जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 99/2011 तक्रार दाखल तारीख –02/08/2011
सिंमीताबाई भ्र.यदा उर्फ यादव ऊर्फ यादा नवगरे
वय 44 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.गोपाळपुर पो.नागापुर ता.परळी जि.बीड
विरुध्द
1. महाराष्ट्र शासन मार्फत
जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय,
नगर रोड, बीड ता.जि.बीड सामनेवाला
2. तहसीलदार,
तहसील कार्यालय, परळी (वै.) ता.परळी (वै.) जि.बीड.
3. तालुका कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, परळी (वै.)
ता.परळी (वै.) जि.बीड
4. अध्यक्ष, कबाल इन्शुरन्स कंपनी लि.
राज अपार्टमेट, जी सेक्टर, प्लॉट नं.29
रिलायन्स फ्रेशच्या मागे,टाऊन सेंटर,सिडको,औरंगाबाद.
5. विभागीय व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19, रिलायन्स सेंटर,वॉलचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई 400 038
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.आर.राजपूत
सामनेवाला क्र.1 व 2 तर्फे :- स्वतः
सामनेवाला क्र.3 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.4 तर्फे ः- स्वतः
सामनेवाला क्र.5 तर्फे ः- अँड.ए.पी.कूलकर्णी
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे
तक्रारदाराचे पती यदा ऊर्फ यादव ऊर्फ यादा नवगरे हे शेतकरी होते. त्यांचे अंगावर दि.10.10.2008 रोजी विज पडली. त्यांना सरकारी दवाखाना परळी येथे उपचारासाठी घेऊन गेले असता ते मयत झाल्याचे डॉक्टरांने सांगितले. घटनेची फिर्याद सरकारी दवाखाना परळी येथे सर्जेराव भीमराव नवगरे रा.गोपाळपूर यांनी दिली व नंतर घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर चौकशी फॉर्म, मरणोत्तर पंचनामा व उपजिल्हा दवाखाना परळी (वै.)येथे मयताचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी अ.मृ.क्र. 32 कलम 174 सी.आर.पी. सी. प्रमाणे गुन्हा नोंदवला.
तक्रारदारांनी वेळोवेळी सामनेवाला कडे दावा संदर्भात विचारणा केली असता त्यांनी आश्वासन दिले व लवकरच नुकसान भरपाई मिळाली अशी अट केली. शेवटी दि.7.3.2011 रोजी सामनेवाला क्र.1 ते 4 कडे चौकशी केली असता त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला. तक्रारदाराचे हित जोपासले नाही.उशिर माफीसाठी वेगळा अर्ज दाखल केला आहे.
विनंती की, विमा रक्कम रु.1,00,000/- सामनेवाला दावा दाखल केल्यापासून प्रचलित व्याजासह देण्या बाबत आदेश व्हावेत. तक्रारीचा खर्च, मानसिक शारीरिक त्रास देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1,2 यांनी त्यांचा खुलासा दि.15.9.2011 रोजी दाखल केला. यदा ऊर्फ यादव ऊर्फ यादा नवगरे हे दि.10.10.2008 रोजी शेतात विज अंगावर पडून मरण झालेले असल्याने त्यांचे वारस पत्नी श्रीमती सिमिंताबाई यांनी या कार्यालयाकडून रु.1,00,000/- मदत देण्यात आलेली आहे व शेतकरी अपघात योजना अंतर्गत मिळण्यासाठी कार्यालयाकडून मूदतीत कबाल इन्शुरन्स कंपनी औरंगाबाद येथे कार्यालयाचे पत्र नंबर 2008/एमएजी/शे.आ.वि/कावी दि.23.12.2008 रोजी यांना वेळीच सादर करण्यात आलेली आहे. विमा कंपनीकडे घटनेच्या दिनांकापासून विहीत मूदतीत उपस्थित होण्यास विलंब झालेला आहे. विलंब क्षमापित करण्यात यावा असे संबंधीतानी नमूद केलेले आहे. सर्व कागदपत्रे या कार्यालयाकडून विमा कंपनी पाठविण्यात आलेले असल्याने विलंब क्षमापित करण्याचा या कार्यालयास अधिकार नाही.विलंबास हे कार्यालय जबाबदार नाही करीता तक्रार फेटाळण्यात यावी.
सामनेवाला क्र.3 चा खुलासा दि.15.9.2011 रोजी दाखल केला. दरम्यान शासन निर्णयात बदल होऊन दि.5.8.2008 रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर विमा योजना कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे. त्रूटी असलेल्या प्रकरणाची यादी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांचेकडे पाठविण्यात आली. त्यात तक्रारदाराचे नांव समाविष्ट आहे. या कार्यालयाने पत्रनंबर 267 दि.8.3.2010 रोजी प्रत्यक्ष दिनांक 9.3.2010 रोजी 13 प्रस्ताव मे. कबाल इन्शुरन्स कंपनी प्रा लि.औरंगाबाद यांचेकडे त्रूटीची पूर्तता करुन सादर केले होते. त्यात तक्रारदाराचा प्रस्ताव समाविष्ट आहे. परिपूर्ण प्रस्ताव प्रकरणे या बाबत यादी प्रसिध्द केलेली आहे.या बाबत तक्रारदारास कोणताही प्रकारचा क्लेम कंपनीमार्फत मिळालेला नाही. तशा प्रकारचे पत्रव्यवहार कंपनीमार्फत तालूका कृषी अधिकारी कार्यालयास करण्यात आलेला नाही. यात सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कोणताही कसूर केलेला नाही.
सामनेवाला क्र.4यांनी त्यांचा खुलासा दि.27.9.2011 रोजी दाखल केला आहे. श्री.यादा बेलाजी नवगरे रा.गोपाळपूर ता.परळी वैजनाथ यांचा अपघात दि.10.10.2008 रोजी झाला. त्यांचा दावा दि.20.02.2009रोजी अपूर्ण स्थितीत आल्याने त्या बाबतची सूचना जिल्हा अधिक्षक कृषी विभाग बीड यांना देण्यात आली.पूर्ण पूर्तता झाल्यानंतर सदरचा प्रस्ताव सामनेवाला क्र.4 कडे पाठविण्यात आला.त्यांनी सदरचा दावा मंजूर करुन रु.1,00,000/- चा चेक क्र. 064343 दि.6.9.2011 रोजीचा एचडीएफसी बँकेचा तक्रारदाराच्या नांवाचा पाठविला आहे. सदरचा चेक हा तक्रारदारांना देण्यात आलेला आहे.त्या बाबतचे पत्र सोबत सादर केले आहे.
सामनेवाला क्र.5 यांनी त्यांचा खुलासा दि.09.11.2011 रोजी दाखल केला. खुलाशात सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. सामनेवाला यांनी कोणताही सेवेत कसूर केलेला नाही. तक्रार खर्चासह रदद करावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाला क्र.1 ते 5 यांचा खुलासा,सामनेवाला यांचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.राजपूत व सामनेवाला क्र.5 यांचे विद्वान वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता कागदपत्राची पुर्तता झाल्यानंतर सामनेवाला क्र.5 यांनी तक्रारदाराच्या नांवाचा चेक सामनेवाला क्र.4 कडे दिलेला आहे तो सामनेवाला क्र.4 यांनी तक्रारदारांना दिल्याचे दाखल कागदपत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांना दाव्याची रक्कम मिळाली आहे. यात सामनेवाला यांनी कसूर केल्याची बाब कूठेही स्पष्ट होत नाही. जरी मयताचा मृत्यू 2008 साली झालेला आहे. तरी सदरचा दावा कागदपत्राची पूर्तता कधी झाली यांचा खुलासा तक्रारदार किंवा सामनेवाला क्र. 4 व 5 यांचेकडून नाही. तक्रारदारांचा कोणताही खुलासा नाही. त्यामुळे सदरच्या दाव्याची पुर्तता पूर्ण झाल्यानंतर सामनेवाला यांनी दावा मंजूर केलेला आहे. त्यामुळे तक्रार निकाली काढणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर ) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड