::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 10/10/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने दि. 12/04/12 ला 10,000/- रु. आणि दि. 17/05/12 ला 35,000/- गैरअर्जदार संस्थेत भरुन मुलगा शुभम विनोद पाटील याला दि. 17/05/12 पासून गैरअर्जदार संस्थेत दाखल करुन घेतले. अर्जदार यास कोचिंग मध्ये व राहण्याची व्यवस्था गैरअर्जदाराकडून योग्य पध्दतीने झाली नाही त्यामुळे अर्जदाराचा मुलगा ञासला व शिक्षण घेवू शकला नाही म्हणून अर्जदाराचे पती यांनी दि. 23/05/12 ला गैरअर्जदाराकडे योग्य सुविधा नसल्यामुळे मुलाला घरी घेवून आले. अर्जदाराने गैरअर्जदार संस्थेमध्ये सुविधेच्या अभावामुळे मुलगा पुढे शिकणार नाही अशी माहीती देवून दि. 08/06/12 रोजी लेखीपञ देवून भरलेली रक्क्म परत करण्याची मागणी केली. गैरअर्जदाराकडून असे आश्वासन आले कि, अर्जदाराने भरलेली रक्कम 1 महिण्यानंतर देण्यात येईल परंतु गैरअर्जदाराने सदर रक्कम परत दिली नाही म्हणून अर्जदाराने सदर रक्कमपरत मागण्याकरीता दि. 11/07/12 व 13/02/13 रोजी गैरअर्जदाराला पञ पाठविले त्या पञावर गैरअर्जदाराने कोणतीही दखल घेतली नाही व गैरअर्जदाराने अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली असून अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराची गैरअर्जदाराकडे जमा असलेली रक्कम अर्जदाराला व्याजासह परत मि�ळण्याचा आदेश दयावे तसेच अर्जदाराला झालेला शारिरीक, मानसिक ञासापोटी व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मि�ळण्याचा आदेश दयावे.
2. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून नि. क्र.13 (अ) वर दाखल केले. गैरअर्जदाराने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले कि, अर्जदार हा अज्ञान असल्यामुळे श्रीमती कविता विनोद पाटील यांना मुखत्यार पञ देण्याचे कोणतेही कायदेशिर अधिकार नाही. सबब सदर मुखत्यारनामा व्दारे अर्जदार याने प्रतिनिधी नेमणुकीची कार्यवाही सुध्दा बेकायदेशिर असून सदर तक्रार न्यायसंगत नसल्याकारणास्तव खारीज होण्यास पाञ आहे. अर्जदार प्रवेश घेतावेळी संबंधीत सर्व शर्ती व अटी अर्जदारचे आई-वडिलांना समजवून सांगितल्या होत्या व त्यावेळी अर्जदारातर्फे त्याच्या आई-वडिलांना अशी स्पष्ट समज देण्यात आली होती कि, प्रवेश घेतेवेळी फि संबंधीत जमा केलेली रक्कम अर्जदार जर मधातुन संस्था सोडत असेल तर ती परत मि�ळणार नाही. सदर अटी अर्जदाराला दिलेली रकमेची पावती वर सुध्दा नमुद आहे. अर्जदारातर्फे अर्जदाराचे वडीलांनी त्याची बदली डीपीसीएल धनबाद येथे झाल्यामुळे त्याचे मुलास यामुळे शिकविण्यास असमर्थ आहे अशा विनंतीच्या आधारे भरलेली फि परत मागण्याची विनंती केली होती. गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही न्युनतापूर्ण सेवा अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केलीनाहीव अर्जदाराने त्रारीत लावलेले आरोप खोटे असून गैरअर्जदाराला नाकबुल आहे सबब अर्जदाराचीतक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली आहे.
3. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? नाही.
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? नाही.
4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
4. अर्जदाराने दि. 12/04/12 ला 10,000/- रु. आणि दि. 17/05/12 ला 35,000/- गैरअर्जदार संस्थेत भरुन मुलगा शुभम विनोद पाटील याला दि. 17/05/12 पासून गैरअर्जदार संस्थेत दाखल करुन घेतले. ही बाब दोन्ही पक्षांना मान्य आहे म्हणून मंचाच्या मताप्रमाणे अर्जदार शुभम विनोद पाटील हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे असे सिध्द होते सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
5. अर्जदाराने दाखल केलेले नि. क्रं. 6 वर दस्त क्रं. अ- 1 ची पडताळणी करतांना असे दिसले कि, अर्जदाराने दि. 12/04/12 व 17/05/12 रोजी गैरअर्जदाराकडे प्रवेश करीता 45,000/- रु. भरले होते सदर दस्ताऐवज (पावत्या) वर असे नमुद आहे कि, ” Fees Once Paid would Not be refund under any circumstances.” तसेच नि. क्रं. 6 वर दस्त क्रं. अ- 2 चे अवलोकन करतांना असे दिसले कि, अर्जदाराचे वडीलांनी दि. 08/06/12 ला अर्जदाराचे अॅडमिशन रद्द करण्याबाबत पञ लिहीले होते. त्या पञामध्ये अॅडमिशन रद्द करण्याचे कारण असे दर्शविले होते कि, अर्जदाराचे वडील यांची बदली धनबाद येथे झाली होती म्हणून अर्जदार गैरअर्जदाराच्या संस्थेत शिकण्यास असमर्थ होते.
मा. राष्ट्रीय ग्राहक आयोग यांनी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार
2013(1) CPR 561 (NC) Madan Yadav through Legal Guardian & Mother V/s. Vinod Menon Decided on 18.2.13
Consumer Protection Act, 1986- Sections 15,17, 19 and 21 –Education –Coaching – Demand for refund of fee on declared failed in result of re-totaling- Fee was paid by petitioner despite knowing that at foot of receipt once fee paid is not refundable was written- Once coaching starts and student attends class once cannot claim money for that very year or semester- Revision petition dismissed.
6. अर्जदाराचे पालकांना प्रवेश घेते वेळी ही माहीती होती कि, एखादया संस्थेमध्ये प्रवेश फि भरली तर ती परत मिळणार नाही ही बाब अर्जदाराने दाखल नि. क्रं. 6 दस्त क्रं. अ – 1 वरुन सिध्द होते. नि. क्रं. 6 अ- 2 वरुन असे सिध्द होते कि, अर्जदाराने गैरअर्जदाराचे शिक्षण संस्थेत त्यांचे वडीलांच्या बदलीमुळे सोडले ना कि, सुविधेच्या अभावामुळे या कारणास मंचाचे मताप्रमाणे व वरील नमुद असलेल्या न्यायनिर्णयाचा आधार घेता असे सिध्द होते कि, गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती फिस परत न देवून कोणतीही सेवत ञुटी न देवून तसेच कोणतीही अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नाही सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
//अंतीम आदेश//
1) अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
2) उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
3) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 10/10/2014