Maharashtra

Nanded

CC/09/150

Balagi Bhimappa Jagshette - Complainant(s)

Versus

Directar,City and MIDC Development Mahamandal Limited - Cidco. - Opp.Party(s)

Adv.A.V.Choudhary

09 Oct 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/09/150
1. Balagi Bhimappa Jagshette Vivekanand Society Gopal Chavadi Hadco-Nanded.NandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Directar,City and MIDC Development Mahamandal Limited - Cidco. Cidco.NandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 09 Oct 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :-  2009/150.
                          प्रकरण दाखल तारीख - 06/07/2009
                          प्रकरण निकाल तारीख 09/10/2009
 
समक्ष मा.श्री.सतीश सामते                   - अध्‍यक्ष (प्र.)
               मा.श्रीमती सुजाता पाटणकर            - सदस्‍या
 
बालाजी पि. भिमाप्‍पा जगशेटटे,
वय 29 वर्षे, धंदा व्‍यवसाय,                              अर्जदार रा.विवेकानंद सोसायटी, गोपाळवाडी,
हडको, नांदेड.
विरुध्‍द.
1.   प्रशासक / व्‍यवस्‍थापक,
शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित,
     सिडको,                                          गैरअर्जदार
2.   शाखाधिकारी,
मुख्‍य शाखा कार्यालय,
शहर व औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय
उद्योग भवन, तापडिया फेम समोर,
औद्योगिक विकास महामंडळ, सिडको बसस्‍टँड ते
जळगाव रोड, औरंगाबाद.
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.अ.व्‍ही.चौधरी.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील      - अड.दिनकर नागापूरकर.
गैरअर्जदार क्र. 2 तर्फे             - कोणीही हजर नाही.
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्‍या )
 
              गैरअर्जदार शहर औद्योगिक विकास महामंडळ यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
 
              अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, अर्जदार यांनी दि.6.7.2006 रोजी आनंद नगर हौऊसिंग सोसायटी सिडको यांचेकडील एक प्‍लॉट ज्‍यांचा नंबर 22 ए सेक्‍टर मध्‍ये पूर्वीचे मालक जसपालसिंघ कापसे यांच्‍याकडून खरेदी केला होता. गैरअर्जदार क्र.1 यांच्‍याकडून नोंदणीकृत व अधिकृत करार करुन हस्‍तांतरण व्‍यवहार झाला होता. तसेच पूर्वीचे मालक व ताबेदार यांच्‍याकडून ट्रायपार्टी करार करुन घेतला होता. कापसे यांची दोन वारसदार मूले यांच्‍या संमतीसह वरील व्‍यवहार लिज डिड या करारा अंतर्गत सदरील प्‍लॉट हस्‍तांतरण करुन अर्जदार यांना वरील प्‍लॉटवरची आवश्‍यक ती रक्‍कम व इतर कायदेशीर बाबीची पूर्तता करुन प्राप्‍त झाला होता. त्‍यानंतर अर्जदाराने महानगरपालिकेतून त्‍यांच्‍या नांवे प्‍लॉट करुन घेतला. पूर्वीचे मालक यांनी दि.19.05.2006 रोजी बाकी असलेली रक्‍कम रु.31,437/- भरणा केले होते. पूर्वीची काहीही बाकी नसल्‍यामूळे अर्जदाराच्‍या हक्‍कात व्‍यवहार झाला होता. अर्जदार यांना सदर प्‍लॉटवर बांधकाम करायचे असल्‍यामूळे त्‍यांनी गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दि.16.12.2008 रोजी लेखी अर्ज केला. त्‍यासाठी अर्जदार यांनी दि.22.05.2009 रोजी रु.5,000/- लेट फि जमा केली. तरी देखील गैरअर्जदार यांनी बांधकाम परवाना दिला नाही म्‍हणून परत दि.3.6.2009 रोजी लेट फि चा भरणा केलेला असून लवकरात लवकर बांधकाम परवाना मिळावा अशी लेखी विनंती केली. याबाबत गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे तक्रार केली असता त्‍यांनी सदरच्‍या प्‍लॉटवर रु.98,000/- बाकी असल्‍याचे  तोंडी सांगितले. त्‍यामूळे अर्जदाराला धक्‍का बसला. त्‍यामूळे अर्जदाराने ही तक्रार करुन अशी मागणी केली आहे की, त्‍यांना वरील प्‍लॉट बददल नाहरकत देण्‍यात यावे तसेच झालेल्‍या शारीरिक, मानसिक व आर्थिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
 
                   गैरअर्जदार क्र.1 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे.अर्जदार यांनी जसपालसिंघ करतारसिंघ कापसे यांचेकडून प्‍लॉट घेतला व त्‍यांचा ताबा आहे हे गैरअर्जदार यांना मान्‍य नाही. कापसे  यांनी कोणता करार केला या बाबत त्‍यांना माहीती नाही. अर्जदार यांनी प्‍लॉट घेतवेळेस त्‍या प्‍लॉटवर पूर्वीचा काही बोजा, उजर तसेच आक्षेप अथवा काही बाकी आहे किंवा नाही यांची रितसार चौकशी करुन व्‍यवहार केलेला नाही. गैरअर्जदार यांनी अर्जदारास कधीही रु.5,000/- भरावयास सांगितले नव्‍हते. अर्जदारांनी कोणत्‍याही तारखेला गैरअर्जदाराला अर्ज दिलेला नाही. अर्जदाराने घेतलेल्‍या प्‍लॉटवर सन 1982 पासून रु.98,000/- ची बाकी आहे. अर्जदार हे बांधकाम परवानगी मिळविण्‍यासाठी कधीही आलेले नाहीत. अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडे नाहरकत प्रमाणपञ मिळविण्‍यासाठी केव्‍हाही आलेले नाहीत. अर्जदाराने दिलेल्‍या रक्‍कमा व तारखा गैरअर्जदार हे अमान्‍य करतात.दिवाणी दाव्‍या बाबत व स्‍थगिती बाबत त्‍यांना काहीही कल्‍पना नाही.. त्‍यामूळे त्‍यांना आर्थिक व शारीरिक ञास  होण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. अर्जदार हा ग्राहक या संज्ञेखाली येत नसल्‍यामूळे तक्रार अपाञ असून ती खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
 
              गैरअर्जदार क्र.2 यांना मंचाने पाठविलेली नोटीस मिळाली परंतु ते हजर झाले नाही म्‍हणून प्रकरण त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा करुन पूढे चालविण्‍यात आले.
 
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्‍हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारानी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                                       उत्‍तर
1.   अर्जदार गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ?                       होय.
2.   गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये
     कमतरता केली आहे काय ?                          होय.
3.   काय आदेश ?                           अंतिम आदेशाप्रमाणे
.
                        कारणे
 मूददा क्र. 1 ः-
              अर्जदार यांनी आनंदसागर हौऊसिंग सिडको येथील प्‍लॉट नंबर 22 ए सेक्‍टर मध्‍ये हा जसपालसिंघ करतारसिंघ कापसे या मूळ परवानाधारक मालक असलेल्‍या व्‍यक्‍तीकडून विकत घेतलेला आहे. त्‍यासाठी लागणारी आवश्‍यक ती फी व रक्‍कम अदा केल्‍यानंतरच सदरचा प्‍लॉट अर्जदार यांचे नांवे हस्‍तांतरीत करण्‍यात आलेला आहे. अर्जदार, गैरअर्जदार व जसपालसिंघ करतारसिंघ कापसे यांचेमध्‍ये TRIPARTIATE AGREEMENT झालेले आहे. दि.19.05.2006 रोजी अर्जदार यांनी Addl. Lease Premium म्‍हणून रु.31,437/- एवढी रक्‍कम गैरअर्जदार यांचेकडे भरलेली आहे. तशी गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना पावती दिलेली आहे. अर्जदारांचा अर्ज, शपथपञ व अर्जासोबत दाखल केलेली कागदपञे यांचा विचार होता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर वरील प्रमाणे देण्‍यात आले.
मूददा क्र.2 ः-
                 अर्जदार यांचे नांवे प्‍लॉट हस्‍तांतरण झाल्‍यानंतर अर्जदार यांना सदरचे प्‍लॉटवर बांधकाम करायचे असल्‍याने बांधकाम परवाना मंजूरी मिळणेसाठी मागणी केलेली आहे. त्‍यावेळी गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर प्‍लॉटवर बांधकाम परवानगी मिळण्‍यासाठी अर्जदार यांचेकडून रक्‍कम रु.5,000/- लेट फिस म्‍हणून भरणा करुन घेतलेले आहेत असे अर्जदार यांनी त्‍यांचे अर्जामध्‍ये नमूद केलेले आहे.  त्‍यावेळी बांधकाम करणे बाबतची आवश्‍यक त्‍या कागदपञाची पूर्तता केल्‍यानंतर बांधकाम परवाना मिळण्‍यासाठी सिडकोचे एनओसी आवश्‍यक असल्‍याने अर्जदार यांनी दि.03.06.2009 रोजी लेखी पञाद्वारे सिडको कार्यालय सिडको यांचेकडे एनओसी ची मागणी केलेली आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या लेखी म्‍हणण्‍यामध्‍ये अर्जदार यांचे अर्जातील पूर्ण कथन नाकारलेले आहे. गैरअर्जदार यांनी त्‍यांच्‍या अर्जातील कथन नाकारले म्‍हणजे त्‍यांची जबाबदारी संपत नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपञावर गैरअर्जदार यांची सही व शिक्‍का आहे. त्‍यामूळे अर्जदार यांचे कथन गैरअर्जदार यांनी नाकारले यांला कोणताही कायदेशीर अर्थ उरत नाही. अर्जदार यांनी प्‍लॉट खरेदी करतेवेळी गैरअर्जदार यांचेकडे अडीशनल लिज प्रिमियम म्‍हणून रक्‍कम रु.31,437/- चा भरणा केल्‍याचे दाखल कागदपञावरुन स्‍पष्‍ट होत आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपञावरुन अर्जदार यांनी प्‍लॉट घेतेवेळेस गैरअर्जदार यांचेकडे अडीशनल लिज प्रिमियम भरलेले आहे. अर्जदार यांना गैरअर्जदार यांनी बांधकाम करण्‍यासाठी आवश्‍यक असणारे नाहरकत प्रमाणपञ कोणतेही योग्‍य व कायदेशीर कारण नसताना दिलेले नाही. यांचा विचार होता गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्‍यामध्‍ये कमतरता केली आहे असे या मंचाचे मत आहे.
 
              अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून नाहरकत प्रमाणपञ मिळण्‍यासाठी मागणी केलेली आहे. कोणतेही योग्‍य व संयूक्‍तीक कारण नसताना गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नाहरकत प्रमाणपञ दिले नाही.अर्जदार यांनी प्रमाणपञाची मागणी करुनही गैरअर्जदार यांनी बांधकाम परवानासाठी आवश्‍यक असलेले नाहरकत प्रमाणपञ न दिल्‍यामूळे सदरचे प्रमाणपञ न मिळाल्‍यामूळे  अर्जदार यांना मानसिक ञासही झालेला आहे. गैरअर्जदार यांचेकडून नाहरकत प्रमाणपञ मिळण्‍यासाठी अर्जदार यांना या मंचामध्‍ये अर्ज करावा लागलेला आहे व त्‍या अनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. त्‍यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून अर्जाचे खर्चापोटी व मानसिक ञासापोटी रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.
 
              अर्जदार यांचा अर्ज शपथपञ व त्‍यांनी दाखल केलेली कागदपञे, त्‍यांचे तर्फे वकिलाचा यूक्‍तीवाद आणि गैरअर्जदार यांचे लेखी म्‍हणणे, शपथपञ व नि.12 ला गैरअर्जदार यांचेतर्फे दाखल केलेली लेखी म्‍हणणे हाच यूक्‍तीवाद समजण्‍यात यावा अशी पूरशीस, या सर्वाचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो.
 
                          आदेश
              आजपासून 30 दिवसांचे आंत,
1.                                         गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना प्‍लॉट नंबर 22 ए सेक्‍टर  यांचे नाहरकत प्रमाणपञ दयावे.
 
2.                                         गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल रु.3000/- व दावा खर्च म्‍हणून रु.2000/- दयावेत.
 
3.                                         पक्षकाराना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
श्रीमती सुजाता पाटणकर                         श्री.सतीश सामते     
            सदस्‍या                                             अध्‍यक्ष (प्र.)
 
 
 
जे.यू.पारवेकर.
लघूलेखक.