जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 189/2011 दाखल तारीख :19/07/2011
निकाल तारीख :12/02/2015
कालावधी :03वर्षे 06म.23 दिवस
आतीक पिता इस्माईल काझी,
वय 40 वर्षे, धंदा व्यापार,
रा. टाके नगर, लातूर ता.जि. लातूर ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) संचालक,
बिलॅटरल सर्व्हीसेस नॅशनल एअर सर्व्हीस,
द्वारा – सोविका ग्रूप ऑफ कंपनीज,
ए-607, डेनस्टी बिझनेस पार्क, ए.के.रोड,
जे.बी.नगर, अंधेरी (पुर्व )मुंबई 400 057.
2) हज कमिटी ऑफ इंडिया,
हज हाऊस 7 ए, आर. ए. मार्ग, मंबई 400 001. ... गैरअर्जदार.
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एस.डी.सोनवणे.
गै.अ.क्र. 2 : एकतर्फा.
गै.अ.क्र. 1 :
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्री.अजय भोसरेकर, मा. सदस्य.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
तक्रारदार हा लातूर येथील रहिवाशी असून सन 2010 मध्ये हज कमिटीकडे हज यात्रेसाठी अर्ज केला होता. सदर प्रवासासाठी तक्रारदाराने एकुण 5 सदस्यांसह प्रवास केला , त्यासाठी सोबत त्यांनी 11 बॅग सामान नेले होते. तक्रारदाराचे प्रवासाचे नियोजन औरंगाबाद ते हज व हज ते औरंगाबाद असे समानेवाला क्र. 1 यांच्या मार्फत विमानाचे तिकीट काढले होते. तक्रारदार हा हज हुन औरंगाबादला व्यवस्थित प्रवास करुन आल्यानंतर लगेजचा टोकन नंबर प्रमाणे 11 बॅग ऐवजी 9 बॅग तक्रारदारास प्राप्त झाल्या व 2 बॅग गहाळ झाल्या त्याची रितसर तक्रार एअर इंडिया कंपनीकडे तक्रारदाराने केली.
तक्रारदार बराच वेळ सामान न मिळाल्यामुळे सदर तक्रारदाराची पोहोच घेवुन औरंगाबादहुन लातूर येथे आला व एअर इंडिया कंपनीने तक्रारदरास आपले सामान तुम्हास लातूर येथील घरच्या पत्त्यावर पोहोच केले जाईल असे तोंडी आश्वासन दिले. तक्रारदाराने 4 ते 5 महिने वाट पाहुन वारंवार फोन करुन ही सामान मिळत नाही, म्हणुन तक्रारदाराने सामनेवाला यांना दि. 26.04.2011 रोजी कायदेशीर नोटीस दिली. नोटीसचे उत्तर मिळाले नाही, म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार या न्यायमंचात दाखल केली आहे. तक्रारदाराने सामानाच्या 2 बॅग लगेजची किंमत रु. 1,00,000/- त्यामध्ये सदर सामानामध्ये सोन्याचे दागीने धार्मीक साहित्य, हजवरुन खरेदी करुन आणलेले महत्वाचे साहित्य होते. शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु. 20,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रु. 5000/- सामान गहाळ झालेल्या तारखे पासुन 12 टक्के व्याजासह मिळण्याची मागणी केली आहे.
तक्रारदाराने आपले तक्रारीचे पुष्टयर्थ शपथपत्र व एकुण 4 कागदपत्रे दाखल केले आहेत.
सामनेवाला क्र. 2 यांना न्यायमंचाची नोटीस प्राप्त असून ते हजर झाले नाहीत म्हणुन त्यांचे विरोधात दि. 21.01.2012 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
सामनेवाला क्र. 1 यांना न्यायमंचाची नोटीस पाठवण्यात आली असून, त्यांची नोटीस पोच न्यायमंचात आज पावेतो अप्राप्त आहे, या बाबत तक्रारदाराने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत, असे प्रकरणाच्या निरिक्षणा वरुन दिसून येते.
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार व त्यांचे लेखी म्हणणे, सामनेवाला यांचे कार्यालय हे मुंबई येथील असून, या न्यायमंचाच्या कार्यक्षेत्रा बाहेर आहे. तक्रारदाराने आपली तक्रार सिध्द करण्यासाठी आवश्यक असणारे प्रवासाचे तिकीट व त्यानुसार एकुण किती सामान नेले, व सदर गहाळ सामानातील मागणी केलेली रक्कम सिध्द करणारा कोणताही पुरावा या न्यायमंचात सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार ही या न्यायमंचाचे कार्यक्षेत्रा बाहेरील प्रतिवादी असल्यामुळे आणि तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 2 (डी) नुसार, ग्राहक या संज्ञेत बसतो हे सिध्द न केल्यामुळे , तक्रारदाराची तक्रार रद्द करणे योग्य व न्यायाचे होईल, असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब न्यायमच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार रद्द करण्यता येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**