(मंचाचे निर्णयान्वये,श्री.अनिल एन.कांबळे,मा.अध्यक्ष) (पारीत दिनांक :21.06.2011) अर्जदारांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये सदर तक्रार सामुहिकरित्या एकञ दाखल करण्यास परवानगी मिळण्याचे अर्जासह दाखल केली आहे.. तक्रार नोंदणी करुन प्राथमिक सुनावणीकरीता दि.21.6.2011 रोजी ठेवण्यात आले. परंतु तक्रार न्यायमंचात प्राथमिक सुनावणीकरीता न्यायप्रविष्ठ असतांना, अर्जदारांतर्फे मुखत्यारपञधारक यांनी हजर होऊन नि.6 नुसार सदर प्रकरणात तांञीक अडचणी उद्भवल्याने, सदर तक्रार परत घेवून नव्याने पुनश्च दाखल करणार असल्याने, प्रकरण परत घेण्याची परवानगी मिळण्याचा अर्ज दाखल केला. त्यामुळे, अर्जदारांचे मुखत्यारपञधारक यांना नि.6 मधील मजकुराबाबत विचारणा केले असता, बरोबर असल्याचे मान्य केले. सबब, तक्रार परत घेतल्याने, अंतिमतः निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे. // अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार परत घेतल्यामुळे निकाली. (By way of withdrawal ) (2) अर्जदारांस मुळ कागदपञ असल्यास झेरॉक्स रेकॉर्डवर ठेऊन परत करण्यात यावे, तसेच सदस्य संच परत करण्यात यावे. (3) अर्जदारांस आदेशाची प्रत देण्यात यावी.
| [HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONORABLE Shri Sadik M. Zaweri] Member | |