जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/285 प्रकरण दाखल तारीख - 23/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 14/07/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री. सतीश सामते, - सदस्य. विठठलराव बाबुराव गाडे वय 66 वर्षे, धंदा पेन्शनर रा. राजेश नगर, तरोडा खुर्द नांदेड. अर्जदार विरुध्द 1. दिपक मित्ताल चेअरमन, सोनालिका इंन्टरनॅशनल कार्स अन्ड मोटर्स सोनालिका ग्रूप जांलधर रोड, होशियारपूर, पंजाब 2. पी.के.गांगूली, सर्व्हीस हेड,सोनालिका इंन्टरनॅशनल कार्स अन्ड मोटर्स सोनालिका ग्रूप जांलधर रोड, होशियारपूर, पंजाब गैरअर्जदार 3. चंद्रकांत मिसरीलाल बाफना अधिकृत विक्रेता, बाफना अटोमोटीव्हज, गट नं.235, पिंपळगांव महादेव, नांदेड अकोला रोड, ता.अर्धापूर जि. नांदेड. अर्जदारां तर्फे वकील - अड.ऐ.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.बी.सोलाट गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - अड. संजयकूमार शर्मा. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) 1. गैरअर्जदार यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार आपल्या तक्रारीत म्हणतात की, अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून दि.08.07.2008 रोजी रायनो आरएक्स एस-2 (एम.एच.26/व्ही/688 ) हे वाहन रु.6,88,625/- खरेदी केले. यासाठी इन्टरनॅशनल अटो ट्रक फायनान्स लि. चाक गुजराण यांचेकडून रु.5,00,000/- चे कर्ज घेतले. वाहन घेतल्यानंतर 15 दिवसांतच अचानक त्यात तांञित बीघाड होऊन त्यात दूरुस्तीचे काम नीघू लागले. त्यात टायरचे घर्षन वाजवीपेक्षा जास्त होऊ लागले. वाहनामधील पार्टस निकामी होऊ लागले. गैरअर्जदार यांनी सदरील वाहनाची एक वर्षाची वॉरंटी किंवा 50000 किलोमिटर पर्यत दिलेली होती.अर्जदराचे वाहन वॉरंटी कालावधीत वारंवार काम काढू लागली व 1000 किलोमिटरचे आंत वाहन नादूरुस्त झाले. यातील कारण म्हणजे त्यामधील पार्टस जे टायर, नकल ऑर्म, इंजिन ऑईल लिकेज इत्यादी अल्पावधीतच खराब होऊ लागले. यानंतर ही दोन वर्ष वाहन दूरुस्त केले. टायरच्या लवकर घर्षनामूळे तिन टायर बदलावे लागले. त्यासाठी माहे फेब्रूवारी 2009 मध्ये रु.12900/- खर्च झाला. वॉरंटी बाबत 16.1.2009, 21,01,2009 व दि.29.4.2009 रोजी पञव्यवहार केलेला आहे. यामूळे कर्जाचे फायनान्सचे हप्ते फेडणे अवघड झाले. गैरअर्जदार क्र.3 हे अधिकृत विक्रेता असल्यामूळे सव्हीसिंग सेंटर व पार्टस यांची सूवीधा, या हमीवर विश्वास ठेऊन अर्जदाराने व्यवहार केला. नांदेड येथील सेंटर गेल्या 14 महिन्यापासून बंद आहे. गैरअर्जदर क्र.1 व 2 यांना ही बाब निदर्शनास आणून दिली. वाहनाची सव्हीसिंग व दूरुस्तीची कामे ठराविक मर्यादा ठेऊन व्हायला पाहिजे. नादेंडला सव्हीसिंगची सूवीधा बंद झाली म्हणून नाईलाजास्तव कंपनीचे औरगाबाद येथील सव्हीसिंग सेटंर म्हणजे दिवेकर अटो पार्टस लि. यांचेकडे वाहन दूरुस्तीसाठी पाठविले. दि.19.1.2009 ते 29.01.2009 एवढा कालावधी दूरुस्तीसाठी लागला. एवढे करुनही वाहन दूरुस्त झाले नाही. दि.22.3.2009 रोजीच्या पञाद्वारे गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे कंपनीचे सव्हीस इंजिनिअर श्री. गजानन अग्नीहोञी हे नांदेडला येऊन वाहनाची दूरुस्ती करुन देतील असे सांगितले. परंतु त्यांनी काहीही कारवाई केली नाही. गैरअर्जदर यांचे ञूटीच्या सेवेमूळे व वॉरंटी कालावधीत रायनो आरएक्स एस-2 (एम.एच.26/व्ही/688 हे वाहन रिकृष्ट नीघाल्यामूळे नवीन वाहन देण्याचे करावेत किंवा वाहनाची किंमती वापस दयावी, इन्शूरन्स व टॅक्सची रक्कमही वापस दयावी, शिवाय गैरअर्जदार यांचेकडे वाहन जवळपास 85 दिवस पडून राहीले म्हणून प्रतिदिवस रु.1000/- प्रमाणे रु.85000/- दयावेत, औरंगाबाद येथे दूरुस्तीसाठी वारंवार जावे लागले म्हणून येण्याजाण्यासाठ खर्च रु.25,000/- दयावा, गैरअर्जदार यांनी दिलेल्या चूकीच्या सेवेमूळे मानसिक, शारीरिक ञास झाला त्याबददल रु.1,00,000/- दयावेत, तसेच दावा खर्च म्हणून रु.25,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. तक्रार अर्ज हा निरर्थक बेकायदेशीर असल्यामूळे तो खारीज करावा. तक्रार अर्जात नोंदलेली माहीती व दस्ताऐवजा मधील माहीती यामध्ये तफावत आहे. अर्जदाराने वादातील वाहन हे व्यवसायाठी विकत धेतले आहे त्यामूळे या मंचात तक्रार दाखल करता येणार नाही. अर्जदाराने तक्रारीसोबत जोडलेले दस्ताऐवज दिवेकर अटो यांचे जोडलेले आहे त्यांस अर्जदार यांनी पार्टी केलेले नाही. अर्जदाराने फायनान्सची रक्कम टाळण्यासाठी ही तक्रार दाखल केलेली आहे त्यामूळे ही तक्रार खोटी व बनावट आहे. इतर कोणतेही सकृतदर्शनी पूरावा दाखल केलेला नाही. अर्जदाराने वाहनाच्या माध्यमातून रोजीरोटी मिळविण्याच्या हेतूने खरेदी केलेले वाहन मूळातच कमर्शियल परपजचे आहे. अर्जदाराने कर्जास घेतलेली रक्कम फायनान्स कंपनीकडून घेतलेली आहे पण त्यांना पार्टी केलेले नाही. वाहनाचा वॉरंटीवीषयी कोणतेही कागदपञ दाखल केलेले नाहीत. वाहन खरेदी दि.3.7.2008 नंतर दि.15.8.2008 रोजी प्रथम सव्हीसिंग केलेली आहे, म्हणजे जवळपास 1 महिना उशिराने करण्यात आली आहे. जवळपास वाहन हे त्यावेळेस 6000 किलोमिटर चालले होते. वाहनाच्या कोणत्याही पार्टसच्या निर्मितीची वॉरंटी गैरअर्जदार यांनी दिली होती काय ? हे स्पष्ट केलेले नाही. अर्जदाराने वाहन व्यवसायीक कारणासाठी उपयोगात आणले आहे व अतीशय कमी कालावधीत फार मोठया प्रमाणात चालविलेले असल्या दस्ताऐवजावरुन सिध्द होते. वाजवीपेक्षा अधिक वापर असल्यामूळे टायरची झिज झाल्याचे दिसून येते. तसेच टायर्सची निर्मीती गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी केलेली नाही. टायरची झिज ही वापरण्यावर, हवेचा दाब, इत्यादी बाबीवर अवलंबून असते. अर्जदाराने अधिकाधिक लाभ मिळविण्यासाठी व्यावसायीक वापरासाठी वापरल्यामूळे वाहनाची योग्य निगा राखली नाही. दि.7.8.2009 रोजी नंतर गैरअर्जदार क्र.3 यांचकडून चार वेळा फ्रि सव्हीसिंग करुन घेतले आहे. निर्मीती दोषामूळे वाहन बंद असल्याचे किंवा नूकसानी बाबत सबळ पूरावा नसल्यामूळे तक्रार अर्ज रदद करावा असे म्हटले आहे. 3. गैरअर्जदार क्र.3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराने नमूद केल्याप्रमाणे रायनो आरएक्स एस-2 (एम.एच.26/व्ही/688 ) हे वाहन व्यावसायीक कारणासाठी खरेदी केलेले आहे. यांची नोंद इन्शूरन्स कार्यालयामध्ये आहे. कायदयाचे उल्लंघन करुन वाहनाचा व्यावसायीक वापर केलेला आहे. वाहन हे निकृष्ट दर्जाचे आहे हे सिध्द अर्जदाराने केले पाहिजे. गैरअर्जदार क्र.3 यांचे सोबत असलेला करार संपूष्टात आलेला आहे कारण सदर वाहनाची एजन्सी बंद करण्यात आलेली आहे. अर्जदाराने हे हेतूपूरस्कर दिवेकर अटो यांचे सर्व कागदपञ दाखल केले परंतू त्यांना पार्टी केलेले नाही. फ्रि सव्हीसिंग वॉरंटी कालावधीमध्ये करुन घेतलेल्या आहेत.सदर सव्हीसिंग नंतर वाहन योग्य कंडीशन मध्ये आहे असे जॉब कार्ड मध्ये नमूद करुन अर्जदाराने सही केलेली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वाहनाचे उत्पादक असून वाहना बददल कोणतीही सेवा, बीघाड, नादूरुस्त ही त्यांनी निर्मीती केलेल्या तज्ञ अभिंयत्या मार्फत करण्यात येते. अर्जदार यांनी वॉरंटी कराराचा भंग केलेला आहे व यासाठी ते जबाबदार आहेत. सबब तक्रारदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. 4. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी पूरावा म्हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- 5. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.3 यांचेकडून रायनो आरएक्स एस-2 (एम.एच.26/व्ही/688 ) विकत घेतले. यानंतर अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, वाहन खरेदी केल्या बराबर 1000 किलोमिटरचे आंतच त्यांचे वाहन नादूरुस्त झाले व त्यांचे कारणही त्यांनी सांगून टाकले व त्यामूळे सूटटे भाग व टायर इत्यादी खराब झाले. यातील त्यांनी अर्जातील क्र.1 ते 15 प्रमाणे एवढेच दोष सांगितले आहेत. गैरअर्जदार क्र.3 यांचे सव्हीसिंग सेंटर सूरुवातीला चालू होते त्यावेळेस त्यांनी त्यांचेकडून फ्री सव्हीसिंग वाहनाच्या करुन घेतल्या. याबददल एकही जॉब कार्ड अर्जदारातर्फे दाखल करण्यात आलेले नाही. अर्जदाराने दि.19.1.2009 व 28.1.2009 मध्ये 1000 किलोमिटर, अर्जदार यांनी वॉरंटी कार्ड जरी दाखल केले नसले तरी वाहनाची गैरअर्जदाराने एक वर्षाची वॉरंटी दिलेली होती. असे गृहीत धरल्यास जेव्हा तक्रारदार म्हणतात 1000 किलोमिटर म्हणजे पहिली सव्हीसिंग व त्यात त्यांनी 15 दोष सांगितले आहेत हे सर्व दोष फ्रि सव्हीसिंगचे वेळेस त्या जॉब कार्डवर नमूद करावयास पाहिजे होते व हे सांगितलेले दोष गैरअर्जदाराने दुरुस्त केले काय ? इत्यादी गोष्टीची जॉब कार्ड वर नोंद घेणे आवश्यक आहे. जॉब कार्ड समोरच नसेल तर केवळ तोंडी सांगण्यावरुन वाहनात काय दोष आहे हे ठरविता येणार नाही. यानंतर चार फ्रि सर्व्हीसिंग त्यात वाहनाची खरेदी दि.08.07.2008 रोजी व यानंतर गैरअर्जदार दिवेकर अटो औरंगाबाद हे अधिकृत सेंटर वर गेले व त्यांचे जॉब कार्ड दि.20.06.2009 व दि.5.3.2009 अशी दिलेली आहेत. म्हणजे साधारणतः सहा महिन्यानंतर नांदेड यांचे अधिकृत सव्हींस सेंटर (गैरअर्जदार क्र.3) हे बंद झाल्या कारणाने त्यांना जावे लागले. दि.दि.19.1.2009 ही दिनांक म्हणत असताना अर्जदाराने दि.20.06.2009 चे म्हणजे अजून पाच महिन्याचे नंतरचे जॉब कार्ड दाखल केलेले आहे. हे जॉब कार्ड पाहिल्यावर असे दिसून येते की, डोअर प्रोब्लेम हा कच्च्या रस्त्यावर चालविल्यामूळे किंवा रफ वाहन चालविल्यामूळे होऊ शकतो. (डोअर बिडींग, टायरविअर प्रोब्लेम, डोअर पॅड, ट्रीम्स चार्ज, बॅटरी वॉटर सिपेज चेक, ऑल इलेक्ट्रीकल्स अन्ड लाईट नॉट वर्क, पॉवर विन्डो, स्वीच चार्ज इत्यादी बाबी लिहीलेल्या आहेत. जवळपास वाहन घेतल्यानंतर 11 महिन्यानंतर येणारे दोष व वाहन हे 65000 किलोमिटर चालल्याची नोंद आहे. म्हणजे अर्जदार म्हणतात त्यातील तक्रारीप्रमाणे 50000 किलोमिटरच्या पूढे ही बाब गेलेली आहे. म्हणजे वॉरंटीच्या बाहेर गेलेली आहे. कालावधीनुसार एक महिन्याची वॉरंटी शिल्लक जरी असली तरी किलोमिटर प्रमाणे ती संपलेली आहे. हे दोष पाहिल्यास हे निर्मीती दोष आहेत असे म्हणता येणार नाहीत. वाहन वापरत असल्यामूळे मेंन्टंन्स मध्ये या बाबी नीघू शकतात. आता 65000 किलोमिटर नंतर टायरचा प्रॉब्लेम येऊ शकतो व ते बदलणे आवश्यक आहे. टायर फार तर 35000 ते 40000 किलोमिटर पर्यत चालू शकतात. स्वीच, ऑईल बॅटरी इत्यादी गोष्टी मेंन्टंन्स मध्ये मोडतात ते अधिकृत सर्व्हीसिग सेंटरने दूरुस्त करुन देणे आवश्यक आहे. यात टायमिंग बेल्ट हा कमी अवधीत गेलेला दिसतो. हा बेल्ट बदलण्यात आलेला असून त्यांची किंमत रु.2325/- लावण्यात आलेली आहे. दि.2.7.2009 चे रु.6962/- पेमेंट अर्जदाराने केले का नाही यावीषयी तक्रारीमध्ये अर्जदार काही म्हणत नाहीत. यात जे काही जॉब कार्ड दिलेले आहेत ते दिवेकर अटो यांचे दिलेले आहेत. त्यामूळे त्यांना पार्टी करणे आवश्यक होते परंतु यात त्यांना पार्टी करण्यात आलेले नाही. नि.3 वर कस्टंमर रिक्यायरमेंट म्हणून एक पञ जोडलेले आहे परंतु यांचे बददल काय झाले ते बदलण्यात आले काय यांचे बददल काहीही उल्लेख केलेला नाही. एक नजर टाकली असता बेटींग गॅस किट स्विच इत्यादी गोष्टी लिहीलेल्या आहेत.यांला निर्मीती दोष म्हणता येणार नाही. अर्जदाराने जे गैरअर्जदार क्र.1 व 2 व दिवेकर अटो यांनी दिलेले आहेत ते 5 व 6 महिन्याच्या कालावधीतील आहेत. यांचा अर्थ सूरुवातीचे 9 ते 10 महिने काही तक्रार नव्हती काय ? हा प्रश्न उदभवतो. गैरअर्जदार क्र.1 ला जे पञ लिहीलेले आहे ते दि.29.4.2009 चे आहे. यांला उत्तर म्हणून त्यांनी कंपनीचे अभिंयता पी.के.गांगूली यांनी दिले आहे. यानंतर अर्जदार यांनी त्यांना पञ लिहीलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 ने दि.22.3.2009 रोजीला अर्जदाराच्या नांवाने पञ लिहीलेले आहे. दि.15.1.2008 रोजी ला पीडीआय करण्यात आला. यात गैरअर्जदार क्र.3 यांनी वाहन ओके दिल्याचे म्हटले आहे. यानंतर 1000 किलोमिटरवर सव्हीसिंग केलेली आहे. ती दि.21.7.2008 रोजी ला केलेली आहे. म्हणजे वाहनाच्या खरेदीनंतर दि.8.7.2008 नंतर एक महिन्याने केलेली आहे. यानंतर दूसरी सर्व्हीसिंग 3000 किलोमिटर दि.13.8.2008ला करण्यात आलेली आहे. यानंतर तिसरी सर्व्हीसिंग 10000 किलोमिटरला दि.30.10.2008 रोजी करण्यात आलेली आहे. चौथी सव्हीसिंग ही 15000 किलोमिटर केली पण यावर सर्व्हीसिंगची दिनांक लिहीलेली नाही. किलोमिटर 14676 लिहीलेले आहे. पाचवी सर्व्हीसिंग 20000 किलोमिटर वर करण्यात आली का नाही ? या बददल सर्व्हीसिंग सेंटरचा शिक्का नाही. 25000 किलोमिटरच्या सर्व्हीसिंग सेंटरचा शिक्का नाही. परंतु या दोन्ही यांचेवर दिवेकर अटोचे नांव लिहीलेले आहे. चार सर्व्हीसिंग कूपन्सचे अवलोकन केले असता यावर जॉब कार्ड नबर व दिनांक नाही. शेवटचे दोन कूपन्सवर दिनांक व नांव नाही. अर्जदार म्हणतात की सूरुवातीस दोष होता. एवढया सर्व्हीसिंग झाल्यावर व दोन सर्व्हीसिंगच्या वेळेस ते दोष सांगितले आहेत काय ? व ते दूरुस्त झाले किंवा नाही हे समजणे अशक्य दिसते. दिवेकर अटोचे जे दि.5.3.2009 रोजीचे जॉब कार्ड आहे त्यावर ऑईल लिकेज चेक एवढेच लिहीलेले आहे. व्हील अलायमेंट असे लिहीलेले आहे. व्हील अलायमेंट हे तर दर 5000 किलोमिटरला करावेच लागते. दि.19.01.2008 चे जॉब कार्ड आहे त्यात जे वाहन बददल दोष दिलेले आहेत ते दूरुस्त केल्या बददल दिवेकर अटो ची पावती दिलेली आहे. यात देखील जूजबी दूरुस्त्या जे की मेन्टेंन्स खाली केलेल्या आहेत. निर्मीती दोष जसे की पिस्टन, इंजिन जाम होणे इत्यादी गोष्टी येऊ शकतात. पण त्या या वाहनामध्ये आलेल्या नाहीत. गैरअर्जदार यांचा मूख्य आक्षेप असा आहे की, अर्जदार हे वाहनाचा व्यावसायीक उपयोग करतात त्यामूळे वाहनाचा वापर हा खूप आहे त्यामूळे वाहन निष्काळजीपणे हाताळणे, जास्तीचे प्रवासी बसवणे, वाहन खराब रस्त्याने चालवीणे इत्यादी मूळे वाहन मेंन्टेन्स नीघते. सर्व जॉब कार्डवर लिहीलेले आहे ते मेंन्टेन्स अंतर्गत येते. दिवेकर अटोचे दि.22.9.2008 व 15.8.2008 यावर देखील सायलंसर पाईप, डोअर बिडिंग इत्यादी दोषच म्हटलेले आहे. अर्जदाराने दि.20.4.2009 ला जे मिटर रिंडीग दाखवलेले ओ ती 46239 किलोमिटरची आहे व टायरचे फोटो दाखवलेले आहे त्यांचे किलोमिटर काय आहे हे म्हटलेले नाही. टायर कडक झालेले दिसते म्हणजे अतीशय जूने झालेले आहेत. वाहनाचा वापर खूप आहे यावीषयी काही वाद नाही. एकंदर यात वाहन निर्मीतीत कंपनीचा मूख्यत्वे काही दोष आहे हे अर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत. गैरअर्जदार क्र.3 हे अधिकृत विक्रेते व सर्व्हीसिंग सेंटर यांचे नांदेड येथे होते. अधिकृत विक्रेते म्हणून डिलरशिप रदद झालेली आहे. त्यामूळे अर्थाअर्थी या प्रकरणात सबंध येत नाही. दिवेकर अटो यांनी यापूढील वारंवार सर्व्हीसिंग व दूरुस्त्या केल्या आहेत. त्यांनी टाईमींग बेल्ट सारखे काही पार्टस बदलून दिलेले आहेत. परंतु यावीषयी अर्जदार यांची तक्रार नाही. दिवेकर अटो या प्रकरणात पार्टी नसल्यामूळे त्यांचे विरुध्द काही आदेश करता येणार नाही. राहीला प्रश्न गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा निर्मीती दोष नसल्यामूळे त्यांनाही या प्रकरणात जबाबदार धरता येत नाही. 6. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक. |