Maharashtra

Nanded

CC/10/231

Akshay Subhas Bang - Complainant(s)

Versus

Director, Matoshri Pratishtan Group of Institutions - Opp.Party(s)

Pravin Agrawal

25 Feb 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/231
1. Akshay Subhas BangSomesh Colony, NandedNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Director, Matoshri Pratishtan Group of InstitutionsJijao Nagar, Khupsarwadi Post Vishnupuri NandedNandedMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 25 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :- 2010/231
 
                    प्रकरण दाखल तारीख -             18/09/2010     
                    प्रकरण निकाल तारीख              25/02/2011
 
समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.            -   सदस्‍या 
 
अक्षय सुभाष बंग,
वय वर्षे 20, धंदा शिक्षण
रा.सोमेश कॉलनी, ता.जि.नांदेड.                                          अर्जदार.
      विरुध्
संचालक,
मातोश्री प्रतिष्‍ठाण, ग्रुप ऑफ इन्‍स्‍टीटयुशन्‍स
जिजाऊ नगर, खुपसरवाडी पो.विष्‍णुपुरी                            गैरअर्जदार
नांदेड.                                                 
 
अर्जदारा तर्फे वकील        -   अड.प्रवीण अग्रवाल
गैरअर्जदारा तर्फे वकील       -   अड.एस.आर.धनकोट
 
                                                                                   निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्‍यक्ष )
 
1.     अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की, अर्जदार हा वर्ष 2008-09 मध्‍ये नांदेड येथे शिक्षण घेत होता. अर्जदाराने दि.22.8.2009 रोजी गैरअर्जदाराकडे एमबीए प्रथम वर्षासाठी रु.55,000/- चा भरणा केला, व दि.11.9.2009 रोजी प्रवेश प्रक्रिया संपणार होती. काही कारणास्‍तव अर्जदाराने घेतलेला प्रवेश रदद करण्‍यासाठी गैरअर्जदाराकडे विनंती केली व रु.55,000/- भरलेले शुल्‍क परत मागितले.अर्जदाराने प्रवेश प्रक्रियेची तारीख संपण्‍यापूर्वी प्रवेश रदद केला.  त्‍यामूळे अर्जदार शूल्‍काची रक्‍कम मिळण्‍यास पाञ आहे. रक्‍कमेची मागणी करुनही त्‍यांनी रक्‍कम परत केली नाही. शुल्‍क परत मिळविण्‍यासाठी अर्जदारास गैरअर्जदाराच्‍या खुपसरवाडी या कार्यालयात जावे लागत आहे. शेवटी दि.23.2.2009 रोजी सहसंचालक यांना वकिलामार्फत पञ पाठविले पण त्‍यांची पण दखल घेतली नाही. परत दि.18.10.2009 रोजी वकिलामार्फत पञ पाठवून शूल्‍क परत मिळावे अशी मागणी केली परंतु गैरअर्जदाराने शूल्‍क परत केले नाही. म्‍हणून अर्जदाराने सदरील तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, शूल्‍क रु.55,000/- दि.22.8.2009 पासून 24 टक्‍के व्‍याजाने परत करावेत तसेच मानसिक व शारीरिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.10,000/- मिळावेत.
2.                गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. प्रवेश प्रक्रिये बाबतचे सर्व नियम हे डायरेक्‍टर ऑफ टेक्‍नीकल एज्‍यूकेशन महाराष्‍ट्र सरकार औरंगाबाद यांनी नीर्धारित केलेले आहेत व प्रवेश देखील सदरील नियमाप्रमाणे देण्‍यात येतो. सदर नियमानुसार एमबीए प्रथम वर्षाच्‍या प्रवेशा बाबतचे कट ऑफ डेट ही दि.11.9.2009 होती व ती जाहीरात नेट वर सूध्‍दा उपलब्‍ध असते.या बाबतची माहीती अर्जदार यांना अवगत होती व त्‍यानुसार त्‍यांनी प्रवेश प्रक्रिया बाबतचा अर्ज भरलेला आहे. दि.21.8.2009 रोजी एमबीए प्रथमवर्षासाठी प्रवेश स्‍वतच्‍या हस्‍ताक्षरात भरला व त्‍यासोबत मूळ कागदपञे दाखल केली आहेत. कॉलेममध्‍ये हजर राहील्‍याबददल हजेरीपटावर सही देखील आहे. वर्ष 2009 ते 2010 या वर्षाकरिता एमबीए च्‍या प्रथम वर्षाकरिता अर्जदाराचे नांव संस्‍थेकडे आहे ते कमी करण्‍यात आलेले नाही. अर्जदारास नांव कमी करावयाचे असल्‍यास कट ऑफ डेट पूर्वी प्रवेश रदद करण्‍या बाबतचा अर्ज दिला पाहिजे होता पण अर्जदाराने त्‍यानंतर अर्ज दिला आहे. त्‍यामूळे अर्जदाराचे नांव कमी होऊ शकले नाही.अर्जदाराचा प्रवेश संस्‍थेने आज देखील रदद केलेला नाही म्‍हणून तो आज देखील संस्‍थेचा विद्यार्थी आहे.तसेच दि.11.9.2009 रोजी 4.45 मिनिटांनी दिलेल्‍या अर्जामध्‍ये भरलेली रक्‍कम वापस करण्‍याबददल उल्‍लेख नाही. याउलट दि.7.10.2009 रोजी मूळ कागदपञे परत करावेत असा अर्ज केला व त्‍याप्रमाणे संस्‍थेने अर्जदारास मूळ कागदपञ परत केले. कट ऑफ डेटच्‍या पूर्वी अर्ज न दिल्‍यामूळे संस्‍थेचीएक जागा अर्जदाराच्‍या नांवे ठेवण्‍यात आली होती व ती सतत राहीली आहे म्‍हणून अर्जदार हा कूठलीही रक्‍कम मिळण्‍यास पाञ नाही. अर्जदाराने वारंवार चकरा मारल्‍या हे खोटे आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास कोणतीही नोटीस पाठविलेली नाही. तसेच वकील पाटणी मार्फत पाठविलेली कोणतीही नोटीस त्‍यांना मिळालेली नाहीकिंवा त्‍यांची कोणतीही प्रत मंचासमोर दाखल नाही. सहायक संचानक तंञ शिक्षण औरंगाबाद यांना प्रवेश रदद करण्‍याचे अधिकार आहेत.  तसेच अर्जदाराने सहायक संचालक तंञ शिक्षण औरंगाबाद यांना पक्षकार केलेले नाही. गैरअर्जदार संस्‍था ही उच्‍च तंञज्ञान वीषयीचे शिक्षण शासनाने नेमून दीलेल्‍या चौकटीत राहून पूर्ण करीत आहे. म्‍हणून अर्जदाराची तक्रार ही फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
3.               अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे व दोन्‍ही बाजूचा यूक्‍तीवाद ऐकून जे मूददे उपस्थित होतात ते मुददे व त्‍यावरील सकारण उत्‍तरे खालील प्रमाणे.
            मूददे                                                                                                  उत्‍तर
1.     अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ?                                  होय.
2.    सहसंचालक, तंञशिक्षण औरंगाबाद हे आवश्‍यक पक्षकार
      आहेत काय                                                                                          होय.
3.    अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्‍यास
      गैरअर्जदार बांधील आहेत काय ?                                                             नाही.                            
4.    काय आदेश ?                                                                            अंतिम आदेशाप्रमाणे
                             कारणे
 मूददा क्र.1  ः-
4.                अर्जदाराने गैरअर्जदार मातोश्री प्रतिष्‍ठान येथे एमबीए च्‍या शिक्षणासाठी म्‍हणून प्रवेश साल 2008-09 साठी घेतला होता व त्‍यासाठी फिस म्‍हणून रु.55,000/- दि.22.8.2009 रोजी भरले होते. ही गोष्‍ट गैरअर्जदार यांना मान्‍य आहे. त्‍यामूळे  गैरअर्जदार  ही  शिक्षण  सेवा  देणारी संस्‍था  आहे  व  अर्जदार यांनी मूल्‍य रु.55,000/- त्‍यासाठी भरलेले आहेत. म्‍हणून अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक म्‍हणून संबोधल्‍या जातो. वरील परिस्थितीमूळे मूददा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.
मूददा क्र. 2 ः-
5.                अर्जदाराने वर उल्‍लेख केलयाप्रमाणे दि.22.8.2009 रोजी फिस भरुन गैरअर्जदार संस्‍थेमध्‍ये प्रवेश घेतला होता कागदपञावरुन असे दिसते की, त्‍यानंतर अर्जदाराच्‍या काही कौटूबिंक अडचणीमूळे त्‍यांनी दि.11.9.2009 रोजी गैरअर्जदाराकडे अर्ज देऊन त्‍यांचा प्रवेश रदद करण्‍यात यावा अशी विनंती केली होती. त्‍यानंतर सर्व प्रथम अर्जदारातर्फे अड.श्री.प्रितेश पाटणी यांनी सहसंचालक तंञशिक्षण औरंगाबाद यांना दि.23.9.2009 रोजी पञ देऊन त्‍यामध्‍ये विनंती केली कि, त्‍यांनी गैरअर्जदारांना अर्जदाराचा प्रवेश रदद करावा असे निर्देश दयावेत व अर्जदाराने दाखल केलेले मूळ कागदपञही अर्जदारास वापस करावेत व असेही निर्देश दयावेत की, गैरअर्जदारांनी फिसची रक्‍कम वापस करावी. कागदपञावरुन असे दिसते की, सदरील पञाची नक्‍कल त्‍यावेळी सदरील वकील श्री. पाटणी यांनी गैरअर्जदाराला दिली नव्‍हती ? यावरुन असे दिसते की, अर्जदारास हे पूर्णपणे माहीत होते की, सहायक संचालक तंञशिक्षण औरंगाबाद  हे आवश्‍यक पक्षकार आहेत आणि म्‍हणूनच त्‍यांनी फक्‍त सहायक संचालकानाच वरील प्रमाणे पञ दिले होते ? असे माहीत असताना देखील अर्जदाराने सहायक संचालक तंञशिक्षण औरंगाबाद यांना या तक्रारीमध्‍ये पक्षकार का केले नाही ?  हे समजून येत नाही. कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदार यांना यांची पूर्ण कल्‍पना होती कि, सदरील सहसंचालकच फक्‍त त्‍यांचा प्रवेश रदद करु शकतात व गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे हे स्‍पष्‍ट दिसते की, सदरील प्रवेश रदद करण्‍याचे अधिकार सहायक संचालक तंञशिक्षण औरंगाबाद यांनाच आहेत. दोन्‍ही पक्षकाराच्‍या सदरील कथनावरुन असे दिसते की, सहायक संचालक तंञशिक्षण औरंगाबाद हे या तक्रारीमध्‍ये आवश्‍यक पक्षकार होते तरी देखील अर्जदाराने त्‍यांना या तक्रारीमध्‍ये का शरीक केले नाही ?   हे समजून येत नाही. त्‍यांच्‍या उपस्थितीशिवाय व म्‍हणण्‍याशिवाय या तक्रारीचा योग्‍य निकाल लागणार नाही असे आम्‍हास वाटते. अर्जदाराचा अर्ज दाखल करण्‍यामध्‍येही ञूटी आहे असे वाटते म्‍हणून मूददा क्र.2 चे उत्‍तर देखील होकारार्थी देण्‍यात येते.
मूददा क्र. 3 व 4 ः-
6.                अर्जदाराने रशिद नंबर 449 दि.22.8.2009 ची यादी नि.4 सोबत दाखल केली आहे. त्‍यावरुन असे दिसते की, अर्जदाराने दि.22.8.2009 रोजी गैरअर्जदाराकडे टयूशन फिस म्‍हणून रु.50,000/- जमा केले व इतर फिस म्‍हणून रु.5,000/- जमा केले व अशा प्रकारे एकूण रु.55,000/- जमा करुन गैरअर्जदाराकडे एमबीए चे शिक्षण घेण्‍यासाठी प्रवेश घेतला होता. त्‍यानंतर दि.11.9.2009 रोजी अर्जदाराने त्‍यांची स्‍वतःची सही करुन गैरअर्जदाराकडे एक अर्ज दिला. त्‍यामधील मजकूर खालील प्रमाणे आहे, “ I Akashy Bang student of MBA First year of your college, wants to cancel my admission due to some unavoidable family problems “   सदरील अर्ज दिल्‍याचे गैरअर्जदार कबूल करतात परंतु त्‍यांचे म्‍हणणे असे आहे की, या तक्रारीमध्‍ये कट ऑफ डेट दि.11.9.2009 हीच होती व अर्जदाराने सदरील अर्ज दूपारी 4.45 नंतर दिला व त्‍यावेळी सर्व्‍हर बंद झालेले होते. गैरअर्जदाराचे असेही म्‍हणणे आहे की, प्रवेश रदद करण्‍याचे अधिकार फक्‍त आणि फक्‍त सहायक संचालक तंञशिक्षण औरंगाबाद यांचेकडेच आहेत व त्‍यांचे परवानगीशिवाय गैरअर्जदार तो प्रवेश रदद करुच शकत नाहीत.  त्‍यामूळे अर्जदाराचा प्रवेश आजपर्यत देखील रदद झालेला नाही व अर्जदाराचे नांव गैरअर्जदाराच्‍या हजेरीपटावर आजही चालू आहे. त्‍यांचे असेही म्‍हणणे  आहे की, सुरुवातीला काही दिवस अर्जदार पिरिएडला हजर होता व हजेरीपटावर सही देखील केली आहे.
7.                सदरील अर्ज दि.11.9.2009 रोजीचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, सदरील अर्जामध्‍ये अर्जदाराने फक्‍त एवढेच म्‍हटले आहे की, काही कौटूबिक अडचणीमूळे तो त्‍यांचा प्रवेश रदद करु इच्छितो  ? या अर्जामध्‍ये अर्जदाराने त्‍यांने दाखल केलेले मूळ कागदपञ परत करावेत अथवा सदरील फि परत करावी असा उल्‍लेख केलेला नाही. तो का केला नाही ?  त्‍याबददल खूलासा ही नाही.गैरअर्जदाराचे म्‍हणणे असे आहे की, अर्जदाराला हे पूर्ण ज्ञात होते कि, कट ऑफ डेटच्‍या नंतर तो अर्ज दिल्‍यामूळे तो फिस परत घेण्‍यास पाञ नाही म्‍हणून सदरील अर्जामध्‍ये त्‍यांने फि परत मिळावी असा उल्‍लेख केलेला नाही. सदरील अर्जावर  फक्‍त अर्जदाराचीच सही आहे त्‍यांचे पालक किंवा पिता यांची त्‍यावर काऊंटर सही नाही.  ती का नाही ?  यांचा देखील खूलासा अर्जदाराने केलेला नाही. कागदपञावरुन असे ही दिसते की, त्‍यानंतर दि.07.10.2009 रोजी अर्जदाराचे वडील सुभाष बंग यांनी गैरअर्जदाराला एक लेखी अर्ज दिला व त्‍यामध्‍ये विनंती केली कि, अर्जदाराने कौटूंबिक अडचणीसाठी म्‍हणून त्‍यांचा प्रवेश रदद करण्‍यासाठी अर्ज दि.11.09.2009 रोजी दिला आहे. म्‍हणून मूळ कागदपञ हे त्‍यांचा पूतण्‍या श्री. वीशाल उपाध्‍ये यांना परत करावेत ? अर्जदार विद्यार्थ्‍याने मूळ कागदपञ परत मागण्‍याची तसदी का घेतली नाही ?  या बददल काहीही खूलासा नाही. त्‍यांचप्रमाणे अर्जदाराचे पिताश्री सूभाष बंग यांनी देखील स्‍वतः गैरअर्जदाराकडे जाऊन सदरील महत्‍वाचे मूळ कागदपञ स्‍वतः का घेतले नाही ?  याचाही खूलासा होत नाही. सदरील पिताश्री सूभाष बंग यांनी ते मूळ कागदपञ त्‍यांचे पूतण्‍या श्री. वीशाल उपाध्‍ये यांना दयावेत अशी विनंती केली आहे ? यावरुन एकच दिसते की, अर्जदार किंवा पिताश्री हे प्रवेश घेण्‍यासाठी किंवा रदद करण्‍यासाठी किंवा मूळ महत्‍वाचे कागदपञ हस्‍तगत करण्‍यासाठी गंभीर नव्‍हते व नाहीत ?
8.                कागदपञावरुन असेही दिसते की, त्‍यानंतर दि.18.10.2009 रोजी अर्जदाराचे वकील श्री. पाटणी यांनी गैरअर्जदाराला एक पञ दिले व त्‍यामध्‍येही असा उल्‍लेख केला आहे की, अर्जदाराने दि..11.09.2009 रोजी प्रवेश रदद करण्‍याचा अर्ज दिला होता व त्‍यानंतर अर्जदारातर्फे वकीलांनी  सहायक संचालक तंञशिक्षण औरंगाबाद यांचेकडे सदरील अर्ज दिला होता. वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे त्‍या अर्जाची एक प्रत त्‍यावेळी त्‍यांनी गैरअर्जदार यांना का पाठविली नाही ? यांचे या पञात काही उल्‍लेख नाही. या पञामध्‍ये त्‍यांनी मूळ कागदपञ मिळाल्‍याचा उल्‍लेख केलेला आहे. वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे अर्जदाराच्‍या पिताश्रीने जो अर्ज दिला त्‍यामध्‍ये देखील फिस वापस करावी अशी मागणी केली नाही ? फक्‍त मूळ कागदपञ परत करावेत व ते ही त्‍यांचे पूतण्‍याकडे दयावेत असा फक्‍त उल्‍लेख आहे ? गैरअर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, अर्जदार व त्‍यांचे पिताश्री यांना सदरील गोष्‍टीची पूर्ण कल्‍पना होती कि, कट ऑफ डेट नंतर त्‍यांना फिस परत मिळू शकत नाही म्‍हणून त्‍यांनी फिस परत घेण्‍याचा उल्‍लेख वरील पञामध्‍ये केलेला नाही.
9.                अर्जदाराचे वकील श्री.अग्रवाल यांनी यूक्‍तीवादामध्‍ये असे सांगितले की, कट ऑफ डेट जरी दि.11.09.2009 असली तरी देखील अर्जदार हा फि परत घेण्‍यास
पाञ आहे. त्‍यांनी दि.24.08.2009 रोजीचे सर्कूलरची प्रत दाखल केली आहे. त्‍यामधील अटी प्रमाणे असेही दिसते की, प्रवेश घेते वेळी अडमीशन सूरक्षित करण्‍यासाठी त्‍यांने स्‍पॉट नॉनरिफंडेबल फि म्‍हणून रु.10,000/- डि.डि. द्वारे जमा करणे क्रमप्राप्‍त होते व तो धनार्कष हा  “ Director, Technical Education payable at Mumbai ” या नांवे दिला पाहिजे. अर्जदाराने तसा धनाकर्ष दिल्‍याचा उल्‍लेख त्‍यांचे अर्जात केलेला नाही किंवा तशा प्रकारचे कागदपञही दाखल केलेले नाही ?  गैरअर्जदाराचे वकिल श्री.धनकोट यांनी आपल्‍या यूक्‍तीवादात असे सांगितले आहे की, अर्जदाराचा प्रवेश आजपर्यत देखील रददच झालेला नाही कारण गैरअर्जदाराला प्रवेश रदद करण्‍याचेच अधिकार नाहीत म्‍हणून अर्जदाराचे नांव आजतागायत हजेरीपटावर चालू आहे. त्‍यांनी विद्यार्थ्‍याच्‍या हजेरीपटाच्‍या झेरॉक्‍स प्रती दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यावरुन असे दिसते की, अर्जदाराचे नांव हजेरीपटावर आजही कायम आहे व त्‍यांची हजेरी देखील लिहीलेली आहे. सदरील हजेरीपट (Muster roll ) च्‍या प्रती पाहून असे दिसते की, अर्जदार अक्षय एस बंग  यांचे नांव अद्यापही हजेरीपटावर चालू आहे व काही ठिकाणी त्‍यांची हजेरी देखील लिहीलेली आहे ? सदरील हजेरीपटाच्‍या नकला पाहून असे वाटते की, अर्जदाराचे नांव आजतागायत हजेरीपटावरुन रदद झालेले नाही. म्‍हणून अर्जदारास सदरील फिस परत घेण्‍याचा अधिकार नाही असे आम्‍हाला वाटते.
 
10.               याठिकाणी महत्‍वाची गोष्‍ट अशी आहे की, अर्जदाराने जरी त्‍यांचे वडिलामार्फत व वडीलाच्‍या पूतण्‍यामार्फत मूळ कागदपञ परत घेतले असले तरीही त्‍यांने इतर कूठल्‍या शिक्षण संस्‍थेत प्रवेश घेतला आहे ? असे दाखवणारा कागदपञी पूरावा या न्‍यायमंचापूढे दाखल केलेला नाही, तो का दाखल केला नाही ?  या बददलही खूलासा केलेला नाही. जर खरेच त्‍यांचा प्रवेश गैरअर्जदार संस्‍थेतून रदद झाला असता व त्‍यांनी इतर कूठेही प्रवेश घेतला असता तर अर्जदाराने तसे कागदपञ नक्‍कीच पूरावा म्‍हणून दाखल केला असता. तसा कूठलाही पूरावा किंवा तोंडी-शब्‍द या मंचापूढे आलेला नाही. यांचाच अर्थ अर्जदाराचा प्रवेश गैरअर्जदार संस्‍थेमध्‍ये चालू आहे म्‍हणून अर्जदार हा वरील फिस परत मागण्‍यास मूळीच हक्‍कदार नाही असे या मंचाचे मत आहे.
11.                अर्जदाराचे वकील श्री. अग्रवाल यांनी यूक्‍तीवादाचे वेळी मा. दिल्‍ली राज्‍य आयोगाचे निकालाच्‍या दोन प्रति दाखल केलेल्‍या आहेत. त्‍यामध्‍ये I (2010) CPJ 125 Guru Gobind Singh Indraprastha University Vs. R.S.Khatri and I (2010) CPJ 163 Guru Gobind Singh Indraprastha University Vs. Naresh Dubey , सदरील निकालाच्‍या प्रति पाहून व प्रस्‍तूत प्रकरणातील अर्जदाराचे कथन पाहून असे वाटते की, तो न्‍यायनिवाडा अर्जदाराच्‍या मदतीसाठी येऊ शकत नाही कारण त्‍या दोन्‍ही केसेसमध्‍ये सदरील फिर्यादीचा प्रवेश त्‍या गैरअर्जदाराने रदद केलेला होता व तसे कबूलही केले होते.प्रस्‍तूत प्रकरणामध्‍ये कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराचा प्रवेश गैरअर्जदार संस्‍थेमध्‍ये आजही चालू आहे व अर्जदाराने इतर कूठल्‍याही ठिकाणी प्रवेश घेतल्‍याचा लेखी किंवा तोंडी पूरावा दिलेला नसल्‍यामूळे त्‍यांचा प्रवेश गैरअर्जदार संस्‍थेतच आहे असे गृहीत धरण्‍यास मूळीच हरकत नसावी असे या मंचाचे मत झाले आहे. जर प्रवेशच रदद झाला नसेल तर अर्जदार सदरील फिस मागण्‍यास कसे पाञ होऊ शकतात ?  यांचा सबळ पूरावा अर्जदाराने दाखल केलेला नाही. वरील कथनावरुन असे निश्चित होते की, अर्जदार हे सदरील फि ची रक्‍क्‍म मिळण्‍यास मूळीच पाञ नाहीत असे माहीत असून देखील त्‍यांनी सदरील तक्रार या मंचात दाखल केलेली आहे. गैरअर्जदारांच्‍या वकील महोदयांनी असे सांगितले कि, गैरअर्जदार संस्‍था ही उच्‍च तंञज्ञान विषयांचे शिक्षण विद्यार्थ्‍याना शासनाने नेमून दिलेल्‍या चौकटीत पूर्ण करीत आहे. गैरअर्जदारांची शिक्षण संस्‍था ही नामवंत आहे. सदरील अर्ज हा संस्‍थेची पत कमी करण्‍याच्‍या उददेशाने व ञास देण्‍याच्‍या उददेशाने दाखल करण्‍यांत आला आहे. त्‍यामुळे तो खर्चासहीत फेटाळण्‍यात यावा. तथापि अर्जदार हा तरुण विद्यार्थी आहे त्‍यामूळे त्‍यांचेवर या कार्यवाहीचा खर्च लावणे उचित होणार नाही असे आमचे मत झाले आहे.
 
12.               वरील सर्व गोष्‍टीचा ऊहापोह करुन आम्‍ही या नीर्णयास्‍तव आलो आहोत की, अर्जदाराची तक्रार ही विनाखर्च खारीज करण्‍या योग्‍य आहे म्‍हणून आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
                                                                        आदेश
1.                                          अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्‍यात येतो.1.
2.                                          खर्च ज्‍यांचा त्‍यांनी आपआपला सोसावा.
3.                                          पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                    श्रीमती सुवर्णा देशमूख          
               अध्‍यक्ष                                                              सदस्‍या
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक   
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT