सरा मजला, फ्लॅट नं.302, सोलापूर. 8. श्री. सूर्यकांत सनके, वय 44 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. तिसरा मजला, फ्लॅट नं.303, सोलापूर. 9. श्री. दत्तात्रय सोनावणे, वय 55 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. तिसरा मजला, फ्लॅट नं.304, सोलापूर. 10. श्रीमती मंजुळाबाई चिल्लाळ, वय 47 वर्षे, व्यवसाय : घरकाम, रा. चौथा मजला, फ्लॅट नं.401, सोलापूर. 11. श्री. वसंतराव गायकवाड, वय 52 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. चौथा मजला, फ्लॅट नं.402, सोलापूर. 12. श्री. दशरथ कैय्यावाले, वय 48 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. चौथा मजला, फ्लॅट नं.403, सोलापूर. 13. श्री. शिवयोगीअप्पा पंचपा उंबरजे, वय 48 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. चौथा मजला, फ्लॅट नं.404, सोलापूर. तक्रारदार 14. श्रीमती तनुजा डाके, वय 44 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. पाचवा मजला, फ्लॅट नं.501, सोलापूर. 15. श्री. संतोष गहिरवार, वय 48 वर्षे, व्यवसाय : नोकरी, रा. पाचवा मजला, फ्लॅट नं.501-अ, सोलापूर. 16. श्री. संजय केशवलाल शाह, वय 51 वर्षे, व्यवसाय : व्यापार, रा. पाचवा मजला, फ्लॅट नं.502, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. मे. दिशा कन्स्ट्रक्शन्स्, पत्ता : 632/633, शुक्रवार पेठ, सोलापूर. (सदर भागिदारी फर्मची नोटीस विरुध्द पक्ष क्र.2 वर बजावावी.) 2. मे. दिशा कन्स्ट्रक्शन्स् तर्फे भागिदार : श्री. कल्याणी शंकरराव बिराजदार, वय 47 वर्षे, व्यवसाय : बांधकाम व्यवसाय, पत्ता : 632/633, शुक्रवार पेठ, सोलापूर. 3. मे. दिशा कन्स्ट्रक्शन्सचे भागिदार : श्री. मनोज गजकुमार शहा, वय 46 वर्षे, व्यवसाय : बांधकाम व्यवसाय, पत्ता : वरीलप्रमाणे. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : एन.आर. देगांवकर विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : यु.बी. मराठे आदेश सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, विरुध्द पक्ष यांनी शहर सोलापूर येथील म्यु.घर नं.161, रेल्वे लाईन्स्, सोलापूर, सिटी स.नं. 8391/2अ/1/1 मध्ये ‘दिशा रिजन्सी’ या नांवे अपार्टमेंट बांधलेले आहे. सदर अपार्टमेंटचे ‘दिशा रेजन्सी सी विंग’ नांवे दि.3/7/2004 रोजी रजिस्टर्ड डीड ऑफ डिक्लेरेशन करण्यात आले आहे. विरुध्द पक्ष यांनी बांधकाम परवानगी क्र.1037 अन्वये पाणी पुनर्भरण योजना पूर्ण केली नाही. तसेच इमारतीमध्ये सौर उर्जेद्वारे पाणी तापविण्याची उपकरणे बसविली नाहीत. प्रत्येक मजल्यावर अग्निरोधक यंत्रणा व आग विझविण्यासाठी 24 तास पुरेशा प्रमाणात पाणी साठविण्याची टाकी बांधलेली नाही. फ्लॅटधारक श्री. दावडा यांना ‘दिशा रेजन्सी सी विंग’ मिळकतीच्या 4 पार्किंगची जागा विरुध्द पक्ष यांनी बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. तसेच पार्किंगच्या दक्षीण बाजूस विरुध्द पक्ष यांनी ट्रान्सफार्मर बसविला आहे. विरुध्द पक्ष यांनी त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली नाही. तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीमध्ये पुढे असे नमूद केले आहे की, विरुध्द पक्ष यांनी पार्किंगची जागा विक्री केल्यामुळे लिफ्टकडे जाता येत नाही. ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीमध्ये बसविलेली लिफ्ट सुस्थितीत नाही. टी.व्ही. व दूरध्वनीचे वायरींग योग्य केले नाही. ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीस प्राप्त बांधकाम परवानगीप्रमाणे बांधकाम पूर्ण न करता अपूर्ण ठेवले आहे. ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीचे रंगकाम अर्धवट ठेवले आहे. पार्किंगच्या जागेमध्ये फ्लोअरींग अर्धवट आहे आणि कॉंक्रीट ब्लॉक व्यवस्थित पूर्ण करुन दिले आहे. विरुध्द पक्ष यांची पाचव्या मजल्याचे डीड ऑफ डिक्लेरेशन केले नसल्यामुळे सिटी सर्व्हे उता-यास फ्लॅटधारकांची नांवे लावता येत नाहीत. वाचमनसाठी आवश्यक सोई उपलब्ध करुन दिल्या नाहीत. ‘दिशा रेजन्सी सी विंग’ कडे जाणा-या रस्त्याचे काम पूर्ण केले नाही आणि फ्लॅटधारकांच्या नांवाचा बोर्ड लावलेला नाही. फ्लॅटमध्ये पाणी गळती होत आहे. तसेच काही फ्लॅटधारकांना खरेदीखत करुन दिलेले नाही. फ्लॅटचे डीड ऑफ डिक्लेरेशन, फ्लॅटचे प्रत्यक्ष मोजमाप व प्रत्यक्ष खरेदी क्षेत्रात व साठेखतामध्ये तफावत आहे. विरुध्द पक्ष यांनी सदर त्रुटीचे निराकरण करुन देण्याचे मान्य करुनही त्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीद्वारे वर नमूद त्रुटी दूर करुन देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करावा आणि मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांची तक्रार मुदतबाह्य आहे. तक्रारदार यांची तक्रार पुराव्याद्वारे सिध्द होणे आवश्यक आहे. सर्व तक्रारदार यांच्या हक्कामध्ये खरेदीखत करुन देण्यात आले असून त्यावेळी कोणीही तक्रार केलेली नाही. त्यांनी इमारतीमध्ये सौर उर्जेची उपकरणे बसविण्याचे व अग्निरोधक यंत्रणा बसविण्याचे मान्य केलेले नव्हते. त्यांनी नियमाप्रमाणे पुरेसे पार्कींग उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यांनी पुरेसे पाणी उपलब्ध करुन दिलेले आहे. त्यांनी सुस्थितीत लिफ्ट बसविलेली आहे. तसेच त्यांनी कन्सील्ड् वायरींग केलेली आहे. त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की, त्यांनी परवानगीप्रमाणेच बांधकाम केलेले आहे. ते सप्लीमेंटरी डीड ऑफ डिक्लेरेशनची तजवीज करीत असून सदर कृत्य सेवेतील त्रुटी नाही. त्यांनी रस्त्याची सोय उपलब्ध करुन देण्याची हमी दिलेली नव्हती. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. तक्रारदार यांची तक्रार मुदतीच्या आत आहे काय ? होय. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना सन 2004-05 मध्ये फ्लॅट विक्री केले असून तक्रार सन 2009 मध्ये दाखल केल्यामुळे तक्रार मुदतबाह्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तक्रारदार यांच्या तक्रारीचे स्वरुप पाहता, अनेक दोषाविषयीच्या उपस्थित केलेल्या तक्रारी सातत्यपूर्ण आहेत. तक्रारदार यांच्या तक्रारीचे कारण सातत्यपूर्ण असल्यामुळे फ्लॅटची विक्री केल्याची तारीख मुदतीकरिता ग्राह्य धरता येणार नाही आणि तक्रार मुदतीच्या आत दाखल केल्याच्या निर्णयाप्रत आम्ही आलो आहोत. 5. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून ‘दिशा रेजन्सी सी विंग’ अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी केल्याविषयी विवाद नाही. तसेच दि.3/7/2004 रोजी रजिस्टर्ड डीड ऑफ डिक्लेरेशन करुन देण्यात आल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द अनेक तक्रारी उपस्थित केल्या आहेत. विरुध्द पक्ष यांनी त्यास आक्षेप घेऊन त्या अमान्य केल्या आहेत. विशेषत: तक्रारदार यांच्या तक्रारी एकत्रित जागा व सुविधेसंबंधी आहेत. तसेच रेकॉर्डवर इमारतीचा इन्स्पेक्शन रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे. 6. तक्रारदार यांच्या तक्रारी की, विरुध्द पक्ष यांनी बांधकाम परवानगी क्र.1037 अन्वये पाणी पुनर्भरण योजना पूर्ण केली नाही. इमारतीमध्ये सौर उर्जेद्वारे पाणी तापविण्याची उपकरणे बसविली नाहीत. प्रत्येक मजल्यावर अग्निरोधक यंत्रणा व आग विझविण्यासाठी 24 तास पुरेशा प्रमाणात पाणी साठविण्याची टाकी बांधलेली नाही. फ्लॅटधारक श्री. दावडा यांना ‘दिशा रेजन्सी सी विंग’ मिळकतीच्या 4 पार्किंगची जागा विरुध्द पक्ष यांनी बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. पार्किंगच्या दक्षीण बाजूस विरुध्द पक्ष यांनी ट्रान्सफार्मर बसविला आहे. त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली नाही. पार्किंगची जागा विक्री केल्यामुळे लिफ्टकडे जाता येत नाही. ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीमध्ये बसविलेली लिफ्ट सुस्थितीत नाही. टी.व्ही. व दूरध्वनीचे वायरींग योग्य केले नाही. ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीस प्राप्त बांधकाम परवानगीप्रमाणे बांधकाम पूर्ण न करता अपूर्ण ठेवले आहे. ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीचे रंगकाम अर्धवट ठेवले आहे. पार्किंगच्या जागेमध्ये फ्लोअरींग अर्धवट आहे आणि कॉंक्रीट ब्लॉक व्यवस्थित पूर्ण करुन दिले आहे. विरुध्द पक्ष यांची पाचव्या मजल्याचे डीड ऑफ डिक्लेरेशन केले नसल्यामुळे सिटी सर्व्हे उता-यास फ्लॅटधारकांची नांवे लावता येत नाहीत. वाचमनसाठी आवश्यक सोई उपलब्ध करुन दिल्या नाहीत. ‘दिशा रेजन्सी सी विंग’ कडे जाणा-या रस्त्याचे काम पूर्ण केले नाही आणि फ्लॅटधारकांच्या नांवाचा बोर्ड लावलेला नाही. फ्लॅटमध्ये पाणी गळती होत आहे. तसेच काही फ्लॅटधारकांना खरेदीखत करुन दिलेले नाही. फ्लॅटचे डीड ऑफ डिक्लेरेशन, फ्लॅटचे प्रत्यक्ष मोजमाप व प्रत्यक्ष खरेदी क्षेत्रात व साठेखतामध्ये तफावत आहे. 7. रेकॉर्डवर दाखल श्री.बी.एम. जाधव यांचा इन्स्पेक्शन रिपोर्ट पाहता, पाणी पुरवठा व्यवस्था, ड्रेनेज काम, विद्युतीकरण काम, लिफ्टचा मार्ग, पार्किंग व्यवस्था, पावसाच्या पाणी पुनर्भरणाचे काम, अग्निशामक यंत्रणा, सौर उर्जेवर पाणी तापविण्याची व्यवस्था इ. अपु-या असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच पार्किंग जागा प्रमाणशीर नसल्यामुळे वाहन पार्किंग करताना अडचणी येतात. इमारतीच्या दक्षीण-पश्चिम कोप-यावर ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. चार पार्कींग जागा विटाचे बांधकाम करुन बंद करण्यात आली आहे. बॅटरी व युपीएस पार्कींग एरियातील जिन्याखाली ठेवण्यात आले आहे. लिफ्टची सुविधा नाही. पाण्याचे कनेक्शन बंद करण्यात आले आहे. वायरींग सदोष असून इमारतीस लटकत्या स्वरुपात आहेत. 8. विरुध्द पक्ष यांनी इन्स्पेक्शन अहवालास आक्षेप घेतला असून तो मंचाच्या आदेशाशिवाय तयार केल्याचे नमूद केले. आमच्या मते, तक्रारदार यांची तक्रारीनुसार वस्तुस्थिती मंचासमोर येण्यासाठी तक्रारदार यांचा तो प्रयत्न आहे. उलटपक्षी, विरुध्द पक्ष यांनी रिपोर्ट अमान्य केला असला तरी त्यांनी स्वतंत्ररित्या कोणताही पुरावा मंचासमोर सादर केलेला नाही. त्यामुळे रेकॉर्डवर दाखल इन्स्पेक्शन अहवाल विचारात घेणे आवश्यक ठरते. 9 उपरोक्त विवेचनावरुन विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना आवश्यक सोई-सुविधा उपलब्ध न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारदार त्या तक्रारींचे निराकरण होऊन मिळविण्यास पात्र ठरतात. 10. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीस पाणी पुनर्भरण सुविधा करुन द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीस सौर उर्जेद्वारे पाणी तापविण्याची उपकरण बसवून द्यावे. 3. विरुध्द पक्ष यांनी ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीस प्रत्येक मजल्यावर अग्निरोधक यंत्रणा उपलब्ध करुन द्यावी. 4. विरुध्द पक्ष यांनी ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीस अग्रीमेंटमध्ये नमूद केल्याप्रमाणे पार्किंगची जागा उपलब्ध करुन द्यावी. 5. विरुध्द पक्ष यांनी ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीचे अपूर्ण रंगकाम पूर्ण करुन द्यावे. 6. विरुध्द पक्ष यांनी ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीच्या पार्किंग जागेमधील फ्लोअरींग अर्धवट काम पूर्ण करुन द्यावे. 7. विरुध्द पक्ष यांनी ‘दिशा रेजन्सी सी विंग’ इमारतीच्या पाचव्या मजल्याचे डीड ऑफ डिक्लेरेशन करुन द्यावे. 8. विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त आदेशाची पूर्तता या आदेशाच्या प्राप्तीपासून 60 दिवसाचे आत करावी. 9. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.2,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/4311)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |