मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई
ग्राहक तक्रार क्रमांक – 24/2011
तक्रार दाखल दिनांक – 07/02/2011
अंतिम आदेश दिनांक - 23/02/2011
श्री. यथीपथी व्यंकटाकिस्टम वेणूगोपाळ,
रा. बिल्डींग नंबर 1, फ्लॅट नंबर 230,
सरदार नगर नंबर 4, सायन कोळीवाडा,
अनटॉप हिल, मुंबई 400 037. ........ तक्रारदार
विरुध्द
श्री. दिनेश शिवाजीराव घाडगे,
प्रोप्रायटर ऑफ लग्झरी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स,
अनुराधा, ऑफीस बिल्डींग नंबर 13,
सरदार नगर नंबर 4, सायन कोळीवाडा,
मुंबई 400 037.
रजिस्टर्ड कार्यालय
514, दि ग्रेट इस्टर्न गॅल्लेरीया,
प्लॉट नंबर 20, सेक्टर 4, नेरुळ,
नवी मुंबई 400 706. ......... सामनेवाले
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया
मा. सदस्या, श्रीमती भावना पिसाळ
उपस्थिती – तक्रारदार हजर
- आदेश -
-
द्वारा - मा. अध्यक्ष, श्री. नलिन मजिठिया
प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दिनांक 07/02/2011 रोजी दाखल केलेली आहे. सदर तक्रार दिनांक 09/02/2001 रोजी सुनावणीकरीता आली. परंतु तक्रारदाराच्या वकीलांनी मौखिकरित्या तक्रारीत दुरुस्ती करण्याकरीता वेळ मागितला. परंतु तक्रारदार यांनी तक्रारीत दुरुस्तीकरण्याबाबत कोणताही अर्ज दाखल न करता, तसेच मंचाने कोणताच आदेश पारीत न करता दिनांक 09/02/2011 रोजी तक्रारीच्या पान क्रमांक 2 वर दुरुस्ती केलेली आहे. तसेच स्टेटमेंट ऑफ क्लेम तक्रारीत पान क्रमांक 132 वर दुरुस्ती केलेली आहे. तक्रार दुरुस्त केली, तक्रारदाराची मागणी देखील रुपये 20,00,000/- पेक्षा जास्त आहे, व तक्रार अधिकार क्षेत्रात येत नव्हती म्हणून तक्रारदार यांनी मंचाचा कोणताही आदेश नसतांना तक्रारीत दुरुस्ती केली, ही बाब संयुक्तीक नाही. त्यामुळे तक्रार ही कार्यक्षेत्रात येत नाही. तथापि मंच येथे नमूद करु इच्छितो की, तक्रारदार यांची तक्रार पुनश्च दाखल करण्याचा हक्क अबाधित करण्यात येतो. सबब मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश देत आहेत
- अंतिम आदेश -
1) तक्रारदाराची तक्रार क्रमांक 24/2011 ही दाखल करण्याचा हक्क अबाधित करुन खारिज करण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
3) सदर आदेशाची प्रत नियमाप्रमाणे उभयपक्षांना पाठविण्यात यावी.
दिनांक – 23/02/2011
ठिकाण - मध्य मुंबई, परेल.
(भावना पिसाळ) (नलिन मजिठिया)
सदस्या अध्यक्ष
मध्य मुंबई ग्राहक तक्रार न्याय निवारण मंच, परेल मुंबई
एम.एम.टी./-