निकालपत्र तक्रारदाखलदिनांकः- 02/07/2010 तक्रारनोदणीदिनांकः- 05/07/2010 तक्रारनिकालदिनांकः- 02/11/2010 कालावधी 03 महिने 26 दिवस जिल्हाग्राहकतक्रारनिवारणन्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांतबी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाताजोशीB.Sc.LL.B. सौ.अनिताओस्तवालM.Sc. बारलिंग पिता गनाबुवा गिरी . अर्जदार वय 45 वर्षे.धंदा शेती. अड.जे.बी.गिरी रा.रुमणा (जवळा) ता.गंगाखेड जि.परभणी. विरुध्द 1 जिल्हा व्यवस्थापक . गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अड.डि.यू.दराडे जिल्हा कार्यालय, परभणी. 2 महाव्यवस्थापक अड.डि.यू.दराडे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ विपणन विभाग, महाबिज भवन, अमरावती रोड, अकोला. 3 व्यवस्थापक अड.ए.आर.अत्रे केंद्रीय कापूस संशोधन संस्था ( C.I.C.R ) नागपूर. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाताजोशी. सदस्या. 3) सौ.अनिताओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष ) निकृष्ठ दर्जाच्या कपाशी वियाणाबद्यलची प्रस्तुतची तक्रार आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत खालील प्रमाणे. अर्जदार रुमणा (जवळा.) ता.गंगाखेड येथील शेतकरी आहे. जुन 2009 मध्ये त्याच्या मालकीच्या गट नं 147 मधील 0.80 क्षेत्रात कपाशी पीक घेण्यासाठी त्याने गैरअर्जदाराकडून एन.एच.एच.44 बी.टी वाणाची लॉट क्रमांक 26509 मधील 2 पिशव्या प्रत्येकी रुपये 400/- प्रमाणे खरेदी केल्या होत्या लागवडीनंतर वाढ झालेल्या रोंपाची फक्त 23 % जास्त प्रमाणात कायीक वाढ झाल्याचे दिसून आले. रोपाना बोंडे अतिशय कमी प्रमाणात लागली होती तसेच रोपावर अळीचा प्रादुर्भाव झालेला होता. त्यामुळे अर्जदाराने कृषी अधिकारी जिल्हा परीषद, परभणी यांचेकडे तक्रार दिली त्यानुसार त्यानी 30.10.2009 रोजी शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली व अहवाल दिला शिवाय दिनांक 05.10.2009 रोजी अग्रोनॉमी वरीष्ठ वैज्ञानिकानेही पाहाणी केली होती. अर्जदाराचे म्हणणे असे की, खराब बियाणेमुळे एकरी 20 क्विंटल उत्पादन बुडालेने 2 एकरातील प्रति क्विंटल दर रुपये 3200/- प्रमाणे एकूण रुपये 1,28,000/- चे अर्थिक नुकसान झाले. त्याला गैरअर्जदार सर्वस्वी जबाबदार आहेत. ती नुकसान भरपाई मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे पाठपुरावा केला परंतू त्यानी दाद दिली नाही त्यानंतर अर्जदाराने वकिला मार्फत दिनांक 28.04.2010 रोजी नोटीस पाठवुन नुकसान भरपाईची मागणी केली होती परंतु नोटीस उत्तरातून त्यानी नुकसान भरपाई देण्याचे नाकारले म्हणून कायदेशिर दाद मिळणेसाठी अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन अपेक्षीत उत्पन्नाची नुकसान भरपाई रुपये 120000/- मानसिकत्रासा बद्दल रु.10,000/- गैरअर्जदारांकडून संयुक्तीतकरत्या मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि.2 ) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत एकुण 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटिसा पाठविल्यावर गैरअर्जदार नं 1 व 2 तर्फे एकत्रीत दिनांक 16.08.2010 आणि गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे दिनांक 08.10.2010 रोजी आपले लेखी जबाब अनुक्रमे नि.19 व नि.19) दाखल केले. गैरअर्जदार नं 1 व 2 यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.10) सुरवातीलाच असा आक्षेप घेतला आहे की, अर्जदार त्यांचा ग्राहक नाही. अर्जदाराने खरेदी केलेल्या बियाणाचे त्यानी फक्त वाटप केले होते व दिलेले बियाणे प्रयोगीक तत्वावर वितरीत केलेले होते त्यामुळे तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा. त्यांचे पुढे म्हणणे असे की, गैरअर्जदार क्रमांक 3 यानी कपाशी बियाणाची उत्पादीत व विकसीत केलेले वाणाची बियाणे जी अर्जदाराने खरेदी केली होती त्याचा नाममात्र मोबदला घेतला होता व प्रायोगीक तत्वावरच ठराविक शेतक-याना ती पुरविण्यात आलेली होती. अर्जदाराने बियाणाची पेरणी केल्यावर रोपांची कायीक वाढ झाली, तुरळक प्रमाणात बोंडे लागली वगैरे तक्रार अर्जातील मजकूर त्यानी साफ नाकारुन त्यासंबधीच्या नुकसानीस गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 हे मुळीच जबाबदार नाहीत असे त्याचे म्हणणे आहे. जिल्हा परीषद कृषी विकास अधिकारी समितीने अर्जदाराच्या शेतातील पिकाचा पाहाणी रिपोर्ट देताना शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचा अवलंब केलेला नाही. पेरलेल्या बियाण्यापासून चांगले उत्पन्न मिळणेसाठी पेरणीची पध्दत जमिनीची प्रत, हवामान, आर्द्रता पाणी पुरवठा, व आवश्यक ती खते/ओषधे या बाबी विशेषतः पाहावे लागते व काळजी घ्यावी लागते. अर्जदाराच्या शेतातील पिकांची गैरअर्जदार क्रमांक 3 याच्या वैज्ञानिकाने प्रत्यक्ष पाहाणी केली होती त्यावेळी वरील गोष्टीचा त्याना अभाव दिसून आला होता. त्यासंबधीचा अहवाल ही तयार केला होता. अर्जदाराला वितरीत केलेले बियाणे मुळीच सदोष नव्हते अर्जदारा खेरीज जिल्हायातील आणखी 11 शेतक-याना तेच बियाणे वितरीत केले होते त्यानी पेरलेल्या बियाण्याबद्यल कोणतीही तक्रार आलेली नाही. अर्जदाराने बियाणे पेरल्यानंतर पिकांची योग्य ती पुरेशी काळजी न घेतल्यामुळे नुकसानीस त्याचा तोच जबाबदार आहे . अर्जदाराने नुकसान भरपाईची मागणी संदर्भात वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीशीला देखील तसे रितसर उत्तर पाठविलेले होते तरीदेखील नुकसान भरपाईची गैरअर्जदाराविरुध्द खोटी काल्पनिक तक्रार ग्राहक मंचात केली आहे. अर्जदाराला दिलेले बियाणे सदोष होते हे कायदेशीरपणे सिध्द होण्यासाठी या संदर्भात ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 13 (ब) मधील अर्जदाराने पूर्तता केलेली नाही. बियाणाची तपासणी केलेल्या निष्कर्षाखेरीज बियाणे सदोषतेची तक्रार चालणेस मुळीच पात्र नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी लेखी जबाबाच्या शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार 1 चे शपथपत्र (नि.16) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.17 लगत एकूण 6 कागदपत्रे दाखल केलेले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 3 यानी आपल्या लेखी जबाबात ( नि.19) तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन असे निवेदन केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 हे बियाणे उत्पादक नाहीत व त्यानी अर्जदाराला NHH 44 BT वाणाचे बियाणे विकलेले नव्हते त्यामुळे त्याचे विरुध्द ही तक्रार फेटाळण्यात यावी. त्यांच्या संस्थेमधून विविध प्रकारची बियाणे केंद्र सरकारच्या अर्थ सहायातून विकासीत केली जातात महाराष्ट्रा खेरीज हरीयाणा व तामीळनाडू राज्यातही तशी केंद्रे ( संस्था ) आहेत. विकासीत केलेले बियाणे विक्रीकरता नसून गुणात्मक कार्यक्रमासाठी शेतक-याना वापरण्यास दिले जातात. अर्जदाराने खरेदी केलेल्या वाणाचे बियाणे धारवाड येथील संस्थेने विकसीत केलेले असून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे वितरीत केले आहेत. वितरीत करण्यापूर्वी त्या लॉट नंबर्स मधील बियाणांची आवश्यक ती प्रयोगीक चाचणी/ तपासणी करुन मगच ते वितरीत केलेले आहेत पेरणीनंतर घ्यावयाची काळजी या बाबीही त्यावर छापलेल्या आहेत शिवाय स्वतंत्र माहिती पत्रकही प्रसिध्द केलेले आहे ते बियाणे खरेदी केलेल्या शेतक-याना त्यावेळी पुरविली होती परंतू पेरणीनंतर अर्जदाराने योग्य ते पालन व काळजी घेतली नव्हती हे अर्जदाराच्या शेतातील पिकांची प्रत्यक्ष पाहाणी केली त्यावेळी दिसून आले होते. अर्जदाराखेरीज जिल्हयातील ज्या इतर शेतक-यांना संबंधीत बियाणे वितरीत केलेले होते त्यापैकी एकाचीही बियाणाच्या सदोषबद्यल त्याचेकडे तक्रार आलेली नव्हती व संबंधीत बियाणे उत्कृष्ठ दर्जाचे असून एका रोपाला किमान 70 ते 80 बोंडे येतात व उत्पन्न चांगले मिळते हा शेतक-यानी अनुभव घेतला आहे. अर्जदाराने त्याचे विरुध्द खोटी केस दाखल केली आहे असे त्याचे म्हणणे आहे म्हणून सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी लेखी जबाबाच्या शेवटी विनंती केली आहे. तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदाराचे शपथपत्र (नि.20) व नि. 21 लगत NHH 44 BT कपाशी बियाणाचे माहितीपत्रक, पॉलीथीन बॅग कव्हर, बियाण्याचे प्रयोग शाळेत केलेला तपासणी रिपोर्ट अशी एकूण 3 कागदपत्रे दाखल केलेले आहेत. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदारातर्फे अड.गिरी व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 तर्फे अड डि.यू.दराडे यांनी युक्तीवाद केला व गैरअर्जदार क्रमांक 3 तर्फे कोणीही युक्तिवादासाठी उपस्थित नसल्याने उपलब्ध कागदपत्रे विचारात घेवून मेरीटवर प्रकरणाचा अंतीम निकाल देण्यात येत आहे.. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय. 2 गैरअर्जदारानी अर्जदाराकडून मोबदला घेवून वितरीत केलेले NHH 44 BT कपाशी बियाणे सदोष व बियाणे निकृष्ठ दर्जाची देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब अथवा सेवात्रुटी केली हे अर्जदाराने कायदेशिररित्या शाबीत केले आहे काय ? नाही. 3 निर्णय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे. मुद्दा क्रमांक 1 अर्जदाराने NHH 44 BT कपाशी वाणाची संकरीत कपाशी बियाणांची लॉट क्रमांक 26509 मधील प्रती बॅग रुपये 400/- प्रमाणे 2 बॅगा खरेदी केल्या होत्या त्याची खरेदी पावती तक्रार अर्जासोबत दाखल केलेली नसली तरी गैरअर्जदार क्रमांक 1 राज्य बियाणे महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला अर्जदाराने माहिती अधिकाराखाली त्यांचेकडून मागविलेल्या खुलाशाला गैरअर्जदार क्रमांक 1 ने दिनांक 07.11.2009 चे अर्जदारास जे उत्तर ( नि.5/7) पाठविलेले होते त्यामध्ये रुपये 400/- प्रति किलो दराने अर्जदारास बियाणांची विक्री केली होती हे त्यानी मान्य केलेले असल्याने शिवाय अर्जदाराखेरीज जिल्हयातील एकूण 71 शेतक-यांना त्या बियाणाची विक्री केली होती त्यांची यादीही ( नि.5/8) पत्रासोबत जोडलेली असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यानी मोबदला घेवून अर्जदारास बियाणे विकले होते हे शाबीत झालेले आहे त्यामुहे अर्थातच गैरअर्जदाराचा तो निश्चीत ‘’ ग्राहक ‘’ आहे त्यामुळे अर्जदाराची तक्रार गैरअर्जदारांचा ग्राहक म्हणून चालणेस पात्र आहे सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते. मुद्दा क्रमांक 2 व 3 माहे जुन 2009 मध्ये अर्जदाराने गट क्रमांक 147 मधील 0.80 आर क्षेत्रात म्हणजे दोन एकरात गैरअर्जदाराकडून खरेदी केलेल्या NHH 44 BT कपाशी बियाणे पेरले होते पुराव्यात नि.3/10 वर दाखवलेल्या 7/12 उता-यातील नोंदीतून व नि. 5/9 वरील क्षेत्रनिरीक्षण अहवालावरुन शाबीत झाली आहे. बियाणाची पेरणी केल्यावर पिकांची वाढ बोंडे लागण्याइतपत झाल्यावर रोंपाची फकत कायीक वाढच झाल्याचे दिसून आले. रोपाना तुरळक प्रमाणात बोंडे लागले होती शिवाय रोपावर किडीचाही प्रादुर्भाव झालेला दिसला असेही तक्रार अर्जात कथन केले आहे. ते कृषी अधिका-याच्या अहवालातील अभिप्रायावरुनच दिलेले दिसते कारण जि.प. कृ.वि.अधिकारी यांच्या समितीने दिनांक 30.10.2010 रोजी शेतात पिकांची पाहाणी करुन दिलेल्या अहवाल पुराव्यात नि. 5/9 दाखल केलेला आहे त्या अहवालाच्या शेवटी असा अभिप्राय दिला आहे की, - कापूस क्षेत्राची पाहाणी केली असता 0.80 आर क्षेत्रावर NHH 44 BT कपासाची लागवड केली आहे. कापसाच्या लागवडीच्या 23 % क्षेत्रावर कापसाच्या झाडाची कायीक वाढ जास्त प्रमाणात होवून पाणे व बोंडे अतीशय कमी प्रमाणात लागलेले आहे. तसेच या झाडावर बोंड आळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे शेतक-याचे नुकसान झालले आहे ‘’ तक्रार निवारण समितीने दिलेल्या या अभिप्रायामध्ये झाडावर किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून आला होता त्याअर्थी किडीमुळेच 23 % बोंडे तुरळक प्रमाणात उरली असावीत म्हणजेच 77 % रोपावरील बोंडे चांगली होती असाच यातून निष्कर्ष निघतो. अर्जदाराने पेरणीनंतर त्याबाबत योग्य त्या वेळी आवश्यक ती काळजी उदाः किड नियंत्रण औषधी फवारणी न केल्यामुळे 23 % रोपावर परीणाम झाला असला पाहीजे हे यातून स्पष्ट होते अहवालातील अ. नं. 5 पेरणीच्या वेळी वापरलेली खते या तपशीलापुढे व अ.न.7 पेरणीच्या वेळी वापरलेली कीडकनाशके या तपशीलापुढे रासायनिक खते व किडकनाशकांचा उल्लेख केलेला आहे परंतू अर्जदाराने ती पिकासाठी वापरली होती हे शाबीत करण्यासाठी खते/किटकनाशक खरेदीच्या पावत्या किंवा लेबल्स प्रकरणात दाखल केलेले नाही त्यामुळे केवळ अहवालातील नोंदीवरुन ग्राहय धरता येणे कठीण आहे. याखेरीज सदर अहवालात ब-याच त्रुटी व विसंगती जाणवतात त्या अशा की,बियाणांची उगवण झाली नाही किंवा भेसळयुक्त व निकृष्ठ दर्जाचे बियाणे या संबंधी शेतक-याने कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांचेकडे लेखी तक्रार केल्यावर त्याबाबत अनुसरावयाच्या कार्यपध्दती बाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य कृषी संचालनालयाने तारीख 10 जुन 82 व 2 जानेवारी 84 रोजी परिपत्रक क्युसीसी/कंप्लेंट/3083/कृषी 66 तसेच तारीख 27/3/92 रोजीचे परिपत्रक गु नि यो /बियाणे/स्थां.ज./5/92/का.66 प्रसिध्द केलेले आहे. त्यामध्ये दिलेल्या मार्गदर्शना प्रमाणे प्रकरणातील बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल नाही वास्तविक मार्गदर्शक सुचनां प्रमाणे समितीचे सर्व सदस्य व ज्या उत्पादका विरुध्द तक्रार आहे त्याचे समक्ष पिकांची पाहाणी करुन अहवाल देणे बंधनकारक असताना त्याप्रमाणे नि.5/4 वरील अहवाल देण्यापूर्वी समितीने दक्षता घेतलेली दिसत नाही व व त्याची अंमलबजावणी केलेली नाही शेतक-याची तक्रार मिळाल्यावर एक आठवडयाच्या आत शेतात समितीच्या सर्व सात सदस्यांनी भेट देणे बंधनकारक असते पीक पाहाणी केलेल्या वस्तुस्थितीचा पंचनामा ति-हाईत पंच साक्षीदारा समक्ष करणे बंधनकारक असताना पंचनामाही केलेला नाही. बियाणांपैकी फक्त 23 % रोपे उगवली असा अहवालात उल्लेख केला आहे. परंतु ते कशाचे आधारे ठरविले ? याचा खुलासा दिलेला नाही अहवालावर अर्जदाराची आणि ति-हाईत पंच साक्षीदारांच्या नावे / सहया नसल्यामुळे तो अहवाल खरोखर शेतात समक्ष भेट देवुनच केला आहे हे शाबीत होत नाही.या ब-याच त्रुटीमुळे पुराव्यातील बियाणे तक्रार निवारण कमिटीचा अहवाल कायदेशिररित्या ग्राहय धरता येणे कठीण आहे. उलट गैरअर्जदारातर्फे पुराव्यात नि. 18/1 वर दाखल केलेला संयुक्तीक तपासणी अहवाल जो गैरअर्जदाराच्या वैज्ञानिक प्रतिनीधीने जिल्हयातील ज्या शेतक-यानी तथाकथीत वाहनाचे बियाण्याची पेरणी केली होती त्यांच्या शेतातील पिकांची समक्ष पाहाणी करुन दिलेल्या दिनांक 05.10.2009 च्या संयुक्त अहवालाचे अवलोकन केले असता त्यामध्ये अर्जदाराखेरीज इतर कोणचीही तक्रार बियाण्याच्या वाढीबद्यल अथवा सदोषते बद्यल नसल्याचे दिसते यावरुन बियाणे सदोष नव्हते असा निष्कर्ष निघतो अर्जदाराने पेरणीनंतर योग्य ती काळजी न घेतल्यामुळे किडीच्या प्रादुर्भावामुळे 23 % रोपावरील बोंडे तुरळक दिसली हेच यातून सिध्द झाले आहे एवढेच नव्हेतर गैरअर्जदार क्रमांक 3 यानी लेखी जबाबासोबत नि. 21 लगत NHH 44 BT संकरीत कपाशी बियाणे विकासीत केल्यावर वितरीत करण्यापूर्वी समुचीत प्रयोग शाळेत त्याची तपासणी केल्याचा अहवाल ( सिड टेस्टींग रिपोर्ट ) सादर केलेला आहे त्या रिपोर्टचे ( नि.21/1) बारकाईने अवलोकन केले असता गैरअर्जदाराने विकसीत केलेली संबंधीत वाणाच्या बियाण्यामध्ये 94 % उगवण शक्ती आणि 99 % शुध्दता असल्याचे तपासणी उल्लेख आहे त्यामुळे सदर बियाणे मुळीच सदोष नव्हते याबद्यल कोणतीही शंका उरत नाही. क्षेत्र निरीक्षण अहवालातील वर नमुद केलेल्या त्रुटी खेरीज तक्रार अर्जाबाबत इतरही शंकास्पद बाबी उपस्थीत राहतात त्यामध्ये 1) उगवण झाली नाही म्हणून बियाणे सदोष आहे अशी शंका त्यांना आली होती म्हंटल्यानंतर बियाणे विक्रेता किंवा उत्पादकाकडे त्याबाबत का तक्रार केली नाही ? त्याचा कोणताही पुरावा मंचापुढे दिलेला नाही.किंवा तक्रार अर्जामध्येही तक्रार केल्याचा उल्लेख नाही. 2) ग्राहक मंचात र्गरअर्जदारा विरुध्द पस्तुतच्या तक्रारी दाखल केल्यानंतर खरेदी केलेले बियाणे सदोष किंवा निकृष्ट दर्जाचे होते हे कायदेशिररीत्या शाबीत करण्यासाठी गैरअर्जदाराकडे तथाकथीत बियाणांचे नमुने समुचित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणेत यावेत म्हणून ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 13 (1) (क) मधील तरतुदी प्रमाणे मंचाकडे प्रकरणाच्या अंतिम सुनावणीच्या नेमले तारखे पर्यंतही दरम्यानच्या काळात मागणी केलेली नाही.अथवा त्याबाबत आग्रह धरलेला नाही.ही देखील मोठी कायदेशिर त्रुटी राहिलेली आहे.खरेदी केलेले बियाणे सदोष व उगवण क्षमता नसलेले होते.या कारणास्तव अर्जदाराने नुकसान भरपाईसाठी गैरअर्जदारा विरुध्द कायदेशिर दाद मागीतल्यावर बियाणे सदोष आहेत हे शाबीत करण्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदारावरच येते आणि बियाणांच्या प्रयोगशाळेतील तपासणीतील निष्कर्षा खेरीज ते सदोष अथवा निकृष्ठ आहेत हे कायदेशिररित्या ग्राहय धरता येत नाही. तोच एकमेव सबळ पुरावा ठरतो.या संदर्भात (1) रिपोर्टेड केस 2009 (2) सी.पी.जे.पान 414 (महाराष्ट्र राज्य आयोग) Field inspected by committee – Report of committee could not be acted upon as expert if not associated as required by Govt. Resolution – Seed Defective not proved – No Relief entitled. (2) रिपोर्टेड केस 2008 (3) सी.पी.आर.पान 260 ( महाराष्ट्र राज्य आयोग ) मध्ये असे मत व्यक्त केले आहे की, Seed Committee report placed on record not at all sufficient to establish infirior quality of seeds (3) रिपोर्टेड केस (अ ) 2007 (2) सी.पी.जे.पान 148 ( राष्ट्रीय आयोग ) (ब ) 2008 (2) सी.पी.आर.पान 193 (राष्ट्रीय आयोग) When there was no laboratory testing report, then complaint was liable to be dismissed. (4) रिपोर्टेड केस 2003 (3) सी.पी.जे पान 628 या प्रकरणात देखील मा.महाराष्ट्र राज्य आयोगाने वरील प्रमाणेच मत व्यक्त केले आहे. (5) रिपोर्टेड केस 2009 (1) सी.पी.आर.पान 182 (राष्ट्रीय आयोग) Question of quality of seeds is to be determined procedure contemplated under section 13 (1) (c) of Consumer Protection Act and not on the besis of assumption or presumption . (6) रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.जे.पान 266 ( राष्ट्रीय आयोग ) If Laboratory testing report supports the seed manufacturer that seed was of 99.6 % purity. Then he is not liable for any compensation वरील सर्व रिपोर्टेड केसेस मध्ये व्यक्त केलेली मते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडतात कंपनीने उत्पादित केलेले बियाणे मार्केटमध्ये वितरीत करण्यापूर्वी त्यांच्या उगवण क्षमते विषयी प्रायोगिक तपासणी केलेल्या अहवालाची छायाप्रत ( नि. 21/1 ) दाखल केलेली आहे त्यामध्ये उगवण क्षमता 93 % व शुध्दता 99 % टक्के असल्याचे तपासणी मध्ये आढळून आलेले होते. असे नमुद केलेले आहे. रिपोर्टच्या शेवटी उगवण क्षमता चांगली विक्रीयोग्य असल्याचा अभिप्रायही दिलेला असल्यामुळे बियाणे मुळीच सदोष नव्हते हे पुराव्यातून स्पष्ट होते तरी परंतू उगवण चांगल्या प्रकारे न होण्यापाठीमागे केवळ बियाणे सदोष आहेत हाच एक निकष नाही जमिनीची प्रत, आर्द्रता, औषधे, खते यावरही उगवण क्षमता अवलंबून असते त्यामुळे असा आरोप केल्यानंतर तो काटेकोरपणे शाबीत करण्याची अर्जदारांची जबाबदारी होती परंतु तो शाबीत झालेला नाही. त्यामुळे अर्जदार कोणतीही नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत. सबब,मुद्दा क्रमांक 1 व 3 चे उत्तर नकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते. 2 पक्षकारानी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |