Maharashtra

Nagpur

CC/784/2021

PRAJIT RANDHEER JAVERY - Complainant(s)

Versus

DIRECTOR/MANAGER OF M/S. DRS DILIP ROADLINES LTD. (BRANCH AGARWAL PACKERS AND MOVERS) - Opp.Party(s)

ADV. MR. MAHESH MASODKAR

31 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/784/2021
( Date of Filing : 21 Dec 2021 )
 
1. PRAJIT RANDHEER JAVERY
R/O. INDRA SARYU, JAVERY COMPLEX, -CHHINDWARA ROAD, CHHAONI, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. DIRECTOR/MANAGER OF M/S. DRS DILIP ROADLINES LTD. (BRANCH AGARWAL PACKERS AND MOVERS)
OFF.AT, 306, 3RD FLOOR, KABRA COMPLEX, 61-MG ROAD, SECUNDERABAD-500003
SECUNDERABAD
TELANGANA
2. THE BRANCH IN CHARGE, NAGPUR BRANCH OF M/S. DRS DILIP ROADLINES LTD.
OFF.AT, FLAT NO.501, CRYSTAL HIGH WAY APARTMENTS, ATHARWA TYRE BUILDING, NEAR MARUTI SEWA, AMARAOTI ROAD NAKA NO.10, WADI, NAGPUR-440023
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. MR. MAHESH MASODKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 31 May 2022
Final Order / Judgement

आदेश

आदेश पारीत व्‍दारा श्री. एस आर आजनेमासदस्‍य

  1. तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35  नुसार दाखल केलेली आहे.
  2. वि.प.क्रं.1 चा समानाचे पॅकींग व वाहतूकीचा व्यवसाय असून वि.प.क्रं.2 हे वि.प.क्रं.1 चे शाखा कार्यालय आहे. तक्रारकर्ता हा चेन्नई येथे आयटी कंपनीमध्‍ये कार्यरत होता व मार्च-2020 ला कोव्हीड-2019 चे महामारीमूळे नागपूर येथे घरुन काम करण्‍याकरिता परत आला व चेन्नई येथे भाडयाने घेतलेल्या घरातील समान चेन्नई येथून नागपूरला आणण्‍याकरिता वि.प.क्रं.1 ची सेवा घेतली आहे व तक्रारदाराने त्यांचे चेन्नई येथील समान 2 बॉक्सेस, 1 सुटकेस, बाईक(बुलेट) टाटा स्काय डीस्क चेन्नई येथे पॅंकीग करुन नागपूर येथे आणण्‍याकरिता वि.प.ला रुपये 17,077/- पावती क्रं.4704165 नुसार अदा केले.
  3. तक्रारकर्ता नागपूर येथे असल्याने त्यांचे त्याचे सामान त्याचे सहयोगी मित्र श्री विष्‍णुप्रसाद बिपीन बिहारीकर यांचे मार्गदर्शनाखाली मे. डीआरएस चे कर्मचारी/प्रतिनीधी यांचे हस्ते पॅकींग करुन घेतले. सदरचे तक्रारदाराचे समान पॅंकीग करुन वि.प.क्रं.1 चे कर्मचारी तक्रारदाराचे राहाते घरी ए-408, पेलीकननेस्‍ट अपार्टमेंन्ट,क्रीक स्‍ट्रीट, स्वोदेश्‍वरी नगर, थोराईपक्कम-600097, चेन्नई , येथुन जीसी नं.4695264 दिनांक 18.7.2020 अन्वये उचल केली. तक्रारदाराला त्यांचे सामान दिनांक 1.8.2020 ला नागपूर येथे प्राप्त झाले.
  4. तक्रारदाराला दिनांक 1.8.2020 ला संध्‍याकाळी सदर पॅकेज त्यांचे वडीलांसमक्ष प्राप्त झाले. त्यावेळी तक्रारदाराचे असे लक्षात आले की, सामानातील एक पॅक बॉक्स गहाळ आहे. वि.प.क्रं.1 चे कर्मचारी जो मालाची डीलेव्हरी देण्‍याकरिता आला त्याला याबाबत काहीही माहिती नव्हते व तो त्यांचे संयुक्तीक कारण देऊ शकला नाही. वि.पक्रं.1 चे कर्मचा-यांनी त्यांचे समान पॅकीग केलेले प्राप्त झालेले सामान जेव्हा उघडले त्यावेळी तक्रारदाराचे लक्षात आले की, ट्रॉली सुटकेसचे कुलुप तुटलेले आहे आणि झीप पूर्णपणे तुटलेली आहे. सूटकेस ही खुल्या अवस्थेत होती. त्यामध्‍ये असलेल्या वस्तुची तपासणी केली असता त्यामधील खालील नमुद वस्तु गहाळ झालेल्या आहेत.

SR.NO.

LIST OF ITEMS

AMOUNT IN Rs.(APPROX)

REMARK

1.

Watches -2 Nos. Fossil

Tommy Hilfiger

Rs.11,000/-

Rs.12,000/-

 

2.

Jacket – 1 nos

Rs.7,000/-

 

 

3.

T Shirts and Shirts 15 Nos.

Rs.22,500/-

 

 

4.

Perfume bottles-  3  nos.

Hugo Boss and Burberry

Rs.12,000/-

 

5.

HDFC Forex card ending with No.9665

 

The said card was blocked by the complainant on 1st August, 2020 as a precautionary measure.

  1. वि.प.क्रं.1च्या कर्मचा-यांनी तक्रारदाराचे सामान ताब्यात घेतल्यावर ते पॅक उघउले आणि सूटकेस चे कुलुप तोडुन व झीप क्षतीग्रस्त करुन सामान चोरले ते स्पष्‍ट आहे आणि परतु सूटकेस कंपनीचे मेटेरियल वापरून रि-पॅक केली. तक्रारदाराने सदरची चोरी लक्षात आणून दिल्यानंतर वि.प.चे सूपरवायझर श्री मनोज नैन यांनी क्षतीग्रस्त सूटकेसची तपासणी केली आणि त्यांची बॅंग्स ब्रोकन झाल्याब्रद्दल व त्यातील सामान गहाळ झाल्याबाबत नोंदवुन देण्‍यात आले. तक्रारदाराची सूटकेस क्षतीग्रस्त झाल्यामूळे व त्यातील सामान चोरीला गेल्यामूळे तक्रारदाराचे एकुण 74,500/- एवढया रक्कमेचे नुकसान झाले. तक्रारदाराने सूटकेसमधील गहाळ झालेल्या सामानाकरिता व एक सिलबंद बॉक्सकरिता सदर पोलीस स्टेशन, नागपूर येथे तक्रार नोंदविली. वि.प.ने शोध घेतल्यानंतर तक्रारदाराचा गहाळ झालेला एक बॉक्स हैद्राबाद येथील वाहतूकधारकाचे गोडाऊनमध्‍ये असल्याचे कळले. वि.प. ने दिनांक 8.10.2020 ला सदर गहाळ झालेल्या बॉक्स तक्रारदाराचे घरी पोहचता केला. वि.प.ने तक्रारदाराचे सामान तक्रारदाराला चांगल्या स्थ‍ितीत पोहोचविणे आवश्‍यक होते. परंतु वि.प.क्रं.1 व 2 यांनी त्यांचेवर सोपविलेले कार्य पूर्ण करण्‍यात अपयशी ठरले. वि.प.ने तक्रारदाराचे पॅकेजला क्षतीग्रस्त करुन आणि त्यातील समान गहाळ करुन तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिलेली आहे. त्यामूळे तक्रारदाराने त्यांचे वकीलांमार्फत वि.प.क्रं.1 व 2 यांना दिनांक 25.5.2021 ला कायदेशीर नोटीस पाठविली. परंतु वि.प.ने नोटीसची दखल घेतली नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन वि.प.ने तक्रारदाराचे सूटकेस मधील सामान चोरीला गेल्याबाबत व सूटकेस क्षतीग्रस्त झाल्याबाबत तक्रारदाराला नुकसान भरपाई म्हणुन रुपये 74,500/- अदा करावे. तसेच तक्रारदाराचे सामान वेळेत पोहोचवून न दिल्याबाबत तक्रारदाराला रुपये 10,000/- नुकसान भरपाई बाबत देण्‍यात यावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 15,000/- मिळावे अशी विनंती केली आहे.
  2. वि.प.क्रं.1 व 2 यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली परंतु वि.प.क्रं. 1 व 2 हे नोटीस प्राप्त होऊनही तक्रारीत हजर झाले नाही म्हणुन वि.प.क्रं.1 व 2 यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक 4.4.2022 रोजी पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेले दस्‍तावेजांचे व पुरसिसचे वाचन करता खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

        मुद्दे                                                                        उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                       होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?         होय
  3. विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                                         होय

  1. काय आदेश                                                                     अंतिम आदेशानुसार

 

का र ण मि मां सा

  1. तक्रारदाराने त्यांचे चेन्नई येथील राहत्याघरातील दोन बॉक्स, 1 सुटकेस, बाईक(बुलेट) टाटा स्काय डीस्क चेन्नई येथे पॅंकीग करुन नागपूर येथे वाहुन आणण्‍याकरिता पावती क्रं.4704165 अन्वये रुपये 17,077/- वि.प.ला अदा केल्याचे व सदर सामान डीआरएस दिलीप रोडलाइन्स लि.बॅन्ड (अग्रवाल पॅकर्स अॅन्ड मूव्हर्स) यांचे जी.सी.469526 अन्वये वाहुन आणल्यचे नि.क्रं.दोन वरील दाखल दस्तऐवजांवरुन स्पष्‍ट होते. यावरुन तक्रारदाराने वि.प.ची सेवा घेतल्याचे स्पष्‍ट होते. वि.प.ने कन्साईनर कॉपी जी.सी. जी.सी.469526 अन्वये वाहून नायचे सामानातील सूटकेसचे कूलुप तोडुप झीप क्षतीग्रस्त करुन त्यांतील सामान चोरी गेल्याचे व एकबॉक्स गहाळ झाल्याचे वि.प.चे प्रतीनीधी ने दिनांक 1.8.2020 रोजी घेतलेल्या कन्सांईनर कॉपीवरुन स्पष्‍ट होते. त्यांतील गहाळ झालेला पॅक असलेला बॉक्स तक्रारदाराला दिनांक 10.8.2020 रोजी प्राप्त झाल्याची नोंद आहे. वि.प.ने तक्रारदाराचे सामान चेन्नई येथुन वाहून आणून नागपूरला पोहचते करतांना निष्‍काळजीपणा दाखविल्याचे स्पष्‍ट होते. यावरुन तक्रारदार त्यांच्या झालेल्या नुकसानीकरिता वि.प.कडुन नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे मत आहे. मा. आयोगाने सदर प्रकरणात न्याय देतांना Luffhansa German Airlines Vs. Pankaj Kumar Jain,II (2014) CPJ 115  NC, या न्यायनिवाडयाचा आधार घेतला आहे.

सबब आदेश खालीलप्रमाणे......

अंतिम आदेश

  1. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर.
  2. वि.प. तक्रारकत्याला त्यांचे सामानाचे नुकसानीपोटी रुपये 64,500/- अदा करावे. सदर रक्कमेवर तक्रारदाराचे सामान गहाळ झाल्याचे दिनांक 10.8.2020 पासुन द.सा.द.शे.9 टक्के दराने रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगीपावेतो मिळुन येणारी रक्कम तक्रारदारास द्यावी.
  3. वि.प.ने तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणुन रुपये 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 10,000/-अदा करावे.
  4. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून ४५  दिवसाचे आत करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.