ला गैरअर्जदार क्र.5 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांचेकडे पाठवला.
गैरअर्जदार क्र.5 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या लेखी जबाबानुसार लिमिटेशन क्लॉज नं. IX नुसार दि.15.08.2008 ते 14.08.2009 या कालावधीतील अपघातासाठीचा विमा प्रस्ताव त्यांना जास्तीत जास्त पॉलिसी संपलयानंतर 90 दिवस उशिरापर्यत मिळावयास हवा होता.प्रस्ताव मुदतीच्या बाहेर असल्यामुळे सदरचा प्रस्ताव कंपनीने दि.24.11.2010 रोजी “ विमा नाकारल्याचे पत्र ” पाठवून नाकारला आहे. गैरअर्जदार क्र.5 यांनी योग्य कारणानेच विमा प्रस्ताव नाकारला आहे. तक्रारदार हा गैरअर्जदार क्र.5 यांचा ग्राहक होत नाही. सबब, तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.येळे व गैरअर्जदार क्र.5 चे विद्वान वकील श्री. ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितले की, त्यांनी दि.17.08.2009 रोजीच योग्य कागदपत्रांसह क्लेम फॉर्म तालुका कृषी अधिकारी यांचे कडे दाखल केला होता. तो कबाल इन्शुरन्स कंपनीकडे विलंबाने म्हणजे दि.22.06.2010 रोजी पोहोचला या गोष्टीला तक्रारदार जबाबदार नाही. त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे गैरअर्जदार यांचेकडे पाठवली होती. तसेच ती मंचासमोर देखील दाखल केली आहेत. सबब, त्यांची तक्रार मंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदार क्र.5 यांच्या वकिलांच्या युक्तीवादानुसार प्रस्ताव मुदतीत दाखल केला नव्हता. म्हणून तो योग्य कारणानेच नाकारला आहे. तसे पत्र तक्रारदाराला पाठवलेले आहे. यात त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवेत कमतरता नाही. तरी तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
वरील विवेचन ऐकले व दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला. तक्रारदाराने तक्रारीसोबत अपघात घडल्याची फिर्याद, शवविच्छेदन अहवाल, मरणोत्तर पंचनामा, मृत्यू प्रमणपत्र इत्यादी गोष्टी दाखल केल्या आहेत. त्यावरुन मयत जनार्दन यांचा मृत्यू दि.09.06.2009 रोजी अपघाती झाला हे सिध्द होते. त्याचप्रमाणे 7/12 चा उतारा, 8-अ उतारा, 6-क चा उतारा इत्यादी कागदपत्रांवरुन मयत शेतकरी होता हे देखील सिध्द होते.
तक्रारदाराने दि.17.08.2009 रोजीच क्लेम फॉर्म, तालुका कृषी अधिकारी यांचेकडे पाठवलेला होता. तो प्रस्ताव पुढे कबाल इन्शुरन्स यांना व रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी यांचा उशिराने पोहोचला या गोष्टीसाठी अशिक्षीत तक्रारदाराला जबाबदार धरता येणार नाही. त्यामध्ये तक्रारदाराने विमा प्रस्ताव विहीत मुदतीतच दाखल केला आहे असे मंचाचे मत आहे. तक्रारदार तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे “शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत ” विमा रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे असा निष्कर्ष मंच काढत आहे.
सबब, मंच, खालील आदेश पारित करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2. गैरअर्जदार क्र.5 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदाराला “शेतकरी
व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत ” विमा रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रुपये
एक लाख फक्त) आदेश प्राप्त झाल्यापासून तिस दिवसांच्या आंत दयावेत.
3. वरील रक्कम विहीत मुदतीत अदा न केल्यास रक्कम देय दिवसांपासून ती
तक्रारदारास प्राप्त होईपर्यत त्यावर 9 टक्के व्याज दराने व्याज दयावे.
4. खर्चाबाबत आदेश नाही.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड