Maharashtra

Raigad

CC/08/77

Mrs. Karuna Bhupendra Metha, - Complainant(s)

Versus

Director Of Technical Education - Opp.Party(s)

Rep. Shri. P.V.Gokhale

14 Nov 2008

ORDER


District Forum Raigad, Alibag
District Consumer Disputes Redressal Forum, Block No 6 and 8,Patil Sadan,New by pass road,Chendhare, Alibag
consumer case(CC) No. CC/08/77

Mrs. Karuna Bhupendra Metha,
...........Appellant(s)

Vs.

Director Of Technical Education
Hon. Principle, Dr.Babasaheb Ambedkar Technical University
...........Respondent(s)


BEFORE:
1. Hon'ble Shri R.D.Mhetras 2. Post vacant 3. Shri B.M.Kanitkar

Complainant(s)/Appellant(s):


OppositeParty/Respondent(s):


OppositeParty/Respondent(s):
1. Rep. Shri. P.V.Gokhale

OppositeParty/Respondent(s):
1. Rep. Shri. M.D.Acharya 2. Rep. M.D.Acharya



ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.

 

                                           तक्रार क्र.77/2008.                                                                       तक्रार दाखल दि.18-9-2008.                                                           तक्रार निकाली दि.15-11-2008.

 

 

कु.मेघन भूपेंद्र मेथा हिच्‍या वतीने-

सौ.करुणा भूपेंद्र मेथा,

लक्ष्‍मी निवास, मु.पो.गोरेगांव,

ता.माणगांव, जि.रायगड.                               ...  तक्रारदार.

     विरुध्‍द

1. डायरेक्‍टर ऑफ टेक्निकल एज्‍युकेशन,

  3 महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई 1.

2. प्राचार्य,

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठ,

   मु.पो.लोणेरा, ता.माणगांव, जि.रायगड.              ...  विरुध्‍द पक्षकार.

 

                           उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्‍हेत्रस, अध्‍यक्ष.

                                श्री.बी.एम.कानिटकर, सदस्‍य.

 

                       तक्रारदारतर्फे प्रतिनिधी श्री.गोखले.

              सामनेवालें क्र.1 व 2 तर्फे प्रतिनिधी - श्री.आचार्य.

                                         

                              -निकालपत्र -

द्वारा- मा.सदस्‍य, श्री.बी.एम.कानिटकर.

 

1.           तक्रारदार करुणा भूपेंद्र मेथा, रा.गोरेगांव, जि.रायगड यांनी त्‍यांच्‍या मुलीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र, विद्यापीठ, लोणेरा येथे अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.  त्‍यासाठी अभियांत्रिकी सरकारी अनुदानित विद्यापीठात पहिल्‍या वर्षाच्‍या अभ्‍यासक्रमासाठी रु.26,445/- इतकी रक्‍कम पावती क्र.1841द्वारे दि.25-8-06 रोजी रोखीने भरले होते.  त्‍यांच्‍या मुलीला वैद्यकीय शाखेत शिक्षण घ्‍यावयाचे होते, त्‍यामुळे त्‍यांनी अन्‍यत्र वैद्यकीय शाखेसाठी अर्ज केले होते.  त्‍यामध्‍ये त्‍यांना मेअर्स वैद्यकीय महाविद्यालय, तळेगांव दाभाडे येथे वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला व त्‍यासाठी त्‍यांनी दि.26-9-06 रोजी रु.49,420/- भरुन प्रवेश घेतला.  नंतर लगेचच म्‍हणजे दि.27-9-06 रोजी बाबासाहेब आंबेडकर, तंत्रशास्‍त्र विद्यापीठ, लोणेरा येथे अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमासाठी घेतलेला प्रवेश रद्द करण्‍यासाठी तसेच भरलेले पैसे रु.26,445/- परत मिळण्‍यासाठी अर्ज केला, परंतु दि.20-3-07 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठाचे प्राचार्य श्री. साठेसर यांच्‍याकडे वरील रक्‍कम परत मिळण्‍यासाठी पुन्‍हा विनंतीअर्ज केला.  तसेच दि.9-4-07 रोजी डायरेक्‍टर ऑफ टेक्निकल एज्‍युकेशन मुंबई यांच्‍याकडे माहितीच्‍या अधिकाराखाली पत्र लिहून लोणेरे येथे तक्रारदाराच्‍या मुलीने घेतलेला प्रवेश रद्द केल्‍यामुळे झालेली जागा रिक्‍त राहीलेली नाही अशी माहिती मिळवली.  आजतागायत सदरचे भरलेले पैसे परत न मिळाल्‍यामुळे ऑल इंडिया कॉन्सिल ऑफ टेक्निकल एज्‍युकेशनने सन 2007 व 08 मध्‍ये विद्यार्थ्‍यांची फी परत मिळण्‍याबाबत स्‍पष्‍ट आदेश दिले.  त्‍याप्रमाणे प्रवेश रद्द केल्‍यास भरलेल्‍या रकमेतून रु.1,000/- वजा करुन उर्वरित सर्व रक्‍कम परत करण्‍याचे आदेश सरकारने दिले आहेत.  अनुदानित सरकारी अभियांत्रिकी विद्यापीठ हे एकाच जागेसाठी दोन विद्यार्थ्‍यांकडून एकाच कालावधीसाठी फी घेऊन शकत नाही.  कारण सदरची संस्‍था ही नफा मिळवणारी संस्‍था नाही.  त्‍यामुळे तक्रारदारानी त्‍यांची भरलेली रक्‍कम परत मिळण्‍यासाठी मंचाकडे तक्रार दाखल केली आहे.  त्‍यात त्‍यांनी मंचाला अशी विनंती केली आहे की, 1) तक्रारदाराना सामनेवालेकडून भरलेली फी रु.26,445/- त्‍यात 20 टक्‍के कपात करुन 12 टक्‍के व्‍याजाने रक्‍कम परत मिळण्‍याचे आदेश व्‍हावेत. 2) तक्रारी व विनंतीअर्ज करुन त्‍यांच्‍याकडे अडकून राहिलेले पैसे न मिळाल्‍यामुळे तक्रारदाराना झालेल्‍या मानसिक त्रासापोटी सामनेवालेकडून रु.5,000/- नुकसानभरपाई मिळण्‍याचे आदेश व्‍हावेत. 3) मंचाकडे तक्रार दाखल करावी लागल्‍यामुळे त्‍याच्‍या खर्चापोटी रु.2,000/- त्‍यांना मिळण्‍याची विनंती  केली आहे. 

 

2.          नि.1 अन्‍वये तक्रारदारानी तक्रारअर्ज दाखल केला असून नि.2 अन्‍वये प्रतिज्ञापत्र, नि.3 अन्‍वये बरेच पुराव्‍याचे कागदपत्र दाखल केले आहेत.  त्‍यात तक्रारदारांच्‍या प्रवेशाच्‍या माहितीपत्रकाची प्रत, शुल्‍काची पावती, प्रवेश रद्द केल्‍याचा अर्ज इ.चा समावेश आहे.

3.          नि.7 अन्‍वये मंचाने सामनेवालेंना नोटीसा पाठविल्‍या त्‍याच्‍या पोचपावत्‍या नि.9 अन्‍वये दाखल आहेत.

4.          डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्‍त्र विद्यापीठ, लोणेरे यांनी दिलेले लेखी उत्‍तर नि.8 अन्‍वये अभिलेखात दाखल आहे.  त्‍यात त्‍यांनी म्‍हटले आहे की, विद्यापीठातील विविध  अभियांत्रकी पदवी अभ्‍यासक्रमाना प्रवेश देणे, प्रवेशासाठी विहीत शैक्षणिक अटी तसेच शिक्षण शुल्‍क, अन्‍य शुल्‍क निश्चित करणे इ.चे नियम संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्‍याकडून तयार होतात व त्‍यानुसार प्रवेशाची प्रकरणे नियमित केली जातात.  तक्रारदारांच्‍या मुलीने शैक्षणिक वर्ष 2006-07 मध्‍ये प्रवेश घेतला असल्‍यामुळे याबाबत वरील संचालनालयाच्‍या नियमानुसार तक्रारदाराना प्रवेश रद्द करण्‍याबाबत त्‍या वर्षाचे नियम लागू होतात.  प्रस्‍तुतचे प्रकरण त्‍यांचेकडे सादर केले आहे.  तसेच विहीत केलेल्‍या नियमावलीची प्रत संदर्भासाठी मंचाकडे दिली आहे.  त्‍यातील नियम क्र.6.8 प्रमाणे प्रवेशाच्‍या शेवटच्‍या तारखेपासून 20 दिवसापर्यंत प्रवेश रद्द करण्‍याबाबत अर्ज आल्‍यास 50 टक्‍के भरलेल्‍या फी मधील रकमेचा परतावा मिळेल व त्‍यानंतरच्‍या कालावधीत अर्ज आल्‍यास काहीही परतावा मिळणार नाही असा नियम आहे.  त्‍यामुळे तक्रारदारांचा प्रवेश रद्द करण्‍याबाबतचा अर्ज वरील नियमाप्रमाणे 20 दिवसानंतर आल्‍यामुळे विद्यापीठाने त्‍यांची भरलेली फी परत केली नाही असे त्‍यांच्‍या पत्रात नमूद आहे.

5.          नि.14 अन्‍वये सामनेवाले क्र.1 म्‍हणजे सहायक संचालक तंत्रशिक्षण संचालनालय यांनी त्‍यांच्‍या लेखी जबाबात तक्रारदाराच्‍या पाल्‍याला सन 2006-07 च्‍या शैक्षणिक वर्षासाठी प्रथमवर्ष विद्युत‍ अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश देण्‍यात आला होता.  प्रवेश रद्द केल्‍याचा त्‍यांचा अर्ज त्‍याने दि.27-9-07 दिला होता, परंतु त्‍यावेळी लागू असलेल्‍या नियमाप्रमाणे त्‍यांनी भरलेली फी ची रक्‍कम परत करणे नियमात बसत नाही.  तक्रारदार यांच्‍या पाल्‍याचा अर्ज सन 2006-07 या शैक्षणिक वर्षात घेतला असल्‍यामुळे वर्ष 2007-08 चे नियम त्‍याला लावता येणार नाहीत.  त्‍यामुळे तक्रारदाराचा अर्ज नामंजूर करण्‍यात यावा अशी त्‍याने मंचाला विनंती केली आहे. 

 

6.          नि.8 अन्‍वये सामनेवाले क्र.2 ने त्‍यांचा लेखी जबाब दिला आहे.  त्‍यात त्‍यांनी म्‍हटले आहे की, अभियांत्रिकी पदवी अभ्‍यासक्रमाना प्रवेश देणे व प्रवेशासाठी विहीत शैक्षणिक अटी, शिक्षणशुल्‍क व अन्‍य शुल्‍क निर्धारित करणे इ.चे नियम संचालक तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य, मुंबई यांच्‍याकडून तयार होतात.    तक्रारदाराच्‍या पाल्‍याने 2006-07 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतला असल्‍यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाच्‍या नियमाप्रमाणे तक्रारदारांच्‍या अर्जाप्रमाणे त्‍यानी मागितलेल्‍या अभियांत्रिकीसाठी भरलेल्‍या रकमेचा परतावा देता येत नसल्‍याचे म्‍हटले आहे. 

     

7.          दि.14-11-08 रोजी तक्रारदारातर्फे त्‍यांचे प्रतिनिधी व सामनेवाले क्र.1,2 तर्फे त्‍यांचे प्रतिनिधी हजर होते.  त्‍यावेळी त्‍यांनी युक्‍तीवाद केला.  उभय पक्षकारांचे जबाब वाचले, तसेच उभय पक्षकारांच्‍या प्रतिनिधींचे तोंडी युक्‍तीवाद ऐकले, त्‍यानंतर सदर तक्रारीची सुनावणी अंतिम आदेशासाठी तहकूब करण्‍यात आली.  सदर तक्रारीच्‍या निराकरणार्थ खालील मुद्दे मंचाने विचारात घेतले-

मुद्दा क्र.1 -  सामनेवालेनी तक्रारदारास त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे काय?

उत्‍तर    -  होय.

मुद्दा क्र. 2 -  तक्रारदारानी मागितल्‍याप्रमाणे त्‍यांनी भरलेल्‍या रकमेचा परतावा व मानसिक

            त्रासापोटी भरपाई त्‍यांना देता येईल काय?

उत्‍तर      - होय.

 

विवेचन मुद्दा क्र.1

8.          संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी प्रथमवर्ष इलेक्‍ट्रीकल इंजिनियरिंग पदवी अभ्‍यासक्रमासाठी सन 2006-07 या शैक्षणिक वर्षासाठी केलेल्‍या नियमाप्रमाणे सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदाराच्‍या पाल्‍याला त्‍यांनी घेतलेला प्रवेश रद्द केल्‍यानंतर फीपोटी भरलेली रक्‍कम परत केली नाही.  नि.8/3 वर दि.20-6-07 या शैक्षाणिक वर्षासाठी असलेल्‍या नियम क्र.6.8 प्रमाणे विद्यार्थ्‍याने प्रवेश घेतल्‍याच्‍या तारखेपासून 20 दिवसानंतर जर प्रवेश रद्द करुन पैसे परत मागितले तर 100% रक्‍कम कापण्‍यात येईल असा नियम आहे.  सदर तक्रारीत कु.मेघा भूपेंद्र मेथा हिने दि.25-8-06 रोजी रु.26,445/- भरुन सामनेवाले क्र.2 यांच्‍या विद्यापीठात प्रवेश घेतला होता.  त्‍यानंतर तिने वैद्यकीय शाखेत प्रवेश घेतल्‍यानंतर सामनेवाले क्र.2 यांचेकडे घेतलेला प्रवेश रद्द करण्‍यासाठी दि.27-9-06 रोजी अर्ज केला होता.  विहीत मुदतीनंतर प्रवेश रद्द करुन भरलेली फी परत मागण्‍याचा अर्ज केल्‍यामुळे सामनेवाले क्र.2 यानी त्‍यांनी भरलेली रक्‍कम परत केली नाही.  याकामी तक्रारदारानी आपल्‍या तोंडी व लेखी युक्‍तीवादात असे म्‍हटले आहे की, अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश देण्‍याची प्रक्रीया ही सरकारकडून एकात्मिकदृष्‍टया चालवली जात होती.  तक्रारदाराला वैद्यकीय शाखेत प्रवेश घ्‍यावयाचा होता परंतु वैद्यकीय शाखेत प्रवेश घेण्‍याची प्रक्रीया काही कारणास्‍तव उशीरा सुरु झाली व त्‍यात प्रवेश मिळण्‍याची खात्री वाटत नसल्‍यामुळे व त्‍यांच्‍या पाल्‍याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्‍हणून त्‍याने सामनेवाले क्र.2 कडे अभियांत्रिकी अभ्‍यासक्रमासाठी योग्‍य ती फी भरुन प्रवेश घेतला.  वैद्यकीय शाखेची प्रवेशप्रक्रीया उशीरा सुरु झाल्‍यामुळे त्‍यांना मेयर्स वैद्यकीय महाविद्यालय, तळेगांव दाभाडे येथे वैद्यकीय शाखेसाठी दि.26-9-06 रोजी प्रवेश मिळाला.  त्‍यानंतर लगेच म्‍हणजे दि.27-9-06 रोजी त्‍याने सामनेवाले क्र.2 यांचेकडे प्रवेश रद्द करुन भरलेली फी परत मिळण्‍यासाठी अर्ज केला.  ही सर्व प्रक्रीया सरकारतर्फे राबवली जात असल्‍यामुळे व त्‍यात झालेल्‍या विलंबामुळे सामनेवाले क्र.2 कडे प्रवेश घेतल्‍या तारखेपासून 20 दिवसाचे आत प्रवेश रद्द करण्‍यासाठी अर्ज देऊ शकत नव्‍हते.  शिवाय त्‍यांच्‍या पाल्‍याचा प्रवेश रद्द केल्‍यामुळे सामनेवाले क्र.2 यांच्‍याकडे जी जागा रिक्‍त झाली ती भरण्‍यात आली होती असे सामनेवाले क्र.2 यानी नि.8/1 वर  तंत्रशिक्षण संचालनालयाला लिहीलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे.  या कामी तक्रारदारानी खालील न्‍यायनिवाडयांचा आधार घेतला आहे :-

Sr.No.

References

Guidelines

1.

1993-BCR (Cons) 3-58, 1993 (TLS) 1303669- High Court Bombay- High Court Bombay

Mohan Siroya V/s. Principal, S.S.V.P. Sansthas College of Engineering, Dhule.

-  Student is a Consumer of Services where he receives education on payment of consideration.

 

 – Refund of Tuition fees and deposits granted.

2.

1997 (3) C.P.R. 385 Consumer Disputes Redressal Commission, Andhra Pradesh

Adarsha Residential College ---  Appellant

                        V/s.

Narayana Rao Noute & Anr. ---- Respondents

 

Refund of Tuition fees and Hostel charges granted.

3.

National Consumer Disputes Redressal Commission New Delhi.

Reserve Bank of India

               V/s.

Eshwarappa and Anothers

 

Consumer Protection Act shall be in addition to and not in derogation of any other Act.

 

 

.  एकंदरीत या न्‍यायनिवाडयाचा विचार करता सामनेवाले क्र.2 यांची कृती त्‍यावेळी लागू असलेल्‍या नियमाप्रमाणे योग्‍य होती असे जरी दिसले तरी तक्रारदाराच्‍या पाल्‍याने आपला प्रवेश रद्द केल्‍यामुळे झालेली रिक्‍त जागा भरण्‍यात आली होती म्‍हणजेच एका जागेसाठी दोन विद्यार्थ्‍यांकडून शैक्षणिक शुल्‍क घेणे अयोग्‍य असल्‍याचे मंचाचे मत आहे.  केवळ तांत्रिक कारणामुळे तक्रारदारांवर अन्‍याय होत असल्‍याचे दिसून येत आहे.  याबाबतीत ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1)(0) हे खालीलप्रमाणे आहे-

      "Service" means service of any description which is made available to potential users and includes, but not limited to, the provision of facilities in connection with banking, financing, insurance, transport, processing, supply of electrical or other energy, board or lodging or both, [housing construction], entertainment, amusement or the purveying of news or other information, but does not include the rendering of any service free of charge or under a contract of personal service.

            सदर तक्रारीत तक्रारदारांच्‍या पाल्‍याने सामनेवाले क्र.2 यांच्‍या संस्‍थेत घेतलेला प्रवेश जरी रद्द केला तरी त्‍यामुळे रिक्‍त झालेली जागा भरली गेल्‍याचे दिसून येत आहे, म्‍हणजे तक्रारदारानी जरी प्रवेश रद्द केला तरी सदर शिक्षण संस्‍थेला कोणत्‍याही प्रकारचे नुकसान झालेले नाही व तक्रारदारानी मोबदला दिला असूनही कोणतीही सेवा त्‍यांचेकडून घेतलेली नाही म्‍हणून मंच सामनेवाले क्र.2 यानी तक्रारदाराना खालीलप्रमाणे घेतलेल्‍या रकमेतून परतावा दयावा या निष्‍कर्षाप्रत आले आहे.  सदर प्रवेश देण्‍याचे कामी सामनेवाले क्र.2 यांना काहीतरी खर्च आला आहे हे गृहित धरुन व त्‍यांची ही संस्‍था शैक्षणिक असल्‍यामुळे नफा मिळवणे हा त्‍यांचा उद्देश नसल्‍यामुळे योग्‍य त्‍या रकमेची वजावट करुन खालीलप्रमाणे रक्‍कम परतावा म्‍हणून दयावी.

1. शै‍क्षणिक फी      रु.15,000/-

2. लॅब फी          रु. 1,600/-

3. कॉशन मनी डिपॉझिट रु.500/-

4. लायब्ररी फी         रु.700/-

5. इंटरनेट फॅसिलीटी    रु.500/-

6. Examination Fees  रु.1, 200/-

7. नेटवर्कींग फी      रु.  500/-

---------------------------------

   एकूण फी        रु.20,000/-

 

 

विवेचन मुद्दा क्र.2

9.          तक्रारदारानी सामनेवाले क्र.2 कडे भरलेल्‍या फीच्‍या रकमेपोटी 20% कपात करुन उरलेली रक्‍कम 12% व्‍याजाने देण्‍याची विनंती केली आहे.  ही मागणी मंचाला अवास्‍तव वाटते.  त्‍यामुळे मंचाने सामनेवाले क्र.2 यांना भरलेल्‍या फी पैकी शैक्षणिक फी व इतर डिपॉझिट व अन्‍य फी असे एकूण रु.20,000/-ची रक्‍कम परत करण्‍यास सांगणे योग्‍य ठरेल व त्‍या रकमेवर 5% दराने व्‍याज देण्‍यात यावे असे मंचाचे मत आहे.  मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु.500/- सामनेवाले क्र.2 ने तक्रारदाराना दयावेत या निष्‍कर्षाप्रत मंच आले आहे. 

 

10.                       सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्‍यात येत आहेत-

10.

-ः अंतिम आदेश ः-

अ)    आदेश पारित तारखेपासून 45 दिवसाचे आत सामनेवाले क्र.2 यानी तक्रारदाराना रु.20,000/- (रु.वीस हजार मात्र) द.सा.द.शे. 5% दराने परत करावेत.

ब)   शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (रु.दोन हजार मात्र) व न्‍यायिक खर्चापोटी रु.500/- (रु.पाचशे मात्र) सामनेवाले क्र.2 ने तक्रारदाराना दयावेत. 

क)   विहीत मुदतीत वरील आदेशाचे पालन सामनेवालेनी न केल्‍यास वर कलम 'अ' मधील रक्‍कम व्‍याजासह तसेच कलम 'ब' मधील रकमा वसूल करण्‍याचा अधिकार तक्रारदारांस राहील.

ड)   सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती सर्व पक्षकाराना पाठविण्‍यात याव्‍यात.

ठिकाण- रायगड- अलिबाग.

दिनांक- 15-11-2008.

                        (बी.एम.कानिटकर)        (आर.डी.म्‍हेत्रस)

                       सदस्‍य                अध्‍यक्ष

                 रायगड जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग

 

 

 

 




......................Hon'ble Shri R.D.Mhetras
......................Post vacant
......................Shri B.M.Kanitkar