(मंचाचा निर्णयः- श्री. भास्कर बी. योगी – अध्यक्ष यांचे आदेशान्वये)
- आ दे श -
(पारित दिनांक - 21 सप्टेंबर, 2018)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. तक्रारकर्ता हा मयत श्रीमती ताराबाई हरिचंद्र कोचे यांचा मुलगा असुन कायदेशिर वारसदार व नॉमीनी आहे. विरुध्द पक्ष श्री जय सिध्दी विनायक नागरी सहकारी पत संस्था, चंद्रपूर ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत पंजिकृत सहकारी संस्था आहे.
विरुध्द पक्ष क्रमांक 1 श्री जय सिध्दी विनायक नागरी सहकारी पत संस्था, चंद्रपूर चे निर्देशक आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 2 हे श्री जय सिध्दी विनायक नागरी सहकारी पत संस्था, शाखा साकोलीचे प्रमुख आहेत आणि विरुध्द पक्ष क्रमांक 3 हे संस्थेचे प्रतिनिधी/अभिकर्ता आहे.
तक्रारकर्त्यांची आई श्रीमती ताराबाई हरीचंद्र कोचे ह्यांनी त्यांचे हयातीत विरुध्द पक्ष श्री जय सिध्दी विनायक नागरी सहकारी पत संस्था, (SJSV Land Developers India Ltd.) येथे खालील प्रमाणे गुंतवणूक केली होती.
खात्याचा तपशिल | ठेव रक्कम | कालावधी | मुदत पूर्तीची तारीख | मुदत पुर्तीची रक्कम |
रजि.क्र.0070030004414 प्रमाणे 3 वर्षाकरीता प्लान नं.3 | रु.50,000/- | ठेवीची तारीख 26.03.2013 (3 वर्षे) | 27.03.2016 | रु.68,500/- |
सदर ठेवीच्या परिपक्वता तिथी पूर्वीच तक्रारकर्त्याची आई दिनांक 09/11/2015 रोजी मरण पावली त्याबाबतची माहिती विरुध्द पक्षानां दिली, परंतु विरुध्द पक्षांनी तुमची रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगुन मृत्यु प्रमाणपत्र घेतले नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला त्याच्या आईच्या नावाने परिपक्वता राशी रुपये 68,500/- चा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा धनादेश क्रमांक 370864 दिनांक 27/06/2016 ला दिला. तक्रारकर्ता व मृतक आईच्या नावाने संयुक्त खाते बँक ऑफ इंडिया, शाखा साकोली येथे खाता क्रमांक 922710110007986 असून तक्रारकर्त्याने सदर धनादेश वटविण्याकरीता बँकेत जमा केला परंतु सदर धनादेश हा विरुध्द पक्षाच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे वटविल्या गेला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 29/07/2016 रोजी विरुध्द पक्ष संस्थेला नोटीस पाठवून वर नमूद रकमेची मागणी केली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना रक्कम परत करण्याची वारंवार फोनवर व प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली, परंतु विरुध्द पक्ष रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेवटी वकीला मार्फत दिनांक 12/09/2016 रोजी नोटीस दिली. सदर नोटीस विरुध्द पक्षानां मिळूनही रक्कम देण्याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त परिपक्वता राशी रुपये 68,500/- व्याजासहित तक्रारकर्ता यांना द्यावी.
- शारिरीक व मानसिक त्रास दिल्याबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला द्यावी.
- तक्रार खर्च रु.3,000/- विरुध्द पक्षाकडून वसूल करण्यात यावा.
- तक्रार अर्जातील परिस्थितीनुसार आवश्यक वाटेल ती इतर दाद तक्रारकर्त्याच्या बाजुने देण्यात यावी. 2. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत रक्कम रुपये 50,000/- गुंतवणूकीचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, ताराबाई कोचे यांचे मृत्यु प्रमाणपत्र, न वटलेला धनादेश क्रमांक 370864 इत्यादींचा छायाकिंत सत्यप्रत तसेच कायदेशिर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोचपावत्या इत्यादी दस्तऐवज दाखल केले आहेत.
3. विरुध्द पक्ष 1 ते 3 यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्यात आली. विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांना नोटीस मिळूनही प्रकरणात हजर न झाल्यामुळे त्यांचेविरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला तसेच विरुध्द पक्ष क्रमांक 3 हे प्रकरणात हजर झाले, परंतु त्यांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी आपला लेखी जबाब दाखल केला नसल्याने त्यांचेविरुध्द विना लेखी जबाब प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आला.
4. तक्रारकर्त्याची तक्रार, दाखल दस्ताऐवज, शपथपत्र यांचे मंचातर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले तसेच तक्रारकर्त्यांच्या वकीलांचा मौखिक युक्तिवाद ऐकूण घेण्यात आला. त्यानुसार मंचाचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे-
निष्कर्ष
5. तक्रारकर्त्याने पृष्ठ क्रमांक 10 वर दाखल केलेल्या गुंतवणूकीचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र दाखल केले आहे. सदर प्रमाणपत्राचे अवलोकन केले असता असे दिसून येते की, श्रीमती ताराबाई हरिचंद्र कोचे यांनी दिनांक 26/03/2013 रोजी 3 वर्षाकरीता रुपये 50,000/- गुंतवणूक केली होती व संस्थेचे 500 युनिट खरेदी केले होते. सदर युनिटची रक्कम करार संपुष्टात येण्याचे दिनांकास म्हणजेच 26/03/2016 रोजी रुपये 68,500/- ऐवढी दर्शविली आहे. त्याचप्रमाणे सदर प्रमाणपत्रात तक्रारकर्त्याचे नाव श्रीमती ताराबाई हरिचंद्र कोचे यांचा मुलगा या नात्याने नॉमीनी म्हणून नमूद केले आहे यावरुन हे सिध्द होते की, तक्रारकर्त्याची मयत आई श्रीमती ताराबाई कोचे हिने तिच्या हयातीत विरुध्द पक्ष संस्थेत दिनांक 26/03/2013 रोजी रुपये 50,000/- गुंतविले होते व त्याची दिनांक 26/03/2016 रोजी परिपक्वता राशी रुपये 68,500/- होती. अभिलेखावर दाखल मृत्यु प्रमाणपत्राच्या प्रतीवरुन हे देखील स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याच्या आईचा मृत्यु दिनांक 09/11/2015 म्हणजेच वादातीत गुंतवणूकीच्या परिपक्वता मुदती पूर्वीच झालेला आहे. अश्यापरिस्थितीत तक्रारकर्ता मयत ताराबाई कोचे यांचे मृत्यु पश्चात तिचा मुलगा म्हणून कायदेशिर वारसदार असल्याने तसेच सदर गुंतवणूक प्रमाणपत्रानुसार नॉमीनी असल्यामुळे गुंतवणूक रकमेची परिपक्वता राशी मिळण्यास पात्र आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष संस्थेने तक्रारकर्त्याला सदर गुंतवणूकीची परिपक्वता रक्कम रुपये 68,500/- द्यावयास हवे होते, परंतु विरुध्द पक्ष संस्थेने तसे न करता मृत श्रीमती ताराबाई कोचे यांचे नावाचा दिनांक 27/06/2016 चा रुपये 68,500/- चा धनादेश क्रमांक 370864 तक्रारकर्त्याला दिला व सदर धनादेश विरुध्द पक्ष संस्थेच्या खात्यात पूरेशी रक्कम नसल्यामुळे न वटल्याचे अभिलेखावरुन दिसून येते. त्याचप्रमाणे त्यानंतर तक्रारकर्त्याने नोटीस पाठवून सदर रकमेची मागणी केली असता आजपावेतो विरुध्द पक्ष संस्थेने तक्रारकर्त्याला गुंतवणूकीची परिपक्वता राशी रुपये 68,500/- दिली नाही असे दिसून येते.
6. तक्रारकर्त्याच्या मृतक आईने गुंतवणूक केलेली रक्कम रु.50,000/- ही परिपक्व झाल्यानंतरही विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी तक्रारकर्त्याला दिली नाही ही विरुध्द पक्ष संस्थेची सेवेतील त्रृटी आहे. तक्रारकर्ता कायदेशिर वारस तथा नॉमीनी असल्यामुळे परिपक्वता राशी रुपये 68,500/- मिळण्यात पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. म्हणून तक्रारकर्ता सदर रक्कम रुपये 68,500/- मुदत पूर्तीच्या तारखेपासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह मिळण्यास पात्र आहे.
7. विरुध्द पक्ष क्रमांक 3 हा विरुध्द पक्ष संस्थेचा अभिकर्ता असुन त्याचेमार्फत तक्रारकर्त्याच्या आईने सदरची गुंतवणूक केली आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 3 हा विरुध्द पक्ष संस्थेचा अभिकर्ता असल्यामुळे त्याच्या कामास विरुध्द पक्ष संस्थेतर्फे विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 जबाबदार आहे, परंतु निश्चितपणे तक्रारकर्त्याला विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांच्या सेवेतील त्रृटीमुळे शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे, त्यामुळे शारीरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई म्हणून रु.5,000/- आणि तक्रारीचा खर्च रु.2,000/- विरुध्द पक्ष संस्थेतर्फे क्रमांक 1 ते 3 हे देण्यास जबाबदार आहे असे मंचाचे मत आहे.
वरील निष्कर्षास अनुसरुन खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यांत येत आहे.
- आ दे श -
1 तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते.
2) विरुध्द पक्ष क्रमांक 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारकर्त्याला ताराबाई हरिचंद्र कोचे यांनी गुंतवणूक केलेली रकमेची परिपक्वता राशी रुपये 68,500/- दिनांक 27.03.2016 पासून प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह अदा करावी.
3) विरुध्द पक्ष संस्थेतर्फे विरुध्द पक्ष क्रमांक 1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासाबाबत नुकसान भरपाई रु.5,000/- आणि तक्रार खर्चाबाबत रु.2,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
4) विरुध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांनी सदर आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांचे आत संयुक्तपणे किंवा वैयक्तिकरित्या करावी.
5) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल तक्रारकर्त्यास परत कराव्यात.
6) आदेशाची प्रत उभय पक्षांना विनामुल्य पुरवावी.
(मंचाचा निर्णयः- श्री. भास्कर बी. योगी – अध्यक्ष यांचे आदेशान्वये)
- आ दे श -
(पारित दिनांक - 21 सप्टेंबर, 2018)
तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल केलेल्या तक्रारीचे संक्षिप्त विवरण येणेप्रमाणे.
1. तक्रारकर्ता हा मयत श्रीमती ताराबाई हरिचंद्र कोचे यांचा मुलगा असुन कायदेशिर वारसदार व नॉमीनी आहे. विरुध्द पक्ष श्री जय सिध्दी विनायक नागरी सहकारी पत संस्था, चंद्रपूर ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत पंजिकृत सहकारी संस्था आहे.
विरुध्द पक्ष क्रमांक 1 श्री जय सिध्दी विनायक नागरी सहकारी पत संस्था, चंद्रपूर चे निर्देशक आहे. विरुध्द पक्ष क्रमांक 2 हे श्री जय सिध्दी विनायक नागरी सहकारी पत संस्था, शाखा साकोलीचे प्रमुख आहेत आणि विरुध्द पक्ष क्रमांक 3 हे संस्थेचे प्रतिनिधी/अभिकर्ता आहे.
तक्रारकर्त्यांची आई श्रीमती ताराबाई हरीचंद्र कोचे ह्यांनी त्यांचे हयातीत विरुध्द पक्ष श्री जय सिध्दी विनायक नागरी सहकारी पत संस्था, (SJSV Land Developers India Ltd.) येथे खालील प्रमाणे गुंतवणूक केली होती.
खात्याचा तपशिल | ठेव रक्कम | कालावधी | मुदत पूर्तीची तारीख | मुदत पुर्तीची रक्कम |
रजि.क्र.0070030004414 प्रमाणे 3 वर्षाकरीता प्लान नं.3 | रु.50,000/- | ठेवीची तारीख 26.03.2013 (3 वर्षे) | 27.03.2016 | रु.68,500/- |
सदर ठेवीच्या परिपक्वता तिथी पूर्वीच तक्रारकर्त्याची आई दिनांक 09/11/2015 रोजी मरण पावली त्याबाबतची माहिती विरुध्द पक्षानां दिली, परंतु विरुध्द पक्षांनी तुमची रक्कम तुम्हाला मिळेल असे सांगुन मृत्यु प्रमाणपत्र घेतले नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला त्याच्या आईच्या नावाने परिपक्वता राशी रुपये 68,500/- चा भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा धनादेश क्रमांक 370864 दिनांक 27/06/2016 ला दिला. तक्रारकर्ता व मृतक आईच्या नावाने संयुक्त खाते बँक ऑफ इंडिया, शाखा साकोली येथे खाता क्रमांक 922710110007986 असून तक्रारकर्त्याने सदर धनादेश वटविण्याकरीता बँकेत जमा केला परंतु सदर धनादेश हा विरुध्द पक्षाच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे वटविल्या गेला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 29/07/2016 रोजी विरुध्द पक्ष संस्थेला नोटीस पाठवून वर नमूद रकमेची मागणी केली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना रक्कम परत करण्याची वारंवार फोनवर व प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली, परंतु विरुध्द पक्ष रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेवटी वकीला मार्फत दिनांक 12/09/2016 रोजी नोटीस दिली. सदर नोटीस विरुध्द पक्षानां मिळूनही रक्कम देण्याविषयी कोणतीही कार्यवाही केली नाही, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली असुन खालीलप्रमाणे मागणी केली आहे.
- विरुध्द पक्ष यांनी उपरोक्त परिपक्वता राशी रुपये 68,500/- व्याजासहित तक्रारकर्ता यांना द्यावी.
- शारिरीक व मानसिक त्रास दिल्याबाबत नुकसान भरपाई रु.10,000/- विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला द्यावी.
- तक्रार खर्च रु.3,000/- विरुध्द पक्षाकडून वसूल करण्यात यावा.
- तक्रार अर्जातील परिस्थितीनुसार आवश्यक वाटेल ती इतर दाद तक्रारकर्त्याच्या बाजुने देण्यात यावी.
2. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीसोबत रक्कम रुपये 50,000/- गुंतवणूकीचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, ताराबाई कोचे यांचे मृत्यु प्रमाणपत्र, न वटलेला धनादेश क्रमांक 370864 इत्यादींचा छायाकिंत सत्यप्रत तसेच कायदेशिर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व पोचपावत्या इत्यादी दस्तऐवज दाखल केले आहेत.