निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/08/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 12/08/2010 तक्रार निकाल दिनांकः- 14/01/2011 कालावधी 05 महिने 02 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सुरतसिंग पिता- जगतसिंग टाक. अर्जदार वय 40 वर्षे.धंदा. शेती. अड.के.एम.सरपे. रा.गुरुगोविंदसिंग नगर,परभणी. विरुध्द व्यवस्थापक, गैरअर्जदार. श्रीराम सिटी युनियन फायनान्स लि. अड.व्हि.एच.काळे. वसमत रोड,भालेराव बिल्डींगच्या बाजुला,परभणी. ------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती अनिता ओस्तवाल. सदस्या. ) गैरअर्जदार फायनान्स कंपनीने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार याने गैरअर्जदाराकडून हिरो होंडा कंपनीची पॅशन पल्स दुचाकी गाडी रक्कम रु. 47,000/- घेण्यासाठी 12 टक्के व्याजदराने रक्कम रु. 30,500/- चे कर्ज मार्च 2008 मध्ये घेतले होते.सदरचे वाहन घेण्यासाठी अर्जदाराने गैरअर्जदार कंपनीकडे रु.17,500/- आणि 24 चेक्स जमा केले होते. दिनांक 12/04/2008 रोजी अर्जदारास हिंरो होंडा कंपनीची पॅशन पल्स हे दुचाकी वाहन मिळाले. त्यासाठी अर्जदारास रक्कम रु. 1627/- चे 24 हप्ते ठरविण्यात आले होते. दिनांक 12/12/2008 रोजी निरज हॉटेल गव्हाने रोड परभणी येथून सदरील वाहन चोरीस गेले ( नो.क्रं.MH-22, K-7113 ) सदर वाहनाचा अर्जदाराने 2 दिवस शोध घेतला व शेवटी वाहन न मिळाल्याने ती चोरीस गेल्याची रितसर लेखी तक्रार संबंधीत पोलीस स्टेशनला दिनांक 15/12/2008 रोजी दिली.त्याच दिवशी सदर घटनेची माहिती गैरअर्जदार कंपनीशी संपर्क साधून तोंडी माहिती दिली. सदरील वाहन चोरीला जाण्यापुर्वी अर्जदाराने स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेव्दारे दिनांक 21/05/2008, 16/7/2008, 22/08/2008,व 14/10/2008 रोजी धनादेशाव्दारे अनुक्रमे क्रमांक 688886, 688888, 688889, 688891 व्दारे 1627/- रु.चे एकुण 4 हप्ते फायनान्स कंपनीला दिले होते.या वाहानाचा युनायटेड इंडिया इंश्युरंस कं.लि.यांच्याकडून 1 वर्ष मुदतीचा विमा घेतला होता.पुढे दिनांक 09/11/2009 रोजी गैरअर्जदार कंपनीस रक्कम रु. 39,950/- चा धनादेश विमा कंपनीकडून मिळाला.तरीही गैरअर्जदार विमा कंपनीने अश्वासन दिल्या प्रमाणे अर्जदारास त्याने भरणा केलेली अगाऊ रक्कम व हप्त्यापोटी भरणा करण्यात आलेली रक्कम अशी एकुण रक्कम रु. 24,008/- मागणी करुन ही दिलेली नसल्यामुळे अर्जदाराने प्रस्तुतची तक्रार मंचासमोर दाखल करुन गैरअर्जदाराने दुचाकी वाहनासाठी भरणा केलेली रक्कम रु.24008/- व्याजासहीत द्यावी.तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- अर्जदारास द्यावी.अशा मागण्या अर्जदाराने मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/7 मंचासमोर दाखल केली. मंचाची नोटीस अर्जदारास तामील झाल्यानंतर गैरअर्जदाराने लेखी निवेदन नि.12 वर दाखल करुन अर्जदाराचे कथन बहुतअंशी अमान्य केले आहे. गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदाराने करारा नुसार नियमित हप्ते न भरल्यामुळे करारातील अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास दिलेले धनादेश न वठल्यामुळे प्रत्येक न वठलेल्या चेकसाठी पाचशे रु.दंड करारातील अटी व शर्तीनुसार आकारण्यात आलेला आहे तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडून कर्ज घेतलेल्या रक्कमेवर व्याज दर हा 14 टक्के होता.यामुळे अर्जदार हाच गैरअर्जदार कंपनीचा थकबाकीदार असल्यामुळे त्याला कोणतीही रक्कम मागण्याचा अधिकार पोहचत नाही.म्हणून वरील सर्व कारणामुळे अर्जदाराची तक्रार नुकसान भरपाई रक्कम रु.20,000/- सहीत खारीज करण्यात यावा.अशी विनंती गैरअर्जदाराने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि.13 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.17/1 ते नि.19/3 मंचासमोर दाखल केली. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रुटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणती दाद मिळणेस पात्र आहे. ? अंतिम आदेशा पमाणे कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराने गैरअर्जदाराकडून हिरो होंडा कंपनीची पॅशन प्लस दुचाकी गाडी खरेदी करण्यासाठी रक्कम रु. 30,500/- चे कर्ज 12 टक्के व्याजदराने घेतले होते कर्ज रक्कमेची परतफेड प्रत्येक हप्ता रु.1627/- प्रमाणे 24 हप्त्यामध्ये करण्याचे ठरले होते.अर्जदाराने एकुण 4 हप्ते गैरअर्जदाराकडे जमा केले. तदनंतर सदरचे वाहन दिनांक 12/12/2008 रोजी निरज हॉटेल गव्हाने रोड येथून चोरीस गेले सदर वाहनाचा युनायटेड इंडिया इन्शुरंस कं.लि. यांच्याकडून 1 वर्षासाठीचा विमा घेतलेला असल्यामुळे गैरअर्जदारास दिनांक 09/11/2009 रोजी रक्कम रु. 39,950/- चा धनादेश मिळाला.अर्जदाराने अगाऊ रककम रु. 7500/- व गैरअर्जदाराकडे भरणा करण्यात आलेले 4 हप्ते असे एकुण रु.24,008/- परत करण्याची मागणी केली असता गैरअर्जदाराने वरील रक्कम अर्जदारास देण्यास टाळाटाळ केली. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे. यावर गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदार हा त्याचा थकबाकीदार असल्यामुळे त्याला रक्कम मागण्याचा अधिकार नाही.मंचाच्या निर्णयासाठी एकमेव मुद्दा असा आहे की,अर्जदार हा गैरअर्जदाराचा थकबाकीदार आहे काय ? अर्जदाराने नि.4/5 वर स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या पासबुकची सत्यप्रत मंचासमोर दाखल केली आहे.त्याची पडताळणी केली असता असे लक्षात येते की, सदर वाहन चोरीस जाई पर्यंत अर्जदारास एकुण 8 हप्ते गैरअर्जदाराकडे जमा करावयाचे होते त्या 8 हप्त्यापैकी अर्जदाराने गैरअर्जदारास हप्त्यापोटी दिलेले चेक क्रमांक 688886 688888, 688891 व 688892 वठलेले दिसतात. पुढे अर्जदाराचे म्हणणे असे की, त्याने सदर वहान चोरीला गेल्याची तोंडी सुचना देवुन देखील गैरअर्जदाराने उर्वरित चेक्स बँकेत टाकले व ते बाऊंन्स झाल्यामुळे अर्जदाराकडे बाऊंन्सींग चार्जेस व O.D.C. वसुल करण्यात आले.तर गैरअर्जदाराने असा बचाव घेतला आहे की, वाहन चोरीस गेल्याचे अर्जदाराने कळविले नसल्यामुळे गैरअर्जदाराने चेक्स बँकेत टाकले व ते बाऊंन्स झाले यावर मंचाचे असे मत आहे की, नेहमीच्या व्यवहारात असे निदर्शनास येते की, फायनान्स कंपनी 2 -3 चेक्स बाऊंन्स झाले की, लगेच पुढील करवाई तत्परतेने करतात.परंतु प्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदाराने चेक्स बाऊंन्स झाल्यानंतरही कोणतेही कारवाई अर्जदारावर केलेली दिसत नाही यावरुन सदर वाहन चोरीला गेल्याची सुचना गैरअर्जदारास नक्कीच मिळाली असावी असे अनुमान काढावे लागेल.म्हणजे गैरअर्जदाराने जाणुन बुजून उर्वरित चेक्स जमा केले व ते त्यांच्या अपेक्षे प्रमाणे बाऊंन्स ही झाले पुढे दिनांक 09/11/2009 रोजी रक्कम रु. 39,950/- युनायटेड इंडिया इन्शुरंन्स कंपनीकडून मिळाल्याचे गैरअर्जदारास मान्य आहे. गैरअर्जदाराने मंचासमोर नि.19/1 वर दाखल केलेल्या हायरर लेझरच्या झेरॉक्स प्रतिवरुन दिनांक 09/11/2009 रोजी रक्कम रु.39098.19/- अर्जदाराकडून येणे असल्याचे दिसते.त्या रक्कमे मध्ये चेकबाऊन्सींग चार्जेस रु.3200/- व Overdue charges रक्कम रु. 5185/- चा अंतर्भाव आहे. गैरअर्जदाराने विनाकारण 11 चेक्स बँकेत टाकले त्यामुळे चेकबाऊंन्सींग चार्जेस रक्कम रु. 3200/- पैकी फक्त सदरचे वाहन चोरी होईपर्यंत बाऊन्स झालेले चेक्स दिसतात कारण दिनांक 07/12/2008 चा चेक गैरअर्जदाराने बँकेत टाकलेला नाही.व नि.19/1 पान क्रमांक 4 प्रमाणे Cheque Bounced details या कॉलम खाली दर्शविल्यानुसार रककम रु. 200/- प्रति चेक प्रमाणे रक्कम रु. 400/- वसुल करण्यास पात्र आहेत. त्यामुळे गैरअर्जदारास मिळालेली रक्कम रु.39,950/- मधून अर्जदाराकडून येणे असलेली ( 39098--2800) = रक्कम 36,298/-वजा केल्यास रक्कम रु.3652/- गैरअर्जदाराकडे येणे उरते.ती रक्कम गैरअर्जदाराने अर्जदारास द्यावयास हवी होती व मागणी करुन ही अर्जदारास उर्वरित रक्कम न देऊन गैरअर्जदाराने नक्कीच त्रुटीची सेवा अर्जदारास दिलेली आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात आले.तसेच अर्जदाराने अगाऊ रक्कम रु.17,500/- ची व हप्त्यापोटी भरलेल्या रक्कमेची केलेली मागणी अयोग्य असल्यामुळे ती मान्य करता येणार नाही.म्हणून सर्व बाबींचा सरासरी विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोंत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 गैरअर्जदाराने निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास रक्कम रु.3,652/-दिनांक 09/11/2009 पासून ते रक्कम पदरी पडे पावेतो 9 टक्के व्याजदराने द्यावी. 3 तसेच गैरअर्जदाराने मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रित रक्कम रु.1,000/- अर्जदारास आदेश मुदतीत द्यावी. 4 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. श्रीमती अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |