निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 16/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 17/03/2011 तक्रार निकाल दिनांकः- 07/09/2011 कालावधी 05 महिने 21 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B.
सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ 1) कृष्णकांत पिता रावजीराव देशमुख. अर्जदार वय 41 वर्षे. धंदा.शेती. तक्रार क्रमांक 70/2011 रा.झरी ता.जि.परभणी. 2) रविकांत पिता रावजीराव देशमुख. अर्जदार वय 37 वर्षे.धंदा.शेती. तक्रार क्रमांक 71/2011 रा.झरी ता.जि.परभणी. 3) देविकांत पिता रावजीराव देशमुख. अर्जदार वय 35 वर्षे.धंदा.शेती. तक्रार क्रमांक 72/2011 रा.झरी ता.जि.परभणी. 4) रावजीराव पिता साहेबराव देशमुख अर्जदार वय 65 वर्षे.धंदा शेती. तक्रार क्रमांक 73/2011 रा.झरी ता.जि.परभणी. विरुध्द. जिल्हा व्यवस्थापक. गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ. मर्यादित अकोला,जिल्हा कार्यालय,परभणी. सर्व तक्रारीतील अर्जदार तर्फे अड.एस.टी.अडकीणे. व गैरअर्जदार तर्फे अड.डि.यु.दराडे. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा.श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्यक्ष.) बियाणे महामंडळास पुनर्विक्री केलेल्या उडीद मालाच्या किंमतीतील फरकाची रक्कम वसुली बाबत प्रस्तुतच्या तक्रारी आहेत. चारही तक्रार अर्जातील अर्जदार मौजे झरी ता.जि.परभणी गावचे रहिवासी असून चारही तक्रार अर्जातील तक्रारींचे स्वरुप एकसारखेच आहे तसेच गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यामध्ये विरुध्द पार्टी असून त्यांनी तक्रार अर्जावर दिलेले लेखी म्हणणेही एकसारखेच असल्याने संयुक्त निकालपत्राव्दारे सर्व प्रकरणाचा निकाल देण्यात येत आहे. अर्जदारांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदार मौजे झरी ता. जि. परभणी येथील रहिवासी शेतकरी आहेत, गैरअर्जदार महामंडळाने सन 2009-10 च्या हंगामात उडीद व मुग या पिकासाठी प्रोक्रुमेंट कार्यक्रम राबविण्यासाठी अर्जदाराच्या गांवाची निवड केली होती त्यानुसार अर्जदारांनी उडीद टी.पी.यु.1 टी.एफ.जातीच्या बियाणांची पेरणी करुन उत्पन्न घेतल्यानंतर माहे ऑक्टोबर 2009 मध्ये गैरअर्जदारास विकले व पावत्या घेतल्या.अर्जदारांचे म्हणणे असे की,गैरअर्जदारांने स्कीम जाहीर करतेवेळी शेतकरी आपला माल महामंडळाकडे विकण्यास ज्या वेळी घेवुन येतील त्यावेळी त्या जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या पंधरवड्यातील जो जास्तीचा दर असेल त्या दरात माल विकत घेतला जाईल व प्रती क्वींटल बोनस देण्यात येईल.असे ठरले होते.अर्जदाराने महामंडळाकडे उडीद माल विकला होता त्या पंधरवड्यात कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे उडीद मालाची आवक नव्हती म्हणून जवळच्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा त्या पंधरवड्यातील दर गैरअर्जदाराने विचारात घेतला पाहिजे होता.लातूरचा दर त्यावेळी प्रती क्वींटल रु.6,101/- होता मात्र गैरअर्जदाराने त्या ऐवजी रु.5,161/- या दराने अर्जदारांना किमत अदा केली त्यामुळे फरकाची रक्कम गैरअर्जदाराकडून मिळाली पाहिजे यासाठी प्रस्तुत तक्रार अर्जाव्दारे ग्राहक मंचातून दाद मागितली असून प्रकरण 70/11 मधील अर्जदाराने रु.70,034/-, प्रकरण 71/11 मधील अर्जदाराने रु. 23,694/-, प्रकरण 72/11 मधील अर्जदाराने रु.45,936/- आणि प्रकरण 73/11 मधील अर्जदाराने रु. 65,506/- याप्रमाणे फरकाची रक्कम 12 टक्के व्याजासह मिळावी व नुकसान भरपाई रु.10,000/- प्रत्येकी मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदारांची शपथपत्रे (नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 6 लगत गैरअर्जदारास उडीद माल विकल्याची पावती, लातूर बाजार समितीचा अहवाल, गैरअर्जदारास वकिला मार्फत पाठविलेल्या नोटीसीची स्थळप्रती व पोस्टाच्या पावत्या वगैर प्रत्येकी 7 कागदपत्रे दाखल केले आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांस मंचातर्फे नोटिस पाठविल्यावर तारीख 26/04/2011 रोजी आपले लेखी म्हणणे (नि.11) दाखल केले आहे. त्यामध्ये सुरवातीलाच तक्रार अर्जाबाबत असा कायदेशीर आक्षेप घेतला आहे की, अर्जदाराना दिलेले बियाणे हे बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यासाठी दिलेले होते तसा महाबीज व अर्जदारांशी करार झालेला होता करारानुसार सामनेवाला यांच्या तांत्रीक व्यक्तिच्या सल्यानुसार बियाण्याची लागवड करावयाची होती व आलेल्या उत्पादनाची विक्री सामनेवाला यानाच करण्याचे होते. उभयंता मधील करार व्यापारी स्वरुपाचा होता त्यामुळे गैरअर्जदाराचा ग्राहक म्हणून अर्जदारांच्या तक्रारी ग्राहक संरक्षण कायद्याखाली चालण्यास पात्र नाहीत त्या फेटाळण्यात याव्यात.गैरअर्जदाराचे पुढे म्हणणे असे की, उडीद मालची आवक तारीख 01/11/2009 ते 15/11/2009 या पंधरवड्यात परभणी, गंगाखेड, बसमत व हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो दर असेल तो दर अधिक 300 रु.बोनस देण्याचे आदेश केले होते.मात्र अर्जदारांनी त्या लातूर येथील दर (भाव) विचारात घेतला आहे.लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही परभणी जिल्हयाच्या जवळची नाही त्यामुळे त्या बाजार समितीचा भाव मुळीच गृहीत धरता येणार नाही. तक्रार अर्जातील बाकीचा बराचसा मजकूर वैयक्तिक माहिती अभावी नाकारला आहे. सबब अर्जदारांच्या तक्रारी वरील कारणास्तव खर्चासह फेटाळण्यात यावेत अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र ( नि.12) सर्व प्रकरणात दाखल केले आहे. आणि पुराव्यातील कागदपत्रात नोटीस उत्तराची स्थळप्रत, पोस्टाची पावती वगैरे तीन कागदपत्रे दाखल केले आहेत. प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्यावेळी अर्जदारा तर्फे अड एस.टी.अडकीणे व गैरअर्जदारातर्फे अड डि.यू.दराडे यांनी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर 1) अर्जदारांची तक्रार गैरअर्जदारांचा ‘’ ग्राहक ‘’ म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याखाली चालणेस पात्र आहे काय ? नाही. 2) निर्णय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदारांनी सन 2009 ते 2010 च्या हंगामात गैरअर्जदाराकडून टी.पी.यु.1 टी.एफ. वाणाचे उडीद बियाणे प्राक्रुमेंट स्कीम अंतर्गत पेरुन बियाणांचे उत्पन्न माहे ऑक्टोबर 2009 मध्ये गैरअर्जदारांना प्रती क्वींटल रु. 5,161/- या दराने विकलेले होते.ही अडमिटेड फॅक्ट आहे.त्याबद्दल गैरअर्जदाराने सर्टीफिकेट वजा पावत्या अर्जदारांना दिलेल्या होत्या त्या पावत्या (नि.6/1 + 2) तक्रार अर्जासोबत पुराव्यात दाखल केलेल्या आहेत.अर्जदार व गैरअर्जदार या उभयतां मध्ये ठरलेल्या करारा प्रमाणे तथा गैरअर्जदारातर्फे राबवण्यात आलेल्या उडीद व मुग पिकाच्या उत्पन्ना बाबत जाहीर केलेल्या प्रोकुमेंट स्कीम प्रमाणे गैरअर्जदाराच्या टी.पी.यु.1 टी.एफ. वाणाच्या उडीद बियाणांचे उत्पन्न घेतल्यावर त्याची पुनर्विक्री गैरअर्जदारास केलेली असल्यामुळे त्या व्यवहारा मध्ये अर्जदार हे विक्रेता होतात असाच यातून स्पष्ट अर्थ निघतो.त्यामुळे अर्थात अर्जदारानी प्रस्तुत तक्रार अर्जातून गैरअर्जदाराचा ग्राहक “ ग्राहक ” म्हणून मागीतलेली दाद ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (डी) मधील ग्राहक व्याख्ये मध्ये बसत नाही. अर्जदारांनी शेतातून घेतलेल्या उत्पन्नाची पुनर्विक्री केलेली असल्यामुळे अर्जदारांच्या तक्रारी गैरअर्जदारांचे ग्राहक म्हणून ग्राहक मंचात मुळीच चालणेस पात्र नाही. असे आमचे मत आहे. गैरअर्जदारतर्फे अड.डि.यु.दराडे यांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्य आयोगापुढे चाललेल्या अपिलांच्या निकालाची कॉपी दाखल केलेली आहे.त्यामध्ये मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने देखील अपील क्रमांक 539/98 , 542/99, 1460/98, 1729/99, 1735/99, 1736/99 182 ते 193/2001, 135 ते 136/2003 वगैरे अपीलामध्ये दिनांक 05.10.2004 रोजी कॉमन जजमेंटमध्ये असे मत व्यक्त केले आहे की, Seeds supplied to the complainants were on the basis of foundation seeds as per arrangements reached between the parties . In that the farmers were supplied seeds by the seeds producers with understanding to by back the products. Similar was the position in the judgment of National Commission in Shakti Suger Mills Ltd it was held that status of complainant would be that of seller as well and that been so the complainant cannot claim status of consumer. अशाच प्रकारचे मत रिपोर्टेड केस 1999(2) सी.पी.जे. पान 4 शक्ती शुगर मिल्स विरुध्द श्रीधर शाह वगैरे ( मा.राष्ट्रीय आयोग ) मध्ये व्यक्त केले आहे मा. राष्ट्रीय आयोगाने आणि मा. राज्य आयोग मुंबई यानी व्यक्त केलेल्या मता प्रमाणेच अर्जदाराच्या तक्रार प्रकरणांची वस्तूस्थिती असल्यामुळे अर्जदाराची तक्रार निश्चीतपणेच ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (डी) मधील व्याख्येनुसार गैरअर्जदारांचे ग्राहक म्हणून मंचात चालणेस पात्र नाहीत. चारही प्रकरणातील तक्रारींचा मेरीटमध्ये निर्णय दयावयाचा झाल्यास देखील असे दिसून येते की, सर्व तक्रारींचा वाद विषय रिकव्हरी तथा रक्कम वसुलीच्या बाबतीतील असल्यामुळे अशा प्रकारच्या तक्रारी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाही.तसेच अर्जदारांनी गैरअर्जदारास विकलेल्या उडीद मालाचा दर परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्या पंधरवड्यातील दरा प्रमाणे अगर नजिकच्या जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या दरा प्रमाणे किंमत देण्याचे ठरले होते असे अर्जदारांनीच आपल्या तक्रार अर्जात नमुद केलेले आहे मात्र फरकासाठी त्यांनी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा दर गृहीत धरुन त्या दराप्रमाणे गैरअर्जदाराने अर्जदारांचा माल विकत न घेता कमी दराने घेतला म्हणून त्या फरकाच्या रक्कमेची मागणी केलेली आहे.परंतु मुळातच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीही परभणी जिल्हयाच्या नजिकची तथा जवळची मुळीच नाही परभणी जिल्हयाच्या नजिक हिंगोली, बसमत कृषी उत्पन्न बाजार समितीही जवळची केंद्रे असल्याने त्यांनी दिलेला दर विचारात घेवुनच गैरअर्जदारांने अर्जदारांच्या मालाची किंमत दिलेली असल्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द केलेली तक्रार निश्चित चुकीची आहे हे स्पष्ट होते.तक्रार अर्जातून अजदारांनी केलेली मागणी गैर व करार बाह्य असल्यामुळे मुळीच विचारात घेता येणार नाही.याही कारणास्त तक्रारी फेटाळण्यास पात्र ठरतात. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1) तक्रार अर्ज क्रमांक 70/2011, 71/2011, 72/2011 आणि तक्रार अर्ज क्रमांक 73/2011 फेटाळण्यात येत आहे. 2) पक्षकारांनी आपला खर्च आपण स्वतः सोसावा. 3) निकाल पत्राची मुळ प्रत प्रकरण क्रमांक 70/2011 मध्ये ठेवण्यात यावी व छायाप्रती इतर तीन प्रकरणात ठेवाव्यात. 4) पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल . सौ.सुजाता जोशी. श्री. सी.बी. पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Anita Ostwal] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT | |